वटपौर्णिमा या व्रताचा उद्देश, वटवृक्षाचे महत्त्व, तसेच व्रत करण्याची पद्धत
उद्देश
सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रियांनी या काताची सुरुवात केली.
सावित्रीचे महत्त्व
भरतखंडात प्रसिद्ध असलेल्या पतीव्रतांपैकी सावित्री हीच आदर्श मानलेली आहे. तसेच तिला अखंड सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते.
व्रताची देवता
या व्रताची मुख्य देवता सावित्रीसह ब्रह्मदेव असून, सत्यवान, सावित्री, नारद व यमधर्म या उपांग (गौण) देवता आहेत.
वटवृक्षाचे महत्त्व
यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. शास्त्रचर्चा वटवृक्षाखाली झाली; म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले.
अ. प्रलय झाला तरी वटवृक्ष असतोच. तो युगान्ताचा साथीदार आहे.
आ. बाल मुकुंदाने प्रलयकाळी वटपत्रावर शयन केले.
इ. प्रयागच्या अक्षय्य वटाखाली राम, लक्ष्मण व सीता विसावले होते.
ई. ब्रह्मा, श्रीविष्णु, महेश, नृसिंह, नील व माधव यांचे वटवृक्ष हे निवासस्थान आहे.
उ. वड, पिंपळ, औदुंबर व शमी हे पवित्र व यज्ञवृक्ष म्हणून सांगितले आहेत. या वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो.
ऊ. वडाच्या चिकात कापूर वाटून त्याचे अंजन डोळयांत घातले असता मोतीबिंदू बरा होतो.'
व्रत करण्याची पद्धत
अ. संकल्प : सुरुवातीला सौभाग्यवती स्त्रीने `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो', असा संकल्प करावा.
आ. पूजन : वडाचे षोडशोपचारे पूजन करावे. पूजेत अभिषेक झाल्यानंतर वडाला सूत्रवेष्टन करावे, म्हणजे वडाच्या खोडाभोवती सुती धाग्याने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीनदा गुंडाळावे. पूजेच्या शेवटी `अखंड सौभाग्य लाभू दे, जन्मोजन्मी हाच पती लाभू दे, तसेच धनधान्य व कुल यांची वृद्धी होऊ दे', अशी सावित्रीसह ब्रह्मदेवाला प्रार्थना करतात.
इ. उपवास : स्त्रियांनी संपूर्ण दिवस उपवास करावा.
(अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे म्हणजे अंनिसचे कार्यकर्ते `वटपौर्णिमा' म्हणजे निवळ `भाकडकथा' असा प्रचार करतात. कणाकणांत देवतांचे अस्तित्व मानून वृक्षदेवतेची पूजा करायला शिकवणारा महान हिंदु धर्म कुठे, तर हिंदु धर्माला असत्य ठरवणारे असे धर्मद्रोही व साम्यवादी कुठे !)
संदर्भ : सनातनचा ग्रंथ `सण, धार्मिक उत्सव व व्रते'
http://sanatan.org/marathi/dainik/visheshank/vatpournima/
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा:
Post a Comment