वाढदिवस कसा साजरा करवा ?

2 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
वाढदिवस

वाढदिवस साजरा करण्याची पद्धत


`व्यक्‍ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग' हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. या सिद्धांताला अनुसरून धर्माचरणाच्या पद्धतीही निरनिराळया आहेत. पद्धती भिन्न असल्या तरी त्यांच्यामुळे साध्य होणारा परिणाम हा सारखाच असतो, म्हणजे त्या पद्धतींमुळे ईश्‍वरी तत्त्वाचा लाभ हा मिळतोच. आपापल्या प्रकृतीप्रमाणे ज्याला जी पद्धत सोयीस्कर वाटेल, त्याने ती अवलंबणे उपयुक्‍त ठरते. वाढदिवस साजरा करण्याची आज पद्धत पुढे देत आहोत.


अभ्यंगस्नान करणे : वाढदिवसाच्या दिवशी सचैल म्हणजे वस्त्रांसहित अभ्यंगस्नान करावे। (वाढदिवसाच्या दिवशी स्नान करणे, हे स्नानाच्या माध्यमातून भूतकाळ विसरून सतत वर्तमानकाळाचे भान रहाण्यासाठी ईश्‍वराची प्रार्थना करण्याचे प्रतीक आहे.) स्नान करतांना `स्नानाचे जल निर्मळ व शुद्ध गंगेच्या रूपात आपल्या अंगावर पडून आपला देह व अंत:करण यांची शुद्धी होत आहे', असा भाव ठेवावा.

आ. स्नानानंतर नवीन वस्त्रे परिधान करावीत.

इ. आई-वडील तसेच वडीलधार्‍या व्यक्‍ती यांना नमस्कार करावा.

ई. कुलदेवतेला अभिषेक करावा किंवा तिची मनोभावे पूजा करावी.

उ. औक्षण करणे : ज्याचा वाढदिवस असेल, त्याचे औक्षण करावे. औक्षण करवून घेणारा, तसेच ते करणारा यांनी `एकमेकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष ईश्‍वरच कृतीस्वरूप कार्य करून आम्हाला आशीर्वाद देत आहे', असा भाव ठेवावा. औक्षण झाल्यावर कुलदेवता किंवा उपास्यदेवता यांचे स्मरण करून वाढदिवस असलेल्याच्या डोक्यावर तीन वेळा अक्षता टाकाव्यात.

ऊ. भेटवस्तू : ज्याचा वाढदिवस असेल, त्याला काहीतरी भेटवस्तू द्यावी. भेटवस्तू देतांना पुढील दृष्टीकोन ठेवावा. लहान मुलाला कर्तव्यबुद्धीने त्याचे कौतुक करण्यासाठी भेटवस्तू द्यावी. मोठ्यांना भेटवस्तू देतांना कर्तेपणा बाळगू नये. अपेक्षा न ठेवता एखाद्याला दान दिले, तर काही काळाने आपण त्या दानाविषयी विसरूनदेखील जातो. वाढदिवसाच्या दिवशी द्यावयाचे दान हे असे असावे लागते. दानाविषयी कर्तेपणा किंवा अपेक्षा बाळगल्यास देवाणघेवाण हिशोब निर्माण होतो. दान किंवा भेटवस्तू स्वीकारणार्‍याने `हा ईश्‍वरकृपेने मिळालेला प्रसाद आहे', असा भाव ठेवल्यास देवाणघेवाण हिशोब निर्माण होत नाही.

ए. `सत्पात्रे दानम्' : वाढदिवसाच्या दिवशी ज्या वस्त्रांसहित स्नान केले, ती वस्त्रे स्वत: न वापरता कोणालाही अपेक्षा न ठेवता दान करावीत. दान हे `सत्पात्रे दानम्' होण्यासाठी ते भिकारी वगैरेंना देण्यापेक्षा देवाची उपासना करणार्‍यांना किंवा राष्ट्र व धर्म यांच्या हितासाठी कार्य करणार्‍यांना देणे पुण्यदायी ठरते.

(संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील ग्रंथ `धार्मिक व सामाजिक कृतींमागील शास्त्र')


अधिक अध्यात्मशास्त्रीय माहिती साठी येथे टिचकी मारा

2 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा:

मोरपीस said...

ब्लॉग फ़ारच छान आहे.

Unknown said...

Your blog is really nice.

Want to tell you about latest marathi website

Love Marathi videos? See the biggest collection of marathi videos on
MarathiTube

Admin
MarathiTube