दत्तजयंती

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपांत आसुरी शक्‍ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. त्या वेळी देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्‍न अयशस्वी झाले. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला.त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती' म्हणून साजरा करतात.

दत्तजयंती हा एक सांप्रदायिक जन्मोत्सव आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत होत असतो.

दत्ताचा नामजप : श्री गुरुदेव दत्त ।

फायदे
१. दत्त या देवतेकडून जिवाला अधिक प्रमाणात सात्त्विक शक्‍ती मिळत असल्याने त्याच्या आधारे जीव वाईट शक्‍तींशी लढू शकतो.
२. दत्ताच्या नामजपामुळे जिवाला शिवाचीही शक्‍ती मिळते.
३. दररोज किमान १५ ते २० मिनिटे एकाग्र चित्ताने दत्ताचा नामजप केल्यास वाईट शक्‍तींचा त्रास अल्प होतो.
४. पूर्वजांना गती मिळते आणि त्यामुळे घरातील वातावरण आनंदी रहाण्यास साहाय्य होते. - श्री गणेश (श्री. भरत मिरजे यांच्या माध्यमातून, २.११.२००५, रात्री ८.३०)

लिंगदेहाला गती देण्याच्या संदर्भात दत्ताच्या नामजपाचे होणारे फायदे
१. पूर्वजांना गती देणारी देवता दत्त आहे. दत्ताचा नामजप केल्याने नामजपातून प्रक्षेपित होणार्‍या आघातजन्य तेजोमय लहरींमुळे लिंगदेहाभोवती असलेल्या वासनात्मक लहरींची कार्य करण्याची तीव्रता अल्प होऊन त्यातील रज-तम नष्ट होऊ लागल्याने लिंगदेहाचे जडत्व अल्प होऊन त्याला पुढे जाण्यास ऊर्जात्मक बळ मिळते.
२. लिंगदेह आणि त्याच्या प्रत्यक्ष देहाभोवती संरक्षककवच निर्माण होते. यामुळे त्याचे वाईट शक्‍तींच्या आक्रमणांपासून रक्षण होते.
३. पृथ्वीवरील वासनात्मक आसक्‍तीही अल्प होण्यास साहाय्य झाल्याने त्याला अल्प वेळात पृथ्वीमंडल भेदून पुढे जाता येणे शक्य होते.
४. दत्ताचा नामजप केल्याने वायूमंडलात चैतन्य कणांची निर्मिती होऊन त्याचा लिंगदेहाला फायदा होतोच.
५. नामजप करणार्‍या इतर जिवांचेही दूषित झालेल्या वायूमंडलातील त्रासदायक लहरींपासून रक्षण होते. (३०.९.२००६, दुपारी २.०७)

पूर्वजांच्या त्रासांच्या निवारणार्थ दत्तोपासना

दत्त म्हणजे ब्रम्हा, विष्णु, महेश यांच्या सगुण रुपांचे प्रत्यक्ष एकत्व !

विवाह न होणे, विवाह झाल्यास पती-पत्‍नींचे न जुळणे, जुळल्यास गर्भधारणा न होणे, गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, अपत्ये बालपणातच मृत्यूमुखी पडणे वगैरे त्रास असलेले समाजात आपल्याला दिसतात. या गोष्टी पूर्वजांच्या त्रासामुळे होतात. दारिद्र्य, शारीरिक आजार यामागेही पूर्वजांचे त्रास असू शकतात. मात्र आपल्याला पूर्वजांचा त्रास आहे किंवा नाही, हे केवळ उन्नतच सांगू शकतात.

हल्लीच्या काळी पूर्वीप्रमाणे कोणी श्राद्धपक्ष वगैरे करत नाहीत. तसेच साधनाही करत नाहीत. त्यामुळे बहुतेकांना पूर्वजांच्या लिंगदेहामुळे त्रास होतो. मात्र तो त्रास आहे किंवा नाही, हे सांगणारे उन्नत न भेटल्यास येथे दिलेले काही तर्‍हेचे त्रास पूर्वजांमुळे होतात, असे समजून साधना करावी.

समंधबाधा दूर होण्यासाठी दत्तोपासना

समंधबाधांना (वेगवेगळया पद्धतीने किंवा मार्गाने आत्महत्या करणार्‍यांना) ब्रह्मांडातील कोणतीच गती प्राप्‍त होत नसल्याने (कोणत्याही योनीची प्राप्‍ती होत नसल्याने) त्यांना पाताळवास प्राप्‍त होतो. पाताळवासात पोहोचण्यापूर्वी त्याच्या कर्मगतीचा प्रवास त्याला भुवलोकात राहून पूर्ण करावा लागतो, उदा. जसे हलक्या वजनाच्या थोड्या बिया (मिरची, तुळस, सब्जा वगैरे) किंवा थोडे वाळूचे बारीक कण भरून फुगवून हवेत सोडलेला फुगा आतील बियांसहित किंवा वाळूच्या कणांसहित हवेत तरंगतो.

त्याची शक्‍ती क्षीण होऊन तो फुटल्यानंतर त्यातील बिया आणि कण यांसहित फुग्याचे जे व्रतडे हवेत वर तरंगत होते किंवा विहार करत होते ते आतील दाण्यांसहित खाली येते. याप्रकारेच भुवलोकातील कर्मगती संपल्यानंतर उरलेले तम (कातडे) त्याच्या तमाच्या वजनानुसार त्याला प्राप्‍त झालेल्या लोकात स्थीर होते. मात्र प्राप्‍त कर्मगती असेपर्यंत भुवलोकातील समंधबाधा इतर वाईट शक्‍तींच्या आश्रयाने आपल्या नातेवाइकांना प्रचंड प्रमाणात त्रास देत राहतात. अशा प्रकारे समंधबाधांमुळे साधकांना साधना करण्यात प्रचंड अडथळे निर्माण होतात. दत्ताच्या नित्य उपासनेने अशा समंधबाधांना कर्मगती संपेपर्यंत दत्तमहाराज आपल्यातील योगसामर्थ्याने सातत्याने आपल्या ताब्यात ठेवून साधनामार्गातील अडथळे दूर करतात - ब्रह्मतत्त्व (२४.४.२००६ सकाळी ७.३५)

'दत्त'विषयक - आध्यात्मिक माहिती

http://www.sanatan.org/marathi/dainik/visheshank/dattajayanti/index.htm

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: