नमस्कार करतांना पुरुषांनी डोके झाकू नयेत; मात्र स्त्रियांनी डोके का झाकावेत ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
न सोपानद्वेष्टितशिरा अवहितपाणिर्वाभिवादयीत । - आपस्तम्ब धर्मसूत्र १/४/१४/१९

अर्थ : पादत्राणे घालून, डोके झाकून किंवा हातात काही घेऊन नमस्कार करू नये।(स्त्रियांनी मात्र डोक्यावर पदर घेऊनच नमस्कार करावा.)`नमस्कार करतांना हात टेकवलेल्या स्थानावरील कुंडलिनीतील चक्र जागृत झालेले असते. त्यामुळे शरीरात सात्त्विकता जास्त प्रमाणात प्रवेश करू शकते. काही वेळा कुंडलिनीच्या जागृतीमुळे डोक्याच्या माध्यमातूनही सत्त्वलहरी शरिरात येऊ लागतात; परंतु काही वेळा वाईट शक्‍ती याचा फायदा उठवण्याचा प्रयत्‍न करतात व त्या काळी शक्‍ती सत्त्वलहरींमध्ये मिसळतात. पुरुषांमधील कुंडलिनीजागृतीची क्षमता ही स्त्रियांच्या कुंडलिनीजागृतीच्या क्षमतेच्या तुलनेत अधिक असते. त्यामुळे पुरुषांवर या काळया शक्‍तीचा फारसा प्रभाव पडत नाही. याउलट स्त्रिया जास्त संवेदनशील असल्याने त्यांच्यावर काळया शक्‍तीचा प्रभाव व परिणाम अधिक होतो आणि त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. यासाठी स्त्रियांनी नमस्कार करतांना डोक्यावर पदर घ्यावा. त्यामुळे डोके व लहरी यांच्यामध्ये कापडाचा अडथळा निर्माण होतो व वाईट स्पंदनांना शरीरात प्रवेश करता येत नाही. मात्र डोक्यावरील पदरामुळे चांगली स्पंदनेही काही प्रमाणात डोक्यातून आत शिरू शकत नाहीत. (वाईट स्पंदनांपेक्षा चांगली स्पंदने जास्त सूक्ष्म असल्याने पदरातूनही तीकाही प्रमाणात डोक्यात शिरतात.) तरीही नमस्काराच्या मुद्रेतून व्यक्‍तीला सात्त्विकता सर्वांत जास्त प्रमाणात मिळत असल्याने स्त्रियांना आवश्यक अशी सात्त्विकता या मुद्रेतून मिळते. यावरून लक्षात येते की, ईश्‍वर प्रत्येकाची किती काळजी घेतो. भाव असेल, तर वरील बंधने न पाळता नमस्कार केल्यास त्याचा तितकाच फायदा होतो.'

संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'
.

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: