नवरात्र विशेष : देवीच्या पूजेची कृती आणि महत्त्व, तसेच कुमारिका पूजन

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

नवरात्र विशेष

आश्‍विन शु. प्रतिपदा (१९ सप्टेंबर २००९) या दिवसापासून नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्त आज देवीच्या पूजेची कृती आणि महत्त्व, तसेच कुमारिका पूजन केल्यामुळे होणारा परिणाम यांविषयी जाणून घेऊया.



देवीच्या पूजेची कृती आणि महत्त्व
देवीपूजनाची सांगता खण अन् साडी देवीला अर्पण करून करावी. देवीला साडी अर्पण करतांना ती सुती किंवा रेशमी असावी. या धाग्यांमध्ये देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांपेक्षा अधिक असते. दोन्ही हातांच्या ओंजळीत साडी ठेवून त्यावर खण आणि त्यावर नारळाची शेंडी देवीकडे ठेवून देवीला चैतन्य देण्याविषयी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी भावपूर्ण प्रार्थना करून सगुण देवीतत्त्व जागृत करावे आणि खण-नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करावा. त्यानंतर देवतेच्या चरणांवरील वस्त्र देवतेचा प्रसाद म्हणून परिधान करावे आणि नारळाचाही प्रसाद म्हणून उपयोग करावा.

महत्त्व
अ. नारळ : नारळाच्या शेंडीकडे देवतेचे तत्त्व आकृष्ट होते आणि ते खण अन् साडी यांमध्ये संक्रमित होण्यास मदत होते. नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे जिवाच्या शरिराभोवती संरक्षण कवच निर्माण होते.

आ. वस्त्र : वस्त्रातून पृथ्वीतत्त्वाच्या साहाय्याने प्रक्षेपित होणार्‍या लहरी या नारळातून आपतत्त्वाच्या साहाय्याने प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरींमुळे गतिमान बनतात व या लहरींचे जिवाच्या देहाभोवती संरक्षण कवच निर्माण होण्यास मदत होते.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `शक्‍ती')

कुमारिका-पूजन केल्यामुळे होणारा परिणाम
सूक्ष्मातील स्पंदनांचे प्रमाण (टक्के)
ईश्‍वरी तत्त्व : १.२५
चैतन्य : २
शक्‍ती (अप्रकट) : ४

१. `यजमान पत्‍नीसह कुमारिकेचे पूजन करतात, त्या वेळी त्यांनी `प्रत्यक्ष देवीचेच पूजन करत आहोत', असा भाव ठेवल्याने त्यांच्या ठिकाणी भावाचे वलय निर्माण होते.

२. यजमानांनी भावपूर्ण पूजन केल्यामुळे कुमारिकेमध्ये ईश्‍वरी तत्त्व आकृष्ट होते.

२ अ. ईश्‍वरी तत्त्वाचे वलय कुमारिकेमध्ये निर्माण होते.

चैतन्य
३. चैतन्याचा प्रवाह आकृष्ट होतो.
३ अ. चैतन्याचे वलय कार्यरत स्वरूपात फिरते.
३ आ. चैतन्याच्या कणांचे वातावरणात प्रक्षेपण होते.

शक्‍ती
नवरात्रीमध्ये श्री दुर्गादेवीच्या पूजनानंतर कुमारिकेचे पूजन केले जाते.
४. देवीतत्त्वाच्या अप्रकट शक्‍तीचा प्रवाह कुमारिकेकडे आकृष्ट होतो.
४ अ. अप्रकट शक्‍तीचे वलय निर्माण होते.
४ आ. या वलयातून शक्‍तीच्या प्रवाहाचे प्रक्षेपण पूजन करणारे यजमान आणि पत्‍नी यांच्याकडे होते.
४ इ. अप्रकट शक्‍तीचे वलय यजमान पती आणि पत्‍नी यांच्यामध्ये निर्माण होते.
४ ई. कुमारिकेकडून शक्‍तीचे कण वातावरणात, तसेच यजमान आणि त्यांची पत्‍नी यांच्या देहात पसरतात.

इतर सूत्रे
१. कुमारिकेत मनावरील संस्कार आणि अहं यांचे प्रमाण न्यून असल्यामुळे ईश्‍वरी चैतन्य आकृष्ट होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे जाणवले.

२. सवाषिणीच्या पूजनातून प्रकट शक्‍तीचे प्रक्षेपण होते आणि कुमारिकेच्या पूजनातून अप्रकट शक्‍तीचे पूजन होते. त्यामुळे सवाषिणीच्या पूजनातून शक्‍तीच्या प्रक्षेपणाचे कार्य कुमारिकेकडून प्रक्षेपित होणार्‍या शक्‍तीपेक्षा अधिक असते.

३. कुमारिकेच्या पूजनातून आनंदाची स्पंदने अधिक प्रमाणात जाणवतात.

४. त्यानंतर कुमारिकेला सौंदर्यप्रसाधने (पावडर, फणी, कुंकू, आरसा इत्यादी.), दूध, वस्त्र, फळे आणि द्रव्य देऊन तिचे पूजन केले जाते.



हे देवीच्या तारक रूपाची भक्‍ती केल्याप्रमाणे असल्याचे जाणवले.'- कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था, गोवा. (भाद्रपद कृ. नवमी, कलियुग वर्ष ५१११ (१३.९.२००९)

Read more...

नवरात्र विशेष : घटस्थापना, वेदीवर सप्‍तधान्य पेरणे आणि कलशाचे पूजन करणे यांविषयी जाणून घेऊया.

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

नवरात्र विशेष

आश्‍विन शु. प्रतिपदा (१९ सप्टेंबर २००९) या दिवसापासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त घटस्थापना, वेदीवर सप्‍तधान्य पेरणे आणि कलशाचे पूजन करणे यांविषयी जाणून घेऊया.



घटस्थापना
घटस्थापना करतांना ज्या पदार्थांत देवतांकडून सात्त्विक लहरी आकर्षित करून घेण्याची क्षमता जास्त असते, ते पदार्थ घटात वापरतात. त्यामुळे ईश्‍वराकडून आकर्षित झालेली शक्‍ती त्यात साठवली जाऊन ती शस्त्रपूजेच्या वेळी मिळते. शास्त्रानुसार घटस्थापना केली, तर देवतेचे ३० टक्के तत्त्व (शक्‍ती) मिळते. - श्री गणेश (श्री. भरत मिरजे यांच्या माध्यमातून, १२.९.२००५, दुपारी ४)
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `शक्‍ती')

घटस्थापना : वेदीवर सप्‍तधान्य पेरणे आणि कलशाचे पूजन करणे
सूक्ष्मातील स्पंदनांचे प्रमाण (टक्के)
ईश्‍वरी तत्त्व :
२
आनंद : ०.७५
चैतन्य : ३
शक्‍ती : ४
कृती : `चाळलेल्या मातीची वेदी सिद्ध करण्यात येते. या भूमीला प्रार्थना करण्यात येते. वेदीच्या मध्यभागी जव घालण्यात येतात आणि त्यावर कलश ठेवण्यात येतो. त्यात जल, दूर्वा, गंध घालून मग पंचपल्लव घालतात. (वड, पिंपळ, आंबा, जांभूळ आणि औदुंबर यांची पाने ठेवतात.) थोडी माती, सुपार्‍या, पंचरत्‍ने (सोने, हिरा, पाचू, नीलमणी आणि मोती), चांदीचे नाणे कलशात घालतात. कलशाच्या कंठाला दोरा गुंडाळतात. त्यावर ताम्हनात तांदूळ ठेवून कलशात वरुणदेवाचे आवाहन करून पूजन करतात. वेदीवर माती पसरतात. त्यावर अंकुरणारी धान्ये पसरण्यात येतात. जव, तांदूळ, दोन प्रकारच्या चवळी, दोन प्रकारचे वाटाणे आणि मूग पेरतात. त्यावर पर्जन्यस्वरूप पाण्याचा वर्षाव करतात. धान्याला प्रार्थना करतात. त्यानंतर कलशाचे पूजन आणि प्रार्थना करतात.

१. चाळलेल्या मातीपासून सिद्ध करण्यात आलेल्या वेदीला, म्हणजेच भूमीला प्रार्थना केल्यावर शक्‍तीचा प्रवाह वेदीकडे आकृष्ट होतो.
१ अ. शक्‍तीच्या वलयांची वेदीमध्ये निर्मिती होणे आणि त्यांचे वातावरणात प्रक्षेपण होते.

२. शक्‍तीची स्पंदने वेदीच्या मध्यभागी घातलेल्या जवाच्या ठिकाणी निर्माण होतात.
जवाच्या वर आधी दिल्याप्रमाणे विविध वस्तू घालून सिद्ध केलेला तांब्याचा कलश आणि ताम्हन ठेवून वरुणदेवतेला आवाहन केल्यानंतर कलशात पुढीलप्रमाणे प्रवाह आकृष्ट होतात.
३. ईश्‍वरी तत्त्व
४. आनंद
५. चैतन्य

कलशात पुढीलप्रमाणे वलये निर्माण होऊन ती कार्यरत स्वरूपात फिरणे

३ अ. ईश्‍वरी तत्त्व
४ अ. आनंद
५ अ. चैतन्य
५ आ. चैतन्याच्या प्रवाहांचे वलयातून वातावरणात प्रक्षेपण होणे

शक्‍ती
६. कलशामध्ये घालण्यात येणार्‍या वस्तूंमुळे त्यामध्ये शक्‍तीचा प्रवाह आकृष्ट होतो.
६ अ. शक्‍तीचे वलय कलशामध्ये निर्माण होते.
६ आ. शक्‍तीच्या वलयातून शक्‍तीच्या प्रवाहांचे वातावरणात प्रक्षेपण होते.
६ इ. शक्‍तीच्या कणांचे कलशातून वातावरणात प्रक्षेपण होते.
६ ई. सप्‍तधान्य पेरल्यामुळे वेदीवर शक्‍तीचे कण कार्यरत रूपात फिरतात.
नवरात्रीतील घटस्थापनेच्या विधीतून शक्‍तीची स्पंदने अधिक प्रमाणात निर्माण होऊन ती वातावरणात प्रक्षेपित होणे कलशात घालण्यात येणार्‍या वस्तूंतून निर्माण
होणारी स्पंदने, त्यांचे प्रमाण आणि रंग (तत्त्वाच्या स्वरूपात)









येथे दिसणे आणि जाणवणे यांची क्रिया एकत्र झाली. म्हणजेच कधी तत्त्वाच्या जाणवण्यावरून त्याचा रंग दिसला, तर कधी रंगाच्या दिसण्यावरून (बुद्धीचा वापर करून) तत्त्व निश्चित केले. पहिल्यांदाच असे झाले आहे, उदा. पिंपळात निळसर रंग दिसला. यावरून `तेथे विष्णुतत्त्व अधिक आहे', असा विचार मनात आला. औदुंबरात दत्ततत्त्व अधिक असल्याने तेथे तांबडा (वैराग्याचा) रंग दिसला. - कु. प्रियांका लोटलीकर

इतर सूत्रे
१. चाळलेल्या मातीपासून सिद्ध केलेल्या वेदीमध्ये पृथ्वीतत्त्वाचे प्रमाण अधिक असते.
२. वेदीतील भूमीला प्रार्थना केल्यामुळे तिच्यातील शक्‍तीस्वरूप तत्त्व प्रकट होते. या शक्‍तीस्वरूप प्रकट भूमीतत्त्वामुळे पाताळातून आक्रमण करणार्‍या शक्‍तींना आळा बसतो.
३. वेदीच्या मध्यभागी ठेवलेल्या जवामध्ये शक्‍तीची स्पंदने कार्यरत स्वरूपात असतात. त्यामुळे वातावरणात मातीच्या गंधाचे (पृथ्वीतत्त्वाचे) प्रक्षेपण होते.
४. जवावर कलश ठेवण्यात येतो. त्या वेळी जवामध्ये शक्‍तीची स्पंदने कार्यरत होतात. त्यामुळे कलशाला आधार मिळतो.
५. कलशात पवित्र नद्यांना आवाहन करून जल घालण्यात येते. त्यामुळे जलामध्ये आपतत्त्वात्मक चैतन्य निर्माण होत असल्याचे जाणवले.
६. घटस्थापना विधीमध्ये कलशाला दोरा बांधण्यात येतो. त्यामुळे देवतांची कलशात निर्माण झालेली तत्त्वे दीर्घकाळ कार्यरत रहातात.
७. कलशाच्या वर ताम्हनात तांदूळ ठेवण्यात येतात. तांदुळामध्ये असणार्‍या चैतन्यामुळे ताम्हनात देवीला आसन प्रदान करण्यात येते.
८. वेदीवर सात प्रकारची धान्ये पेरण्यात येतात.
९. `सृष्टीच्या निर्मितीत उत्पत्तीजन्य शक्‍तीचे प्रतीक म्हणून ही कडधान्ये पेरण्यात येतात', असे जाणवले.
१०. कडधान्यांना प्रार्थना करून त्यावर जलस्वरूप पर्जन्याचा वर्षाव करतात. म्हणजेच `सृष्टीच्या आवश्यक शक्‍तीचे पूजन करून कृपा संपादन करण्यात येते', असे जाणवले.'
- कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था, गोवा. (भाद्रपद कृ. नवमी, कलियुग वर्ष ५१११ (१३.९.२००९))

आधुनिक शिक्षण नव्हे, तर धर्मशिक्षण घेऊन त्यानुसार आचरण केल्यासच मनुष्यजन्माचे सार्थक होते; कारण धर्मशिक्षणानेच `आचार कसा असावा', हे कळते.

Read more...

श्री गणेश पूजाविधी

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

श्री गणेशाची पूजा करतांना अंत:करणात भाव असेल, तर पूजेचा अधिकाधिक लाभ होईल !

कोणत्याही देवतेच्या पूजेत देवतेचे आवाहन, स्थापना आणि प्रत्यक्ष पूजाविधी, या गोष्टी अंतर्भूत असतात. यासाठी देवतेला उपचार समर्पित करतांना त्या वेळी करायच्या कृती आणि म्हणायचे मंत्र यांचा अर्थ पूजकाला ज्ञात असल्यास त्याच्याकडून पूजाकर्म अधिक भावपूर्ण होते. त्यामुळे देवतेचे तत्त्व मूर्तीत अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन पूजकांना (पूजा करणारा अन् त्याचे कुटुंबीय यांना) त्याचा लाभ होतो, म्हणजे पूजकावर त्या देवतेची कृपा होते. याच उद्देशाने श्री गणेश चतुर्थीच्या वेळी करावयाची पूजा, पूजेतील विधी आणि काही मंत्र अर्थासह येथे देत आहोत. अध्यात्मात `भाव तेथे देव' हे तत्त्व महत्त्वाचे आहे. देवतेची पूजा करतांना अंत:करणात भाव नसेल, तर पूजेचा तेवढा लाभ होणार नाही. म्हणून श्री गणेशाची पूजा करतांना `प्रत्यक्ष श्री गणेश पूजास्थळी आला आहे', या भावानेच सर्व उपचार करावेत.



१. पूजेची सिद्धता
१ अ. पूजेची सिद्धता (तयारी) करतांना स्तोत्रपठण किंवा नामजप कसा करावा ? : पूजेची सिद्धता करत असतांना स्तोत्रपठण किंवा नामजप करावा. नामजपाच्या तुलनेत स्तोत्रात सगुण तत्त्व जास्त असते; म्हणून स्तोत्र मोठ्याने म्हणावे आणि नामजप मनात करावा. नामजप मनातल्या मनात होत नसल्यास मोठ्याने करण्यास हरकत नाही.
१ आ. पूजासाहित्य : १. पिंजर (कुंकू) १०० ग्रॅम, २. हळद १०० ग्रॅम,
३. सिंदूर २५ ग्रॅम, ४. अष्टगंध ५० ग्रॅम, ५. रांगोळी पाव किलो,
६. अत्तर १ डबी, ७. यज्ञोपवीत (जानवी) २ नग, ८. उदबत्ती २५ नग, ९. कापूर २५ गॅ्रम, १०. वाती ५० नग, ११. कापसाची वस्त्रे ६ (७ मण्यांची), १२. अक्षता (अखंड तांदूळ) १०० ग्रॅम, १३. सुपार्‍या १५ नग, १४. नारळ ५ नग, १५. विड्याची २५ पाने, १६. तांदूळ १ किलो, १७. १ रुपयाची १० नाणी, १८. तिळाचे तेल १ लिटर, १९. शुद्ध तूप १०० ग्रॅम, २०. फुले १ किलो, २१. फुलांचे ३ हार, २२. तुळशी (२ पाने असलेली) २५ टिक्शा, २३. दोनशे दूर्वा, २४. बेलाची १५ पाने, २५. फळे (प्रत्येकी पाच प्रकारची) १० नग, २६. पत्री, २७. देवाची मूर्ती (गणपति) १, २८. चौरंग १ नग, २९. पाट ४ नग, ३०. कलश १ नग, ३१. ताम्हण ३ नग, ३२. घंटा १ नग,
३३. समई २ नग, ३४. निरांजने ४ नग, ३५. पंचपात्री १ नग, ३६. पळी
१ नग, ३७. तबक (ताटे) ५ नग, ३८. वाट्या १५ नग, ३९. पातेली
१ नग, ४०. आम्रपल्लव ५ टाळे, ४१. एकारती १ नग, ४२. पंचारती
१ ाग, ४३. एक काडेपेटी, ४४. पराती १ नग, ४५. मोदक ३५ नग,
४६. करंज्या १५ नग, ४७. धूप १०० ग्रॅम, ४८. खण १, ४९. तोरणाचे (माटोळी) साहित्य, ५०. देव पुसण्यासाठी वस्त्र (कापड), ५१. पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर प्रत्येकी १ लहान वाटी)

१ इ. पूजास्थळाची शुद्धी आणि उपकरणांची जागृती करणे
१ इ १. पूजास्थळाची शुद्धी
अ. पूजाघर असलेल्या खोलीचा केर काढावा. शक्यतो पूजा करणार्‍या जिवानेच केर काढावा.
आ. केर काढल्यावर खोलीतील भूमीचा पृष्ठभाग मातीचा असल्यास ती शेणाने सारवावी. भूमीचा पृष्ठभाग मातीचा नसल्यास ती स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी.
इ. आंब्याच्या किंवा तुळशीच्या पानाने खोलीत गोमूत्र शिंपडावे. गोमूत्र उपलब्ध नसल्यास विभूतीच्या पाण्याचा वापर करावा. त्यानंतर खोलीत धूप दाखवावा.

१ इ २. उपकरणांची जागृती : देवपूजेची उपकरणे घासूनपुसून स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर त्यांच्यावर तुळशीचे पान किंवा दूर्वा यांनी जलप्रोक्षण करावे.
१ ई. रांगोळी काढणे
१. रांगोळी पुरुषांनी न काढता स्त्रियांनी काढावी.
२. रांगोळी शक्यतो मुख्य देवतेचे तत्त्व आकृष्ट करणारी असावी. तसेच एखाद्या विशिष्ट देवतेची पूजा करत असतांना तिच्या तत्त्वाशी संबंधित रांगोळी काढावी.
३. देवाच्या नावाची किंवा रूपाची रांगोळी न काढता स्वस्तिक किंवा बिंदू यांनी युक्‍त असलेली काढावी.
४. रांगोळी काढल्यावर तिच्यावर हळदी-कुंकू वहावे.

१ उ. शंखनाद करणे
१. शंखनाद करतांना उभे राहून मान वरच्या दिशेने करून आणि थोडी मागच्या बाजूला झुकवून मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्‍न करावा.
२. श्‍वास पूर्णत: छातीत भरून घ्यावा.
३. त्यानंतर शंखध्वनी करण्यास प्रारंभ करून ध्वनीची तीव्रता वाढवत न्यावी आणि शेवटपर्यंत तीव्र नाद करावा. शक्यतो शंख एका श्‍वासात वाजवावा.
४. शंखिणीचा नाद करू नये.

१ ऊ. देवपूजेला बसण्यासाठी आसन घेणे : सर्वसाधारण पूजकाने (३० टक्के पातळीपर्यंतच्या) आसन म्हणून लाकडी पाट घ्यावा. तो दोन फळया जोडून न बनवता अखंड असावा. त्याला लोखंडाचे खिळे मारलेले नसावेत. शक्यतो पाट रंगवलेला नसावा ३० ते ५० टक्के पातळीच्या पूजकाने रेशमी किंवा तत्सम आसन घ्यावे, तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त पातळीच्या पूजकाने कोणतेही आसन घ्यावे. आसनाखाली रांगोळी काढावी. रेशमी वस्त्र वा तत्सम आसन घेतल्यास त्यांच्या सभोवती रांगोळी काढावी. बसण्यापूर्वी उभे राहून भूमी आणि देव यांना प्रार्थना करावी, `आसनाच्या ठायी आपला चैतन्यमय वास असू दे.'

१ ए. पूजासाहित्य आणि पूजास्थळ यांची अन् स्वत:ची शुद्धी : कलश आणि शंख यांतील थोडेसे पाणी पळीमध्ये एकत्र घ्यावे. `पुंडरीकाक्षाय नम: ।' हा नाममंत्र म्हणत तुळशीच्या पानाने ते पाणी पूजासाहित्यावर, आजूबाजूला आणि स्वत:च्या शरिरावर शिंपडावे. त्यानंतर तुळशीचे पान ताम्हनात सोडावे.

२. पूजेविषयी महत्त्वाच्या सूचना
२ अ. पूजेच्या प्रारंभी सोवळे किंवा पीतांबर किंवा धूतवस्त्र (धोतर) आणि उपरणे परिधान करावे.
२ आ. पूजा करतांना देवता आपल्यासमोर प्रत्यक्ष प्रगट झाली आहे, आसनस्थ झाली आहे आणि आपण अनन्य शरणागत भावाने करत असलेली पूजा देवता स्वीकारत आहे', असा भाव मनात ठेवावा अन् प्रत्येक उपचार देवाच्या चरणी अर्पण करावा.
२ इ. आदल्या दिवशी देवतांना अर्पण केलेली फुले आणि हार (निर्माल्य) काढून त्याचे विसर्जन करावे.
२ ई. ज्यांना पूजेतील श्लोक/मंत्र म्हणता येणार नाहीत, त्यांनी केवळ `आवाहयामि, समर्पयामि' असा उल्लेख असलेले नाममंत्र म्हणून देवतेला उपचार समर्पित करावे, उदा. श्री महागणपतये नम: । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।।

३. श्री गणेशाची षोडशोपचारपूजा
।। अथ पूजा प्रारंभ ।।
कुंकूमतिलक : पूजकाने (यजमानाने) प्रथम स्वत:ला कुंकूमतिलक लावावा.
आचमन : उजव्या हाताने आचमनाची मुद्रा करावी. नंतर डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हाताच्या तळव्यावर (मुद्रेच्या स्थितीतच) घ्यावे आणि प्रत्येक नावाच्या शेवटी `नम:' हा शब्द उच्चारून ते पाणी प्यावे.
१. श्री केशवाय नम: । २. श्री नारायणाय नम: । ३. श्री माधवाय नम: । चौथे नाव उच्चारतांना `नम:' या शब्दाच्या वेळी उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे.
४. श्री गोविंदाय नम: ।
पूजकाने हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ हात जोडावे अन् शरणागतभावासह पुढील नावे उच्चारावीत.
५. श्री विष्णवे नम: । ६. श्री मधुसूदनाय नम: । ७. श्री त्रिविक्रमाय नम: । ८. श्री वामनाय नम: । ९. श्री श्रीधराय नम: । १०. श्री हृषीकेशाय नम: । ११. श्री पद्मनाभाय नम: । १२. श्री दामोदराय नम: । १३. श्री संकर्षणाय नम: । १४. श्री वासुदेवाय नम: । १५. श्री प्रद्मुम्नाय नम: । १६. श्री अनिरुद्धाय नम: । १७. श्री पुरुषोत्तमाय नम: । १८. श्री अधोक्षजाय नम: । १९. श्री नारसिंहाय नम: ।
२०. श्री अच्युताय नम: । २१. श्री जनार्दनाय नम: । २२. श्री उपेंद्राय नम: । २३. श्री हरये नम: । २४. श्री श्रीकृष्णाय नम: ।।
पुन्हा आचमनाची कृती करून २४ नावे म्हणावीत. नंतर पंचपात्रीतील सर्व पाणी ताम्हणात ओतावे अन् दोन्ही हात पुसून छातीशी नमस्काराच्या मुद्रेत हात जोडावेत.
देवतास्मरण
श्रीमन्महागणाधिपतये नम: । इष्टदेवताभ्यो नम: । कुलदेवताभ्यो नम: । ग्रामदेवताभ्यो नम: । स्थानदेवताभ्यो नम: । वास्तुदेवताभ्यो नम: । आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नम: । सर्वेभ्यो देवेभ्यो नम: । सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम: । अविघ्नमस्तु ।।
देशकाल : पूजकाने स्वत:च्या दोन्ही डोळयांना पाणी लावून पुढील `देशकाल' म्हणावा.
श्रीमद्‌भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्‍वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे प्रथमचरणे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दंडकारण्ये देशे गोदावर्या: दक्षिणे तीरे बौद्धावतारे रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने शालिवाहन शके व्यावहारिके अमुकनाम संवत्सरे, दक्षिणायने वर्षाऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्यां तिथौ अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे शुभयोगे शुभकरणे एवंगुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ
पंचांग पाहून अमुक या शब्दाच्या ठिकाणी संवत्सर, वार आणि नक्षत्र यांचा उच्चार करावा.
ज्यांना वरील देशकाल म्हणणे शक्य नसेल, त्यांनी पुढील श्लोक म्हणावा आणि नंतर संकल्प म्हणावा.
`तिथिर्गुरुस्तथा वारं नक्षत्रं गुरुरेव च ।
योगश्च करणं चैव सर्वं गुरुमयं जगत् ।।
संकल्प : उजव्या हातात अक्षता घेऊन संकल्प म्हणावा.




श्री महागणपतिपूजन : प्रथम पार्थिव मूर्तीच्या समोर किंवा उपलब्ध स्थानानुसार (जागेनुसार) ताह्मण अथवा केळीचे पान ठेवावे. त्यावर तांदूळाची रास घालावी. त्यावर श्रीफळ (नारळ) ठेवतांना त्याची शेंडी आपल्या दिशेने ठेवावी. नंतर चंदनादी उपचारांनी श्री महागणपतीचे पूजन करावे.
ध्यान : नमस्काराची मुद्रा करून हात छातीशी घ्यावे आणि श्री महागणपतीचे रूप डोळे मिटून मनात आठवावे आणि पुढील श्लोक म्हणावा.
वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।
अर्थ : वाईट मार्गाने जाणार्‍यांना सरळ मार्गावर आणणार्‍या, प्रचंड शरीर असलेल्या, कोटी सूर्यांचे तेज सामावलेल्या हे गणपतिदेवा, माझ्या कार्यांतील विघ्ने सदोदित तूच दूर कर. श्री महागणपतीला नमस्कार करून मी तुझे ध्यान करतो.
श्री महागणपतये नम: । ध्यायामि ।।
आवाहन : उजव्या हातात (मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून) अक्षता घेऊन `आवाहयामि' म्हणतांना श्रीफळरूपी महागणपतीच्या चरणी वहाव्यात.)
`श्रीमहागणपतये नम: । महागणपतिं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्‍तिकं आवाहयामि ।।'
आसन : उजव्या हातात अक्षता घेऊन `समर्पयामि' म्हणतांना महागणपतीच्या चरणी वहाव्यात.
श्री महागणपतये नम: । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।।
चंदनादी उपचार : उजव्या हाताच्या अनामिकेने गंध (चंदन) घेऊन देवाला लावा. त्यानंतर पुढील नाममंत्र म्हणतांना `समर्पयामि' हा शब्द उच्चारतांना कंसात दिल्याप्रमाणे उपचार देवाच्या चरणी अर्पण करावेत.
श्री महागणपतये नम: । चंदनं समर्पयामि ।। (गंध लावावे.) ऋद्धिसिद्धिभ्यां नम: । हरिद्रां समर्पयामि ।। (हळद वहावी.) ऋद्धिसिद्धिभ्यां नम: । कुंकुमं समर्पयामि ।। (कुंकू वहावे.) श्री महागणपतये नम: । ऋद्धिसिद्धिभ्यां नम: । सिंदूरं समर्पयामि ।। (सिंदूर वहावा.) श्री महागणपतये नम: । अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि ।। (अक्षता वहाव्यात.)
श्री महागणपतये नम: । पुष्पं समर्पयामि ।। (फूल वहावे.) श्री महागणपतये नम: । दूर्वांकुरान् समर्पयामि ।। (दूर्वा वहाव्यात.) श्री महागणपतये
नम: । धूपं समर्पयामि ।। (उदबत्ती ओवाळावी.) श्री महागणपतये
नम: । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.)
उजव्या हातात दूर्वा घेऊन त्यावर पाणी घालावे. नंतर दूर्वांनी ते पाणी नैवेद्यावर प्रोक्षण करून (शिंपडून) दूर्वा हातातच धरून ठेवाव्यात आणि आपल्या डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळयांवर (पाठभेद : डावा हात छातीवर) ठेवून नैवेद्य समर्पण करतांना पुढील मंत्र म्हणावे.
प्राणाय नम: । अपानाय नम: । व्यानाय नम: । उदानाय नम: । समानाय नम: । ब्रह्मणे नम: ।।
(टीप - वेदोक्‍त पूजाविधीमध्ये `प्राणाय नम: ' या ठिकाणी `ॐ प्राणाय स्वाहा ।' अशा प्रकारे म्हणतात.)
हातातील एक दूर्वा नैवेद्यावर आणि उर्वरित दूर्वाश्री गणपतीच्या चरणी वहाव्यात. हातावर पाणी घ्यावे अन् पुढील प्रत्येक मंत्र म्हणतांना ते पाणी ताम्हणात सोडावे.
श्रीमहागणपतये नम: । नैवेद्यं समर्पयामि ।। मध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं
समर्पयामि ।। (गंध-फूल वहावे.) करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।।
नमस्काराची मुद्रा करून प्रार्थना करावी.
कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरि । विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि गणनायक ।।
अर्थ : हे गणनायका, तू माझ्यावर प्रसन्न हो. तसेच माझ्या कार्यातील सर्व विघ्ने दूर करून तूच माझे कार्य सिद्धीस ने.
यानंतर पळीभर पाणी घ्यावे आणि `प्रीयताम्' हा शब्द म्हणतांना ते ताम्हणात सोडावे.
अनेन कृतपूजनेन श्री महागणपति: प्रीयताम् ।
श्रीविष्णुस्मरण : दोन्ही हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीशी हात जोडावे. नंतर ९ वेळा `विष्णवे नमो' म्हणावे अन् शेवटी `विष्णवे नम: ।' असे म्हणावे.

कलशपूजन
गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मदे सिंधुकावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ।। कलशे गंगादितीर्थान्यावाहयामि ।। कलशदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।
कलशामध्ये गंध, अक्षता अन् फूल एकत्रित वहावे.
शंखपूजा
शंखदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि ।।
अर्थ : हे शंखदेवते, मी तुला वंदन करून सर्व उपचारांसाठी गंध-फूल समर्पित करतो.
घंटापूजा
आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम् । कुर्वे घंटारवं तत्र देवताह्वानलक्षणम् ।।
अर्थ : देवतांनी यावे आणि राक्षसांनी निघून जावे, यासाठी देवता-आगमनसूचक असा नाद करणार्‍या घंटादेवतेला वंदन करून गंध-फूल समर्पित करतो.
घंटायै नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।
दीपपूजा
भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यय: ।आरोग्यं देहि पुत्रांश्च मतिं शांतिं प्रयच्छ मे ।। दीपदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।
अर्थ : हे दीपदेवते, तू ब्रह्मस्वरूप आहेस. सर्व ज्योतींचा अव्यय असा स्वामी आहेस. तू मला आरोग्य, पुत्रसौख्य, बुद्धी आणि शांती दे. मी तुला वंदन करून सर्व उपचारांसाठी गंध-फूल समर्पित करतो. (दीपदेवतेला हळदी-कुंकू वहाण्याची पद्धतही आहे.)
मंडपपूजन (माटोळीपूजन) : पुढील मंत्र म्हणतांना `समर्पयामि' या शब्दाच्या वेळी मंडपावर (माटोळीवर) गंध, अक्षता आणि फूल वहावे.
मंडपदेवताभ्यो नम: । गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।
स्थलशुद्धी
अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा । य: स्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतर: शुचि: ।।
अर्थ : अपवित्र किंवा कोणत्याही अवस्थेतील मनुष्य पुंडरीकाक्षाच्या (विष्णूच्या) स्मरणाने अंतर्बाह्य शुद्ध होतो.
पूजकाने या मंत्राने तुळशीपत्रावर पाणी घालून ते पाणी पूजासाहित्यावर आणि स्वत:वर प्रोक्षण करावे (शिंपडावे). नंतर तुळशीपत्र ताह्मणात सोडावे.
पार्थिव सिद्धिविनायकाच्या मूर्तीची पूजा
प्राणप्रतिष्ठा : पूजकाने स्वत:चा उजवा हात मूर्तीच्या हृदयाला लावून `या मूर्तीत सिद्धिविनायकाचे प्राण (तत्त्व) आकृष्ट होत आहे', असा भाव ठेवून पुढील मंत्र म्हणावेत.
अस्य श्रीप्राणप्रतिष्ठामंत्रस्य ब्रह्माविष्णुमहेश्‍वरा ऋषय: ऋग्यजु:सामानि छंदांसि पराप्राण-शक्‍तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्‍ति: क्रों कीलकम् । अस्यां मूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोग: ।। ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य प्राणा इह प्राणा: ।।ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य जीव इह स्थित: ।। ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य सर्वेन्द्रियाणि ।। ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य वाङ्मन:चक्षु:श्रोत्रजिह्वाघ्राणप्राणा इहागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा ।।
(टीप - प्राणप्रतिष्ठेचे वरील मंत्र वेदोक्‍त आहेत.)
अस्यै प्राणा: प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणा: क्षरन्तु च । अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन ।।
नंतर `परमात्मने नम: ।' असे १५ वेळा म्हणावे.
ध्यान : हात जोडून नमस्काराची मुद्रा करावी.



(टीप - हा मंत्र वेदोक्‍त आहे. )
एकदंतं शूर्पकर्णं गजवक्‍त्रं चतुर्भुजम् । पाशांकुशधरं देवं
ध्यायेत् सिद्धिविनायकम् ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय
नम: । ध्यायामि ।।
अर्थ : ज्याच्या मुखकमलात एकच दात आहे, कान सुपासारखे मोठे रुंद आहेत, तोंड हत्तीचे आहे, चार हात आहेत, अशा प्रकारे हातांमध्ये अंकुश आणि पाश धारण करणार्‍या भगवान सिद्धिविनायकदेवाचे मी ध्यान (चिंतन) करतो.
१.आवाहन : उजव्या हातात अक्षता घेऊन `आवाहयामि' म्हणतांना महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणी वहा. (अक्षता वहातांना मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून वहाव्यात.)
आवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्‍वर । अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थं गणनायक ।।
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । आवाहयामि ।।
अर्थ : हे विघ्नेशा, देवगणांनी पूजलेल्या, अनाथांच्या नाथा, सर्वज्ञ गणनायका मी पूजेसाठी तुझे आवाहन करतो.
२. आसन : उजव्या हातात अक्षता घेऊन `समर्पयामि' म्हणतांना देवांच्या चरणी वहा.
विचित्ररत्‍नरचितं दिव्यास्तरणसंयुतम् । स्वर्णसिंहासनं चारु गृहाण सुरपूजित उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । आसनार्थे अक्षतां समर्पयामि ।।
३. पाद्य : उजव्या हाताने पळीभर पाणी घ्या आणि `समर्पयामि' म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी अन् सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा.
सर्वतीर्थसमुद्‌भूतं पाद्यं गंधादिभिर्युतम् । विघ्नराज गृहाणेदंभगवन्भक्‍तवत्सल ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । पाद्यं समर्पयामि ।।
४. अर्घ्य : डाव्या हाताने पळीभर पाणी घ्या. त्या पाण्यात गंध, फूल आणि अक्षता घाला. उजव्या हातात दूर्वा घेऊन `समर्पयामि' म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा.

अर्घ्यं च फलसंयुक्‍तं गंधपुष्पाक्षतैर्युतम् । गणाध्यक्ष नमस्तेऽस्तु गृहाण करुणानिधे ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । अर्घ्यं समर्पयामि ।।

५.आचमन : डाव्या हातात पळीभर पाणी आणि उजव्या हातात दूर्वा घ्या. नंतर `समर्पयामि' म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी आणि गणपती यांच्या चरणांवर प्रोक्षण करा.
विनायक नमस्तुभ्यं त्रिदशैरभिवन्दितम् । गंगोदकेन देवेश शीघ्रमाचमनं कुरु ।।
अर्थ : हे विनायका, देवांनीही अभिवादन केलेल्या देवेशा, या गंगेच्या पाण्याचा आचमनार्थ तू स्वीकार कर.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । आचमनीयं समर्पयामि ।।

६. स्नान : पळीभर पाणी घ्या. मग उजव्या हातात दूर्वा घेऊन `समर्पयामि' म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी अन् सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा.
गंगासरस्वतीरेवापयोष्णीयमुनाजलै: । स्नापितोऽसि मया देव तथा शांतिं कुरुष्व मे ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । स्नानं समर्पयामि ।।
अर्थ : गंगा, सरस्वती, रेवा, पयोष्णी आणि यमुना या नद्यांच्या पाण्याने मी तुला स्नान घालत आहे. हे देवा, मला शांती प्रदान कर.
६ अ. पंचामृत स्नान : पुढीलप्रमाणे दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे स्नान घालावे. उजव्या हातात दूर्वा घेऊन `समर्पयामि' म्हणतांना महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणांवर दूध प्रोक्षण करावे. नंतर शुद्धोदक प्रोक्षण करावे. अशा प्रकारे उर्वरित उपचारांनी देवाला स्नान घालावे.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । पयस्नानं समर्पयामि । तदन्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।। पुढील प्रत्येक स्नानानंतर शुद्धोदकाचा वरील मंत्र म्हणून देवांच्या चरणी पाणी प्रोक्षण करावे. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दधिस्नानं समर्पयामि ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । घृतस्नानं समर्पयामि ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । मधुस्नानं समर्पयामि ।।
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह ।।भक्‍त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने ।
त्राहि मां निरयाद् घोराद् दीपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे त्रिभुवनातील अंधार दूर करणार्‍या देवेशा, मी अग्नीने संयुक्‍त केलेली तुपाची वात तुला अर्पण करत आहे. हे परमात्मने, हा भक्‍तीपूर्वक अर्पण केलेल्या या दीपाचा तू स्वीकार कर. हे भगवंता, तूच मला घोर नरकातून सोडव.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.)
६ आ. अभिषेक : पंचपात्रामध्ये पाणी भरून घ्यावे आणि उजव्या हातात दूर्वा घ्याव्या. नंतर पळीतील पाणी देवावर प्रोक्षण करतांना श्रीगणपतिअथर्वशीर्ष किंवा संकटनाशनगणपति स्तोत्र म्हणावे.

७.वस्त्र : कापसाची वस्त्रे घ्या अन् `समर्पयामि' म्हणतांना ती देवतांच्या चरणी वहा.
रक्‍तवस्त्रयुगं देव देवतार्हं सुमङ्गलम् । सर्वप्रद गृहाणेदं लंबोदर हरात्मज ।।
अर्थ : हे शिवसुता, लंबोदरा, देवतांसाठी सुयोग्य, सुमंगल आणि सर्व गोष्टी प्रदान करणार्‍या या लाल वस्त्रांच्या जोडीचा तू स्वीकार कर.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । कार्पासनिर्मितं वस्त्रं समर्पयामि ।।

८. यज्ञोपवीत : महादेव आणि सिद्धिविनायक यांना यज्ञोपवीत अर्पण करावे अन् देवीला अक्षता वहाव्यात.
राजतं ब्रह्मसूत्रं च कांचनस्योत्तरीयकम् । विनायक नमस्तेऽस्तु गृहाण सुरवन्दित ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । यज्ञोपवीतं समर्पयामि ।।
अर्थ : हे सुरगणपूजित विनायका, सुवर्णाचे उत्तरीय अन् रुप्याप्रमाणे लखलखित यज्ञोपवीताचा तू स्वीकार कर.
उमायै नम: । उपवीतार्थे अक्षतान् समर्पयामि ।।

९. चंदन : देवांना अनामिकेने गंध लावावे.
श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरम् । विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम् । उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।
अर्थ : हे देवश्रेष्ठा, अत्यंत मनोहर, भरपूर सुगंधाने पुष्ट असणार्‍या दिव्य अशा श्रीखंड चंदनाच्या लेपाचा तू स्वीकार कर.
श्री उमायै नम: । हरिद्रां कुंकुमं समर्पयामि ।। (हळद-कुंकू वहावे.)
श्री उमायै नम: । श्रीसिद्धिविनायकाय नम: । सिंदूरं समर्पयामि ।। (गौरी अन् सिद्धिविनायक यांना शेंदूर वहावा.)
१०. फुले-पत्री : उपलब्ध असलेली विविध प्रकारची फुले आणि पत्री अर्पण करावी.



अर्थ : हे प्रभो, मी पूजेसाठी आणलेल्या फुलांच्या माळा, तसेच चमेली आदी सुगंधित फुले आपण घ्यावी. तसेच शेवंती, बकुळ, चाफा, उंडीणकमळे, पुंनाग, जाई, कण्हेर, आंब्याचा मोहर, बेल, तुलसी चमेली आदी फुलांनी मी तुझी पूजा करतो. हे जगदीश्‍वरा, तू प्रसन्न हो.
महादेव आणि गौरी यांना तुळस अन् बेलाचे पान वहावे.
श्रीउमामहेश्‍वराभ्यां नम: ।
तुलसीपत्रं बिल्वपत्रं च समर्पयामि ।।
अंगपूजा : पुढील नावांनी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी किंवा देवाच्या त्या त्या अवयवांवर उजव्या हाताने मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून) अक्षता वहाव्यात.
श्री गणेशाय नम: । पादौ पूजयामि ।। (चरणांवर) श्री विघ्नराजाय नम: । जानुनी पूजयामि ।। (गुडघ्यांवर) श्री आखुवाहनाय नम: । ऊरू पूजयामि ।। (मांड्यांवर) श्री हेरंबाय नम: । कटिं पूजयामि ।। (कमरेवर) श्री कामारिसूनवे नम: । नाभिं पूजयामि ।। (बेंबीवर) श्री लंबोदराय नम: । उदरं पूजयामि ।। (पोटावर) श्री गौरीसुताय नम: । हृदयं पूजयामि ।। (छातीवर) श्री स्थूलकंठाय नम: । कंठं पूजयामि ।। (गळयावर) श्री स्कंदाग्रजाय नम: । स्कंधौ
पूजयामि ।। (खांद्यांवर) श्री पाशहस्ताय नम: । हस्तौ पूजयामि ।। (हातावर)
श्री गजवक्‍त्राय नम: । वक्‍त्रं पूजयामि ।। (मुखावर)
श्री विघ्नहर्त्रे नम: । नेत्रे पूजयामि ।। (डोळयांवर) श्री सर्वेश्‍वराय नम: । शिर: पूजयामि ।। (मस्तकावर) श्री गणाधिपाय नम: । सर्वांगं पूजयामि ।। (सर्वांगावर)
पत्रीपूजा : पुढील नावांनी देठ देवाकडे करून `समर्पयामि' असे म्हणतांना देवाच्या चरणी पत्री वहावी.
श्री सुमुखाय नम: । मालतीपत्रं समर्पयामि ।। (चमेलीचे पान) श्री गणाधिपाय नम: । भृंगराजपत्रं समर्पयामि ।। (माका) श्री उमापुत्राय नम: । बिल्वपत्रं समर्पयामि ।। (बेल) श्री गजाननाय नम: । श्‍वेतदूर्वापत्रं समर्पयामि ।। (पांढर्‍या दूर्वा) श्री लंबोदराय नम: । बदरीपत्रं समर्पयामि ।। (बोर)
श्री हरसूनवे नम: । धत्तूरपत्रं समर्पयामि ।। (धोतरा) श्री गजकर्णाय नम: । तुलसीपत्रं समर्पयामि ।। (तुळस) श्री गुहाग्रजाय नम: । अपामार्गपत्रं
समर्पयामि ।। (आघाडा) श्री वक्रतुंडाय नम: । शमीपत्रं समर्पयामि ।। (शमी) श्री एकदंताय नम: । केतकीपत्रं समर्पयामि ।। (केवडा) श्री विकटाय नम: । करवीरपत्रं समर्पयामि ।। (कण्हेर) श्री विनायकाय नम: । अश्मंतकपत्रं समर्पयामि ।। (आपटा) श्री कपिलाय नम: । अर्कपत्रं समर्पयामि ।। (रुई) श्री भिन्नदंताय नम: । अर्जुनपत्रं समर्पयामि ।। (अर्जुनसादडा) श्री पत्‍नीयुताय नम: । विष्णुक्रांतापत्रं समर्पयामि ।। (गोकर्ण) श्री बटवेनम: । दाडिमीपत्रं समर्पयामि ।। (डाळिंब) श्री सुरेशाय नम: । देवदारूपत्रं समर्पयामि ।। (देवदार) श्री भालचंद्राय नम: । मरूबकपत्रं समर्पयामि ।। (मरवा)
श्री हेरंबाय नम: । सिंदुवारपत्रं समर्पयामि ।। (निगडी / लिंगड) श्री शूर्पकर्णाय नम: । जातीपत्रं समर्पयामि ।। (जाई) श्री सर्वेश्‍वराय नम: । अगस्तिपत्रं समर्पयामि ।। (अगस्ति)
यानंतर श्री सिद्धिविनायकाची १०८ नावे म्हणून एकेक दूर्वा अर्पण करावी.

११. धूप : उदबत्ती ओवाळावी.
वनस्पतिरसोद्‌भूतो गंधाढ्यो गंध उत्तम: ।
आघ्रेय: सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : वनस्पतींच्या रसांतून उत्पन्न झालेला, पुष्कळ सुगंधाने युक्‍त असलेला, सर्व देवतांनी सुवास घेण्याजोगा असा हा धूप मी तुला दाखवत आहे. हे देवा, तू याचा स्वीकार कर.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: ।
धूपं समर्पयामि ।।

१२. दीप
आज्यं च वर्तिसंयुक्‍तं वह्िनना योजितं मया ।
दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह ।।
भक्‍त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने ।
त्राहि मां निरयाद् घोराद् दीपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे त्रिभुवनातील अंधार दूर करणार्‍या देवेशा, मी अग्नीने संयुक्‍त केलेली तुपाची वात तुला अर्पण करत आहे. हे परमात्मने, हा भक्‍तीपूर्वक अर्पण केलेल्या या दीपाचा तू स्वीकार कर. हे भगवंता, तूच मला घोर नरकातून सोडव.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: ।
दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.)

१३. नैवेद्य : उजव्या हातात तुळशीपत्र / बेलाचे पान / दूर्वा घेऊन त्याच्यावर पाणी घालावे. ते पाणी नैवेद्यावर शिंपडून तुळस हातातच धरावी. तुळशीसह पाण्याने नैवेद्याभोवती मंडल करावे. नंतर आपला डावा हात छातीवर ठेवावा (पाठभेद : आपल्या डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळयांवर ठेवावी). तसेच आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी देवतेला त्या नैवेद्याचा गंध (नैवेद्य समर्पित करतांना) देतांना पुढील मंत्र म्हणावा.
नैवेद्यं गृह्यतां देव भक्‍तिं मे ह्यचलां कुरु । ईप्सितं मे वरं देहि परत्र च परां गतिम् ।। शर्कराखंडखाद्यानि दधिक्षीरघृतानि च । आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे भगवंता, या नैवेद्याचा स्वीकार करावा आणि माझी भक्‍ती अचल करावी. या लोकांत माझे अभीष्ट, ईप्सित पूर्ण करावे. तसेच परलोकात मला श्रेष्ठ गती प्राप्‍त व्हावी. खडीसाखर आदि खाद्यपदार्थ दही, दूध, तूप आदि भक्ष्य आणि भोज्य आहाररूप अशा नैवेद्याचा आपण स्वीकार करावा.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: ।
पुरतस्थापितमधुरनैवेद्यं निवेदयामि ।। प्राणाय नम: ।
अपानाय नम: । व्यानाय नम: । उदानाय नम: । समानाय नम: । ब्रह्मणे नम: ।।
(टीप - वेदोक्‍त पूजाविधीमध्ये `प्राणाय नम: ।' या ठिकाणी `ॐ प्राणाय स्वाहा ।' असे म्हणण्यात येते.) पूजकाने हातातील दूर्वा श्री सिद्धिविनायकाच्या चरणी वहाव्या आणि उजव्या हातावर पाणी घेऊन पुढील प्रत्येक मंत्र म्हणून ते पाणी ताम्हणात सोडावे.
नैवेद्यं समर्पयामि । मध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।।
फुलाला गंध लावून देवाला वहावे.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।।
यानंतर आरती करून कापूरारती करावी.
पाठभेद : शास्त्रात आरतीनंतर `नमस्कार, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प' हा क्रम सांगितला असला, तरी सध्या बर्‍याच ठिकाणी आरतीनंतर `मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार' या क्रमाने उपचार केले जातात.

१४. नमस्कार : नंतर पुढील श्लोक म्हणून देवाला पूर्ण शरणागत भावाने साष्टांग नमस्कार घालावा.
नम: सर्वहितार्थाय जगदाधारहेतवे । साष्टांगोऽयं प्रणामस्ते प्रयत्‍नेन मया कृत: ।। नमोऽस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे ।।
सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्‍वते सहस्रकोटीयुगधारिणे नम: ।।
अर्थ : सर्व जगाचा आधार आणि कारण असलेल्या, सर्वांचे हित करणार्‍या देवा, मी तुला साष्टांग प्रणाम करतो. सहस्र शरीरे, पाद (पाय), नेत्र, शिर, मांड्या आणि बाहू असलेल्या, सहस्र नावे असलेल्या, सहस्रकोटी युगांना धारण करणार्‍या, शाश्‍वत अन् अनंत अशा महापुरुषाला माझा नमस्कार असो.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । नमस्कारान् समर्पयामि ।।

१५. प्रदक्षिणा : नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ दोन्ही हात जोडावे आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने स्वत:च्या भोवती गोल फिरून पुढील मंत्र म्हणतांना प्रदक्षिणा घालावी.
यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च ।
तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे ।।
अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम् ।
तस्मात्कारुण्यभावेन रक्ष माम् परमेश्‍वर ।।
अर्थ : आतापर्यंत जन्मोजन्मी माझ्याकडून घडलेली पापे, मी तुला प्रदक्षिणा घालतांना पडत असलेल्या पावलागणिक नष्ट होत आहेत. हे देवा, तुझ्याविना मला कोणीही त्राता नाही, तूच माझा आधार आहेस. म्हणून हे भगवंता, करुणामय दृष्टीने माझे रक्षण कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.
उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: ।
प्रदक्षिणां समर्पयामि ।।
दूर्वायुग्मसमर्पण
(पाठभेद : काही ठिकाणी नैवेद्यानंतर दूर्वायुग्म वहातात.)
दूर्वांचे देठ देवाकडे आणि अग्र आपल्याकडे करून पुढील प्रत्येक नावांनी दोन दूर्वा एकत्र करून देवाच्या चरणी वहाव्यात, उदा. श्री गणाधिपाय नम: । दूर्वायुग्मं समर्पयामि ।। याप्रमाणे प्रत्येक नाममंत्र उच्चारल्यावर `दूर्वायुग्मं समर्पयामि ।' असे म्हणावे.
श्री गणाधिपाय नम: । श्री उमापुत्राय नम: । श्री अघनाशनाय नम: । श्री एकदंताय नम: । श्री इभवक्‍त्राय नम: । श्री मूषकवाहनाय नम: ।
श्री विनायकाय नम: । श्री ईशपुत्राय नम: । श्री सर्वसिद्धिप्रदायकाय नम: । श्री कुमारगुरवे नम: ।।

नंतर पुढील श्लोक म्हणून देवाच्या चरणी एकविसावी दूर्वा वहावी.
गणाधिप नमस्तेऽस्तु उमापुत्राघनाशन ।
एकदंतेभवक्‍त्रेति तथा मूषकवाहन ।।
विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक ।
कुमारगुरवे तुभ्यं पूजयामि प्रयत्‍नत: ।।
श्री सिद्धिविनायकाय नम: । दूर्वामेकां समर्पयामि ।।

१६. मंत्रपुष्प आणि प्रार्थना
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् । करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्तत् ।।
अर्थ : हे देवा, पूजा करतांना माझ्याकडून काया-वाचा-मन-बुद्धीने काही चुका झाल्या असल्यास मला क्षमा करावी आणि पूजा परिपूर्ण करून घ्यावी.
अनेन देशकालाद्यनुसारत: कृतपूजनेन उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकदेवता
प्रीयताम् ।। (हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडणे.)
प्रीतो भवतु । तत्सद्ब्रह्माऽर्पणमस्तु ।।
पाठभेद : शास्त्रात `नमस्कार, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प' हा क्रम सांगितला असला, तरी सध्या बर्‍याच ठिकाणी `मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार' या क्रमाने उपचार केले जातात.
मोदक वायनदान मंत्र : पुढील मंत्र म्हणून ब्राह्मणाला मोदकाचे वायनदान द्यावे.
विनायक नमस्तुभ्यं सततं मोदकप्रिय ।
अविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।
दशानां मोदकानां च दक्षिणाफलसंयुतम् ।
विप्राय तव तुष्ट्यर्थं वायनं प्रददाम्यहम् ।।
यानंतर आचमन करून `विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नम: ।' असे म्हणावे.
मूर्तीविसर्जनाचा मंत्र : पुढील मंत्र मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी म्हणावा.यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवात् ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च ।।
अर्थ : पार्थिव (मातीच्या) मूर्तीची मी आजपर्यंत केलेली पूजा सर्व देवगणांनी स्वीकारावी आणि ईप्सित कार्याच्या सिद्धीसाठी अन् पुन्हा येण्यासाठी आता प्रस्थान करावे.

श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्‍वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवावी. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करावे.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `गणेश पूजाविधी')


Read more...

रक्षाबंधनामागील उद्देश, अर्थ व कारण तसेच रक्षाबंधनामागील शास्त्र व राख्यांचे महत्त्व

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

raksha_bandhan_kruti01





१. उद्देश
`रक्षाबंधन' हा भारतीय संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी बहीण भावाला तिचे रक्षण करण्यासाठी अतूट बंधनात बांधते. - श्री गणेश (श्री. भरत मिरजे यांच्या माध्यमातून, १६.८.२००५, सकाळी ७.३०)

२. अर्थ व कारण
२ अ. `बहिणीचे जन्मोजन्मी रक्षण करणार आहे', हे सांगून त्याचे वचन म्हणून भाऊ बहिणीकडून धागा बांधून घेतो व त्याला वचनबद्ध करण्यासाठी बहीण धागा बांधते.
`बहीण व भाऊ यांनी नात्याच्या बंधनात रहावे' यासाठी हा दिवस इतिहास कालापासून प्रचलीत आहे.

२ आ. राखी हे बहीण व भाऊ यांच्या पवित्र बंधनाचे एक प्रतीक आहे.

२ इ. जसे बहिणीच्या रक्षणार्थ भाऊ धागा बांधून घेऊन वचनबद्ध होतो, तसे बहीणही भावाचे रक्षण व्हावे, म्हणून ईश्‍वराच्या चरणी विनवणी करते.

२ ई. बहिणीचा भक्‍तिभाव, तिची ईश्‍वराप्रतीची तळमळ व तिच्यावर असलेली गुरुकृपा जितकी अधिक, तितका तिने भावासाठी मारलेल्या हाकेवर परिणाम होऊन भावाची अधिक प्रमाणात प्रगती होते.

२ उ. बहिणीच्या पातळीप्रमाणे भावाला ५ तासापर्यंत होणारा फायदा

क्र. बहिणीची पातळी
(टक्के)
भावाला होणारा फायदा
(टक्के)
१. २५ ते ३० १३
२. ३५ ते ४५ १६
३. ४५ ते ५५ २५
४. ५५ ते ७० ५०
५. ७० ते ९० ८०
६. ९० ते १०० १००
- श्रीकृष्ण (सौ. प्रार्थना बुवा यांच्या माध्यमातून, १२.८.२००५, रात्री १.०५ )

३. रक्षाबंधनामागील शास्त्र काय ?
(यमलहरींमुळे व पृथ्वीकणांमुळे संयोगाने पृथ्वीवर निर्माण होणार्‍या आच्छादनाचा, म्हणजे रक्षेचा आसुरी शक्‍तींना उपयोग होऊ नये, म्हणून त्यांचे स्त्री-शक्‍तीने पुरुषतत्त्वाच्या माध्यमातून केलेले बंधन म्हणजे रक्षाबंधन)

या दिवशी ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या यमलहरींच्या गतिमानतेतून निर्माण होणार्‍या घर्षणात्मक ऊर्जेतून वायुमंडलात प्रक्षेपित होणार्‍या तेजकणांना पृथ्वीकणांच्या संयोगाने ज्या वेळी जडत्त्व प्राप्‍त होते, त्या वेळी हे कण भूमीवर आपले आच्छादन तयार करतात. यालाच `रक्षा' असे संबोधले जाते. बलिराजा हा या रक्षेतून प्रक्षेपित होणार्‍या रज-तमात्मक लहरींचा आवश्यकतेप्रमाणे आसुरी शक्‍तींच्या पोषणासाठी उपयोग करून घेतो; म्हणून या दिवशी भूमीला आवाहन करून तिच्या साहाय्याने बलीला बंधन घालण्याचे प्रतीक म्हणून स्त्री-शक्‍ती कार्यमान पुरुषाला राखी बांधते, म्हणजेच रक्षारूपी कणांना ताब्यात ठेवून वायुमंडलाचे रक्षण करण्यासाठी विनवते. सर्वसमावेशक अशा तांदुळाच्या कणांचा समुच्चय हा राखीचे प्रतीक म्हणून कार्यमान पुरुषाच्या हातात बंधन म्हणून बांधला जातो. - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून १८.८.२००५, सकाळी ९.३३)

तांदुळाच्या कणांचा समुच्चय राखी म्हणून रेशमी धाग्याने बांधण्याची पद्धत का आहे ?
(सर्वसमावेशकतेचे प्रतीक असलेले तांदूळ व सात्त्विक लहरींचे गतिमान वहन करणार्‍या रेशमी धाग्याने तयार केलेली राखी बांधल्यावर बहिणीतील शक्‍तीलहरी तांदुळाच्या माध्यमातून भावाकडे संक्रमित झाल्याने त्याची सूर्यनाडी कार्यरत होऊन त्याच्यातील शिवतत्त्व जागृत होणे व वायुमंडलातील रज-तमकणांचे विघटन होणे) तांदूळ हे सर्वसमावेशकतेचे प्रतीक, म्हणजेच ते सर्वांना आपल्यात सामावून घेणारे, तसेच ते सर्व लहरींचे उत्तम आदान-प्रदान करणारे आहे. तांदुळाचा समुच्चय पांढर्‍या वसनात बांधून तो रेशमाच्या धाग्याने शिवरूपी जिवाच्या उजव्या हातात बांधणे, म्हणजे एक प्रकारे सात्त्विक रेशमी बंधन तयार करणे. रेशमी धागा सात्त्विक लहरींचे गतिमान वहन करण्यात अग्रेसर आहे. कृतीच्या स्तरावर प्रत्यक्ष कर्म घडण्यासाठी हे रेशमी बंधन प्रत्यक्ष तयार केले जाते. राखी बांधणार्‍या जिवातील शक्‍तीलहरी तांदुळाच्या माध्यमातून शिवरूपी जिवाकडे संक्रमित झाल्याने त्याची सूर्यनाडी कार्यरत होऊन त्यातील शिवतत्त्व जागृत होते. तांदुळाच्या कणांच्या माध्यमातून शिवातील क्रियाशक्‍ती कार्यरत होऊन वायुमंडलात कार्यलहरींचे गतिमान प्रक्षेपण करून वायुमंडलातील रज-तमकणांचे विघटन करते. अशा तर्‍हेने रक्षाबंधनाचा मूळ उद्देश शिव व शक्‍ती यांच्या संयोगाने साध्य करून या दिवसाचा फायदा मिळवणे मानवजातीच्या दृष्टीने जास्त इष्ट ठरते. - एक विद्वान (१८.८.२००५, दुपारी १२.३६)

४. राख्या कशा असाव्यात ?
राख्यांमधील लहरींचा बहीण व भाऊ या दोघांना फायदा होतो. त्यामुळे दिखाऊ राख्या घेण्यापेक्षा ईश्‍वरीतत्त्व टिकवून ठेवणार्‍या राख्या घेतल्या पाहिजेत, अन्यथा त्या राख्यांमधील त्रिगुणांचा जिवांवर परिणाम होऊन त्यांची तशी वृत्ती बनण्यास मदत ठरते.
- श्रीकृष्ण (सौ. प्रार्थना बुवा यांच्या माध्यमातून, १२.८.२००५, रात्री १.०५ )

५. सनातनने तयार केलेल्या राख्यांचे महत्त्व

सनातनने तयार केलेल्या राखीतून मिळणार्‍या लहरींमुळे भावाला होणारा वाईट शक्‍तींचा त्रास ५ तासापर्यंत २ (१५ *) टक्के व बहिणीचा त्रास २ (१० *) टक्के कमी होतो.

राखीतील प्रेमभाव वातावरणात प्रक्षेपित झाल्याने जिवाला त्याच्या भावानुसार फायदा होतो व त्याचा भक्‍तिभाव वाढण्यास मदत होते. राखीतील चैतन्यामुळे जिवात असणार्‍या षड्रिपूंचे प्रमाण ५ तासापर्यंत २ (२५ *) टक्क्यांनी कमी होते. - श्रीकृष्ण (सौ. प्रार्थना बुवा यांच्या माध्यमातून, १२.८.२००५, रात्री १.०५ )
(याबाबतची अधिक माहिती `सनातन' राखीची उत्पत्ती' या मुद्द्यात दिली आहे.)

६. राख्यांच्या व्यष्टी व समष्टी स्वरूपात केलेल्या प्रसारामुळे आनंदाच्या लहरी निर्माण होणे आणि त्याचा फायदा पुढे ७ दिवस होणे
सनातनने तयार केलेल्या राख्यांच्या व्यष्टी व समष्टी स्वरूपात केलेल्या प्रसाराचा साधकाला अधिक प्रमाणात फायदा होतो. त्यामुळे वातावरणातील दाब कमी होऊन आनंदाच्या लहरी निर्माण होतात व जिवाला रक्षाबंधनाच्या दिवसापासून पुढे ७ दिवस त्याचा फायदा होतो. - श्रीकृष्ण (सौ. प्रार्थना बुवा यांच्या माध्यमातून, २.८.२००५, रात्री १.०५ )

७. पाटाच्या भोवती रांगोळी काढण्याचा उद्देश
राखी बांधतांना भावाला बसण्यासाठी ठेवलेल्या पाटाच्या भोवती सात्त्विक रांगोळी काढावी. अशा सात्त्विक रांगोळीतून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होतात. त्यामुळे तेथील वातावरण सात्त्विक बनते. सात्त्विक रांगोळीत ईश्‍वराकडून मिळणारी सात्त्विक शक्‍ती १० (२५ ते ३० *) टक्के ग्रहण केली जाते व ती जिवांना मिळते. त्यामुळे वाईट शक्‍तींच्या त्रासाची तीव्रता कमी होण्यास मदत होते. - श्री गणेश (श्री. भरत मिरजे यांच्या माध्यमातून, १६.८.२००५, सकाळी ७.३०)

८. तुपाच्या निरांजनाने ओवाळणे
राखी बांधल्यावर भावाला तुपाच्या निरांजनाने ओवाळतात. तुपाच्या निरांजनाने ओवाळतांना त्यातून तेज प्रक्षेपित होते. त्यामुळे भावातील तेजतत्त्व वाढायला मदत होते. तुपाच्या ज्योतीत ईश्‍वराकडून येणारी शक्‍ती ग्रहण करण्याची क्षमता असते. त्या ज्योतीत १० (५० ते ६० * ) टक्के ईश्‍वरी चैतन्य कार्यरत असते. (तेलाच्या ज्योतीत ३ (१० ते २० *) टक्के ईश्‍वरी चैतन्य कार्यरत असते. तेलाच्या ज्योतीमुळे रजोगुण वाढायला मदत होते.) तुपाची ज्योत शांतपणे तेवत रहाते. त्यामुळे भावात शांतपणे विचार करण्याची बुद्धी वाढण्यास मदत होते. - श्री गणेश (श्री. भरत मिरजे यांच्या माध्यमातून, १६.८.२००५, सकाळी ७.३०)

९. ओवाळायच्या ताटात मौल्यवान वस्तू न ठेवण्याचे कारण
ओवाळायच्या ताटात पैसे अगर मौल्यवान वस्तू ठेवू नयेत. ताटात अशा प्रकारच्या वस्तू ठेवल्याने बहिणीत त्या विषयी अपेक्षा निर्माण होऊन तो संस्कार वाढतो. त्यामुळे तिच्यात रज-तमाच्या संस्कारांचे प्रमाण वाढत जाऊन भाऊ-बहिणीत कलह निर्माण होऊन तिच्यातील प्रेम कमी होते. - श्री गणेश (श्री. भरत मिरजे यांच्या माध्यमातून, १६.८.२००५, सकाळी ७.३०)

१०. बहिणीने भावाला राखी बांधतांना द्रौपदीप्रमाणे भाव ठेवावा
माझ्या बोटातून वाहणार्‍या रक्‍तप्रवाहाला थांबविण्यासाठी द्रौपदीने तिच्या साडीचा पदर फाडून माझ्या बोटाला बांधला. बहीण भावाला होणारा त्रास कदापी सहन करू शकत नाही. त्याच्यावर आलेले संकट दूर करण्यासाठी ती काहीही करू शकते. राखी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावाला राखी बांधतांना हाच भाव ठेवला पाहिजे. - श्रीकृष्ण (सौ. प्रार्थना बुवा यांच्या माध्यमातून, १२.८.२००५, रात्री १.०५ )

११. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने कोणतीही अपेक्षा न बाळगता राखी बांधण्याचे महत्त्व
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाकडून वस्तूच्या रूपात कोणतीही अपेक्षा मनात बाळगल्यास ती त्या दिवशी मिळणार्‍या आध्यात्मिक फायद्यापासून वंचित रहाते. हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या देवाण-घेवाण हिशोब कमी करण्यासाठी असतो. अपेक्षा ठेवून वस्तूची प्राप्‍ती केल्यास देवाण-घेवाण हिशोब ३ पटीने वाढतात.

११ अ. अपेक्षेमुळे वातावरणातील प्रेमभाव व आनंद यांच्या लहरींचा फायदा करून घेता येत नाही.
११ आ. आध्यात्मिकदृष्ट्या १२ टक्के नुकसान होते. त्यामुळे प्रत्येक बहिणीने आपल्या भावास नि:स्वार्थीपणाने राखी बांधल्यास व त्याचे आशीर्वाद घेतल्यास देवाण-घेवाण हिशोब कमी होण्याचे प्रमाण वाढते.
- श्रीकृष्ण (सौ. प्रार्थना बुवा यांच्या माध्यमातून, १२.८.२००५, रात्री १.०५ )

१२. रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी देण्याचे महत्त्व
रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीस ओवाळणीच्या रूपात भेटवस्तू देत असतो. त्याची स्थूल व सूक्ष्म कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

१२ अ. एकमेकांकडे असणार्‍या स्थूल गोष्टींमुळे एकमेकांची सातत्याने आठवण रहाते.
१२ आ. देवाण-घेवाण हिशोब एका टक्क्याने कमी होतात.
१२ इ. भावाप्रती बहिणीच्या सातत्याने असणार्‍या मायेचे मोल भाऊ करू शकत नाही; पण काही प्रमाणात प्रेमाने प्रेम देऊन ते कमी करू शकतो. हे स्थूल माध्यमाद्वारे करण्याचा तो प्रयत्‍न करतो
१२ ई. ओवाळणी देतांना भावाच्या मनात असणार्‍या ईश्‍वराप्रतीच्या भावाचा बहिणीवर परिणाम होत असतो. त्यामुळे भावाला ओवाळणी न मागता त्याने स्वेच्छेने दिल्यास ती स्वीकारावी, अन्यथा ती टाळणे हेच सोयीस्कर व उपयुक्‍त ठरते. - श्रीकृष्ण (सौ. प्रार्थना बुवा यांच्या माध्यमातून, १२.८.२००५, रात्री १.०५ )

१३. भावाने सात्त्विक ओवाळणी देण्याचे महत्त्व

१३ अ.
सात्त्विक वस्तूंचा जिवांवर व्यावहारिक परिणाम होत नाही.
१३ आ. सात्त्विक वस्तू देणार्‍या जिवाला २० टक्के व घेणार्‍या जिवाला १८ टक्के लाभ होतो.
१३ इ. सात्त्विक कृती केल्याने देवाण-घेवाण हिशोब कमी होऊन त्यातून नवीन देवाण-घेवाण हिशोब निर्माण होत नाही.
त्यामुळे साधकबंधूंनो, सात्त्विक ओवाळणी देऊन भगिनींच्या कर्मबंधनातून मुक्‍त व्हा. - श्रीकृष्ण (सौ. प्रार्थना बुवा यांच्या माध्यमातून, १२.८.२००५, रात्री १.०५ )

१४. पुढील काळात प्रत्येक जिवाने करावयाचे प्रयत्‍न

१४ अ.
या दिवसाची आठवण ठेवून बहीण-भावाचे बंधन अतूट ठेवण्याचा प्रयत्‍न करणे
१४ आ. समाजातील इतर जिवांशी अतूट बंधन ठेवण्याचा प्रयत्‍न करणे
१४ इ. ईश्‍वरावरील श्रद्धा वाढवण्याचा प्रयत्‍न करणे

१५. देव व गुरु यांना करावयाची प्रार्थना
प्रत्येक भावाने `बहिणीच्या रक्षणाबरोबरच समाज, राष्ट्र व धर्म यांच्या रक्षणासाठी माझ्याकडून प्रयत्‍न होऊ देत', अशी प्रार्थना करावी. - श्री गणेश (श्री. भरत मिरजे यांच्या माध्यमातून, १६.८.२००५, सकाळी ७.३०)

( * वाईट शक्‍तीने सांगितलेली चुकीची माहिती)

अधिक माहिती वाचा

श्रावण पौर्णिमा विशेष - रक्षाबंधन


अनुक्रमणिका

  • १. प्रस्तावना

  • २. रक्षाबंधनामागील उद्देश, अर्थ व कारण तसेच रक्षाबंधनामागील शास्त्र व राख्यांचे महत्त्व

    १. उद्देश
    २. अर्थ व कारण
    ३. रक्षाबंधनामागील शास्त्र काय ? तसेच तांदुळाच्या कणांचा समुच्चय राखी म्हणून रेशमी धाग्याने बांधण्याची पद्धत का आहे ?
    ४. राख्या कशा असाव्यात ?
    ५. सनातनने तयार केलेल्या राख्यांचे महत्त्व
    ६. राख्यांच्या व्यष्टी व समष्टी स्वरूपात केलेल्या प्रसारामुळे होणारा फायदा
    ७. राखी बांधतांना पाटाच्या भोवती रांगोळी काढण्याचा उद्देश
    ८. राखी बांधल्यावर तुपाच्या निरांजनाने ओवाळणे
    ९. ओवाळायच्या ताटात मौल्यवान वस्तू न ठेवण्याचे कारण
    १०. बहिणीने भावाला राखी बांधतांना द्रौपदीप्रमाणे भाव ठेवावा
    ११. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने कोणतीही अपेक्षा न बाळगता राखी बांधण्याचे महत्त्व
    १२. रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी देण्याचे महत्त्व
    १३. भावाने सात्त्विक ओवाळणी देण्याचे महत्त्व
    १४. पुढील काळात प्रत्येक जिवाने करावयाचे प्रयत्‍न

  • ३. `सनातन'ची राखी

    अ. `सनातन' राखीची उत्पत्ती
    आ. `सनातन' राखीची वैशिष्ट्ये
    इ. राखीमुळे सगुण व निर्गुण स्तरावर होणारे लाभ
    ई. `सनातन' राखीवर वाईट शक्‍तींचा हल्ला होण्याचे कारण
    उ. `सनातन' राखीच्या संदर्भात अनुभूती

  • ४. वाचकांना विनंती

    अ. साधिकांनो, रक्षाबंधनाच्या दिवशी देवतांना (देवांना) राखी बांधा !
    आ. राखी पौर्णिमेदिवशी बांधलेली राखी नंतर नामपट्टीप्रमाणे वापरा अगर विसर्जित करा !

  • ५. रक्षाबंधनाच्या सणामध्ये शिरलेले गैरप्रकार व विरोध

    अ. राख्यांवर `क्रिश' व `प्रिन्स' हिंदु धर्मातील सणांच्या व्यावसायिकरणाचा कळस !
    आ. राक्षस व भुते यांचे मुखवटे असलेल्या राख्यांची बाजारात विक्री
    इ. राखीद्वारे हनुमानाचे विडंबन थांबवणारा बालसाधक कु. सनत
    ई. मुसलमान युवतीची लाजिरवाणी प्रतिक्रिया
    उ. धर्मविषयक अज्ञानामुळे भयग्रस्त होऊन फोनाफोनी करणारे हिंदू
    ऊ. ख्रिश्चन मिशनरी शाळांचे हिंदुधर्माच्या विरोधातील कुटील कारस्थान
    ए. हिंदु विद्यार्थ्यांचे ख्रिस्तीकरण करण्याचा नियोजनबद्ध प्रयत्‍न

  • ६. एक हजारापेक्षा अधिक राख्यांचे वितरण करणार्‍या सनातनच्या साधिका व त्यांना आलेल्या अनुभूती

  • ७. रक्षाबंधनाच्या संदर्भातील साधकांना आलेल्या अनुभूती

Read In English : http://www.hindujagruti.org/hinduism/festivals/raksha-bandhan/

Read more...

नागपंचमीचा पूजाविधी

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

नागपंचमीचा पूजाविधी


संकलक : श्री. दामोदर
वझे, फोंडा, गोवा.

पूजेची प्राथमिक तयारी
चंदनामध्ये हळद घालून भिंतीवर नाग काढावा किंवा दरवाज्याच्या दोन्ही दारांवर मातीने किंवा गाईच्या शेणाने नागपत्‍नीसह नागाचे चित्र काढावे किंवा कुलाचाराप्रमाणे नागपूजन करावे.

संकल्प
सुरुवातीला आचमन करावे व देशकाल म्हणून पुढील संकल्प करावा - `मम सकुटुंबस्य सपरिवारस्य सर्वदा सर्वत: सर्पभय निवृत्ति पूर्वकं सर्प प्रसाद सिद्धिद्वारा श्री परमेश्‍वर प्रीत्यर्थं । श्रावण शुक्ल पंचम्यां यथामिलित उपचारै: नागपूजां करिष्ये ।'

अर्थ : माझ्या कुटुंबाचे व परिवारातील सर्वांचे नेहमी व सर्व ठिकाणी सर्पापासूनच्या भयाचे निवारण व्हावे. तसेच सर्पाची (नागराजाची) कृपादृष्टी व्हावी; म्हणून श्री परमेश्‍वराच्या प्रीतीकरिता श्रावण शुद्ध पंचमीला नागाची पूजा करतो. नेहमीप्रमाणे कलश, घंटा, दीप यांची पूजा करावी व न्यास करावा.

नागांचे आवाहन
उजव्या हातात अक्षता घेऊन नागांची पुढील एक एक नावे घ्यावी व तेव्हा `नम:'
म्हणतांना नागावर अक्षता वहाव्या.

१. अनंताय नम: अनंतं आवाहयामि ।
२. वासुकये नम: वासुकिं आवाहयामि ।
३. शेषाय नम: शेषं आवाहयामि ।
४. शंखाय नम: शंखं आवाहयामि ।
५. पद्माय नम: पद्मं आवाहयामि ।
६. कंबलाय नम: कंबलं आवाहयामि ।
७. कर्कोटकाय नम: कर्कोटकं आवाहयामि ।
८. अश्‍वतराय नम: अश्‍वतरं आवाहयामि ।
९. धृतराष्ट्राय नम: धृतराष्ट्रं आवाहयामि ।
१०. शंखपालाय नम: शंखपालं आवाहयामि ।
११. तक्षकाय नम: तक्षकं आवाहयामि ।
१२. कालियाय नम: कालियं आवाहयामि ।
१३. कपिलाय नम: कपिलं आवाहयामि ।
१४. नागपत्‍नीभ्यो नम: नागपत्‍नी: आवाहयामि ।
आवाहन झाल्यावर पुढील मंत्राने ध्यान करावे.

अनंतोवासुकिश्चैव कालियो मणि भद्रक: ।।
शंखश्च शंखपालश्च कर्कोटक धनंजयौ ।।
धृतराष्ट्रश्च ये सर्पास्तेभ्यो नित्यं नमो नम: ।।

ध्यान झाल्यावर पूजेला सुरुवात करावी.

१. अनंतादि नाग देवताभ्यो नम: आवाहयामि ।
२. अनंतादि नाग देवताभ्यो नम: आसनार्थे अक्षतां समर्पयामि ।
३. अनंतादि नाग देवताभ्यो नम: पाद्यम् समर्पयामि ।
४. अनंतादि नाग देवताभ्यो नम: अर्घ्यम् समर्पयामि ।
५. अनंतादि नाग देवताभ्यो नम: आचमनीयम् समर्पयामि ।
६. अनंतादि नाग देवताभ्यो नम: स्नानम् समर्पयामि । (किंवा `पंचामृत स्नानम् समर्पयामि ।', असे म्हणून पंचामृत घालावे.)
७. अनंतादि नाग देवताभ्यो नम: वस्त्रम् समर्पयामि ।
८. अनंतादि नाग देवताभ्यो नम: यज्ञोपवितम् समर्पयामि ।
९. अनंतादि नाग देवताभ्यो नम: चंदनम् समर्पयामि ।
नागपत्‍नीभ्यो नम: हरिद्रां कुंकूमं समर्पयामि ।
(नागपत्‍नीला हळदकुंकू वहावे व अलंकार वहावे.)
१०. अनंतादि नाग देवताभ्यो नम: पुष्पाणि, तुलसीपत्रम्, बिल्वपत्रम्, दुर्वाकुरान् समर्पयामि ।
(फुले वाहिल्यावर दही, अक्षता व दूर्वांकूर वहावे.)
११. अनंतादि नाग देवताभ्यो नम: धूपम् समर्पयामि ।
१२. अनंतादि नाग देवताभ्यो नम: दीपम् समर्पयामि ।
(नैवेद्यासाठी दूध, दही, तूप, साखर, पायस व लाह्या हे पदार्थ दाखवावेत. त्यांपैकी एखादे नसल्यास बाकीचे दाखवावेत.)
१३. अनंतादि नाग देवताभ्यो नम: नैवेद्यम् समर्पयामि ।
नारळ व विडा यांच्यावर पाणी घालावे. मग आरती करावी व कापूर ओवाळावा.
१४. अनंतादि नाग देवताभ्यो नम: प्रदक्षिणाम् समर्पयामि ।
१५. अनंतादि नाग देवताभ्यो नम: नमस्कारान् समर्पयामि ।
१६. अनंतादि नाग देवताभ्यो नम: प्रार्थनाम् समर्पयामि ।


प्रार्थना
श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी केलेल्या नागदेवतेच्या पूजनामुळे नागदेवता संतुष्ट होवो व मला नेहमी सुख प्राप्‍त होवो. हे नागराजा, पूजा करतांना ज्ञानाने किंवा अज्ञानामुळे कमी किंवा जास्त उपचार झाले असल्यास किंवा काही चुकल्यास मला क्षमा कर. तुमच्या कृपाशीर्वादाने माझे सर्व हेतु, इच्छा पूर्ण होवोत. सदा-सर्वदा तू आमच्या कुळाचे सर्पाच्या विषापासून रक्षण कर.

या दिवशी काय करावे ?
१. ज्यांना शक्य असेल त्यांनी वारुळाच्या ठिकाणी नागाला दूध पाजावे. दुधामध्ये तूप व साखर घालावी
२. वारुळाच्या ठिकाणी पुरुष व स्त्रिया यांनी गायन, भजन करावे.
३. भाजलेले चणे, भात, लाह्या इत्यादि पदार्थ सर्वांनी खावेत. (त्यामुळे दात घट्ट होतात.)
४. नागदेवता संतुष्ट व्हावी; म्हणून पायस व अन्न वाढून ब्राह्मण-भोजन घालावे.
याप्रमाणे दरवर्षी केले असता सर्पाची बाधा होत नाही.

या दिवशी काय करू नये ?
१. लोखंडी तव्यावर पोळया भाजू नयेत.
२. जमीन नांगरणे किंवा खणणे टाळावे.

साभार : नागपंचमी विशेषांक




Read more...

श्रावणमासातील व्रतवैकल्ये व ती साजरा करण्याची पद्धत

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा


श्रावणमास म्हटलं की डोळयासमोर येतात ती व्रतवैकल्ये. श्रावणमास म्हटलं की आठवतात ती व्रत आणि व्रत म्हटलं की आठवतो श्रावण. असे होण्याची दोन कारणे आहेत. श्रावण ज्या चातुर्मासात येतो, ते चातुर्मास म्हणजे स्वत:च एक व्रत आहे ! आणि दुसरे कारण म्हणजे वर्षातील बारा महिन्यांपैकी या विशिष्ट चार महिन्यांमध्ये व्रते अधिक प्रमाणात आहेत. आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत किंवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत येणार्‍या श्रावण, भाद्रपद, कार्तिक आणि आश्‍विन या चार महिन्यांच्या काळास `चातुर्मास' असे म्हटले जाते. शारीरिक आणि मानसिक स्तरावरती मनुष्याला बंधनात रहाण्याची शिकवण व्रतामुळे मिळते. चातुमार्साचे आध्यात्मिक महत्त्व या निमित्ताने जाणून घेऊया.

याविषयीच्या अधिक माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी प्रतिदिन दैनिक सनातन प्रभातचे वाचन करा...
श्रावणमास विशेषांक - दैनिक सनातन प्रभात - आषाढ कृ.१२, रविवार,१९ जुलै २००९

विशेषांक

ही माहिती आपल्या मित्रमंडळींना पाठवून धर्मप्रसारात सहभागी होऊ या...

Read more...

गुरुपौर्णिमाविषयक माहिती

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

गुरुपौर्णिमाविषयक माहिती

दैनिक मुख्य पान | मराठी मुख्य पान


गुरुपूजन संहिता

गुरुपूजन (मराठी) - mp3

गुरुपूजन (हिदी) - mp3

माझे सद्‌गुरु

संसारात जीव जळत आहे, शांतीचे स्थान सत्पुरुषच आहे, कुठलाही पापी जीव असला तरीही त्याला मोक्ष मार्गाला चढवतात, तसे हे माझे सद्‌गुरु आहेत !


गुरुकृपायोगानुसार साधनेचे टप्पे

स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्‍न, नामजप, सत्संग, सत्सेवा, अहं-निर्मूलनासाठी प्रयत्‍न, सत्साठी त्याग, भावजागृतीसाठी प्रयत्‍न आणि साक्षीभाव हे गुरुकृपायोगानुसार साधनेचे टप्पे आहेत.


ईश्‍वर

भक्‍तांचाच नाही तर इतरांचाही योगक्षेम ईश्‍वर वहातो; पण अहंकारामुळे त्यांना ते कळत नाही.


संतांच्या ठिकाणी भेदभाव नाही.

`मेघ हा सर्वत्र सारखाच वर्षाव करीत असतो; पण सखोल जागी पाणी साठते व ताठरपणे उभे असलेले डोंगर कोरडेच रहातात. त्याचप्रमाणे संतांच्या ठिकाणी भेदभाव नाही. त्यांची दयादृष्टी सर्वांवर सारखीच असते, पण जो शुद्ध अंत:करणाने त्यांचे ठिकाणी लीन असतो, त्याला श्रद्धेनुसार यथोचित फलप्राप्‍ती होते.'


शिक्षकदिन नव्हे गुरुपौर्णिमा साजरी करा !

भारतीय संस्कृतीनुसार कोणतेही सण किंवा उत्सव साजरे करण्यामागे काही विशिष्ट तत्त्व असते व त्याप्रमाणे ते साजरे करणार्‍यास त्याचा फायदा होत असतो. ईश्‍वरी राज्यात शिक्षकदिन हा गुरुपौर्णिमेदिवशी साजरा करण्यात येईल; कारण या दिवशी पृथ्वीवर जास्त प्रमाणात येणार्‍या गुरुतत्त्वाचा विद्यार्थ्यांना लाभ होईल. तसेच शिक्षक हे ठराविक वेळ व केवळ शब्दांच्या माध्यमातून शिकवितात, तर गुरु हे चोवीस तास शब्द व शब्दातीत या दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत मार्गदर्शन करीत असतात. ईश्‍वरी राज्यातीलशिक्षक हे गुरूंप्रमाणेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे असतील. त्यामुळे ईश्‍वरी राज्यात गुरुपौर्णिमा व शिक्षकदिन हे वेगवेगळे साजरे न करता, ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी साजरे करण्यात येतील !


ग्रंथ - अध्यात्मशास्त्रीय माहिती

१. भावाचे प्रकार व जागृती

२. संत भक्‍तराज महाराज यांचे चरित्र : खंड १

३. संत भक्‍तराज महाराज यांचे चरित्र : खंड २

४. संत भक्‍तराज महाराज यांचे चरित्र : खंड ३

५. संत भक्‍तराज महाराज यांचे चरित्र : खंड ४

६. संत भक्‍तराज महाराज यांचे चरित्र : खंड ५

७. गुरुकृपायोग

८. शिष्य

९. समष्टी साधनेसाठी आवश्यक गुण

१०. व्यष्टी साधनेसाठी आवश्यक गुण

वितरणासाठी संपर्क

  • मुंबईः ३२४३५६९९

  • ठाणेः ९३२२६५२५८०

  • रायगडः २७४५०३३८

  • पुणेः ९४२२४३७१३४

  • जळगावः ९४२३०५६४०३

  • संभाजीनगरः ९४२२४३७१३१

  • नाशिकः ९४२२४४१७८२

  • इ-मेलः dainik@sanatan.org

अनुक्रमणिका



अ. महर्षी व्यास


महर्षी व्यास

व्यासांचे अमाप वाङ्मय
`व्यासांनी अठरा पुराणे व अठरा उपपुराणे रचली. यांशिवाय व्यासांची पुष्कळशी पुराणे प्रसिद्ध आहेत आणि बरीचशी लुप्‍त झाली आहेत. व्यासांचा `वेदांत दर्शन' (ब्रह्मसूत्र) ग्रंथ तर प्रतिभा- प्रज्ञेचा अपूर्व विलास आहे. त्यांनी अनेक गीता रचल्या, अनेक प्रकरणी ग्रंथ केले. बृहद्व्यास स्मृति, लघुव्यास स्मृति असे काही ग्रंथ रचले. अनेक ग्रंथांवर भाष्ये (व्यास भाष्ये) लिहिली.'

व्यासांचे वाङ्मय नष्ट होण्याला जबाबदार कोण ?

`व्यासांचे सगळे वाङ्मय या देशाला गोर्‍यांचे पाय लागण्याआधी परंपरेने साक्षात् उपलब्ध होते. बौद्ध, यवन, मुसलमान आणि इंग्रजी शासनाने ते नष्ट व भ्रष्ट करून टाकले. (आमच्या प्राचीन वाङ्मयासंबधी हीनगंड जोपासल्याने आम्ही त्या वाङ्मय अध्ययनाचा त्याग केला. पुष्कळसे ग्रंथ वाचक नसल्याने गंगार्पण केले.)' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी


आ. `गुरुकृपा ही केवलं शिष्यपरममंङ्लम् ।'

१. ईश्‍वरप्राप्‍तीच्या ध्येयाने प्रेरित झालेल्यांना `परमकल्याण केवळ गुरुच करू शकतात', याची खात्री पटणे : `गुरुकृपा ही केवलं शिष्यपरममंङ्लम् ।', याचा अर्थ शिष्याचे परममंगल केवळ गुरुकृपेनेच होते. ईश्‍वरप्राप्‍तीच्या ध्येयाने प्रेरित झालेले साधक व शिष्य यांनी प्रत्यक्ष गुरुकृपा अनुभवलेली असल्याने त्यांना गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व पटलेले असते. त्यामुळे त्यांना `आपल्या गुरूंसाठी काय करू व किती करू', असे वाटत असते. गुरुकृपेचे वर्णन व महत्त्व हे शब्दातीत असल्यामुळे ते शब्दांतून व्यक्‍त करणे अशक्यच असते. तरीही शिष्यांना गुरूंच्या आलेल्या अनुभूती, गुरूंनी केलेली कृपा, त्यांचे हास्य, त्यांनी आपल्याशी केलेली मधुरवचने, मार्गदर्शन इत्यादींचे नित्य स्मरण शिष्याकडून होत असते व तो गुरूंच्या आठवणीतच सतत रममाण होत असतो. त्याला आता खर्‍या अर्थाने गुरूंचे वेड लागलेले असते. अंतर्यामी गुरूंचे महत्त्व पटलेले असल्याने व उत्तरोत्तर गुरूंची ओढ वाढत गेल्याने त्याला आता गुरूंशिवाय चैन पडत नाही. आपले परमकल्याण केवळ गुरुच करू शकतात याची खात्री पटल्याने तो पूर्णपणे गुरूंना समर्पित होतो व गुरुही त्याला जवळ घेतात.

२. साधनेत प्रगती होत गेल्यावर `आतापर्यंतचा साधनेतला प्रवास केवळ गुरुकृपेनेच झाला आहे', याची अनुभूती सातत्याने आल्याने व गुरुचरणांशीच सर्व देवता असल्याचे पटल्याने शिष्य फक्‍त गुरुभक्‍ती व गुरुसेवा यांत रममाण होणे : खरेतर साधकाने अध्यात्माच्या शाळेत प्रवेश केल्यापासूनच गुरु त्याची साधना करवून घेत असतात; परंतु साधकाला त्याची जाणीव नसते. साधकाची साधनेत जसजशी प्रगती होत जाते, तसतसे त्याला गुरूंचे महत्त्व पटू लागते. `आतापर्यंतचा साधनेतला प्रवास केवळ गुरुकृपेनेच झाला आहे', याची त्याला खात्री पटते. गुरुकृपा सातत्याने मिळवण्यासाठी तो गुरूंच्या मार्गदर्शनानुसार प्रयत्‍न करतो. शिष्य झाल्यावर गुरुच त्याच्याकडून योग्य प्रकारे साधना करवून घेऊन त्याची साधनेत प्रगती करून घेतात. या स्थितीला `गुरूंचे आज्ञापालन करणे', हा एकच ध्यास शिष्याला लागलेला असतो. `आपली प्रगती गुरूंच्या संकल्पाने होत आहे व तेच सर्वकाही आपल्याकडून करवून घेत आहेत', अशी अनुभूती सातत्याने घेतल्याने शिष्याचा गुरूंप्रती कृतज्ञताभाव व शरणागतभाव वाढू लागतो. आता त्याला देवतांची भक्‍तीही करावी लागत नाही. गुरुचरणांशीच सर्व देवता असल्याने आता तो फक्‍त गुरुभक्‍ती व गुरुसेवा यांत रममाण होतो.

३. गुरूंना आपल्या शिष्यासाठी `काय करू व किती करू', असे वाटत असणे, त्यांना आपल्या शिष्याच्या प्रगतीची ओढ वाटत असणे व ते त्याला आपल्यासारखा बनवण्यासाठी अधीर असणे : शिष्याला गुरूंचा काही महिन्यांचा अथवा काही वर्षांचा सहवास लाभला, तरी तो गुरूंसाठी वेडा होतो. ज्या गुरूंनी अनेक जन्मांपासून त्याचे बोट धरून ठेवले आहे व ते त्याला प्रत्येक जन्मात साधनेचे मार्गदर्शन करून पुढे पुढे घेऊन जातात, त्यांना आपल्या शिष्याचे किती वेड असेल ! गुरूंना आपल्या शिष्यासाठी `काय करू व किती करू', असे वाटत असते. त्यांचे प्रेमही शिष्याला भरभरून मिळत असते. त्याला आपल्यासारखा बनवण्यासाठी ते अधीर असतात. शिष्याला जेव्हा गुरुचरणांची व त्यांच्या चरणी स्थान प्राप्‍त करण्याची ओढ लागते व ती वाढत जाते, त्या वेळी गुरुच त्याला आत्मज्ञान देतात व त्यानंतर स्वत:मध्ये सामावून घेतात. खरेतर हे सर्व गुरूंनीच केलेले असते. त्यासाठी शिष्याला काहीही प्रयत्‍न करावे लागत नाहीत. जसे आपण काशीला जाणार्‍या आगगाडीत बसलो की, आपणही काही न करता काशीला पोहोचतो, त्याप्रमाणे एकदा आपण गुरुकृपेच्या गाडीत बसलो की, आपोआपच गुरु आपल्याला योग्य ठिकाणी नेऊन सोडतात. त्यासाठी शिष्याला काहीही करावे लागत नाही. हे अनुभवल्यामुळेच शिष्याला गुरुकृपेचे अनन्यसाधारण महत्त्व माहीत असते व तो गुरुचरणी सतत लीन असतो.' - ईश्‍वर (सौ. राजश्री अरुण खोल्लम यांच्या माध्यमातून, २४.७.२००७ सायं.५ वाजता)


इ. गुरु-शिष्य परंपरांनी धर्मरक्षणासाठी अधिक कार्यरत व्हावे !


डॉ. जयंत बाळाजी आठवले

`गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे गुरूंच्या पूजनाचा दिवस. गुरूंकडून आपल्याला जे मिळाले व जे मिळत आहे, त्याप्रती पूर्ण कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा दिवस. या दिवशी सनातन हिंदु संस्कृतीच्या निर्देशक असणार्‍या व गुरु-शिष्य परंपरा जपणार्‍या सर्व विद्याशाखांमधील साधक आपापल्या गुरुपरंपरेचे स्मरण करतात व गुरूंचे पूजन करतात. गुरु-शिष्य परंपरा ही सनातन हिंदु संस्कृतीने जगाला दिलेली देणगी आहे. ती सनातन हिंदु संस्कृतीतील ज्ञानदानाच्या व विद्यादानाच्या पद्धतीचा गाभा आहे. तीमध्ये विद्या देणार्‍याचे व ती घेणार्‍याचे संबंध वैशिष्ट्यपूर्ण आहेत. विद्या देणार्‍यावर केवळ तेवढीच विद्या देण्याची जबाबदारी नाही, तर अन्य जीवनमूल्ये त्या साधकाला शिकवण्याचीही जबाबदारी आहे. विद्या घेणारा पोटार्थी म्हणून ती ग्रहण करणारा विद्यार्थी नसून त्या विद्येचे संवर्धन करणारा साधक आहे. या संस्कृतीत `ज्ञान' ही संज्ञा ईश्‍वरप्राप्‍तीशी निगडित आहे. त्याला `सर्वश्रेष्ठ विद्या' ही संज्ञा आहे; कारण हे ज्ञान केवळ त्याचे अधिकारी असणारे गुरुच दुसर्‍याला देऊ शकतात. जेथे अशा ज्ञानदानाची `गुरु-शिष्य' परंपरा जपणारे पूजन असेल, तेथे या सोहळयाचे वैभव काय सांगावे ! असे सर्व असतांना ज्या सनातन हिंदु धर्माने जगाला अशी अत्यंत महत्त्वपूर्ण देणगी दिली, त्याची स्थिती बिकट बनलेली आहे. अलीकडचेच उदाहरण घ्या. `दी लव्ह गुरु' नावाच्या हॉलिवूड-निर्मित चित्रपटात गुरूंचे यथेच्छ विडंबन करण्यात आले आहे. `गुरु-शिष्य' परंपरा या पुण्यभूमीतील आहे', असे आपण म्हणतो; मात्र `ती आपली नाही', हे आपल्याला सांगण्यासाठी `ही संस्कृती आर्यांची आहे व आर्य हे बाहेरून आले होते. त्यामुळे ही संस्कृती येथील नव्हे', असा खोटा इतिहास सांगितला जातो. मध्यंतरी केरळमधील देवस्वम्मंत्री सुधाकरन यांनी `गुरु अंतर्वस्त्रे घालत नाहीत. त्यांनी ते घालणे आधी शिकावे', असे संतापजनक विधान केले होते. ईश्‍वरप्राप्‍तीचे ज्ञान देणे, म्हणजे धर्माचे ज्ञान देणे. असे कार्य करणार्‍यांवर धर्मद्रोही वाटेल तसा हल्ला चढवतात, हे वेळोवेळी अनुभवाला आले आहे. सरकार सनातन हिंदु संस्कृतीचे कोणत्याही प्रकारे पोषणकर्ते तर नाहीच; उलट ते ती नष्ट करू पहात आहे, हेही वेळोवेळी प्रत्ययाला आले आहे. - डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था.


ई. गुरूंची आवश्यकता

१. शहरात एखाद्याचा पत्ता माहीत नसेल, तर तो कोणीतरी सांगावा लागतो. त्याचप्रमाणे ईश्‍वराचा पत्ता गुरुच सांगू शकतात.
२. स्वत:ला पोहता येत नसेल, तर नदीपार होण्यासाठी भोपळयाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे संसारसागर तरून जाण्यासाठी गुरुरूपी भोपळयाची आवश्यकता असते.
३. शिष्याला स्वत:च्या प्रयत्‍नांनी आपली उन्नती करून घेता येत नाही, असे नाही; पण चांगल्या गुरूंच्या उपदेशाने व मार्गदर्शनाने शिष्याचा आत्मोन्नतीचा मार्ग सुगम होतो. एक आगबोट एके ठिकाणी ४ तासांत जाऊन पोहोचत असेल, तर तिच्यामागे तिला दोरीने बांधलेली होडी चारच तासांत त्या स्थळी पोहोचते; पण ती होडी आगबोटीपासून वेगळी केली आणि एकटीच चालवण्यात आली, तर ती त्या ठिकाणी जाण्यास तिला १२ तास लागतील. आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गात आपण स्वत:च प्रयत्‍न करू लागलो, तर आपल्यातील दोषांमुळे व चुकांमुळे आपली उन्नती होण्यास फार काळ लागतो; पण योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाने १२ तासांचा मार्ग ४ तासांत आक्रमिता येतो. थोडक्यात म्हणजे `महाजनो येन गत: स पंथा: ।' (मोठी मोणसे ज्या मार्गाने गेली त्या मार्गाने जावे.) या न्यायाने गुरूंकडे जावे.
४. ईश्‍वराकडे जाण्याचा मार्ग गुरूच सांगू शकतात
अ. आपल्या एका मित्राला भेटायला आपण त्याच्या गावात आलो; पण त्याचा पत्ता माहीत नसेल, तर तो कोणाला तरी विचारावा लागतो. त्याचा पत्ता कळल्यावर आपण ते ठिकाण शोधू शकतो. त्याचप्रमाणे `मी'चा म्हणजे आत्मारामाचा पत्ता गुरुच सांगू शकतात.
आ. आपण वाळवंटात वाट चुकल्यावर आपल्याला मार्गदर्शक वाटाड्या मिळाला नाही, तर इकडून तिकडे व तिकडून इकडे, असे भटकून आपण दमून जाऊ. अन्न-पाणी न मिळाल्याने आपण मरून जाऊ. त्याचप्रमाणे मार्गदर्शक गुरु भेटले नाहीत, तर आपल्यातील दोष आणि आपल्या हातून होणार्‍या चुका यांमुळे आपल्याला ८४ लक्ष योनींतून भटकत रहावे लागेल.
इ. आपण मित्राला दूरध्वनी केला व तो लागला नाही, तर दूरध्वनीचालक आपल्याला दूरध्वनी लावून देतो. त्याचप्रमाणे आपला संपर्क देवाशी होत नसला, तर गुरु मधल्या अडचणी दूर करून आपला संपर्क देवाशी करून देतात. अडचणी कोणत्या ? आई-वडील, बंधू-भगिनी, पत्‍नी, संपत्ती या गोष्टी म्हणजे आपण व ईश्‍वर या मध्ये मायावी पडदाच आहे. या मोहपाशातून गुरु आपणास सोडवून देवाचे दर्शन घडवतात.
`जिज्ञासु : परमेश्‍वर व मी यांच्या ओळख-संबंधांत हा त्रयस्थ दलाल गुरु कशाला पाहिजे ?
प.पू. महाराज : हे पहा, साध्या व्यावहारिक गोष्टीतदेखील, ``हा रस्ता कोठे जातो ?'' यालादेखील मार्गदर्शकाची जरूरी लागते. व्यावहारिक शिक्षण देण्याच्या बाबतीतसुद्धा गुरुजींची जरूरी लागते. कोणीतरी उजेड दाखवावा लागतो. हीच गोष्ट परमेश्‍वराची ओळख करून देण्याच्या बाबतीत आहे.' - आत्मप्रभा (ब्रह्मीभूत श्री गजानन महाराज, नाशिक यांचे पारमार्थिक विचार. पृष्ठ ५७)


उ. गुरुपौर्णिमेसाठी केलेल्या सेवेचे व त्यागाचे महत्त्व

साधनेत जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी हळूहळू आपले तन, मन व धन यांचा त्याग होणे आवश्यक असते. मनाचा त्याग नामस्मरणाने, तनाचा त्याग शारीरिक सेवेने आणि धनाचा त्याग ते अर्पण करून होतो. त्यासाठी संत हेच पात्र आहेत. आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी, उदा. आजारपण, धंद्यात येणार्‍या अडचणी, पैसा न टिकणे, या गोष्टी पूर्वजन्मीच्या देवाण-घेवाण हिशोबामुळे घडतात. संतांना दिलेल्या दानातून विविध अडचणी दूर होतात. याचा अनुभव साधकांनी घेतलेला असतो; म्हणून अनेक साधक क्षेत्रावर अर्पण करत असतात. ईश्‍वरप्राप्‍तीसाठी सर्वस्वाचा त्याग करायचा असतो. ते साध्य व्हावे; म्हणून टप्प्याटप्प्याने दानाचे प्रमाण वाढवीत जावे. अर्पण किती केले, यापेक्षा आसक्‍ती किती कमी झाली, हे महत्त्वाचे आहे. उदा. लाखो रुपये असतांना १० हजार रुपये अर्पण करणे, याऐवजी १०० रुपये असतांना १०० रुपये अर्पण करणे हे जास्त महत्त्वाचे आहे. गुरुपौर्णिमेला गुरुतत्त्व इतर दिवसांपेक्षा एक हजार पटीने जास्त कार्यरत असते. त्यामुळे गुरूंच्या इतर आध्यात्मिक कार्यक्रमांच्या वेळी किंवा एरव्ही केलेल्या सेवा व त्याग याच्यापेक्षा गुरुपौर्णिमेसाठी केलेल्या सेवा व त्याग यांमुळे अनुभूती जास्त प्रमाणात येतात व गुरुकृपा जास्त प्रमाणात होते.


ऊ. साधनेत धन अर्पण करण्याचे महत्त्व व त्याचे परिणाम

एकूण साधनेत धन अर्पणाचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.
१. देवाण-घेवाण हिशोब फिटण्यास मदत होते.
२. प्रारब्ध भोग भोगून संपवण्यात सुरू असलेल्या प्रक्रियेत जलदता येते.
३. धनासंदर्भातील आसक्‍ती कमी होते.
४. मायेतून बाहेर पडून साधना करणे सोपे जाते.


ए. अर्पण करण्याची संधी देणारा गुरुपौर्णिमा हा महान क्षण होय !

अध्यात्मजीवन ही सिद्ध व साधक यांची क्रीडा आहे. त्यात एकाने द्यायचे असते व दुसर्‍याने घ्यायचे असते. जो देतो तोच पुन्हा घेतो व जो घेतो तोच पुन्हा देतो. फक्‍त देतांना व घेतांना वस्तूच्या स्वरूपात बदल होतो. या क्रीडेतील एकाला `गुरु' म्हणतात व दुसर्‍याला `शिष्य' म्हणतात. भौतिकातील कुठलेही क्षेत्र याला अपवाद नाही. तथापि आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात गुरु-शिष्य संबंध जास्त प्रभावी असतात. त्याचे माध्यम वाणी तथा वाङ्मय असते. त्याचे संकलन, विषयवार एकीकरण, वर्गनिहाय नियमन, नियोजन व स्वयंभू रचना ज्यांनी वैश्‍विक आदर्श पद्धतीने बलवत्तर प्रमाणात केली, त्यांना भगवान `श्री व्यास' या नावाने ओळखले जाते. वैश्‍विक सद्‌गुरु ही परमश्रेष्ठ उपाधी लोकमानसाच्या हृदयातून त्यांनी प्राप्‍त करून घेतली आहे. त्यांच्या चिरायू स्वरूपाच्या वाङ्मयकार्यातून ते विश्‍वाला अखंडपणे देत असतात. त्यांचे हात हजारो आहेत. घेणार्‍यांची झोळी दुबळी पडू नये म्हणून आणि घेणार्‍यांकडून कृतज्ञतेचा वारसा जपला जावा म्हणून व्यासपौर्णिमा जी गुरुपौर्णिमा या नावाने ओळखले जाते, तिचे आयोजन केले जाते. भगवान श्री व्यास म्हणजे मूर्तिमंत ज्ञान. त्यांनी ज्ञान ओतून कर्म व भक्‍ती यांच्या पायांनी सुदृढ केलेले आणि योगाच्या आधारे बळकट केले ते व्यासपिठ ! व्यासपिठावर बसण्याचा अधिकार ज्यांना प्राप्‍त झाला, ते श्री सद्‌गुरु होत. अशांना अभिवादन करून त्यांचेकडून प्राप्‍त झालेल्या अमर अमृतश्रोताला कृतज्ञतेच्या कोंदणात बसवून ते अर्पण करण्याची संधी देणारा गुरुपौर्णिमा हा महान क्षण होय ! देणारा श्री सद्‌गरु अखंडपणे देत असतो. घेणारा मात्र खंडितपणेच घेत असतो. तेवढ्यानेदेखील घेणार्‍याच्या जीवनात क्रांति घडून येते. जीवनाची वाटचाल धन्यतेकडे होऊ लागते. ज्याला याची जाण असेल, त्याची कृतज्ञता बुद्धी खचितच जागृत होईल. तीच प्रगट करण्याचा सुवर्णकाल म्हणजे गुरुपौर्णिमा. - प.पू. स्वामी विद्यानंद, पुणे


अ. गुरुकृपायोगाचे महत्त्व

गुरुकृपायोगामुळे अहं लवकर कमी होणे
`गुरुकृपायोगाची मूल्ये जिवाला सेवाभावातून अहं कमी करण्यासाठी त्या त्या स्तरावर चैतन्य प्रदान करत असल्याने समष्टी साधनेमुळे व्यष्टी साधनेपेक्षा लवकर अहं कमी होण्यास मदत होते, याचे शिक्षण देतात.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ६.१.२००६, रात्री ८.२५)


गुरुकृपायोगानुसार साधना करणारे जीव सप्‍तपाताळ व सप्‍तलोक यांत न अडकणे
`गुरुकृपायोगानुसार समष्टी साधना करणार्‍या कलीयुगातील जिवाला कमी कालावधीत सप्‍तपाताळ व सप्‍तलोक यांत असणार्‍या अडचणींविषयी, म्हणजेच साधनेत येणार्‍या प्रत्येक स्तरावरील अडचणींविरुद्ध कसे लढायचे, हे माहीत झाल्याने असे जीव स्थूलात किंवा सूक्ष्मात त्या त्या टप्प्यावर अडकण्याची शक्यता खूप कमी असते.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १६.४.२००६, दुपारी ३.१९)


गुरुकृपायोगानुसार साधना करणारे देवाणघेवाणीच्या स्तरावरून मुक्‍त झाल्याने त्यांना पुनर्जन्म नसणे
`गुरुकृपायोगानुसार समष्टी साधना करणारे सर्व जीव ईश्‍वरी राज्यात परिक्रमणा करणारे असून सर्वच दृष्टीने परिपूर्ण असतात; कारण या कालावधीत कमाल वाईट शक्‍तींच्या होणार्‍या त्रासातून ते कृपेच्या बळावर तरून, शिक्षित होऊन, पुढे येणार्‍या सर्व अडथळयांवर मात कशी करायची याचे प्रशिक्षण घेतलेले असतात. यामुळे प्रत्यक्ष देवाणघेवाणीच्या स्तरावरून ते मुक्‍त होऊन परत जन्माला न येता पुढची गती धारण करतात.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १६.४.२००६, दुपारी ३.१९)


आ. समष्टी साधनेतील सहजता, सुंदरता व सानंदता या तीन `स'कारांवर `गुरुकृपायोग' आधारित असणे


सौ. अंजली गाडगीळ


`सहजता, सुंदरता व सानंदता या तीन `स'कारांसह कृती करण्याचा प्रयत्‍न करणारा तो साधक.


अ. सहजता (दिसेल ते कर्तव्य) :
`दिसेल ते कर्तव्य', या भावातून प्रत्येक गोष्ट केली, तर ती सहजपणे होते. सतत वर्तमानकाळात रहाता आल्यामुळे भूतकाळ व भविष्यकाळ यांचे विचार कमी होण्यास, परिणामी संस्कार कमी होण्यास मदत होते.

आ. सुंदरता (प्रत्येक गोष्ट सुंदर, परिपूर्ण करण्यास शिकणे व मग ती दुसर्‍यालाही शिकवणे) :
कुठलीही कृती करतांना ती नीटनेटकी, सुंदर व दुसर्‍याला समजेल अशी केल्याने त्या कृतीचे इतरांनाही लगेच आकलन होते व त्या गोष्टीतून इतर जिवांनाही आनंद मिळतो. `ही गोष्ट फक्‍त मला माझ्यासाठी सुंदर करावयाची नाही, तर ती दुसर्‍यांना आनंद देण्यासाठी करावयाची आहे', हा झाला जिवाचा समष्टी भाव. समष्टीमध्ये एखादी कृती करून मग ती सोपी करून इतरांना शिकवणे व आपल्यासारखाच दुसरा साधक तयार करणे ईश्‍वराला अपेक्षित असते. सुंदर गोष्ट नेहमीच चैतन्यदायी व आनंददायी असते.

इ. सानंदता (प्रत्येक कृती ही केवळ माझ्या आनंदापुरतीच मर्यादित नसून ती दुसर्‍याला आनंद देण्यासाठीही आहे.) : सहजता व सुंदरता या टप्प्यांतून जीव हळूहळू सानंदतेकडे जाऊ लागतो. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये जिवाचे ईश्‍वराशी द्वैत असते. प्रत्येक कृती सानंदतेने करता करताच जिवाचा प्रवास सायुज्य मुक्‍तीकडे लवकर होऊ शकतो.' - श्री गुरुतत्त्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १६.४.२००४, सकाळी १०.४४)
(वरील मुद्याचे संगणकावर टंकलेखन करत असतांना मला माझा उजवा हात प.पू. डॉक्टरांच्या लेखणी धरलेल्या हातासारखा जाणवत होता. - सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.)


इ. गुरुकृपायोग : आध्यात्मिक उन्नतीचा विहंगम माग

गुरुकृपायोगानुसार साधनेत नामासहित कर्म करतांना प्रार्थना केल्यामुळे जिवाचा भाव वाढणे, कृतज्ञतेमुळे अहं कमी होणे व नामाचे रूपांतर गुणात्मक नामात झाल्याने साधक कमी कालावधीत संतपदाला पोहोचणे :
`नामासहित कर्म करता करता कर्माला प्रार्थना व कृतज्ञता यांची जोड दिली असता, या नामाचे रूपांतर गुणात्मक नामात होते; कारण जिवाच्या नामामुळे ब्रह्मांडातील सूक्ष्मलहरी, प्रार्थना केल्यामुळे जिवाचा भाव वाढल्याने सूक्ष्मतर लहरी व कृतज्ञतेमुळे अहं कमी झाल्याने सूक्ष्मतम लहरी कार्यरत होतात व जिवाकडे आकृष्ट होतात. त्यामुळे कर्म करतांना एकाच वेळी या तिन्ही लहरींचा फायदा जिवाला मिळतो. यातच गुरुकृपायोगाच्या शिकवणीचे महत्त्व लक्षात येते; कारण इतर संप्रदाय फक्‍त `नामजप करा', एवढेच सांगतात. त्यामुळे गुरुकृपायोगाप्रमाणे साधना करणारे जीव फक्‍त नामजप करणार्‍या जिवांपेक्षा गुणात्मक नामजपाकडे लवकर जातात. साहजिकच इतरांच्या तुलनेत त्यांची उन्नती जलद होते व असे जीव कमी कालावधीत संतपदाला पोहोचतात.' - श्री गुरुतत्त्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २६.५.२००४, सायं. ६.५०)

गुरुकृपायोगानुसार साधनेने साधकाची आध्यात्मिक उन्नती जलद होऊन त्याला `चौर्ध्वागती' प्राप्‍त होणे
गुरुकृपायोगात सर्व प्रकारच्या साधनामार्गांबद्दल स्थूलातून व सूक्ष्मातून मार्गदर्शन होत असल्याने साधकाच्या साधनेच्या अंगानुसार व त्यामुळे त्याला प्राप्‍त पातळीनुसार आवश्यक साधना करवून घेतली जाते. त्यामुळे साधकाची आध्यात्मिक उन्नती जलद होऊन त्याला `चौर्ध्वागती' प्राप्‍त होते. गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍यांची विविध तर्‍हेने होणारी उन्नती गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या काही साधकांना मोक्ष मिळालेला असेल, काही साधकांची त्या दिशेने वाटचाल सुरू असेल, काहींना स्वर्गप्राप्‍ती झालेली असेल, काहींना ईश्‍वरी राज्यातील राजवैभव प्राप्‍त झालेले असेल, तर काहींना चौर्ध्वागती प्राप्‍त झाल्याने उच्च लोकांत स्थान प्राप्‍त होऊन तेथे त्यांची सूक्ष्मातून साधना सुरू असेल. कलीयुगात अवतरलेल्या गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या सनातनच्या काही साधकांना प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने चौर्ध्वागती प्राप्‍त झालेली आहे.' - ब्रह्मतत्त्व (सौ. कविता विक्रमसिंह पाटील यांच्या माध्यमातून, १९.४.२००६, सकाळी ७.४५)

गुरुकृपायोगाप्रमाणे साधना केल्याने सात देवतांची उपासना होत असल्यामुळे सातही देवतांप्रती जिवाचा भाव वाढणे, त्यामुळे देवतांनी समष्टी साधना करणार्‍या जिवाला आपणहून मदत करणे व जिवाची उन्नती झपाट्याने होणे
`गुरुकृपायोगाप्रमाणे साधना करणार्‍या जिवाला सप्‍तदेवतांच्या नामजपाच्या प्रयोगातून आलेला तो तो नामजप करण्याची सवय लागल्याने त्याची सर्व देवतांशी जवळीक होण्यास मदत होते व सातही देवतांप्रती जिवाचा भाव वाढण्यास मदत झाल्यामुळे देवता समष्टी साधना करणार्‍या जिवाला आपणहून मदत करतात. हे गुरुकृपायोगातील सात उच्च देवतांच्या नामजपाच्या प्रयोगपद्धतीचे महत्त्व असल्याने जिवाची उन्नतीही ते ते तत्त्व मिळाल्यामुळे झपाट्याने होते.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १९.६.२००४, सायं. ५.०७)


ई. गुरुकृपायोगानुसार साधना करणारे जीव हे निवृत्तीमार्गी असणे

श्री. निषाद : गुरुकृपायोगानुसार साधना करणारे जीव हे प्रवृत्तीमार्गी आहेत कि निवृत्तीमार्गी ?
एक ज्ञानी : गुरुकृपायोगानुसार साधना करणारे जीव मायेमध्ये राहून निवृत्तीमार्ग अनुभवत साधनेतील सर्व अनुभव घेत आहेत. निवृत्तीमार्गी जिवांना देहबुद्धी व संपत्ती यांचा गर्व रहात नाही अथवा खूप अत्यल्प प्रमाणात रहातो. त्याप्रमाणे सनातनचे साधक सर्व अनुभवत आहेत. साधनामार्गाच्या दृष्टीने बघितल्यास गुरुकृपायोग हा प्रवृत्तीमार्ग आहे. साधकांचा स्तर व त्यांच्या अनुभूतींच्या दृष्टीने बघितल्यास सनातनचे साधक हे निवृत्तीमार्गी ठरतात; म्हणून गुरुकृपायोगाने साधना करणारे जीव हे प्रवृत्तीमार्गाने जाणारे निवृत्तीमार्गी जीव आहेत. (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १५.६.२००६, दुपारी ४.५३)


उ. `गुर्वाज्ञापालन हेच एकमेव उद्दिष्ट

गुरुकृपायोगाप्रमाणे साधना करणार्‍या जिवांचे `गुर्वाज्ञापालन हेच एकमेव उद्दिष्ट' असणे व विविध योगमार्गांची ब्रीदवाक्ये

अज्ञात शक्‍ती : गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या जिवांसाठी `गुरुकृपायोगाप्रमाणे साधना करणार्‍या जिवाला गुर्वाज्ञापालन हेच एकमेव उद्दिष्ट आहे', असाच नियम का आहे ?
एक ज्ञानी : प्रत्येक मार्गाप्रमाणे साधना करणार्‍या जिवांसाठी त्या त्या योगमार्गाच्या विशिष्ट पद्धतीकडे वळता यावे; म्हणून त्या त्या योगमार्गाचे ते ते ब्रीदवाक्य असते.

कर्मयोग
अ. माध्यम : कर्म
आ. ब्रीदवाक्य :
`कर्म करा; पण फळाची अपेक्षा करू नका.' म्हणजे कर्मामध्ये (योगमार्गाच्या विशिष्ट पद्धतीमध्ये) सतत सातत्य ठेवा; पण फळाची अपेक्षा करू नका, म्हणजे स्वत:ला लिप्‍त करून घेऊ नका.

ज्ञानयोग
अ. माध्यम : ज्ञान
आ. वाक्य :
`अयं आत्मा ब्रह्म' व `ब्रह्म सत्य जगत् मिथ्या', म्हणजे `स्वत: ब्रह्म आहे, हे सत्य आहे व हे सर्व जगत मायास्वरूप आहे', हे लक्षात ठेवा. `स्वत: ब्रह्म आहे', या ज्ञानाला (जाणिवेला) विसरू नका.

गुरुकृपायोग
अ. माध्यम : गुरूंची प्राप्‍ती करणे
आ. वाक्य :
`गुर्वाज्ञापालन हेच एकमेव उद्दिष्ट', म्हणजे गुरुस्वरूपाचे (तत्त्व किंवा सगुण स्वरूप) पूर्णपणे अनुकरण करावे.
वरील माहितीवरून गुरुकृपायोगाचे ब्रीदवाक्य हे गुरूंशी निगडित असलेल्या प्रत्यक्ष देहात्मक जिवाला प्रत्येक क्षण विघटनाच्या प्रक्रियेतून गुरुतत्त्वाकडे नेणारे असले पाहिजे. ही शक्‍ती वरील वाक्यामध्ये असल्यामुळे हेच वाक्य गुरुकृपायोगाचे ब्रीदवाक्य असणे योग्य आहे. (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ११.६.२००६, दुपारी ५.०७)


ऊ. गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍यांची उन्नती लक्षात न येण्याचे कारण

संकलक :
कलीयुगात जलद आध्यात्मिक उन्नती साधून घेऊन परत जन्माला न येता स्वचैतन्याच्या बळावर पुढील मार्गक्रमणा करणार्‍या जिवांचे कमाल प्रमाण ३० टक्के आहे, असे आपण सांगितले आहे. एवढे प्रमाण आहे, तर ते स्थूल व सूक्ष्म यांद्वारे जाणवत का नाही ?
एक विद्वान : `आताच्या रज-तमयुक्‍त वाईट शक्‍तींच्या कमाल प्रभावाखाली ते जाणवत नाही; कारण या अवस्थेत आपल्या अंतर्बाह्य मनाच्या जाणिवांची एकाग्रता चैतन्याच्या दाोतावर केंद्रित न होता वाईट शक्‍तींचे होणारे हल्ले परतवण्यात गुंतलेली असल्याने सातत्याने पातळीमध्ये चढ-उतार होत असतो. वाईट शक्‍तींच्या कमाल प्रभावाखाली साधकांचे आताचे वेगळेपण सुस्पष्ट होणारे नाही.' (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १६.४.२००६, दुपारी ३.१९)

गुरुकृपायोगानुसार साधना करणार्‍या साधकांचे वेगळेपण सन २०१२ नंतर सर्वांच्याच लक्षात येणार असणे
`आता साधकांचा कार्यातील सगुण-निर्गुण असा टप्पा सुरू आहे. पुढे उत्क्रांती होऊन ज्या वेळी निर्गुण स्तरावरील टप्पा सुरू होईल, त्या वेळी साधक ब्राह्म व क्षात्र या दोन्ही तेजांनी भारीत असल्याने, सन २०१२ नंतर त्यांची क्षात्र, म्हणजेच स्थूल व ब्राह्म, म्हणजेच सूक्ष्म या दोन्ही स्तरांवर प्रगती होऊन कमी कालावधीत उन्नती होईल. त्या वेळी त्यांचे वेगळेपण सर्वांच्याच लक्षात येईल.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १६.४.२००६, दुपारी ३.१९)


अ. यंदाची गुरुपौर्णिमा अशी साजरी करूया !

गुरुपौर्णिमा, गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्याचा दिवस. प्रत्येकच साधक हा दिवस जास्तीतजास्त चांगल्या पद्धतीने साजरा करण्याचा विचार करत असतो. अर्थात या दिवशी गुरुतत्त्व १ हजार पटीने कार्यरत असल्याने साधकांना त्याचा फायदा अधिक प्रमाणात होत असतो. गुरूंना शिष्याकडून अपेक्षा अशी काहीच नसते. शिष्याने त्याची आध्यात्मिक उन्नती करून घेऊन आत्मकल्याण करावे, यासाठीच ते सर्व करीत असतात. जलद आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी स्वत:त साधकत्व निर्माण करणे गरजेचे असते. साधकाने स्वत:त साधकत्व व कालांतराने शिष्यत्व निर्माण करणे, हीच गुरूंप्रती खर्‍या अर्थाने कृतज्ञता असते. प.पू. डॉक्टरांनीही साधकांत साधकत्व निर्माण व्हावे, यासाठी सर्वच जिल्ह्यांत साधकत्ववृद्धी शिबिरांचे आयोजन करण्यास मागे सांगितले होते. त्याच दृष्टीने पावले उचलून जास्तीतजास्त प्रयत्‍न करून आपण स्वत:त साधकत्व निर्माण करून यंदाची गुरुपौर्णिमा साजरी करूया. त्यासाठी `नेमके काय करायला हवे', याची उजळणी या लेखात करूया. संकलक : अँड्. योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


अँड्. योगेश जलतारे


१. स्वत:त साधकत्व निर्माण करण्यासाठी साधनेच्या पुढील नऊ अंगांचा अंगिकार करूया !
१ अ. स्वभावदोष-निर्मूलन :
यासाठी चुका स्वीकारून व त्यांच्या मुळाशी जाऊन स्वभावदोष शोधणे, त्यांची नोंद तक्‍त्यात करणे व त्यांवर स्वयंसूचना देणे आदी बाबी नियमित करूया.
१ आ. अहं-निर्मूलन : दिवसभरातील प्रत्येकच कृती जाणीवपूर्वक शरणागतीच्या भावाने करण्याचा प्रयत्‍न करूया. आपल्या ज्या कृतींतून किंवा लक्षणांतून आपल्या अहंचे प्रकटीकरण होते, त्या कृतींची किंवा लक्षणांची नोंद करून त्याच्या निवारणासाठी प्रयत्‍न करूया.
१ इ. नेतृत्वगुण : सेवेमध्ये जास्तीतजास्त जबाबदार्‍या घेऊन त्या चांगल्यात चांगल्या प्रकारे पार पाडूया. त्यासाठी नेतृत्वातील विविध पैलूंचा अभ्यास करून त्यांचे आचरण करूया. वरील तीन अंगे आपण प्रामाणिकपणे अंगिकारल्यास पुढील सहा अंगे खर्‍या अर्थाने अंगिकारल्यासारखे होईल.
१ ई. नामजप : अहंविरहित व दशापराधविरहित आणि शरणागतीच्या भावाने केलेला नामजप भावपूर्णच होतो. त्यासाठी निराळे प्रयत्‍न करावे लागत नाहीत.
१ उ. सत्संग : अहंविरहित व दोषविरहित जीवन जगणे व जोडीला नामजप करणे, म्हणजे एकप्रकारचा सत्संगच झाला असे झाल्यास आपण २४ तास सत्संगात राहू व आपल्याला प्रत्येक गोष्टीतून सत्संग मिळवता येईल.
१ ऊ. सत्सेवा : नामासहीत व शरणागतीच्या भावाने केलेली सेवा सत्सेवा होईल.
१ ए. त्याग : गुरुपौर्णिमेला त्यागाचे खूप महत्त्व आहे. साधनेची सर्व अंगे नियमितपणे आचरणात आणण्यातून तन, मन व धन यांचा त्याग होईल. एरव्ही आपण साधना सुरू करताच गुरुकृपेला सुरुवात होते; परंतु आपले तन, मन व धन यांचा ५५ टक्के इतका त्याग झाल्यावर गुरुकृपेची अनुभूती आपल्याला घेता येते. ही अनुभूती घेण्यासाठी आपल्याला प्रयत्‍न करायला हवेत. दिवसभरात आपल्याकडून १३ तास शारीरिक सेवा झाल्यास व आपले नामाशी, म्हणजेच ईश्‍वराशी अनुसंधान राहिल्यास तन व मन यांचा ५५ टक्के त्याग झाला, असे म्हणता येईल. मनाच्या त्यागामध्ये आपल्या मनाविरुद्ध झाले, तरी त्याचा भावनात्मक विचार न करता `गुरूंनी आपल्याला शिकवण्यासाठीच हा प्रसंग आपल्या जीवनात घडवला आहे', असा भावात्मक विचार करणे अंतर्भूत आहे. हा विचार मनात येण्यासाठीच स्वभावदोष व अहं-निर्मूलन प्रक्रिया प्रभावीपणे राबवायला हवी. बुद्धीचा त्याग होण्यासाठी प्रत्येक सेवा `योग: कर्मसु कौशलम्', म्हणजे `कर्म कुशलतेने, परिपूर्णपणे करणे, म्हणजे योग', या नियमाप्रमाणे करायला हवी. लवकरात लवकर मनोलय व बुद्धीलय होणे, हेच अध्यात्मात साध्य करायचे असते. ते त्यागातून साध्य होते. धनाचा त्याग करणे त्यामानाने सोपे असते. पूर्णवेळ साधकांच्या मनात प्रश्‍न येतो, `आम्ही सर्वच त्याग करून आलो आहोत, तर आमचा धनाचा त्याग कसा होईल ?' त्यांनी गुरूंनी दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा विनियोग काटकसरीने व योग्य पद्धतीने करायला हवा. त्यातून त्यांना धनाचा त्याग साध्य होईल.


१ ऐ. प्रीती : वरील सर्व अंगे आपल्याला निरपेक्ष भावाने व प्रेमाने अंगिकारायची आहेत. यातूनच आपल्यात सर्वांप्रती प्रीती निर्माण होईल.
१ ओ. भाववृद्धी : वरील आठ अंगांची परिपूर्ण पूर्तता केल्यास भाववृद्धी निश्चित आहे.

२. एवढे सगळे कधी करावे ?
वरील सर्व वाचल्यावर आपल्या मनात प्रश्‍न येतो, `एवढे सगळे करायचे कधी ?' येथेच आपले प्रयत्‍न थांबतात. `कसे करायचे', या विचारात आपण काहीच करत नाही. येथे महत्त्वाचा भाग म्हणजे, प.पू. डॉक्टरांनी जर आपल्याला वरीलप्रमाणे करायला सांगितले आहे, तर त्याबाबत त्यांनी विचार केला असेल कि नाही ? साधकाला अशक्यप्राय असलेली गोष्ट प.पू. डॉक्टर करायला सांगतील का ? या गोष्टींचा विचार आपण करायला हवा. आपले दैनंदिन सेवेचे योग्य नियोजन केल्यास वरील सर्व गोष्टी आपणास सहज करता येतील. त्यात काही अडचण असल्यास प्रमुखसेवकांना विचारून घेऊ शकतो.

३. अंतर्मुखता कशी साधावी ?
साधनेची वरील अंगे अंगिकारण्यात आणखी एक अडचण असते, ती म्हणजे अंतर्मुखतेचा अभाव. सर्वसाधारणत: `दिवसभरात सेवा करतांना होणार्‍या चुका व इतर साधकांविषयी मनात येणार्‍या प्रतिक्रिया लक्षात येत नाहीत किंवा त्यांवर ताबा मिळवता येत नाही. नामजप करतांना किंवा सेवा करतांना एकाग्रता साधत नाही', अशा प्रकारच्या आपल्या अडचणी असतात. यामध्ये आपण शेवटपर्यंत स्वत:च्या स्तरावर चिंतन करायला कमी पडतो. कुठल्याही प्रसंगात आपण `मी कुठे कमी पडलो', याऐवजी परिस्थिती, नियोजन, सहकारी साधक यांना दोष देतो. येथेच नेमकी चूक होते. ही चूक टाळण्यासाठी नेमकी विचारसरणी कशी असायला हवी, हे पुढील उदाहरणांतून समजून घेऊया.

उदा. अ. : `सुनील ऐकत नाही', अशी अनिलची तक्रार आहे. अनिल म्हणतो, ``मी सुनीलच्या चुका वेगवेगळया प्रकारे सांगून पाहिल्या; परंतु तो ऐकतच नाही. त्यामुळे आता मी त्याला सांगणे सोडून दिले. येथे अनिलने हा अभ्यास सुनीलच्या स्तरावर केलेला आहे. त्यामुळे तो `सुनील ऐकत नाही, म्हणजे सुनीलमध्ये ऐकण्याची वृत्ती नाही', या निष्कर्षाप्रत पोहोचला. अनिलने शेवटपर्यंत स्वत:च्या स्तरावर चिंतन केल्यास ते पुढीलप्रमाणे असेल. - सुनील माझे ऐकत नाही; परंतु प.पू. डॉक्टर किंवा डॉ. दुर्गेश सामंत यांनी सांगितलेले ऐकेल. याचा अर्थ `त्याच्यात ऐकण्याची वृत्ती नाही', असे नाही. उलटपक्षी `माझ्यातच काहीतरी कमी आहे. मी प.पू. डॉक्टर किंवा दुर्गेशदादा यांच्यासारखा झाल्यास सुनील माझे ऐकेल. त्यामुळे मलाच माझे प्रयत्‍न वाढवायला हवेत', असे विचार केल्यास अनिलच्या मनातून सुनीलविषयीच्या नकारात्मक भावना निघून जातील व तो त्याच्यासाठी सकारात्मक विचार व प्रयत्‍न करू लागेल. येथे सुनील सुधारेल अथवा न सुधारेल; मात्र अनिलमध्ये सुधारणा होऊन तो प.पू. डॉक्टर किंवा दुर्गेशदादा यांच्यासारखा होईल व हेच प.पू. डॉक्टरांना अपेक्षित आहे. उदा. आ. : श्री दत्त मंदिरातील सत्संग बंद पडला. त्या संदर्भात सत्संगसेवक श्री. शिंदे म्हणाले, ``सत्संगातील संख्या कमी झाली आहे. येणारे जिज्ञासू नसून श्रवणभक्‍त आहेत व काहींना खूपदा बोलावूनही ते येत नाहीत. त्यामुळे सत्संग बंद करावा लागला.'' येथेही श्री. शिंदे यांनी सत्संग बंद पडण्यामागील कारणांचा विचार करतांना इतरांच्या स्तरावरच केला. स्वत:च्या स्तरावर विचार केल्यास त्यांची विचारसरणी पुढीलप्रमाणे असेल, `मी सत्संगात घेत असलेला विषय सगळयांना समजतो का ? सत्संगाची वेळ त्यांना सोयीची आहे का ? त्यांच्या मनातील शंकांचे निरसन मी व्यवस्थित केले आहे का ? सत्संगात येण्यात त्यांना आणखी काही अडचणी नाहीत ना ?' येथेही सत्संग बंद पडला, तरी तो सुरू रहाण्यासाठी श्री. शिंदे यांनी शेवटपर्यंत प्रयत्‍न केल्याने त्यांची उन्नती निश्चित होईल.

४. प्रार्थनेने अशक्य काय आहे ?
वरील प्रयत्‍नांच्या जोडीला प्रार्थना केल्यास अंतर्मुखता साधणे व वरील नऊ अंगांनुसार साधना करणे अशक्य नाही. काही वेळा वाईट शक्‍तींनी काळे आवरण आणल्याने आपल्याकडून हव्या त्या प्रमाणात व नियमितपणे प्रयत्‍न होत नाहीत. येथेही आपण `काळे आवरण आल्याने प्रयत्‍न होत नाहीत', असे म्हटले, तर दुसर्‍या टोकाचाच विचार झाला. प.पू. डॉक्टरांनी सांगितले आहे, ``आपली आध्यात्मिक पातळी वाढली, तर वाईट शक्‍ती आपल्याला त्रास देऊ शकत नाहीत.'' याचा अर्थ आपणच आपली भक्‍ती वाढवून आध्यात्मिक बळ वाढवले पाहिजे. त्यासाठी वरील प्रयत्‍नांच्या जोडीला जास्तीतजास्त प्रार्थना केल्यास ते अशक्य नाही.

५. प्रार्थना
या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वरील ध्येय आम्हा साधकांना लवकरात लवकर प्राप्‍त होओ, हीच श्री गुरुचरणी प्रार्थना !


आ. साधकांनो, भक्‍तीमार्गानुसार गुरुपौर्णिमा साजरी करून जास्तीतजास्त गुरुकृपा संपादन करूया !


संकलक :
श्री. भूषण कुलकर्णी,
नेसाई, गोवा


सनातन संस्थेतर्फे देशात १९९७ सालापासून व विदेशात २००० सालापासून गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा होत आहे. यंदाही संस्थेतर्फे सर्वत्र गुरुपौर्णिमेचा प्रसार, निधीसंकलन करणे व जाहिराती मिळवणे, या दृष्टीने प्रयत्‍न सुरू झाले आहेत. काही वेळेस गुरुपौर्णिमेचे आयोजन करतांना एक प्रकारची मरगळ दिसून येऊ शकते. त्यासाठी कारणीभूत उत्साह, चैतन्य व भाव यांची कमतरता, म्हणजेच भक्‍तीमार्गाचा अभाव आहे, ही गोष्ट साधकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. तसेच गुरुपौर्णिमेच्या संदर्भात करावयाच्या प्रत्येक छोट्या सेवेतूनही आपली देवावरची भक्‍ती कशी वाढेल, ते पहाणे आवश्यक आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केल्या जाणार्‍या प्रत्येक सेवेतून आपली व्यष्टी व समष्टी साधना होणार आहे. गुरुपौर्णिमेच्या तयारीचा एक भाग म्हणून आपण विविध समित्या स्थापन करतो, त्याविषयी काही मुद्दे या लेखातून पाहूया. तसेच प्रत्येक साधकाला गुरुतत्त्वाचा १ हजार पटीने फायदा कसा होईल व सातत्याने गुरुकृपा कशी संपादन करता येईल, यांविषयीचे विवेचन येथे केले आहे.


१. गुरुपौर्णिमेचा जास्तीतजास्त फायदा मिळवण्यासाठी करावयाचे उपाय
अ. प्रार्थना, वैयक्‍तिक नामजप व सातत्याने कृतज्ञता वाढवून गुरुपौर्णिमेच्या वेळी होणार्‍या वाईट शक्‍तींच्या त्रासांवर मात करावी.
आ. आपण साधना म्हणून सत्सेवेला ३० टक्के महत्त्व द्यावे. जे साधक नोकरी करत असतील, त्यांनी रजेचे नियोजन करून सेवेत जास्तीतजास्त वेळ सहभागी होण्याचा प्रयत्‍न करावा. पूर्णवेळ साधकांनी उपलब्ध वेळेचा क्षणन्क्षण गुरुपौर्णिमेच्या सेवेसाठी कसा उपयोगात आणता येईल व आपली सेवा ही गुरुसेवा कशी होईल, यांकडे लक्ष द्यावे.
इ. त्यागाला ३० टक्के महत्त्व आहे. त्यामुळे तन, मन, धन, वेळ, बुद्धी व अहं यांचा साधनेसाठी जास्तीतजास्त त्याग करावा.
गुरुकृपेने गेल्या वर्षभरात आपण जी काही साधना व आध्यात्मिक उन्नती करू शकलो, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्याची गुरुपौर्णिमा हीच एकमेव संधी आहे. ही कृतज्ञता गुरुपौर्णिमेनिमित्त उत्कृष्ट सेवा करूनच व्यक्‍त करू शकतो.

२. व्यष्टी व समष्टी साधनेच्या दृष्टीने होणारे फायदे
अ. ज्या साधकांमध्ये भक्‍तीभाव, गुरूंच्या कार्याविषयी तळमळ व क्षात्रवृत्ती आहे आणि ज्या साधकांची प्रार्थना व नाम जास्तीतजास्त सुरू आहे, अशा साधकांकडे हे गुरुतत्त्व जास्त प्रमाणात आकृष्ट होणार आहे.
आ. साधकांना `सत्पात्रे दानम्' करण्याची ही वर्षभरातील दुर्लभ संधी आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुकार्यासाठी केलेले अर्पण साधकाच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट ठरते.
इ. समाजात अध्यात्माविषयी तात्त्विक मुद्दे सांगावयाचे असल्यामुळे आपला अभ्यास व बुद्धीचा निश्चय होतो. तशीच आपली श्रद्धाही वाढते.
ई. अध्यात्मप्रसार केल्यामुळे आपला अहं कमी होण्यास मदत होते.
उ. सेवा करत असतांना आपले स्वभावदोष लक्षात येतात व ते कमी करण्यासाठी गुरुचरणी शरणागतभाव वाढतो.

३. समष्टी साधनेच्या दृष्टीने होणारे फायदे
अ. `संघे: शक्‍ति कलौयुगे ।' या उक्‍तीप्रमाणे समष्टी साधनेचा प्रत्येक साधकाला फायदा होण्यासाठी एखाद्या साधकाची चूक जर आपल्या लक्षात आली, तर ती त्याला वेळीच लक्षात आणून द्यावी. यामुळे जितक्या चुका कमी तितका गुरुतत्त्वाचा अधिकाधिक फायदा साधकांना होईल.

आ. धर्मसंस्थापनेचे गुरूंचे कार्य हे अवतार कार्य आहे. त्यामुळे या कार्यातील खारीचा वाटा म्हणून समाजात गुरुपौर्णिमा व अध्यात्म यांचा जास्तीतजास्त प्रसार केल्याने धर्मसंस्थापनेच्या कार्याला हातभार लागेल.

४. गुरुपौर्णिमेनिमित्त परिणामकारक प्रसार करण्यासाठी न्यावयाचे प्रसारसाहित्य
अ. संस्थेच्या कार्याची माहिती असलेली प्रसारधारिका
आ. ग्रंथ, लघुग्रंथ, ध्वनीफिती व ध्वनीचित्र तबकडी
इ. नामपट्ट्या, वास्तू शुद्ध करण्यासाठी करावयाचे नामपट्ट्यांचे सूक्ष्म-छत व त्याबद्दलची माहितीपत्रके, देवतांची सात्त्विक चित्रे
ई. सनातनची नियतकालिके, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेले विशेषांक
उ. गुरुपौर्णिमेचे निमंत्रण व आवाहनपत्रक
ऊ. निधीसंकलनाचे पावतीपुस्तक
ए. जाहिरातीचे रिलीज ऑर्डर फॉर्म

५. गुरुपौर्णिमेनिमित्त जाहिराती किंवा निधीसंकलन करतांना घ्यावयाची काळजी
अ. ईश्‍वरी कार्यासाठी केवळ जाहिरात मिळवणे, हा उद्देश नसावा. जाहिरातदारांना व देणगीदारांना या कार्यासाठी जाहिरात किंवा अर्पण दिल्याने गुरुतत्त्वाचा कसा फायदा होतो, हे उदाहरणांसहित समजावून सांगावे.
आ. `गुरुपौर्णिमा विशेषांका'च्या माध्यमातून जे ज्ञान आपण समाजाला देत आहोत, ते समजावून सांगावे.
इ. जाहिरातदार व देणगीदार साधक कसे होतील, या गोष्टीला जास्त प्राधान्य द्यावे.

६. गुरुपौर्णिमा महोत्सवाची पूर्वतयारी
गुरुपौर्णिमा महोत्सवाची तयारी करतांना विविध समित्यांचे आयोजन करणे आवश्यक आहे. यामध्ये पुढील विविध सेवा करण्यार्‍या साधकांची नेमणूक करावी.
अ. प्रतिष्ठित व्यक्‍तींना निमंत्रण देणे
आ. साफसफाई
इ. स्वागत-कक्ष
ई. ग्रंथप्रदर्शन
उ. अध्यात्मविषयक प्रदर्शन
ऊ. नामपट्ट्या व देवतांची सात्त्विक चित्रे यांचे प्रदर्शन
ए. सूक्ष्म-जगताविषयी माहिती व त्याविषयी प्रदर्शन
ऐ. नियतकालिकांचे प्रदर्शन
ओ. आरती म्हणणारे साधक व त्यांचा सराव
औ. कापडीफलक लावणे व ते काढणे
अं. सूत्रसंचालन करणारे साधक
क. पूजा करणारे व सांगणारे साधक

गुरुपौर्णिमेची तयारी उत्कृष्ट व गुरूंना अपेक्षित कशी होईल, या दृष्टीने प्रत्येक साधकाने प्रयत्‍नशील रहावे. याचबरोबर सेवा करतांना होणार्‍या त्रुटींचे बारकाईने निरीक्षण करणार्‍या व त्यात बदल सांगणार्‍या साधकाची निवड करावी. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात होणार्‍या चुका अगोदरच लक्षात येऊन वेळीच दुरुस्त केल्या जातील. असे केल्याने या वर्षी होणारी गुरुपौर्णिमा चुकांविरहित होऊन प्रत्येक साधकाला जास्तीतजास्त आध्यात्मिक लाभ मिळेल.

७. गुरुपौर्णिमेची पूर्वतयारी करतांना व प्रसारासाठी बाहेर जातांना घ्यावयाची काळजी
अ. स्वत:च्या नामजपावर लक्ष केंद्रित करून ते संख्यात्मक व गुणात्मक दृष्ट्या वाढवावे.
आ. प्रसाराला निघण्यापूर्वी अर्धा तास नामजप करून निघावे. त्यामुळे आपल्याभोवती संरक्षककवच निर्माण होण्यास मदत होईल. तसेच गुरूंना अपेक्षित अशी सेवा व्हावी व आपल्याभोवती संरक्षककवच असावे, यांसाठी दर अर्ध्या तासाने प्रार्थना करावी व कृतज्ञता व्यक्‍त करावी.
इ. विभूतीचे पाणी जास्तीतजास्त प्राशन करावे व आवश्यकतेनुसार विभूती लावावी.
ई. दिवसभर प्रसारामध्ये आपल्याकडून झालेल्या चुका परत होऊ नयेत, यासाठी उपाययोजना करावी. सेवा करतांना आलेल्या अडचणी, वेळेच्या नियोजनातील त्रुटी, लक्षात आलेले स्वभावदोष, तसेच दिवसभरामध्ये झालेले निधीसंकलन, मिळालेल्या जाहिराती व झालेली ग्रंथविक्री यांचा हिशोब या सर्व गोष्टी लिहून ठेवाव्यात. तसेच हे सर्व आपल्या जिल्ह्यातील/विभागातील जबाबदार सेवकाला सांगावे.
उ. दुसर्‍या दिवशी प्रसाराला जाण्याचे नियोजन हे लिखित स्वरूपात असावे. प्रसाराला घेऊन जातांना न्यावयाचे सर्व साहित्य आवश्यकतेप्रमाणे आहे कि नाही, हे तपासावे व आवश्यकतेनुसार त्याची मागणी करावी.
ऊ. रात्री झोपण्यापूर्वी १५ मिनिटे नामजप करावा व नामपट्ट्यांचे मंडल करावे.

८. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुढील गोष्टी कटाक्षाने करा !
अ. नामजप करत गुरुपौर्णिमेचे आयोजन केलेल्या वास्तूची स्वच्छता व गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी.
आ. सेवा करत असतांना दर अर्ध्या तासाने सामूहिक प्रार्थना करावी. त्यासाठी घंटा वाजवण्याचे नियोजन करावे.
इ. दर एका तासाने भाव असलेल्या साधकाने विभूती फुंकरावी. वाईट शक्‍तींच्या विरोधात लढण्यासाठी साधकांनी आपला वैयक्‍तिक नामजप प्रार्थनेसह शरणागतभावाने करावा.
ई. सेवा करत असतांना दर अर्ध्या तासाने विभूतीचे पाणी प्यावे. खाद्यपदार्थांमध्ये विभूती घालून प्रार्थना करूनच ते पदार्थ खावेत.
उ. साधकांचा भक्‍तीभाव वाढण्यासाठी प.पू. भक्‍तराज महाराज यांच्या भजनांची ध्वनीफीत लावावी अथवा एकत्रित नामजप करावा.
ऊ. वाईट शक्‍तींचा तीव्र त्रास असणार्‍या साधकांना वेगळे बसवण्याची व्यवस्था करावी.
ए. उपस्थित जिज्ञासू, साधक व वक्‍ता यांच्या मन व बुद्धी यांवर आलेले आवरण दूर होण्यासाठी व त्यांना विषयाचे आकलन व्हावे, यांसाठी भाव असलेल्या साधकांनी श्री गणेशाला प्रार्थना करावी.
ऐ. प्रत्यक्ष गुरूंचेच पूजन करत आहोत, या भावाने गुरुपूजन करावे व सांगावे.
ओ. गुरुपौर्णिमेचे प्रवचन करणार्‍या व सूत्रसंचालन करणार्‍या साधकांनी कार्यक्रमाच्या अगोदर आपला ५ तास नामजप पूर्ण होईल, असे पहावे.
औ. गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा करत असतांना आलेल्या अनुभूती व गुरुपौर्णिमा कार्यक्रमानिमित्तचे लिखाण त्वरित नजीकच्या संकलन विभागास पाठवावे.


इ. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची उपस्थिती वाढवण्यासाठी, तसेच कार्यक्रम चुकांविरहित करण्याच्या दृष्टीने प्रयत्‍न करा !


डॉ. (कु.) माया पाटील

गुरुपौर्णिमा, म्हणजे पृथ्वीतलावर गुरुतत्त्व १ हजारपटीने प्रक्षेपित होऊन कार्यरत असणारा दिवस. सर्व साधकांच्या दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. पृथ्वीतलावर १ हजार पटीने प्रक्षेपित होणार्‍या गुरुतत्त्वाचा फायदा सर्वांना व्हावा, यासाठी सर्व साधकांनी प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. गुरुपौर्णिमा जवळ येत आहे. त्या दिवशी कार्यक्रमाला जास्तीतजास्त जिज्ञासूंनी यावे, यासाठी आपण प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. तसेच त्या दिवशीचा कार्यक्रम चुकांविरहित व उत्कृष्ट होण्यासाठीही आपल्याकडून प्रयत्‍न व्हायला हवेत. - डॉ. (कु.) माया पाटील, अखिल भारत प्रसारसेविका


१. कार्यक्रमाची उपस्थिती जास्तीतजास्त वाढण्यासाठी पुढील प्रयत्‍न करावेत
अ. निमंत्रणपत्रिका जास्त काढून त्या वितरित करण्यावर भर देऊ नये. बर्‍याचदा लोक निमंत्रण पत्रिका घेतात व त्या तशाच ठेवून देतात, त्यांचा वापर करत नाहीत. त्यामुळे पत्रिकांची छपाई जास्त करून वापरू नये.
आ. आपल्या ओळखीच्या व्यक्‍तींच्या नावांची यादी आताच तयार करून ठेवावी व त्यांना त्या दिवशीच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यास सांगावे.
इ. जाहिरातदार व अर्पणदार यांच्याकडून जाहिराती व अर्पण घेतांनाच त्यांना निमंत्रित करावे. नंतर आवश्यकता असल्यास त्यांना दूरध्वनीवरून निमंित्रित करू शकतो.
ई. प्रत्येक साधकाने किमान १० जिज्ञासू कार्यक्रमाला येतील, अशी जबाबदारी घ्यावी. केंद्रामध्ये १०० साधक असतील, तर कार्यक्रमाला १ हजार जिज्ञासूंची उपस्थिती असणे कठीण नाही.
उ. गुरुपौर्णिमेच्या शेवटच्या आठवड्यात सर्व साधकांनी कार्यक्रमाला उपस्थिती कशी वाढेल, या दृष्टीने नियोजन करून त्याप्रमाणे प्रसार करण्याकडे लक्ष द्यावे.
ऊ. बँका, पतसंस्था, सरकारी कार्यालये इत्यादी ठिकाणी जाऊन सर्वांना एकत्रित करून ५ ते १० मिनिटांचा विषय सांगावा. यामध्ये गुरुपौर्णिमेचे महत्त्व, कार्यक्रमाचे स्वरूप व गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये व फायदे, असे मुद्दे एकत्रित करून सांगितल्यास लोकांना कार्यक्रमाला येण्याचे महत्त्व पटेल व ते कार्यक्रमाला येतील.
ए. वरील विषयाला अनुसरून कोपरा-सभा घ्याव्यात, तसेच देवळांमध्येही विषय सांगण्यास थांबावे.
ऐ. देवळांमध्ये फलक असल्यास फलकावर किंवा भित्तीपत्रके (पोस्टर्स) तयार करून त्यांवर, तसेच गल्लीतील फलकांवर गुरुपौर्णिमा सोहळयाचे स्थळ व वेळ चार दिवस अगोदरच लिहून ठेवावी.
ओ. प्रमुखसेवकांनी सर्व साधकांचे विभागानुसार नियोजन करून त्याचा पाठपुरावा करावा.

२. कार्यक्रम चुकांविरहित व उत्कृष्ट करण्यासाठीचे प्रयत्‍न आतापासूनच करा !
अ. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम चुकांविरहित होण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी करावयाच्या सर्व सेवांचा सराव आताच करून घ्या. यामध्ये गुरुपूजन करणे, प्रवचन करणे, धार्मिक विधींचे प्रात्यक्षिक करणे, कार्यस्थळाच्या ठिकाणची सर्व सजावट इत्यादी.
आ. सत्यम्-शिवम्-सुंदरम् हे ईश्‍वराचे तत्त्व आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी १ हजार पटीने कार्यरत असणारे गुरुतत्त्व ग्रहण होण्यासाठी कार्यक्रमामध्ये चुका होणारच नाहीत, याकडे आपण लक्ष द्यायला हवे. त्यासाठी प्रत्येक कृती करण्यापूर्वी त्याचा सराव करणे, समयमर्यादा घालून सेवा पूर्ण करणे, तसेच प्रमुखसेवकांनी प्रत्येक सेवा स्वत: पहाणे यांकडे लक्ष द्यावे. `(कोणतीही) सेवा इतर साधकांनी केली असेल', असे गृहीत धरू नये.
इ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यासपिठावर करावयाच्या सेवा भावनेपोटी कोणालाही करावयास सांगू नये. ज्या साधकांना व्यासपिठावरील सेवा चांगल्या करावयास येतात, त्यांनाच त्या करायला सांगाव्यात, उदा. सूत्रसंचालन करणे, धार्मिक विधीतील कृती करणे इत्यादी.


अ. गुरूंकडून ज्ञान मिळवण्यापेक्षा त्यांची सेवा करणे जास्त महत्त्वाचे !

अध्यात्मात सर्वस्वाचा त्याग करायचा असतो. शिष्य जेव्हा गुरूंकडून ज्ञान मिळवतो, तेव्हा तो त्याग करण्याऐवजी काहीतरी मिळवत असतो. याउलट सेवा करतांना तन व मन यांचा त्याग होतो; म्हणूनच जिज्ञासूपेक्षा सेवा करणारे शिष्य गुरूंना जास्त आवडतात. - डॉ. आठवले (२३.७.२००७, सायं. ६)


`महर्षी व्यास कोण ?' - धर्मद्रोही हिंदु सरकारी वकिलाचा प्रश्‍न

महाराष्ट्रातील एका तालुक्याच्या ठिकाणी एका न्यायालयात एका प्रकरणाची सुनावणी सुरू होती. हे प्रकरण हिंदु व मुसलमान यांच्यात झालेल्या वादाचे होते. न्यायालयात पोलिसांची बाजू मांडतांना सरकारी वकिलांनी `महर्षी व्यास कोण ?' असा प्रश्‍न उपस्थित केला. सरकारी वकील हिंदु असतांना त्यांनी असा प्रश्‍न उपस्थित केल्यामुळे ही सुनावणी ऐकण्यासाठी न्यायालयात उपस्थित असलेल्या काही हिंदूंना त्या वकिलांची कीव आली, तर काही धर्माभिमानी हिंदूंच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली. ही सुनावणी ऐकणार्‍या अशाच एका धर्माभिमानी हिंदूने व्यक्‍त केलेले विचार येथे देत आहोत.


हिंदूंमध्ये धर्माभिमानाचा अभाव असल्यामुळेच धर्मद्रोही सरकारी वकिलांकडून हिंदूंना दुखावणारा प्रश्‍न उपस्थित
या प्रकरणाची सुनावणी सुरू असतांना न्यायालयात उपस्थित असलेल्यांमध्ये ८० टक्के लोक हिंदू होते. हिंदु धर्मियांत महर्षी व्यासांना आदराचे स्थान आहे. महर्षी व्यासांना आदिगुरु मानले जाते. हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व असणारी गुरु-शिष्य परंपरा त्यांच्यापासूनच सुरू झाली. प्रत्येक विषय त्यांनीच निर्माण केला आहे. महर्षी व्यासांच्या कृपेमुळेच मानवाला विविध विषयांचे ज्ञान होत आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी हिंदू प्रतीवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमा हा दिवस `व्यासपौर्णिमा' म्हणजेच `गुरुपौर्णिमा' म्हणून साजरी करतात. हिंदूच नव्हे, तर प्रत्येक मनुष्याने त्यांच्याप्रती कृतज्ञ असले पाहिजे, असे महान कार्य महर्षी व्यासांनी केले आहे. असे असतांना जन्माने हिंदु असणार्‍या वकिलांनी मोठ्या संख्येने हिंदू उपस्थित असतांनाही `महर्षी व्यास कोण ?' असा प्रश्‍न जाहीररीत्या उपस्थित केलाच कसा ? अर्थात याचे उत्तर आहे, हिंदूंमध्ये असलेला धर्माभिमानाचा अभाव.

हिंदूंमध्ये धर्मप्रबोधनाला पर्याय नाही !
महंमद पैगंबर किंवा येशू िख्र्तास् कोण ? असा प्रश्‍न प्रत्यक्षात नव्हे, तर कोणी स्वप्नातही विचारू शकत नाही. मुसलमानांना असलेला त्यांच्या धर्माप्रतीचा प्रचंड अभिमान, हेच याचे कारण आहे. सरकारी वकिलांनी असा प्रश्‍न उपस्थित करून त्यांना हिंदु धर्माचा काडीमात्र अभिमान नसल्याचेच दाखवून दिले आहे. या सरकारी वकिलांनी आपली बुद्धी थोडी जरी चालवली, तरी लक्षात येईल की, महर्षी व्यासांमुळेच आज त्यांना वकिली करता येत आहे. या सुनावणीला बरेच दिवस उलटले आहेत, तरी एकाही हिंदूने याबाबत त्यांना जाब विचारलेला नाही. हिंदूंची ही स्थिती केवळ धर्मप्रबोधनानेच बदलू शकते.

मुसलमानधार्जिणेपणा जपणार्‍या हिंदूंना हिंदुस्थानात रहाण्याचा काय अधिकार ?
सुनावणी सुरू असलेले प्रकरण हिंदु व मुसलमान यांच्यातील वादाचे होते. या प्रकरणात आरोपीच्या पिंजर्‍यात हिंदू उभे होते. केवळ मुसलमानांना खूष करण्यासाठी वकील महोदयांनी असा प्रश्‍न विचारला असल्याची शक्यता आहे. स्वधर्माचा काडीचाही अभिमान नसणार्‍या व केवळ मुसलमानांना खूष करू पहाणार्‍या हिंदु वकिलांना हिंदुस्थानात रहाण्याचा काय अधिकार ? त्यांनी मुसलमानांच्या राष्ट्रात जाऊन राहिलेलेच बरे. हिंदु धर्माचा थोडाही अभ्यास नसलेले असे जन्महिंदू पाहिले की, एका मुसलमान व्यक्‍तीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. कर्नाटकात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो असता मला एक मुसलमान व्यक्‍ती भेटली होती. तिला हिंदु धर्माबद्दल खूप कौतुक होते. तिचा हिंदु धर्माबद्दल, मंदिरांबद्दल, हिंदूंचे सण व रूढी परंपरा यांबद्दल खूप अभ्यास होता. त्या व्यक्‍तीने परिसरातील मंदिरांची माहिती मला विस्तृतपणे सांगितली होती. हिंदु धर्माचे कौतुक असणारे असे मुसलमान कोठे व जन्माने हिंदु असूनही `महर्षी व्यास कोण ?' असा प्रश्‍न विचारणारे निलाजरे वकील कोठे ? - एक कट्टर हिंदु


गुरुपौर्णिमेच्या संदर्भातील अनुभूती

रेल्वेतील बाकड्याखाली ठेवलेल्या गुरुपौर्णिमा विशेषांकांतील चैतन्य सहन न झाल्यामुळे त्या बाकड्यावर बसलेली मुसलमान मुलगी प्रकट होणे
१०.७.२००६ रोजी मी जळगाव जिल्ह्याच्या गुरुपौर्णिमा विशेषांकांचे गठ्ठे घेऊन `भुसावळ पॅसेंजर'ने जळगावला जाण्यास निघालो. मी विशेषांकांचे गठ्ठे माझ्या व शेजारच्या बाकाखाली ठेवले होते. इगतपुरी येथे एक मुसलमान व्यक्‍ती व तिची मुलगी माझ्या समोरच्या बाकावर येऊन बसले. अर्ध्या तासानंतर ते दोघे माझ्या शेजारी बसले. काही वेळाने ती मुलगी प्रकट झाली व हातवारे करून ओरडू लागली, `काझी, मुझे मत मारो, मैं इसे छोड जाऊंगी, मुझे कोडे बहुत लगते है ।' ती प्रकट झाल्यावर मी त्या बाकावरून उठलो व दुसर्‍या बाकावर बसलो. त्या वेळी माझा नामजप सुरू होता. पूर्ण प्रवासात तिच्याजवळ कुणीही बसले नाही. ती मुलगी तीन तास प्रकटावस्थेत होती. ते दोघे चाळीसगाव येथे उतरले. नंतर माझ्या लक्षात आले, `बाकाखाली गुरुपौर्णिमा विशेषांकांचे गठ्ठे ठेवलेले होते. त्या विशेषांकांतील चैतन्य सहन न झाल्यामुळे त्या मुलीला त्रास झाला व ती प्रकट झाली.' - श्री. जसराज करगुटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.


गुरुपौर्णिमेच्या दिवशी सभागृहात गेल्यावर तेथील चैतन्यामुळे खूप चांगल्या अनुभूती आल्याने साधनेबद्दलची तळमळ वाढणे
मी १.१.२००४ मध्ये सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यास सुरुवात केली. माझी साधनेतील पहिली गुरुपौर्णिमा आली. आम्हाला अर्पणाचे महत्त्व सांगितले होते. त्यानुसार समाजात जाऊन अर्पण गोळा करायचे होते. जेव्हा मी प्रथम अर्पण मागण्यासाठी आमच्या कॉलनीत गेले, तेव्हा तेथील लोकांनी मला म्हटले, `तुम्ही असे मागणे केव्हापासून सुरू केले.' त्या वेळी मला खूप राग आला होता. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सभागृहात गेल्यावर तेथील चैतन्यामुळे मला खूप चांगल्या अनुभूती आल्या. तेव्हापासून माझी साधनेबद्दलची तळमळ वाढत गेली. त्याच वेळी मी मनाशी ठरवले, `आता इथून मागे जायचे नाही.' त्यानंतर मी भावसत्संगाला जाणे, ज्येष्ठ साधकांच्या मार्गदर्शनाला जाणे, अभ्यासवर्गालाजाणे, विविध कार्यक्रमात सहभागी होणे सुरू केले. एकदा भावसत्संगाहून येण्यास उशीर झाल्यामुळे माझे पती माझ्यावर खूप चिडले होते; परंतु दुसर्‍या आठवड्यात जेव्हा भावसत्संगाच्या वेळी ते मला नेण्यासाठी आले, तेव्हा तेथील चैतन्य पाहून त्यांना खूप चांगले वाटले व तेव्हापासून त्यांनीही साधनेला सुरुवात केली.


गुरुपौर्णिमेच्या ठिकाणी सेवा करतांना प्रथम विरोध करून नंतर स्वत:हून कापडी फलक लावण्यास परवानगी देणे
गुरुपौर्णिमेच्या ठिकाणी संस्थेचे कापडी फलक लावतांना सभागृहाच्या मालकांनी ते लावण्यास मनाई केली व रागवायला सुरुवात केली. आम्ही उपस्थित साधकांनी त्यांना प्रथम नम्रतापूर्वक समजावण्याचा प्रयत्‍न केला; पण ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. मी सर्व साधकांना प्रार्थना करण्यास सुचवून आम्ही सर्वांनी प.पू. डॉक्टरांना प्रार्थना केली. त्यानंतर १० मिनिटांनी त्या गृहस्थांनी बाहेर येऊन `जरा बाजूला बॅनर लावा', असे स्वत:हून सांगितले. त्या क्षणी आम्हाला गुरुतत्त्वाचा महिमा अनुभवायला मिळाला. - सौ. शैलजा वि. अवतरे, कराड (२००६)


समोर प.पू. भक्‍तराज महाराज व प.पू. डॉक्टर बसलेले दिसणे व भाव जागृत होणे
`आज प्रथमच मला `भाव म्हणजे काय असतो', हे अनुभवायला मिळाले. माझ्या समोरच प.पू. भक्‍तराज महाराज व प.पू. डॉक्टर बसलेले मला दिसले. माझ्या डोळयांतून थंड अश्रू येत होते. आज मला नेहमीप्रमाणे जराही त्रास जाणवला नाही.' - सौ. रुची कृष्णा, मेलबोर्न, ऑस्ट्रेलिया.

संपर्क । दैनिक मुख्य पान । मराठी मुख्य पान
Copyright © 2007 - दैनिक सनातन प्रभात
Read more...