स्त्रियांनी कुंकू लावणे यामागील शास्त्र काय ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
* स्त्रियांनी कुंकू लावणे यामागील शास्त्र काय ?
* टिकली लावण्यापेक्षा कुंकू लावणे अधिक योग्य का आहे ?
* कुंकू लावल्यामुळे स्त्रीची आत्मशक्ती जागृत झाल्यास तिच्यात शक्तीतत्त्व आकृष्टकरण्याची प्रचंड क्षमता निर्माण होणे !

`कुंकवामध्ये तारक व मारक शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता आहे। स्त्रीची आत्मशक्ती जागृत झाल्यास त्या शक्तीमध्येही कार्यानुरूप तारक किंवा मारक देवीतत्त्व आकृष्टकरण्याची प्रचंड क्षमता निर्माण होते। देवीतत्त्वाचा कृपाशीर्वाद मिळण्याच्या हेतूने स्त्रीच्या भ्रूमध्यावर तिने स्वत: किंवा दुसऱ्या स्त्रीने कुंकू लावल्यास स्त्रीमधील तारक शक्तीतत्त्वाची स्पंदने जागृत होतात व वातावरणातील शक्तीतत्त्वाची पवित्रके त्या स्त्रीकडे आकृष्ट होतात.'


स्त्रियांनी कुंकू लावणे यामागील शास्त्र
कुंकू :
`शुद्ध कुंकू हे शुद्ध हळद, चुन्याची निवळी व थोड्या प्रमाणात शुद्ध कर्पूर यांपासून तयार करतात. हे कुंकू हळदीपासून बनलेले असले, तरी या कुंकवातील हळदीचा वास पूर्णपणे नष्ट होऊन त्या ठिकाणी दैवी सुगंध दरवळत रहातो. हळद हुंगल्यानंतर वास येतो; मात्र शुद्ध कुंकवाचा सुगंध ठराविक अंतरापर्यंत दरवळत रहातो. शुद्ध कुंकवात आर्द्रता असूनही ते पूर्णपणे कोरडे असते. त्याचा स्पर्श बर्फासारखा गार असतो. शुद्ध कुंकू रक्तवर्णाचे असते. त्यामध्ये लोह या घटकाचे प्रमाण जास्त असते. हे कुंकू कपाळावर लावल्याने वाईट शक्ती भ्रूमध्यातून प्रवेश करू शकत नाहीत. पूर्वीच्या काळी (सत्य, त्रेता व द्वापार या युगांत) शुद्ध कुंकू मिळायचे; मात्र त्या युगांनुसार कुंकवाची सात्त्विकता कमी कमी होत गेली. हल्ली कलीयुगामध्ये हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत लोकच सात्त्विक कुंकू तयार करतात.'


१. `कुंकू लावतांना भ्रूमध्य व आज्ञाचक्र यांवर दाब दिला जातो व तेथील बिंदू दाबले जाऊन चेहर्‍याच्या स्नायूंना रक्‍तपुरवठा चांगला होतो.

२. कपाळावरील स्नायूंचा ताण कमी होऊन चेहरा उजळ दिसतो. इ. कुंकवामुळे वाईट शक्‍तींना आज्ञाचक्रातून शरिरात शिरायला अडथळा निर्माण होतो.' - ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ६.११.२००७, दुपारी २.३०)


टिकली लावण्यापेक्षा कुंकू लावणे अधिक योग्य का आहे ?


`कुंकू हे पावित्र्याचे व मांगल्याचे प्रतीक आहे. कृत्रिम घटकांपेक्षा नैसर्गिक घटकांमध्ये देवतांच्या चैतन्यलहरी ग्रहण व प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असते. हळदीपासून कुंकू बनवलेले असल्याने टिकलीपेक्षा कुंकवामध्ये नैसर्गिकता जास्त असते, तसेच कुंकवातून प्रक्षेपित होणार्‍या सूक्ष्म-गंधामध्ये ब्रह्मांडातील देवतेची पवित्रके आकृष्ट व प्रक्षेपित करण्याची क्षमता असल्याने कुंकू लावलेल्या जिवाचे तारक-मारक चैतन्यलहरींच्या प्रक्षेपणामुळे वाईट शक्‍तींपासून रक्षण होते; म्हणून टिकली लावण्यापेक्षा कुंकू लावणे, हे सात्त्विकता ग्रहण करण्याच्या दृष्टीने जास्त फलदायी असते.टिकलीच्या पाठच्या बाजूला वापरण्यात आलेला गोंद हा तमोगुणी असल्याने तो आपल्याकडे रज-तमात्मक लहरी खेचून घेतो. या लहरींचा प्रवाह जिवाच्या आज्ञाचक्रातून शरिरात संक्रमित झाल्याने शरिरातील रज-तम कणांचे प्राबल्य वाढते. सतत टिकली लावल्यामुळे त्या जागी वाईट शक्‍तींचे स्थान निर्माण होण्याचीशक्यता जास्त असते.' - एक विद्वान(सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २३.१.२००५, रात्री ८.०१)(हे शास्त्र माहीत नसल्याने, तसेच हिंदु धर्मातील मांगलिक गोष्टींकडे पहाण्याची अनास्था असल्याने हल्ली स्त्रिया व मुली कुंकू लावण्याऐवजी टिकलीचा वापर सर्रास करतांना दिसतात. - संकलक)


महत्त्व १. कानातील अलंकारांमुळे कानांच्या पाळयांवर दाब येऊन बिंदूदाबनाचे (अँक्युप्रेशरचे) उपाय होतात.


२. `कानात अलंकार घातल्याने कानाची सात्त्विकता वाढून सूक्ष्म-नाद ग्रहण करण्याची क्षमताही वाढते.


३. कानात घालण्याच्या अलंकारांमुळे कानाभोवती चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होऊन नादलहरींच्या माध्यमातून हल्ला करणार्‍या वाईट शक्‍तींपासून कानाचे रक्षण होते.


४. कानात घालण्याच्या काही अलंकारांच्या हालचालींमुळे सूक्ष्म-नाद निर्माण होऊन कानाचा पडदा व आतील यंत्रणा यांवर उपाय होऊन वाईट शक्‍तींचा त्रास कमी होतो.' - ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १२.११.२००७, रात्री ८.१५)

(संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या मालिकेतील `देवपूजेच्या कृतीचे शास्त्र (पूर्वतयारीसह)')


इंग्रजी मध्ये वाचा : How to identify pure vermilion?


0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: