नवरात्र विशेष
आश्विन शु. प्रतिपदा (१९ सप्टेंबर २००९) या दिवसापासून नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्त आज देवीच्या पूजेची कृती आणि महत्त्व, तसेच कुमारिका पूजन केल्यामुळे होणारा परिणाम यांविषयी जाणून घेऊया.
देवीच्या पूजेची कृती आणि महत्त्व
देवीपूजनाची सांगता खण अन् साडी देवीला अर्पण करून करावी. देवीला साडी अर्पण करतांना ती सुती किंवा रेशमी असावी. या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांपेक्षा अधिक असते. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी ठेवून त्यावर खण आणि त्यावर नारळाची शेंडी देवीकडे ठेवून देवीला चैतन्य देण्याविषयी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी भावपूर्ण प्रार्थना करून सगुण देवीतत्त्व जागृत करावे आणि खण-नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर देवतेच्या चरणांवरील वस्त्र देवतेचा प्रसाद म्हणून परिधान करावे आणि नारळाचाही प्रसाद म्हणून उपयोग करावा.
महत्त्व
अ. नारळ : नारळाच्या शेंडीकडे देवतेचे तत्त्व आकृष्ट होते आणि ते खण अन् साडी यांमध्ये संक्रमित होण्यास मदत होते. नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणार्या लहरींमुळे जिवाच्या शरिराभोवती संरक्षण कवच निर्माण होते.
आ. वस्त्र : वस्त्रातून पृथ्वीतत्त्वाच्या साहाय्याने प्रक्षेपित होणार्या लहरी या नारळातून आपतत्त्वाच्या साहाय्याने प्रक्षेपित होणार्या सात्त्विक लहरींमुळे गतिमान बनतात व या लहरींचे जिवाच्या देहाभोवती संरक्षण कवच निर्माण होण्यास मदत होते.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `शक्ती')
कुमारिका-पूजन केल्यामुळे होणारा परिणाम
सूक्ष्मातील स्पंदनांचे प्रमाण (टक्के)
ईश्वरी तत्त्व : १.२५
चैतन्य : २
शक्ती (अप्रकट) : ४
१. `यजमान पत्नीसह कुमारिकेचे पूजन करतात, त्या वेळी त्यांनी `प्रत्यक्ष देवीचेच पूजन करत आहोत', असा भाव ठेवल्याने त्यांच्या ठिकाणी भावाचे वलय निर्माण होते.
२. यजमानांनी भावपूर्ण पूजन केल्यामुळे कुमारिकेमध्ये ईश्वरी तत्त्व आकृष्ट होते.
२ अ. ईश्वरी तत्त्वाचे वलय कुमारिकेमध्ये निर्माण होते.
चैतन्य
३. चैतन्याचा प्रवाह आकृष्ट होतो.
३ अ. चैतन्याचे वलय कार्यरत स्वरूपात फिरते.
३ आ. चैतन्याच्या कणांचे वातावरणात प्रक्षेपण होते.
शक्ती
नवरात्रीमध्ये श्री दुर्गादेवीच्या पूजनानंतर कुमारिकेचे पूजन केले जाते.
४. देवीतत्त्वाच्या अप्रकट शक्तीचा प्रवाह कुमारिकेकडे आकृष्ट होतो.
४ अ. अप्रकट शक्तीचे वलय निर्माण होते.
४ आ. या वलयातून शक्तीच्या प्रवाहाचे प्रक्षेपण पूजन करणारे यजमान आणि पत्नी यांच्याकडे होते.
४ इ. अप्रकट शक्तीचे वलय यजमान पती आणि पत्नी यांच्यामध्ये निर्माण होते.
४ ई. कुमारिकेकडून शक्तीचे कण वातावरणात, तसेच यजमान आणि त्यांची पत्नी यांच्या देहात पसरतात.
इतर सूत्रे
१. कुमारिकेत मनावरील संस्कार आणि अहं यांचे प्रमाण न्यून असल्यामुळे ईश्वरी चैतन्य आकृष्ट होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे जाणवले.
२. सवाषिणीच्या पूजनातून प्रकट शक्तीचे प्रक्षेपण होते आणि कुमारिकेच्या पूजनातून अप्रकट शक्तीचे पूजन होते. त्यामुळे सवाषिणीच्या पूजनातून शक्तीच्या प्रक्षेपणाचे कार्य कुमारिकेकडून प्रक्षेपित होणार्या शक्तीपेक्षा अधिक असते.
३. कुमारिकेच्या पूजनातून आनंदाची स्पंदने अधिक प्रमाणात जाणवतात.
४. त्यानंतर कुमारिकेला सौंदर्यप्रसाधने (पावडर, फणी, कुंकू, आरसा इत्यादी.), दूध, वस्त्र, फळे आणि द्रव्य देऊन तिचे पूजन केले जाते.
हे देवीच्या तारक रूपाची भक्ती केल्याप्रमाणे असल्याचे जाणवले.'- कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था, गोवा. (भाद्रपद कृ. नवमी, कलियुग वर्ष ५१११ (१३.९.२००९)