कोणाला नमस्कार करू नये ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

खाली उल्लेख केलेल्या व्यक्‍तींना का नमस्कार करू नये, यामागील शास्त्र येथे विशद केले आहे.

१. समुद्रात उतरलेली व्यक्‍ती : समुद्रात उतरलेल्या व्यक्‍तीला धोका असतो. तिला नमस्कार केल्याने आपल्यालाही धोका संभवू शकतो.

२. उद्विग्न व्यक्‍ती : उद्विग्न व्यक्‍तीला नमस्कार केल्याने आपले मन विचलित होऊन आपल्यातही उद्विग्नता निर्माण होऊ शकते. तसेच उद्विग्न व्यक्‍तीला नमस्कार करण्याचा आदर्श ठेवणेही चुकीचे आहे.

३. ओझे वाहणारी व्यक्‍ती : ओझे वाहणार्‍या व्यक्‍तीतील रजोगुण वाढलेला असतो. तसेच अशा व्यक्‍तीला नमस्कार करणे, म्हणजे तिच्यासारखा (अनावश्यक) ओझे वाहण्याचा आदर्श समोर ठेवणे.

४. स्त्रीसह क्रीडेत आसक्‍त असलेली व्यक्‍ती : स्त्रीसह क्रीडेत आसक्‍त असलेल्या व्यक्‍तीतील वासना वाढलेल्या असल्याने तिच्यातील तम व रज गुणांचे प्रमाण वाढलेले असते। अशा व्यक्‍तीला नमस्कार केल्याने आपल्यातील तम व रज गुण वाढतातच, शिवाय आपल्याही मनामध्ये वासनेचे विचार येतात.

५. बालकासह खेळणारी व्यक्‍ती : बालकासह खेळणार्‍या व्यक्‍तीला सुख मिळत असते, म्हणजेच तिची कुंडलिनी जागृत असण्याची शक्यता कमी असते. (कुंडलिनी जागृत असलेल्या व्यक्‍तीकडून आनंदाच्या लहरी प्रक्षेपित होत असतात. कुंडलिनीशक्‍ती ही ईश्‍वराच्या शक्‍तीचे प्रतीरूप असल्याने या शक्‍तीच्या जागृतीमुळे आनंदाची अनुभूती येते.) अशा व्यक्‍तीला नमस्कार केल्याने त्या नमस्काराचा आपल्याला पूर्ण फायदा होत नाही.

६. हातामध्ये फूल व दर्भ घेतलेली व्यक्‍ती १. हातामध्ये फूल व दर्भ घेतलेल्या व्यक्‍तीचा भाव वाढलेला असतो व बहुतेक वेळा कुंडलिनीही जागृत झालेली असते। तिला नमस्कार केल्याने तिचा भाव कमी होऊ शकतो.२. नमस्कार करणार्‍याची पात्रता कमी असल्यास त्याला नमस्कारातून मिळणारी शक्‍ती सहन न झाल्याने त्या शक्‍तीचा त्रास होऊ शकतो.'

संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'

.

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: