एका हाताने नमस्कार करू नये

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
एका हाताने नमस्कार करू नये, असे शास्त्र असतांना देवळाच्या पायरीला आपण एका हाताने का नमस्कार करतो ?

उत्तर : देवळाचा परिसर हा इतर परिसराच्या मानाने मुळातच सात्त्विक असल्याने तेथे कोणतेही कर्म भावरहित जरी केले, तरी इतर ठिकाणच्या तुलनेत थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु सात्त्विकतेचा लाभ होतोच। देवळाच्या पायर्‍या चढता चढता पायरीला स्पर्श करून नमस्कार करणे, ही शरिराचा तोल सांभाळून कमी कालावधीत करावयाची एक सात्त्विक कृती आहे. पायर्‍या चढणे, या रजोगुणी हालचालीमुळे जिवाच्या शरिरातील रजोगुण कार्यरत झालेला असतो. एका हाताने म्हणजेच उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श केल्याने चैतन्यभूमीतील सात्त्विक व शांत लहरी हाताच्या बोटांतून शरिरात संक्रमित होत गेल्याने एक प्रकारे सातत्याने जिवाच्या शरिरातील रजोगुणावर सूर्यनाडीच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जाते, म्हणजेच सूर्यनाडीच्या कार्याचे क्षणिक शमन करणे शक्य होते. या प्रक्रियेतून जिवाला रजोगुणातूनही सात्त्विकतेचे संवर्धन करण्यास शिकवले जाते. म्हणून त्या त्या स्तरावर ती ती कृती करणे योग्य ठरते.

(संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती')

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: