श्रीरामनवमीआध्यात्मिक् महत्त्व : या दिवशी ब्रह्मांडात आदिशक्ती श्री दुर्गादेवीच्या तत्त्वाच्या व रामतत्त्वाच्या लहरी सर्वांत जास्त प्रमाणात कार्यरत असल्याने जिवांना श्री दुर्गादेवी व श्रीराम या दोन्ही तत्त्वांचा फायदा होतो.
साजरी करण्याची पद्धत : राममंदिरातून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस रामायणाचे पारायण, कथाकीर्तन आणि राममूर्तीला विविध शृंगार, अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीला दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. माध्यान्हकाळी, लहान मुलाचे टोपडे घातलेला नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात. त्यावर गुलाल आणि फुले उधळतात. या दिवशी श्रीरामाचे कात केल्याने सर्व कातांचे फळ मिळते, तसेच सर्व पापांचे क्षालन होऊन अंती उत्तम लोकाची प्राप्ती होते.
(संदर्भ - सनातन-निर्मित ग्रंथ `श्रीराम', `मारुति' व `सण, धार्मिक उत्सव व व्रते')
मारुति
हनुमान जयंतीचैत्र पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्म झाला, तो दिवस `हनुमान जयंती' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासूनच कीर्तनाला सुरुवात करतात. सूर्योदयाला हनुमानाचा जन्म होतो, त्या वेळी कीर्तन संपते व सर्वांना प्रसाद वाटतात.श्रीरामनवमी व हनुमान जयंती या दिवशी अनुक्रमे श्रीराम व हनुमान या देवतांचे तत्त्व जास्तीतजास्त ग्रहण करण्यासाठी रामनवमीला `ॐ श्रीराम जय राम जय जय राम ।' असा व हनुमान जयंतीला `ॐ हं हनुमते नम: ।' असा नामजप जास्तीतजास्त करावा.
(संदर्भ - सनातन-निर्मित ग्रंथ `श्रीराम', `मारुति' व `सण, धार्मिक उत्सव व व्रते')
संदर्भ : http://www.sanatan.org/marathi/san/san.shtml#ramnavmi
0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा:
Post a Comment