विधिवत साष्टांग नमस्कार म्हणजे काय व तो करण्यामागील शास्त्र काय ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
साष्टांग नमस्काराची व्याख्या काय ?
विधिवत साष्टांग नमस्कार म्हणजे काय व तो करण्यामागील शास्त्र काय ?

षडरिपू, मन व बुद्धी या आठ अंगांसह ईश्‍वराला शरण जाणे, म्हणजे साष्टांग नमस्कार करणे होय। षडरिपू हे सूक्ष्ममनाशी संबंधित आहेत। वरील व्याख्येत मन व बुद्धी हे दोन घटक अनुक्रमे स्थूलमन व स्थूलबुद्धी याअर्थी वापरले आहेत. ईश्‍वरप्राप्‍तीची तळमळ ६० टक्क्यांच्या पुढे असलेला साधकच `अहं'सहित शरण येऊ शकतो; म्हणून वरील व्याख्या ही सर्वसाधारण तळमळ असलेल्या साधकाच्या संदर्भातील आहे.' (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून मिळालेले ईश्‍वरी ज्ञान, ८.७.२००५, दुपारी १.३४)(षडरिपू म्हणजे चित्तावर जन्मोजन्मीच्या असलेल्या संस्कारांचा आविष्कार. संस्कार हे चित्ताशी, म्हणजे अंतर्मनाशी संबंधित असतात व अंतर्मन हे बाह्यमनाच्या तुलनेत सूक्ष्म आहे. यासाठी षडरिपू हे सूक्ष्ममनाशी संबंधित असतात, असे येथे म्हटले आहे. सर्वसाधारणत: ज्यांना आपण विचार करणारे मन (बाह्यमन) व विचार करणारी बुद्धी असे संबोधतो, त्यांना येथे अनुक्रमे स्थूलमन व स्थूलबुद्धी असे संबोधले आहे. - संकलक)

विधिवत साष्टांग नमस्कार म्हणजे काय व तो करण्यामागील शास्त्र काय ?

उरसा शिरसादृष्ट्या मनसा वचसा तथा पद्भ्यां कराभ्यां जानुभ्यां प्रणामोऽष्टांगमुच्यते ।अर्थ : १। छाती, २. शिर (डोके), ३. दृष्टी (डोळयांनी नमस्कार करणे), ४. मन (मनाने नमस्कार करणे), ५. वाचा (तोंडाने `नमस्कार' असे म्हणणे), ६. पाय, ७. हात व ८. जानू (गुडघे), जमिनीला टेकवून नमस्कार करणे म्हणजे साष्टांग नमस्कार. `याप्रमाणे केल्या जाणार्‍या नमस्काराला `विधिवत नमस्कार' असे म्हणतात. यामध्ये कायिक, वाचिक व मानसिक पद्धतीने देवतांना शरण येऊन त्यांना आवाहन केले जाते.

संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'
Read more...

मारुतीला नारळ अर्पण करण्यामागील शास्त्र ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
मारुतीला नारळ अर्पण करण्यामागील शास्त्र ?
मारुतीला प्रदक्षिणा घालण्यामागील शास्त्र ?
मारुतीचा जप करण्यामागील शास्त्र ?
मारुतीला तेल वाहाण्यामागील शास्त्र ?

मारुतीच्या देवळात जाऊन मारुतीला नारळ अर्पण करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. नारळ हा चांगल्या तसेच वाईट, अशा दोन्ही प्रकारच्या लहरी आकर्षित व प्रक्षेपित करू शकतो. नारळ अर्पण करण्यापूर्वी मारुतीच्या मूर्तीसमोर नारळाची शेंडी धरावी व मारुतीची सात्त्विक स्पंदने नारळात यावीत यासाठी मारुतीची प्रार्थना करावी।



त्यानंतर नारळ वाढवून त्याचा अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा व राहिलेला अर्धा भाग तेथील स्थानदेवतेला अर्पण करावा. यामुळे स्थानदेवतेच्या माध्यमातून देवळाच्या परिसरातील त्रासदायक शक्‍ती व कनिष्ठ भुते यांना उतारा मिळून तीही संतुष्ट होतात. नंतर आपल्यासाठी ठेवलेला नारळाचा अर्धा भाग प्रसाद म्हणून ग्रहण केल्याने मारुतीच्या सात्त्विक लहरींचा लाभ होतो। काही भाविक देवाला नारळ पूर्णत: अर्पण करून टाकतात। नारळ पूर्णत: अर्पण करून टाकल्याने त्यांच्या मनात फक्‍त त्यागाची भावना क्वचितच उत्पन्न होते; त्यातून त्यांना आध्यात्मिक लाभ होत नाही। यासाठी शक्यतो देवाला पूर्ण नारळ अर्पण करू नये। त्याऐवजी नारळ वाढवून नारळाचा अर्धा भाग देवळात देऊन अर्धा भाग आपल्यासाठी ठेवावा व देवतेच्या तत्त्वाचा अधिकाधिक लाभ घ्यावा. एखाद्या व्यक्‍तीला वाईट शक्‍तीचा त्रास असल्यास तो दूर करण्यासाठी त्या व्यक्‍तीवरून नारळ उतरवावा व त्यानंतर तो मारुतीच्या देवळात फोडावा. व्यक्‍तीवरून नारळ उतरवल्याने व्यक्‍तीतील वाईट शक्‍ती नारळात येते व तो नारळ मारुतीच्या देवळात फोडल्यावर त्यातून बाहेर पडणारी वाईट शक्‍ती मारुतीच्या सामर्थ्याने नष्ट होते. त्यानंतर तो नारळ विसर्जित करावा

मारुतीला प्रदक्षिणा घालण्यामागील शास्त्र ?
मारुतीचे पंचतत्त्वांवर आधिपत्य असल्याचे प्रतीक म्हणून मारुतीच्या देवळात दर्शन घेतल्यानंतर पाच प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा नेहमी घड्याळाच्या काट्यांच्या दिशेनेच घालावी. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवाला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा जास्त घालायच्या असल्यास त्या शक्यतो किमान प्रदक्षिणेच्या संख्येच्या पटीत घालाव्यात. प्रदक्षिणा घातल्याने देवाकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य कमी कालावधीत संपूर्ण शरीरात संक्रमित होते.

मारुतीचा जप करण्यामागील शास्त्र ?
मारुतिस्तोत्रात `भूतप्रेतसमंधादि, रोगव्याधि समस्तही । नासती तूटती चिंता, आनंदें भीमदर्शने ।।', अशी मारुतीची महती गायली आहे. मारुति हा सर्वशक्‍तीमान असल्यानेच त्याला भूत, पिशाच, राक्षस, समंध इत्यादी कोणत्याही आसुरी शक्‍ती त्रास देऊ शकत नाहीत.
लंकेत लाखो राक्षस होते, तरीही ते मारुतीला काही करू शकले नाहीत. आसुरी शक्‍तींपासून रक्षण होण्यासाठी मारुतीची उपासना म्हणूनच विशेष फलदायी ठरते. व्यक्‍तीला आसुरी शक्‍तींचा त्रास असल्यास तो दूर होण्यासाठी तिला मारुतीच्या देवळात नेणे, तिच्यावरून नारळ उतरवून मग तो नारळ मारुतीच्या देवळात फोडणे, तिला मारुतिस्तोत्र म्हणण्यास सांगणे, तिला मारुतीचा नामजप करण्यास सांगणे यांसारखे उपाय करता येतात. मारुतीचा नामजप अखंड करणार्‍याला मारुतीची शक्‍ती व चैतन्य अखंड लाभल्याने त्याचे आसुरी शक्‍तींपासून सदैव रक्षण होते; म्हणून नामजप हा सर्व उपायांपैकी सर्वांत प्रभावी उपाय आहे.

मारुतीला तेल वाहाण्यामागील शास्त्र ?
मारुतीच्या उपासनेने शनिग्रहपीडाही दूर करता येते. याचा विधी याप्रमाणे आहे. एका वाटीत तेल घ्यावे. त्यात चौदा काळे उडीद टाकून त्या तेलात स्वत:चा चेहरा पहावा. मग ते तेल मारुतीला वाहावे.
एखादी आजारी व्यक्‍ती जर मारुतीच्या देवळात जाऊ शकत नसली, तरीही याच पद्धतीने तिला पूजा करता येते. तेलात चेहर्‍याचे प्रतिबिंब पडते, तेव्हा वाईट शक्‍तीचेही प्रतिबिंब पडते. ते तेल मारुतीला वाहिल्यावर त्यातील वाईट शक्‍तीचा नाश होतो. मारुतीला वाहायचे असलेले तेल मारुतीच्या देवळाबाहेर बसलेल्या तेलविक्रेत्याकडून विकत न घेता घरून नेऊन वाहावे. याचे कारण म्हणजे एखादी व्यक्‍ती ज्या अनिष्ट शक्‍तीच्या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी तेलविक्रेत्याकडून तेल विकत घेऊन ते मारुतीला वाहात असेल, ती अनिष्ट शक्‍ती त्या तेलविक्रेत्याला त्रास देण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी तेल घरून नेऊन वाहावे.

(संदर्भ : सनातन-निर्मित `अध्यात्मशास्त्र' या ग्रंथमालिकेतील खंड ८ `विष्णु व विष्णूची रूपे')

Read more...

एका हाताने नमस्कार करू नये

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
एका हाताने नमस्कार करू नये, असे शास्त्र असतांना देवळाच्या पायरीला आपण एका हाताने का नमस्कार करतो ?

उत्तर : देवळाचा परिसर हा इतर परिसराच्या मानाने मुळातच सात्त्विक असल्याने तेथे कोणतेही कर्म भावरहित जरी केले, तरी इतर ठिकाणच्या तुलनेत थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु सात्त्विकतेचा लाभ होतोच। देवळाच्या पायर्‍या चढता चढता पायरीला स्पर्श करून नमस्कार करणे, ही शरिराचा तोल सांभाळून कमी कालावधीत करावयाची एक सात्त्विक कृती आहे. पायर्‍या चढणे, या रजोगुणी हालचालीमुळे जिवाच्या शरिरातील रजोगुण कार्यरत झालेला असतो. एका हाताने म्हणजेच उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श केल्याने चैतन्यभूमीतील सात्त्विक व शांत लहरी हाताच्या बोटांतून शरिरात संक्रमित होत गेल्याने एक प्रकारे सातत्याने जिवाच्या शरिरातील रजोगुणावर सूर्यनाडीच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जाते, म्हणजेच सूर्यनाडीच्या कार्याचे क्षणिक शमन करणे शक्य होते. या प्रक्रियेतून जिवाला रजोगुणातूनही सात्त्विकतेचे संवर्धन करण्यास शिकवले जाते. म्हणून त्या त्या स्तरावर ती ती कृती करणे योग्य ठरते.

(संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती')
Read more...

देवळात प्रवेश करतांना पायरीला नमस्कार कसा करावा ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

कृती : पायरीला उजव्या हाताची बोटे लावून तोच हात डोक्यावर फिरवावा.

शास्त्र : `देवळाच्या प्रांगणात देवतांच्या लहरींच्या संचारामुळे सात्त्विकता वाढलेली असते. परिसरातील चैतन्यामुळे पायर्‍यांनाही देवत्व प्राप्‍त झालेले असल्याने, पायरीला उजव्या हाताची बोटे लावून तोच हात डोक्यावर िफिरवण्याची पद्धत आहे. पायर्‍यांवरील धूळही चैतन्यमय असते आणि तिचाही आपण मान राखायचा असतो व तिच्यातील चैतन्याचाही फायदा करून घ्यावयाचा असतो, हे यावरून लक्षात येते. नमस्कार करतांना `पायरीत आलेले देवतेचे चैतन्य हातातून संपूर्ण शरिरात संक्रमित होत आहे', असा भाव ठेवल्याने जिवाला अधिक फायदा होतो; परंतु या वेळी जिवाचा अहंही कमी असेल, तर नमस्काराचे मिळणारे फळ सर्वाधिक असते। कुठलीही कृती ही `स्व'चा त्याग करून केली असता, ते अकर्म कर्म होते।

(संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती')
Read more...

नमस्कार कसा करावा ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

नमस्कार करण्याचे व्यावहारिक फायदे`नमस्कार करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की, ज्याला आपण नमस्कार करतो, त्याच्याकडून आपल्याला आध्यात्मिक व व्यावहारिक फायदे व्हावेत।

व्यावहारिक फायदे : देवाला किंवा संतांना नमस्कार केल्याने त्यांचे गुण व कर्तृत्व यांचा आदर्श आपल्यासमोर नकळत उभा रहातो. त्यानुसार आपण स्वत: आचरण करू लागतो व स्वत:मध्ये बदल करू लागतो.

शरणागतीचा व कृतज्ञतेचा भाव वाढणे : नमस्कार करतांना `मला काहीही येत नाही, तुम्हीच सर्व करा, मला तुमच्या चरणांशी स्थान द्या', असे विचार असल्यावर शरणागतीचा व कृतज्ञतेचा भाव वाढण्यास मदत होते.

सात्त्विकता मिळणे व आध्यात्मिक उन्नती जलद होणे

अ . नमस्काराच्या मुद्रेतून आपल्याला सात्त्विकता जास्त प्रमाणात मिळते.

आ. देवाला किंवा संतांना नमस्कार केल्याने त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या सत्त्वलहरी किंवा आनंदलहरी आपल्याला मिळतात.

इ . देवाला किंवा संतांना नमस्कार केल्यामुळे आपल्याला त्यांचे आशीर्वादही मिळतात. त्यामुळे आपली आध्यात्मिक उन्नती जलद होण्यास मदत होते.

(संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती')












इंग्रजी मध्ये नमस्कार कसा करावा ? या विषयी माहिती हवी असल्यास येथे टिचकी मारा


Read more...

महर्षी व्यास

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

लाखापेक्षा अधिक श्लोकसंख्या असलेले महाभारत न थांबता सांगून ते श्लोक लिहिण्याबद्दल गणपतीची अट पुरी करणारे महर्षि व्यास !



`वेदव्यासांनी साक्षात् गणेशालाच आपला लेखक बनवले. त्यांना महाभारत लिहायचे होते. लाखापेक्षा अधिक श्लोकांचा प्रचंड असा तो महाग्रंथ महाभारत ! हा प्रचंड ग्रंथ कोण लिहिणार ? असा बुद्धिमान, प्रज्ञासंपन्न, ऋतंभरा, प्रज्ञेचा महापुरुष कसा लाभायचा ? व्यासांनी ग्रंथ लिहिण्यासाठी विद्येच्या देवतेची, गणेशाची प्रार्थना केली. गणपतीने काही अटींवर होकार दिला. त्या अटींप्रमाणे व्यासांनी सारखे श्लोक सांगत जायचे व कुठेही थांबायचे नाही. व्यास विचार करायला थांबले, तर गणपति लेखन थांबवेल व पुढे तो लिहिणार नाही. व्यासांनीही शर्त सांगितली, ``जे जे मी सांगेन, ते ते अर्थ ग्रहण करून समजून उमजूनच लिहायचे. केवळ अक्षरे कागदावर रेखाटायची नाहीत. अर्थाचे अनुसंधान साधूनच श्लोक लिहायचे.'' गणपतीने होकार दिला. व्यास जसे सांगत गेले, तसा गणपति अर्थानुसंधान राखत लिहीत गेला. व्यासांना विचार करायला सवडच सापडत नव्हती. व्यासही चतुर होते. पुढचे श्लोक मनात जुळवण्याकरिता त्यांना वेळ हवा असे, त्या वेळी ते कूटश्लोक सांगत. `श्लोकांचा अर्थ लवकर कळूच नये', असे कूटार्थाचे (दोन-दोन, तीन-तीन अर्थ करता येतील असे) श्लोक सांगत. असा कूटश्लोक आला की, गणपतीला विचार करावा लागे. तोवर व्यासांना सवड मिळत असे. व्यास नवे नवे श्लोक मनात रचत आणि सांगत. अशा रीतीने लाखापेक्षा अधिक श्लोकसंख्या असलेले महाभारत व्यासांनी सांगितले आणि गणपतीने लिहिले. महाभारतात जे नाही, ते जगात कुठेच नाही. `यन्न भारते, तन्न जगति ।' जगातले सर्वच्यासर्व सारस्वत वाड्मय हे व्यासांचे उच्छिष्ट आहे. `व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम् ।' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

साभार : महर्षी व्यास जयंती विशेषांक

Read more...

सहस्रचंद्रदर्शन शांतीविधीतील मंत्रांमुळे होणारे फायदे

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
शांती करणे


सहस्रचंद्रदर्शन शांतीविधीतील मंत्रांमुळे होणारे फायदे

अ. विधीतील मंत्रांमध्ये साधना व जीवनाचा उद्देश सांगितला आहे. त्यामुळे लिंगदेहावर चैतन्याच्या जोडीला साधना करण्याचाही संस्कार होतो.

आ.या ज्ञानाचे स्मरण मृत्यूपर्यंत व मृत्यूसमयी झाल्यामुळे जिवाचा अहं कमी होण्यास मदत होते.

इ. जिवाच्या मनात सत्चे विचार व जिवाची सात्त्विकता वाढण्यास मदत होते.

ई. त्यामुळे पुढचा जन्म घेतांना जिवामध्ये वाईट शक्तींचा प्रतिकार करण्याची उपजतच क्षमता निर्माण होते.

उ. अशा जिवाला गर्भात धारण करणार्‍या मातेलाही प्रसूतीपूर्वी व प्रसूतीच्या वेळी शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्तरांवर त्रास होण्याचे प्रमाण कमी असते. याउलट गर्भातील जिवाच्या सूक्ष्म-देहांवर चैतन्य व साधना यांचे संस्कार झाल्यामुळे मातेला गर्भातील जिवाचा सत्संग लाभतो व आनंद आणि चैतन्य यांची अनुभूती येते. (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून)

(संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील ग्रंथ `धार्मिक व सामाजिक कृतींमागील शास्त्र')
Read more...

वाढदिवस कसा साजरा करवा ?

2 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
वाढदिवस

वाढदिवस साजरा करण्याची पद्धत


`व्यक्‍ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग' हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. या सिद्धांताला अनुसरून धर्माचरणाच्या पद्धतीही निरनिराळया आहेत. पद्धती भिन्न असल्या तरी त्यांच्यामुळे साध्य होणारा परिणाम हा सारखाच असतो, म्हणजे त्या पद्धतींमुळे ईश्‍वरी तत्त्वाचा लाभ हा मिळतोच. आपापल्या प्रकृतीप्रमाणे ज्याला जी पद्धत सोयीस्कर वाटेल, त्याने ती अवलंबणे उपयुक्‍त ठरते. वाढदिवस साजरा करण्याची आज पद्धत पुढे देत आहोत.


अभ्यंगस्नान करणे : वाढदिवसाच्या दिवशी सचैल म्हणजे वस्त्रांसहित अभ्यंगस्नान करावे। (वाढदिवसाच्या दिवशी स्नान करणे, हे स्नानाच्या माध्यमातून भूतकाळ विसरून सतत वर्तमानकाळाचे भान रहाण्यासाठी ईश्‍वराची प्रार्थना करण्याचे प्रतीक आहे.) स्नान करतांना `स्नानाचे जल निर्मळ व शुद्ध गंगेच्या रूपात आपल्या अंगावर पडून आपला देह व अंत:करण यांची शुद्धी होत आहे', असा भाव ठेवावा.

आ. स्नानानंतर नवीन वस्त्रे परिधान करावीत.

इ. आई-वडील तसेच वडीलधार्‍या व्यक्‍ती यांना नमस्कार करावा.

ई. कुलदेवतेला अभिषेक करावा किंवा तिची मनोभावे पूजा करावी.

उ. औक्षण करणे : ज्याचा वाढदिवस असेल, त्याचे औक्षण करावे. औक्षण करवून घेणारा, तसेच ते करणारा यांनी `एकमेकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष ईश्‍वरच कृतीस्वरूप कार्य करून आम्हाला आशीर्वाद देत आहे', असा भाव ठेवावा. औक्षण झाल्यावर कुलदेवता किंवा उपास्यदेवता यांचे स्मरण करून वाढदिवस असलेल्याच्या डोक्यावर तीन वेळा अक्षता टाकाव्यात.

ऊ. भेटवस्तू : ज्याचा वाढदिवस असेल, त्याला काहीतरी भेटवस्तू द्यावी. भेटवस्तू देतांना पुढील दृष्टीकोन ठेवावा. लहान मुलाला कर्तव्यबुद्धीने त्याचे कौतुक करण्यासाठी भेटवस्तू द्यावी. मोठ्यांना भेटवस्तू देतांना कर्तेपणा बाळगू नये. अपेक्षा न ठेवता एखाद्याला दान दिले, तर काही काळाने आपण त्या दानाविषयी विसरूनदेखील जातो. वाढदिवसाच्या दिवशी द्यावयाचे दान हे असे असावे लागते. दानाविषयी कर्तेपणा किंवा अपेक्षा बाळगल्यास देवाणघेवाण हिशोब निर्माण होतो. दान किंवा भेटवस्तू स्वीकारणार्‍याने `हा ईश्‍वरकृपेने मिळालेला प्रसाद आहे', असा भाव ठेवल्यास देवाणघेवाण हिशोब निर्माण होत नाही.

ए. `सत्पात्रे दानम्' : वाढदिवसाच्या दिवशी ज्या वस्त्रांसहित स्नान केले, ती वस्त्रे स्वत: न वापरता कोणालाही अपेक्षा न ठेवता दान करावीत. दान हे `सत्पात्रे दानम्' होण्यासाठी ते भिकारी वगैरेंना देण्यापेक्षा देवाची उपासना करणार्‍यांना किंवा राष्ट्र व धर्म यांच्या हितासाठी कार्य करणार्‍यांना देणे पुण्यदायी ठरते.

(संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील ग्रंथ `धार्मिक व सामाजिक कृतींमागील शास्त्र')


अधिक अध्यात्मशास्त्रीय माहिती साठी येथे टिचकी मारा
Read more...

देवळात प्रवेश करण्यापूर्वी कळसाचे दर्शन घेण्यामागील शास्त्र

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
देवळात दर्शन


`कोणताही जीव जन्माला येतांना गतजन्मीची आध्यात्मिक पातळी सोबत घेऊन येतो. त्यानुसार त्याच्या कुंडलिनीतील आवश्यक ते चक्र जागृत असते किंवा त्या चक्रापर्यंत त्याच्या कुंडलिनीचा प्रवास होेऊन थांबलेला असतो. सत्य, त्रेता व द्वापार या युगांत जिवाचा पहिला वाढदिवस साजरा करतांना त्याला आशीर्वाद देण्यासाठी आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत येत असत किंवा जिवाला आशीर्वाद मिळण्यासाठी उन्नतांकडे नेले जात असे. उन्नत जिवाचे औक्षण करून व जिवासाठी अव्यक्‍त संकल्प करून त्याच्या शरीराच्या विविध अवयवांवर अक्षता टाकून त्या त्या ठिकाणी असलेले चक्र जागृत करीत व ज्या चक्रापर्यंत जिवाची उन्नती झालेली असेल, त्याच्या पुढच्या चक्राला आपल्या हाताच्या बोटांत अक्षता घेऊन बोटांनी स्पर्श करीत. त्यामुळे जिवाच्या कुंडलिनीचा पुढील प्रवास सुरू होत असे. ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पातळीच्या उन्नतांना कोणत्याही जिवाकडे पाहिल्यावर `त्याची आध्यात्मिक उन्नती कोणत्या चक्रापर्यंत झालेली आहे', हे लक्षात येत असे. त्यामुळे त्यांनी केवळ त्या चक्रावर नजर टाकली, तरीही जिवाची उन्नती होत असे.'

संदर्भ : सनातन-निर्मित `धर्म असे का सांगतो ?' या ग्रंथमालिकेतील ग्रंथ `देवळात दर्शन कसे घ्यावे ?')

अधिक अध्यात्मशास्त्रीय माहिती साठी येथे टिचकी मारा


Read more...

प्राचीन भारतीय वास्तूशास्त्राचे महत्त्व जाणा !

1 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
वास्तूशास्त्र



प्राचीन भारतीय वास्तूशास्त्राचे महत्त्व जाणा !
माणूस हा घरात रमणारा प्राणी आहे. केवळ माणूसच नाही, तर प्रत्येक प्रत्येक जीव हा आपल्या घरट्यात सुख, समाधान, सुरक्षितता अनुभवतो. घर हे बांधावे लागते. ते आपोआप उभे रहात नाही. घराचे घरपण हे त्यात रहाणार्‍या माणसांवर अवलंबून असले, तरी त्या माणसांना माणुसकीने रहायला उद्युक्‍त करायला त्या वास्तूतील वातावरण प्रामुख्याने जबाबदार असते. वास्तूशास्त्र हे पुरातन शास्त्र आहे. महाभारत काळात मयासुराने बांधलेल्या मयसभेचा, तसेच इंद्रप्रस्थाचा उल्लेख आहे. मयानेही वास्तूशास्त्रात मोलाची भर टाकली आहे. वास्तूशास्त्र म्हणजे निसर्गावर आधारलेल्या अनेक शास्त्रांपैकी एक शास्त्र. नैसर्गिक दिशा, पृथ्वीच्या पोटातील चुंबक, भौगोलिक परिस्थिति यांचा शास्त्रीयदृष्ट्या वास्तू बांधण्यासाठी उपयोग म्हणजे वास्तूशास्त्र. सर्व चराचर सृष्टी ही आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी या पंचमहाभूतांनी व्यापलेली आहे. या पंचमहाभूतांपैकी प्रत्येकाचे गुण व कार्य निरनिराळे आहेत. यांपैकी आकाशतत्त्व हे शब्दगुणयुक्‍त असून जीव निर्माण करणे, कोणत्याही गोष्टीसाठी साधनांची उपलब्धता देणे, हे त्याचे कार्य आहे. वायूतत्त्व हे स्पर्शगुणयुक्‍त असून वहन, नियंत्रण आणि वितरण हे त्याचे कार्य आहे. तेजतत्त्व हे रूपगुणयुक्‍त असून शुद्धीकरण, दिशा देणे, अधिकार, नेतृत्व यासाठी ते उपयुक्‍त आहे. आप महाभूत हे रसगुणयुक्‍त असून तृप्‍ती, समाधान, पुष्टी, तुष्टी हे त्याचे कार्य आहे. पृथ्वीतत्त्व हे गंधगुणयुक्‍त असून संघटन, संयोजन या कामात ते महत्त्वाचे ठरते. वास्तूशास्त्र हे ज्योतिषशास्त्राप्रमाणेच प्राचीन आहे आणि ज्योतिषशास्त्रातील ग्रहांचे कारकत्व, त्यांचे पंचमहाभूतातील वर्गीकरण यांचा उपयोग वास्तूशास्त्रात केला आहे. त्याचे वर्गीकरण रवि, मंगळ-अग्नीतत्त्व, चंद्र, शुक्र-जलतत्त्व, गुरु-आकाशतत्त्व, शनि-वायूतत्त्व आणि बुध-पृथ्वीतत्त्व असे आहे. वेदकालापासून दशदिशांवर विविध देवतांचे स्वामित्व आणि त्यांच्या गुणानुसार कार्य सांगितले आहे. ते या क्रमाने आहे.

पूर्वदिशा : देवता - इंद्र, ग्रहाधिपति - रवि
अग्नेय : देवता - अग्निदेव, ग्रहाधिपति - शुक्र
दक्षिण : देवता - यम, ग्रहाधिपति - मंगळ
नैऋत्य : देवता - नैऋति, ग्रहाधिपति - राहु, केतु
पश्चिम : देवता - वरुण, ग्रहाधिपति - शनि
वायव्य : देवता - वायुदेव, ग्रहाधिपति - चंद्र
उत्तर : देवता - कुबेर, ग्रहाधिपति - बुध
आपल्यापैकी प्रत्येकाचे कार्य व गरजा हे पंचमहाभूते, अष्टदिशा यांच्या बाहेर नाही आणि वास्तूशास्त्रात याच गोष्टींचा प्रामुख्याने उपयोग करून घेतला आहे. आपण घरात ज्या वास्तूत रहातो, तेथील वातावरणाचे गुण आपण अंगिकारलेल्या कर्मासाठी, त्या कर्मानुसार मिळणार्‍या फळासाठी पोषक किंवा घातक असतात. ते जास्त शुभफलदायी व्हावे; म्हणून वास्तूशास्त्रात जमिनीचा आकार, जमिनीचा चढउतार, शल्यशोधन, माती परीक्षण, प्रवेशद्वार अशा विविध गोष्टींचा अभ्यास केला आहे. आपल्या घरात बैठकीची खोली, स्वयंपाकघर, शयनगृह, देवघर अशी विविध दालने असतात आणि त्या प्रत्येक खोलीत करावयाची कर्मे निरनिराळया गुणांची असतात; उदा. बैठकीच्या खोलीत चर्चा, खलबते, विचारविनिमय, निर्णय होतात. स्वयंपाकघरात उदरभरण, पुष्टी, तुष्टी ही कर्मे केली जातात. शयनगृहात विश्रांति, विषयसेवन ही कर्मे केली जातात, तर देवघरात विश्‍वास, शांतता, समाधान मिळत असते. अनुभवजन्य वास्तूशास्त्रानुसार असे सिद्ध झाले आहे की, नैसर्गिक दिशांच्या गुणांशी आपल्या कर्मगुणांची सांगड घालून घरातील विविध दालनांची विभागणी केल्यास कमी श्रमात जास्त यश पदरी पडते आणि या शास्त्राच्या विरुद्ध वर्तन केल्यास कष्ट करूनही अपयशाचे धनी व्हावे लागते. या सर्व गोष्टींचा विचार करून घरातील विविध दालनांची विभागणी करावी.
१. स्नानगृह : कर्म - स्वच्छता - हे अग्नीतत्त्वाचे कार्य असल्यामुळे स्नानगृह पूर्वेला असावे.
२. स्वयंपाकघर : कर्म - चविष्ट पदार्थांची निर्मिती, तृप्‍ती - हे अग्नि (अग्निदेव) व जलतत्त्व (शुक्र) यांचे कार्य असल्यामुळे अग्नेय दिशेस असावे.
३. घरातील तिजोरी : कर्म - धनवृद्धी - हे पृथ्वीतत्त्व (बुध) आणि देवता (कुबेर) यांचे कार्य असल्यामुळे ती उत्तर दिशेकडे उघडणारी असावी. अशा प्रकारेच कार्यकारणभाव ठेवून इतर दालनेही पुढील दिशांना ठेवता येतील.
४. शयनगृह : दक्षिण
५. बैठकीची खोली : पूर्व
६. भोजनगृह : पश्चिम
७. धान्यगृह, कोठार : वायव्य
८. शौचालय : दक्षिण-अग्नेय किंवा पश्चिम-वायव्य
९. पाण्याची टाकी : उत्तर - इशान्य किंवा पूर्व-इशान्य
१०. दूरदर्शन संच, संगणक, इलेक्ट्रिक मीटर : आग्नेय
११. देवघर : इशान्य अशा प्रकारे अष्टदिशांना घरातील विविध दालनाची विभागणी केल्यास तेथील कार्यास गति मिळते. वास्तूशास्त्र हे फक्‍त रहावयाच्या घरांसाठीच मर्यादित नसून देवालये, दुकाने, कारखाने यांच्या उत्कर्षासाठीही त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होतो. आपल्या पूर्वजांनी सखोल अभ्यासाने संपन्न केलेल्या या शास्त्राच्या अनुकरणाने आपले आयुष्य सुखी, समृद्ध, संपन्न करूया !

अधिक माहिती वाचण्यासाठी येथे टिचकी मारा

Read more...

अक्षय तृतीयेचे महत्त्व

1 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
अक्षय तृतीयेला ब्रह्मा व श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुणलोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते.


अर्थ : सदोदित किंवा सातत्याने सुख व समृद्धि प्राप्‍त करून देणार्‍या देवतेची अक्षय तृतीयेच्या दिवशी कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणार्‍या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही. देवतेची कृपादृष्टि सदोदित आपल्यावर रहाण्यासाठी अक्षय तृतीयेला कृतज्ञ भाव ठेवून तिची उपासना करणे.

२. मृतिका पूजन : सदोदित कृपादृष्टि ठेवणार्‍या मृतिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी व वैभवलक्ष्मी यांची प्राप्‍ति होते. अक्षयतृतिया हा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून मृतिकेची उपासना करण्याचा दिवस.

३. मातीत आळी घालणे व पेरणी : पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय तृतीया येते. वर्षाऋतूच्या आगमनाचा, म्हणजे मृग नक्षत्राचा व या तिथीचा घनिष्ट संबंध आहे. (घनिष्ट संबंध म्हणजे शुद्ध किंवा चांगल्या हेतूने परस्परांशी असेलेले घट्ट संबंध.) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे अक्षय तृतीयेपर्यंत मशागत करण्याचे काम पूर्ण करावे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) अक्षय तृतीयेच्या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृतिकेचे कृतज्ञ भाव ठेवून पूजन करावे. त्यानंतर पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालावीत व त्या आळयांमध्ये बियाने पेरावे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही. त्यामुळे वैभव प्राप्‍त होते. (बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार बाजूला काढून घेऊन उरलेले धान्य स्वत:ला व इतरांना पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवणे.)
(पूर्वीच्या काळी पावसाचे प्रमाण जास्त असल्याकारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपिक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नसे. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभूशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे होत असे. अक्षय तृतियेच्या शुभमूहुर्तावर म्हणजेच पावसाला सुरुवात होण्यापूर्वी पेरणीची कामे पूर्ण केली जात असत. हल्ली पावसाचे प्रमाण अगदीच कमी असल्याने व शास्त्राप्रमाणे पेरणी न केल्याने जमिनी नापिक होत चालल्या आहेत व कसदार धान्य पिकण्याचे प्रमाणही कमी झाले आहे.)

४. वृक्षरोपण : अक्षय तृतियेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात. तसेच आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही. - ब्रह्मतत्त्व (८.५.२००५, सायंकाळी ४.४४)

५. अक्षय तृतियेच्या दिवशी श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करण्याचे महत्त्व : अक्षय तृतियेच्या दिवशी राजाने किंवा प्रजेच्या पालनपोषणाची जबाबदारी असणार्‍यांनी सामूहिकरीत्या राजवाड्यात किंवा सामूहिक पूजाविधीच्या ठिकाणी श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्‍तिभावाने पूजन करावे. यामुळे प्रजा सुखी व समृद्ध होते. लक्ष्मीदेवीची कृपाच आपल्यावर होत नाही; कारण लक्ष्मीदेवी ही श्रीविष्णूची शक्‍ति आहे. जेथे श्रीविष्णूलाच बोलावणे नाही, तर त्याच्यासोबत किंवा त्याच्यात असणारी त्याची शक्‍ति कशी बरे पूजास्थळी येऊन कृपा करेल ? म्हणून कोणत्याही रूपातील श्रीलक्ष्मी पूजनाच्या वेळी श्रीविष्णूला प्रथम आवाहन करावे व नंतर श्रीलक्ष्मीलाही आवाहन करावे. त्यामुळे उपासकाला लक्ष्मीतत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ होतो. - ब्रह्मतत्त्व (सौ. कविता विक्रमसिंह पाटील यांच्या माध्यमातून, ८.५.२००५, सायंकाळी ४.४५)

साभार : दैनिक सनातन प्रभात
Read more...