कोणतेही कर्म करतांना पत्नीने पतीच्या उजव्या बाजूस रहावे। पत्नीला नवर्याची अर्धांगी म्हणजेच उजवी नाडी समजतात. उजवी नाडी ही कार्याला ऊर्जा पुरवणार्या आदिशक्तीच्या प्रकट कार्यरत शक्तीचे प्रतीक आहे, तर पुरुषतत्त्वाचे निदर्शक असणारी डावी नाडी ही आदिशक्तीने पुरवलेल्या कार्यऊर्जेच्या बळावर प्रत्यक्ष कार्य करणार्या शिवाचे प्रतीक आहे. शिवाची शक्ती म्हणून पत्नीने पतीच्या उजव्या बाजूला राहून त्याला प्रत्येक कर्मात साथ द्यावयाची असते. प्रत्येक पूजाविधीमध्ये प्रत्यक्ष कर्म न करता पत्नी फक्त पतीच्या उजव्या हाताला आपल्या चार बोटांचा स्पर्श करून त्याला पूजाविधीमध्ये लागणारी श्री दुर्गादेवीची क्रियाशक्ती पुरवते. म्हणून यजमान व त्याची पत्नी यांनी केलेले कर्म शिव-शक्तीची जोड मिळाल्याने कमी कालावधीत फलद्रूप होते.
संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'
इंग्रजी मध्ये माहीती हवी असल्यास येथे टिचकी मारा
0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा:
Post a Comment