श्रावणमास म्हटलं की डोळयासमोर येतात ती व्रतवैकल्ये. श्रावणमास म्हटलं की आठवतात ती व्रत आणि व्रत म्हटलं की आठवतो श्रावण. असे होण्याची दोन कारणे आहेत. श्रावण ज्या चातुर्मासात येतो, ते चातुर्मास म्हणजे स्वत:च एक व्रत आहे ! आणि दुसरे कारण म्हणजे वर्षातील बारा महिन्यांपैकी या विशिष्ट चार महिन्यांमध्ये व्रते अधिक प्रमाणात आहेत. आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत किंवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत येणार्या श्रावण, भाद्रपद, कार्तिक आणि आश्विन या चार महिन्यांच्या काळास `चातुर्मास' असे म्हटले जाते. शारीरिक आणि मानसिक स्तरावरती मनुष्याला बंधनात रहाण्याची शिकवण व्रतामुळे मिळते. चातुमार्साचे आध्यात्मिक महत्त्व या निमित्ताने जाणून घेऊया.
याविषयीच्या अधिक माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी प्रतिदिन दैनिक सनातन प्रभातचे वाचन करा...
श्रावणमास विशेषांक - दैनिक सनातन प्रभात - आषाढ कृ.१२, रविवार,१९ जुलै २००९
विशेषांक
ही माहिती आपल्या मित्रमंडळींना पाठवून धर्मप्रसारात सहभागी होऊ या...
0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा:
Post a Comment