गुढी उभारण्याचे फायदे कोणते ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
गुढी उभारण्याचे फायदे कोणते ?


गुढीपाडव्याला ब्रह्मांडातील प्रजापति या देवतेच्या लहरी सर्वांत जास्त प्रमाणात पृथ्वीवर येतात. गुढीमुळे वातावरणातील प्रजापति-लहरी कलशाच्या साहाय्याने घरात प्रवेश करतात. (दूरदर्शनचा अँटेना जसे कार्य करतो, तसे हे आहे.) दुसर्‍या दिवसापासून या कलशात पाणी पिण्यासाठी घ्यावे. प्रजापति-लहरींचा संस्कार झालेला कलश त्याच तर्‍हेचे संस्कार पिण्याच्या पाण्यावर करतो, त्यामुळे वर्षभर प्रजापति-लहरी आपल्याला प्राप्‍त होतात.

पंचांगश्रवण : `ज्योतिषाचे पूजन करून त्याच्याकडून किंवा उपाध्यायाकडून नूतन वर्षाचे पंचांग अर्थात वर्षफल श्रवण करतात.
फायदे तिथेश्च श्रीकरं प्रोक्‍तं वारादायुष्यवर्धनम् ।नक्षत्राद्धरते पापं योगाद्रोगनिवारणम् ।।करणाच्चिन्तितं कार्यं पञ्चा्गफलमुत्तमम् ।एतेषां श्रवणान्नित्यं ग्गास्नानफलं लभेत् ।।अर्थ : तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते, वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते, नक्षत्रश्रवणाने पापनाश होतो, योगश्रवणाने रोग जातो, करणश्रवणाने चिंतिलेले कार्य साधते. असे हे पंचांगश्रवणाचे उत्तम फल सांगितले आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगास्नानाचे फळ मिळते.


'(संदर्भ : सनातनचे प्रकाशन, `सण, धार्मिक उत्सव व व्रते')




गुढीपाडव्या आध्यात्मिक माहिती - वाचण्यासाठी येथे टिचकी

वरील माहिती इंग्रजी ( English) मध्ये वाचण्यासाठी येथे टिचकी मारा

Read more...

होळी

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
होळी पौर्णिमा



समानार्थी शब्द : `होळीला महाराष्ट्रात `शिमगा' म्हणतात, दक्षिणेत `कामदहन' म्हणतात. तर बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण होतो. `हुताशनी', असेही होळीला नाव आहे.

स्थान : देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी फाल्गुन पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवायची असते. बहुधा गावाच्या ग्रामदेवतेसमोर होळी उभी करतात.

कृती : मध्ये एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करतात. त्याच्या भोवती गोवर्‍या व लाकडे रचतात. होळी पेटवण्याकरता जो अग्नी आणतात, तो चांडाळाच्या घरचा आणायचा असतो ! नंतर व्रतकर्त्याने स्नान करून `ढुण्ढाराक्षसीप्रीत्यर्थं समस्तत्पीडापरिहारार्थं होलिकापूजनं अहं करिष्ये ।', असे म्हणून व नंतर `होलिकायै नम: ।', हा मंत्र म्हणून होळी पेटवायची. त्यानंतर होळीची प्रार्थना करायची.

वंदितासि सुरेंद्रेण, ब्रह्मणा शंकरेण च । अतस्त्वं पाहि नो देवि, भूते भूतिप्रदा भव ।।

अर्थ : इंद्र, ब्रह्मदेव, शंकर यांनी तुला वंदन केले आहे. अशा हे देवी, तू आमचे रक्षण करून आम्हाला ऐश्वर्य दे. होळी पेटल्यावर त्या होळीला प्रदक्षिणा करायची आणि पालथ्या हाताने शंखध्वनी करायचा, म्हणजे बोंब मारायची. मनातील दुष्ट प्रवृत्ती शांत होण्याकरता हा विधी आहे. दुसर्‍या दिवशी पहाटे होळीच्या राखेला वंदन करायचे. ती राख अंगाला लावायची आणि स्नान करायचे, म्हणजे आधी-व्याध यांची पीडा होत नाही. (आधी म्हणजे मानसिक व्यथा, चिंता व व्याधी म्हणजे रोग !)

पुराणांतील कथा

१. ढुण्ढा राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा द्यायची. रोग व व्याधी निर्माण करायची. तिला गावाबाहेर हाकलून देण्याकरता लोकांनी खूप प्रयत्‍न केले; पण ती जाईना. अखेरीला तिला बीभत्स शिव्या आणि शाप दिले. ती प्रसन्न झाली आणि गावाबाहेर पळून गेली. (भविष्य पुराण)

२. उत्तरेमध्ये ढुण्ढा राक्षसीऐवजी पुतनेला होळीच्या रात्री पेटवतात. होळीच्या आधी तीन दिवस अर्भक कृष्णाला पाळण्यात निजवतात व त्याचा उत्सव साजरा करतात. फाल्गुन पौर्णिमेला पुतनेचे दहन करतात.

३. दक्षिणेतील लोक कामदेवाप्रीत्यर्थ हा उत्सव करतात. भगवान शंकर तपाचरणात गढले होते. ते समाधीत होते. त्या वेळी मदनाने त्यांच्या अंत:करणात प्रवेश केला. आपल्याला कोण चंचल करतो आहे, म्हणून शंकरांनी डोळे उघडले आणि मदनाला पहाताक्षणीच जाळून टाकले. त्या मदनाचे दहन होळी पौर्णिमेला दक्षिणेत करतात. होळी म्हणजे मदनाचे दहन आहे. या मदनाला जिंकण्याची क्षमता होळीत आहे; म्हणून होळीचा उत्सव आहे.

होळीच्या सणात शिव्या देण्याचे चुकीचे मानसशास्त्र : होळीच्या सणामध्ये आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी वाईट शिव्या देतात. ते काही आधुनिकांना बरे वाटत नाही; पण यात मानसशास्त्र आहे. शब्दांचा मनावर एक प्रकारचा फाजील ताण असतो, तो निघून जातो आणि मन स्वच्छ होते. घाण पाण्याला गटारे करून वाट देतात, तसे माणसातल्या पशूप्रवृत्तीला धर्मशास्त्राने होळीच्या निमित्ताने एक दिवस वाट काढून दिली आहे. होळीच्या सणामध्ये आणि दुसर्‍या दिवशी वाईट शिव्या !... आणि ती बीभत्स वागणूक !! हे विष आहे. रोग बरे करण्याकरता विषाची अत्यंत अल्प मात्रा हवी. अल्प म्हणजे किती तर सुईच्या अग्रावर मावेल एवढी; म्हणजे रोग बरा व्हावा, याकरता विषारी औषधाचा अत्यल्प अंश द्यायचा आणि तोदेखील मोठ्या युक्‍तीने घ्यायचा, बेताने घ्यायचा!'

- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, वर्ष दुसरे, अंक १)

होळी


देशपरत्वे फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या पाच-सहा दिवसांत, कुठे दोन दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो. उत्तरेत याला होरी, दोलायात्रा, तर गोवा, कोकण व महाराष्ट्रात शिमगा, होळी व हुताशनी महोत्सव, होलिकादहन आणि दक्षिणेत कामदहन अशा संज्ञा आहेत. याला `वसंतोत्सव' अथवा `वसंतागमनोत्सव' म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनासाठी साजरा करायचा उत्सव हे नाव देता येईल. होळीच्या सणाचे आज सर्वत्र प्रचलित असलेले स्वरूप पहाता ध्यानी येते की, हा सण मूलत: अगदी लौकिक पातळीवरचा असावा. कालांतराने त्यात उच्च संस्कृतीच्या लोकांकडून कितीही धार्मिक व सांस्कृतिक विधी-विधानांची भर पडली असली, तरीही या सणाचे लौकिक स्वरूप मुळीच लोप पावलेले नाही. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव हे तीन पदर तर सहज उठून दिसतात.






होळीविषयक आध्यात्मिक माहिती - वाचण्यासाठी येथे टिचकी मारा
होळीमध्ये होणारे गैरप्रकार - वाचण्यासाठी येथे टिचकी मारा
आदर्श होळी व गैरप्रकार - वाचण्यासाठी येथे टिचकी मारा

वरील माहिती इंग्रजी ( English) मध्ये वाचण्यासाठी येथे टिचकी मारा



Read more...

महाशिवरात्र

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
शिव




महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कात आहे.

`महाशिवरात्री' म्हणजे काय ? : पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री' असे म्हणतात.

महाशिवरात्रीचे व्रत का करावे ? : शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधि-अवस्थेत जातो. शिवाची समाधि-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे.

व्रत आचरण्याची पद्धत व विधी : उपवास, पूजा व जागरण ही या काताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त रहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा' असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहातात. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कातसमाप्ती करावी.

शिवपूजेची वैशिष्ट्ये : १शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात.२. शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरतात. ३. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात.४. शिवाक्षाला तांदुळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहातात. ५. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व : महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा `ॐ नम: शिवाय' हा नामजप जास्तीतजास्त करावा.

(अधिक माहितीसाठी वाचा : सनातन संस्था-निर्मित ग्रंथ `शिव')

संदर्भ : दैनिक सनातन प्रभातचा महाशिवरात्रि विशेषांक
http://www.hindujagruti.org/hinduism/festivals/mahashivratri/

ध्वनिचित्रपट

शिवविषयक आध्यात्मिक माहिती :


शृंगदर्शन कसे घ्यावे?


`महाशिवरात्री' अधिक ध्वनिचित्रपट व माहिती येथे पहा
Read more...

श्रीराम व मारुति

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
श्रीराम



श्रीरामनवमीआध्यात्मिक् महत्त्व : या दिवशी ब्रह्मांडात आदिशक्ती श्री दुर्गादेवीच्या तत्त्वाच्या व रामतत्त्वाच्या लहरी सर्वांत जास्त प्रमाणात कार्यरत असल्याने जिवांना श्री दुर्गादेवी व श्रीराम या दोन्ही तत्त्वांचा फायदा होतो.

साजरी करण्याची पद्धत : राममंदिरातून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस रामायणाचे पारायण, कथाकीर्तन आणि राममूर्तीला विविध शृंगार, अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीला दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. माध्यान्हकाळी, लहान मुलाचे टोपडे घातलेला नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात. त्यावर गुलाल आणि फुले उधळतात. या दिवशी श्रीरामाचे कात केल्याने सर्व कातांचे फळ मिळते, तसेच सर्व पापांचे क्षालन होऊन अंती उत्तम लोकाची प्राप्ती होते.

(संदर्भ - सनातन-निर्मित ग्रंथ `श्रीराम', `मारुति' व `सण, धार्मिक उत्सव व व्रते')

मारुति



हनुमान जयंतीचैत्र पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्म झाला, तो दिवस `हनुमान जयंती' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासूनच कीर्तनाला सुरुवात करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो, त्या वेळी कीर्तन संपते व सर्वांना प्रसाद वाटतात.श्रीरामनवमी व हनुमान जयंती या दिवशी अनुक्रमे श्रीराम व हनुमान या देवतांचे तत्त्व जास्तीतजास्त ग्रहण करण्यासाठी रामनवमीला `ॐ श्रीराम जय राम जय जय राम ।' असा व हनुमान जयंतीला `ॐ हं हनुमते नम: ।' असा नामजप जास्तीतजास्त करावा.

(संदर्भ - सनातन-निर्मित ग्रंथ `श्रीराम', `मारुति' व `सण, धार्मिक उत्सव व व्रते')

संदर्भ : http://www.sanatan.org/marathi/san/san.shtml#ramnavmi

Read more...

श्री गणेश चतुर्थी

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
श्री गणेश चतुर्थी

महत्त्व : दर महिन्याच्या चतुर्थीला श्रीगणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १०० पटीने कार्यरत असते, तर गणेशोत्सवाच्या दिवसांत ते १००० पटीने कार्यरत असते. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात केलेल्या श्रीगणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होतो.

गणेश चतुर्थीचे कात कुटुंबात कोणी करावे ? : सर्व भाऊ एकत्र रहात असतील, म्हणजेच त्यांचा द्रव्यकोश (खजिना) व पाकनिष्पत्ती (चूल) एकत्र असेल, तर सर्वांनी मिळून एक मूर्ती पुजली तरी चालते; पण द्रव्यकोश व पाकनिष्पत्ती कोणत्याही कारणास्तव विभक्त असतील, तर त्यांनी आपापल्या घरी स्वतंत्र गणेशकात करावे

नवीन मूर्तीचे प्रयोजन : पृथ्वीवर जास्त प्रमाणात येणाऱ्या गणेश लहरी नेहमीच्या पूजेतील मूर्तीत आवाहन केल्यास तिच्यात जास्त शक्ती येईल. जास्त शक्ती असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजा वर्षभर करणे कठीण जाते; कारण त्यासाठी कर्मकांडातील सगळी बंधने पाळावी लागतात. म्हणून नवीन मूर्ती आवाहन करण्यासाठी वापरतात व नंतर विसर्जित करतात.

गणेशाला दूर्वा वहाण्याची पद्धत : कोवळया व ३, ५, ७ अशा विषम संख्येच्या पात्या असलेल्या दूर्वा एकत्र बांधून व पाण्यात भिजवून मग वहाव्यात. दूर्वा वहातांना चेहरा सोडून संपूर्ण मूर्ती दूर्वांनी मढवावी. यामुळे मूर्ती लवकर जागृत व्हायला मदत होते.

गणेशोत्सवाच्या काळात गणेशाचा नामजप करण्याचे महत्त्व : या काळात `ॐ गँ गणपतये नम: ।' हा नामजप जास्तीतजास्त करावा. यामुळे नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या गणेशतत्त्वाचा आपल्याला जास्त लाभ मिळतो.

(अधिक माहितीसाठी वाचा सनातन-निर्मित ग्रंथ `गणपति' )
संदर्भ : http://www.sanatan.org/marathi/san/san.shtml#ganesh

गणपतिची स्थापना कशी करावी ?
Read more...