`देवपूजेची तयारी करतांना पुढीलप्रमाणे करावी.
अ. पूजकाची (जिवाची) तयारी
आ. स्थळाची शुद्धी
इ. उपकरणांची शुद्धी व जागृती
ई. पूजेपूर्वी करावयाची अन्य तयारी, उदा. निर्माल्यविसर्जन, देशकाल उच्चार, संकल्प, देवतांच्या मूर्ती व चित्रे स्वच्छ करणे.
देवपूजेसाठी करावयाच्या तयारीचा विशिष्ट क्रम असण्याचे कारण :
अशा प्रकारची पूजेची तयारी जिवाच्या बाह्यतेतून अंतरात्मकतेकडील प्रवास दर्शवते. त्यामुळे जिवाची वृत्ती जास्त प्रमाणात अंतर्मुख होऊन जीवस्थळ व काळ यांच्यातील सगुणाला त्यागून निर्गुणातील ईश्वरी चैतन्य ग्रहण करण्यास सज्ज होतो.'
संदर्भ : सनातनच्या `पूजेपूर्वी करावयाची वैयक्तिक तयारी' ग्रंथातून
.
0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा:
Post a Comment