विवाहानंतर पती व पत्‍नी यांनी जोडीने नमस्कार का करावा ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

`विवाह म्हणजे शिवरूपी पती व शक्‍तीरूपी पत्‍नी या तत्त्वांचा संगम होय। प्रत्येक कर्म हे शिवरूपी सगुण क्रियाशक्‍ती (प्रत्यक्ष कार्य करणे) व त्या कर्माला गती प्राप्‍त करून देणारी, तसेच जास्तीतजास्त प्रमाणात निर्गुणाशी संबंधित असणारी शक्‍ती यांच्या जोड संगमाने पूर्णत्वास जाते. विवाहानंतर दोन्ही जीव गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतात. गृहस्थाश्रमात एकमेकांना पूरक होऊन संसारसागरातील कर्मे करणे व त्यासाठी थोरामोठ्यांचा एकत्रितपणे आशीर्वाद घेणे महत्त्वाचे ठरते. दोघांनी एकत्रितपणे नमस्कार केल्यास ब्रह्मांडातील शिव-शक्‍तीरूपी लहरी कार्यरत होऊन जिवांमध्ये लीनभावाचे संवर्धन होऊन गृहस्थाश्रमात परिपूर्ण कर्म घडून त्याची योग्य फलप्राप्‍ती झाल्याने कमीतकमी देवाणघेवाण हिशोब निर्माण होणे शक्य होते; म्हणून विवाहानंतर दोघांनी प्रत्येक कर्माला पूरक बनून नमस्कारासारख्या कृतीतूनही एकमेकांना अनुमोदन देणे, असा वरील कृतीमागील उद्देश आहे.

पती व पत्‍नी यांची आध्यात्मिक पातळी किंवा ईश्‍वराप्रती असलेला भाव ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास त्यांनी एकत्रितपणे नमस्कार करणे अथवा एकट्याने नमस्कार करणे किंवा मानस नमस्कार करणे यांतून होणारी फलप्राप्‍ती एकच असते; म्हणूनच प्रत्यक्ष कर्मापेक्षा त्यापाठी असलेल्या ईश्‍वराप्रतीच्या भावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. (पती-पत्‍नीपैकी नमस्कार करायला एकच उपस्थित असेल, तर एकट्यानेच नमस्कार करावा. )


संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'

इंग्रजी मध्ये माहीती हवी असल्यास येथे टिचकी मारा

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: