रक्षाबंधनामागील उद्देश, अर्थ व कारण तसेच रक्षाबंधनामागील शास्त्र व राख्यांचे महत्त्व

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

raksha_bandhan_kruti01





१. उद्देश
`रक्षाबंधन' हा भारतीय संस्कृतीतील अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी बहीण भावाला तिचे रक्षण करण्यासाठी अतूट बंधनात बांधते. - श्री गणेश (श्री. भरत मिरजे यांच्या माध्यमातून, १६.८.२००५, सकाळी ७.३०)

२. अर्थ व कारण
२ अ. `बहिणीचे जन्मोजन्मी रक्षण करणार आहे', हे सांगून त्याचे वचन म्हणून भाऊ बहिणीकडून धागा बांधून घेतो व त्याला वचनबद्ध करण्यासाठी बहीण धागा बांधते.
`बहीण व भाऊ यांनी नात्याच्या बंधनात रहावे' यासाठी हा दिवस इतिहास कालापासून प्रचलीत आहे.

२ आ. राखी हे बहीण व भाऊ यांच्या पवित्र बंधनाचे एक प्रतीक आहे.

२ इ. जसे बहिणीच्या रक्षणार्थ भाऊ धागा बांधून घेऊन वचनबद्ध होतो, तसे बहीणही भावाचे रक्षण व्हावे, म्हणून ईश्‍वराच्या चरणी विनवणी करते.

२ ई. बहिणीचा भक्‍तिभाव, तिची ईश्‍वराप्रतीची तळमळ व तिच्यावर असलेली गुरुकृपा जितकी अधिक, तितका तिने भावासाठी मारलेल्या हाकेवर परिणाम होऊन भावाची अधिक प्रमाणात प्रगती होते.

२ उ. बहिणीच्या पातळीप्रमाणे भावाला ५ तासापर्यंत होणारा फायदा

क्र. बहिणीची पातळी
(टक्के)
भावाला होणारा फायदा
(टक्के)
१. २५ ते ३० १३
२. ३५ ते ४५ १६
३. ४५ ते ५५ २५
४. ५५ ते ७० ५०
५. ७० ते ९० ८०
६. ९० ते १०० १००
- श्रीकृष्ण (सौ. प्रार्थना बुवा यांच्या माध्यमातून, १२.८.२००५, रात्री १.०५ )

३. रक्षाबंधनामागील शास्त्र काय ?
(यमलहरींमुळे व पृथ्वीकणांमुळे संयोगाने पृथ्वीवर निर्माण होणार्‍या आच्छादनाचा, म्हणजे रक्षेचा आसुरी शक्‍तींना उपयोग होऊ नये, म्हणून त्यांचे स्त्री-शक्‍तीने पुरुषतत्त्वाच्या माध्यमातून केलेले बंधन म्हणजे रक्षाबंधन)

या दिवशी ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या यमलहरींच्या गतिमानतेतून निर्माण होणार्‍या घर्षणात्मक ऊर्जेतून वायुमंडलात प्रक्षेपित होणार्‍या तेजकणांना पृथ्वीकणांच्या संयोगाने ज्या वेळी जडत्त्व प्राप्‍त होते, त्या वेळी हे कण भूमीवर आपले आच्छादन तयार करतात. यालाच `रक्षा' असे संबोधले जाते. बलिराजा हा या रक्षेतून प्रक्षेपित होणार्‍या रज-तमात्मक लहरींचा आवश्यकतेप्रमाणे आसुरी शक्‍तींच्या पोषणासाठी उपयोग करून घेतो; म्हणून या दिवशी भूमीला आवाहन करून तिच्या साहाय्याने बलीला बंधन घालण्याचे प्रतीक म्हणून स्त्री-शक्‍ती कार्यमान पुरुषाला राखी बांधते, म्हणजेच रक्षारूपी कणांना ताब्यात ठेवून वायुमंडलाचे रक्षण करण्यासाठी विनवते. सर्वसमावेशक अशा तांदुळाच्या कणांचा समुच्चय हा राखीचे प्रतीक म्हणून कार्यमान पुरुषाच्या हातात बंधन म्हणून बांधला जातो. - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून १८.८.२००५, सकाळी ९.३३)

तांदुळाच्या कणांचा समुच्चय राखी म्हणून रेशमी धाग्याने बांधण्याची पद्धत का आहे ?
(सर्वसमावेशकतेचे प्रतीक असलेले तांदूळ व सात्त्विक लहरींचे गतिमान वहन करणार्‍या रेशमी धाग्याने तयार केलेली राखी बांधल्यावर बहिणीतील शक्‍तीलहरी तांदुळाच्या माध्यमातून भावाकडे संक्रमित झाल्याने त्याची सूर्यनाडी कार्यरत होऊन त्याच्यातील शिवतत्त्व जागृत होणे व वायुमंडलातील रज-तमकणांचे विघटन होणे) तांदूळ हे सर्वसमावेशकतेचे प्रतीक, म्हणजेच ते सर्वांना आपल्यात सामावून घेणारे, तसेच ते सर्व लहरींचे उत्तम आदान-प्रदान करणारे आहे. तांदुळाचा समुच्चय पांढर्‍या वसनात बांधून तो रेशमाच्या धाग्याने शिवरूपी जिवाच्या उजव्या हातात बांधणे, म्हणजे एक प्रकारे सात्त्विक रेशमी बंधन तयार करणे. रेशमी धागा सात्त्विक लहरींचे गतिमान वहन करण्यात अग्रेसर आहे. कृतीच्या स्तरावर प्रत्यक्ष कर्म घडण्यासाठी हे रेशमी बंधन प्रत्यक्ष तयार केले जाते. राखी बांधणार्‍या जिवातील शक्‍तीलहरी तांदुळाच्या माध्यमातून शिवरूपी जिवाकडे संक्रमित झाल्याने त्याची सूर्यनाडी कार्यरत होऊन त्यातील शिवतत्त्व जागृत होते. तांदुळाच्या कणांच्या माध्यमातून शिवातील क्रियाशक्‍ती कार्यरत होऊन वायुमंडलात कार्यलहरींचे गतिमान प्रक्षेपण करून वायुमंडलातील रज-तमकणांचे विघटन करते. अशा तर्‍हेने रक्षाबंधनाचा मूळ उद्देश शिव व शक्‍ती यांच्या संयोगाने साध्य करून या दिवसाचा फायदा मिळवणे मानवजातीच्या दृष्टीने जास्त इष्ट ठरते. - एक विद्वान (१८.८.२००५, दुपारी १२.३६)

४. राख्या कशा असाव्यात ?
राख्यांमधील लहरींचा बहीण व भाऊ या दोघांना फायदा होतो. त्यामुळे दिखाऊ राख्या घेण्यापेक्षा ईश्‍वरीतत्त्व टिकवून ठेवणार्‍या राख्या घेतल्या पाहिजेत, अन्यथा त्या राख्यांमधील त्रिगुणांचा जिवांवर परिणाम होऊन त्यांची तशी वृत्ती बनण्यास मदत ठरते.
- श्रीकृष्ण (सौ. प्रार्थना बुवा यांच्या माध्यमातून, १२.८.२००५, रात्री १.०५ )

५. सनातनने तयार केलेल्या राख्यांचे महत्त्व

सनातनने तयार केलेल्या राखीतून मिळणार्‍या लहरींमुळे भावाला होणारा वाईट शक्‍तींचा त्रास ५ तासापर्यंत २ (१५ *) टक्के व बहिणीचा त्रास २ (१० *) टक्के कमी होतो.

राखीतील प्रेमभाव वातावरणात प्रक्षेपित झाल्याने जिवाला त्याच्या भावानुसार फायदा होतो व त्याचा भक्‍तिभाव वाढण्यास मदत होते. राखीतील चैतन्यामुळे जिवात असणार्‍या षड्रिपूंचे प्रमाण ५ तासापर्यंत २ (२५ *) टक्क्यांनी कमी होते. - श्रीकृष्ण (सौ. प्रार्थना बुवा यांच्या माध्यमातून, १२.८.२००५, रात्री १.०५ )
(याबाबतची अधिक माहिती `सनातन' राखीची उत्पत्ती' या मुद्द्यात दिली आहे.)

६. राख्यांच्या व्यष्टी व समष्टी स्वरूपात केलेल्या प्रसारामुळे आनंदाच्या लहरी निर्माण होणे आणि त्याचा फायदा पुढे ७ दिवस होणे
सनातनने तयार केलेल्या राख्यांच्या व्यष्टी व समष्टी स्वरूपात केलेल्या प्रसाराचा साधकाला अधिक प्रमाणात फायदा होतो. त्यामुळे वातावरणातील दाब कमी होऊन आनंदाच्या लहरी निर्माण होतात व जिवाला रक्षाबंधनाच्या दिवसापासून पुढे ७ दिवस त्याचा फायदा होतो. - श्रीकृष्ण (सौ. प्रार्थना बुवा यांच्या माध्यमातून, २.८.२००५, रात्री १.०५ )

७. पाटाच्या भोवती रांगोळी काढण्याचा उद्देश
राखी बांधतांना भावाला बसण्यासाठी ठेवलेल्या पाटाच्या भोवती सात्त्विक रांगोळी काढावी. अशा सात्त्विक रांगोळीतून सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होतात. त्यामुळे तेथील वातावरण सात्त्विक बनते. सात्त्विक रांगोळीत ईश्‍वराकडून मिळणारी सात्त्विक शक्‍ती १० (२५ ते ३० *) टक्के ग्रहण केली जाते व ती जिवांना मिळते. त्यामुळे वाईट शक्‍तींच्या त्रासाची तीव्रता कमी होण्यास मदत होते. - श्री गणेश (श्री. भरत मिरजे यांच्या माध्यमातून, १६.८.२००५, सकाळी ७.३०)

८. तुपाच्या निरांजनाने ओवाळणे
राखी बांधल्यावर भावाला तुपाच्या निरांजनाने ओवाळतात. तुपाच्या निरांजनाने ओवाळतांना त्यातून तेज प्रक्षेपित होते. त्यामुळे भावातील तेजतत्त्व वाढायला मदत होते. तुपाच्या ज्योतीत ईश्‍वराकडून येणारी शक्‍ती ग्रहण करण्याची क्षमता असते. त्या ज्योतीत १० (५० ते ६० * ) टक्के ईश्‍वरी चैतन्य कार्यरत असते. (तेलाच्या ज्योतीत ३ (१० ते २० *) टक्के ईश्‍वरी चैतन्य कार्यरत असते. तेलाच्या ज्योतीमुळे रजोगुण वाढायला मदत होते.) तुपाची ज्योत शांतपणे तेवत रहाते. त्यामुळे भावात शांतपणे विचार करण्याची बुद्धी वाढण्यास मदत होते. - श्री गणेश (श्री. भरत मिरजे यांच्या माध्यमातून, १६.८.२००५, सकाळी ७.३०)

९. ओवाळायच्या ताटात मौल्यवान वस्तू न ठेवण्याचे कारण
ओवाळायच्या ताटात पैसे अगर मौल्यवान वस्तू ठेवू नयेत. ताटात अशा प्रकारच्या वस्तू ठेवल्याने बहिणीत त्या विषयी अपेक्षा निर्माण होऊन तो संस्कार वाढतो. त्यामुळे तिच्यात रज-तमाच्या संस्कारांचे प्रमाण वाढत जाऊन भाऊ-बहिणीत कलह निर्माण होऊन तिच्यातील प्रेम कमी होते. - श्री गणेश (श्री. भरत मिरजे यांच्या माध्यमातून, १६.८.२००५, सकाळी ७.३०)

१०. बहिणीने भावाला राखी बांधतांना द्रौपदीप्रमाणे भाव ठेवावा
माझ्या बोटातून वाहणार्‍या रक्‍तप्रवाहाला थांबविण्यासाठी द्रौपदीने तिच्या साडीचा पदर फाडून माझ्या बोटाला बांधला. बहीण भावाला होणारा त्रास कदापी सहन करू शकत नाही. त्याच्यावर आलेले संकट दूर करण्यासाठी ती काहीही करू शकते. राखी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावाला राखी बांधतांना हाच भाव ठेवला पाहिजे. - श्रीकृष्ण (सौ. प्रार्थना बुवा यांच्या माध्यमातून, १२.८.२००५, रात्री १.०५ )

११. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने कोणतीही अपेक्षा न बाळगता राखी बांधण्याचे महत्त्व
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाकडून वस्तूच्या रूपात कोणतीही अपेक्षा मनात बाळगल्यास ती त्या दिवशी मिळणार्‍या आध्यात्मिक फायद्यापासून वंचित रहाते. हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या देवाण-घेवाण हिशोब कमी करण्यासाठी असतो. अपेक्षा ठेवून वस्तूची प्राप्‍ती केल्यास देवाण-घेवाण हिशोब ३ पटीने वाढतात.

११ अ. अपेक्षेमुळे वातावरणातील प्रेमभाव व आनंद यांच्या लहरींचा फायदा करून घेता येत नाही.
११ आ. आध्यात्मिकदृष्ट्या १२ टक्के नुकसान होते. त्यामुळे प्रत्येक बहिणीने आपल्या भावास नि:स्वार्थीपणाने राखी बांधल्यास व त्याचे आशीर्वाद घेतल्यास देवाण-घेवाण हिशोब कमी होण्याचे प्रमाण वाढते.
- श्रीकृष्ण (सौ. प्रार्थना बुवा यांच्या माध्यमातून, १२.८.२००५, रात्री १.०५ )

१२. रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी देण्याचे महत्त्व
रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीस ओवाळणीच्या रूपात भेटवस्तू देत असतो. त्याची स्थूल व सूक्ष्म कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

१२ अ. एकमेकांकडे असणार्‍या स्थूल गोष्टींमुळे एकमेकांची सातत्याने आठवण रहाते.
१२ आ. देवाण-घेवाण हिशोब एका टक्क्याने कमी होतात.
१२ इ. भावाप्रती बहिणीच्या सातत्याने असणार्‍या मायेचे मोल भाऊ करू शकत नाही; पण काही प्रमाणात प्रेमाने प्रेम देऊन ते कमी करू शकतो. हे स्थूल माध्यमाद्वारे करण्याचा तो प्रयत्‍न करतो
१२ ई. ओवाळणी देतांना भावाच्या मनात असणार्‍या ईश्‍वराप्रतीच्या भावाचा बहिणीवर परिणाम होत असतो. त्यामुळे भावाला ओवाळणी न मागता त्याने स्वेच्छेने दिल्यास ती स्वीकारावी, अन्यथा ती टाळणे हेच सोयीस्कर व उपयुक्‍त ठरते. - श्रीकृष्ण (सौ. प्रार्थना बुवा यांच्या माध्यमातून, १२.८.२००५, रात्री १.०५ )

१३. भावाने सात्त्विक ओवाळणी देण्याचे महत्त्व

१३ अ.
सात्त्विक वस्तूंचा जिवांवर व्यावहारिक परिणाम होत नाही.
१३ आ. सात्त्विक वस्तू देणार्‍या जिवाला २० टक्के व घेणार्‍या जिवाला १८ टक्के लाभ होतो.
१३ इ. सात्त्विक कृती केल्याने देवाण-घेवाण हिशोब कमी होऊन त्यातून नवीन देवाण-घेवाण हिशोब निर्माण होत नाही.
त्यामुळे साधकबंधूंनो, सात्त्विक ओवाळणी देऊन भगिनींच्या कर्मबंधनातून मुक्‍त व्हा. - श्रीकृष्ण (सौ. प्रार्थना बुवा यांच्या माध्यमातून, १२.८.२००५, रात्री १.०५ )

१४. पुढील काळात प्रत्येक जिवाने करावयाचे प्रयत्‍न

१४ अ.
या दिवसाची आठवण ठेवून बहीण-भावाचे बंधन अतूट ठेवण्याचा प्रयत्‍न करणे
१४ आ. समाजातील इतर जिवांशी अतूट बंधन ठेवण्याचा प्रयत्‍न करणे
१४ इ. ईश्‍वरावरील श्रद्धा वाढवण्याचा प्रयत्‍न करणे

१५. देव व गुरु यांना करावयाची प्रार्थना
प्रत्येक भावाने `बहिणीच्या रक्षणाबरोबरच समाज, राष्ट्र व धर्म यांच्या रक्षणासाठी माझ्याकडून प्रयत्‍न होऊ देत', अशी प्रार्थना करावी. - श्री गणेश (श्री. भरत मिरजे यांच्या माध्यमातून, १६.८.२००५, सकाळी ७.३०)

( * वाईट शक्‍तीने सांगितलेली चुकीची माहिती)

अधिक माहिती वाचा

श्रावण पौर्णिमा विशेष - रक्षाबंधन


अनुक्रमणिका

  • १. प्रस्तावना

  • २. रक्षाबंधनामागील उद्देश, अर्थ व कारण तसेच रक्षाबंधनामागील शास्त्र व राख्यांचे महत्त्व

    १. उद्देश
    २. अर्थ व कारण
    ३. रक्षाबंधनामागील शास्त्र काय ? तसेच तांदुळाच्या कणांचा समुच्चय राखी म्हणून रेशमी धाग्याने बांधण्याची पद्धत का आहे ?
    ४. राख्या कशा असाव्यात ?
    ५. सनातनने तयार केलेल्या राख्यांचे महत्त्व
    ६. राख्यांच्या व्यष्टी व समष्टी स्वरूपात केलेल्या प्रसारामुळे होणारा फायदा
    ७. राखी बांधतांना पाटाच्या भोवती रांगोळी काढण्याचा उद्देश
    ८. राखी बांधल्यावर तुपाच्या निरांजनाने ओवाळणे
    ९. ओवाळायच्या ताटात मौल्यवान वस्तू न ठेवण्याचे कारण
    १०. बहिणीने भावाला राखी बांधतांना द्रौपदीप्रमाणे भाव ठेवावा
    ११. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने कोणतीही अपेक्षा न बाळगता राखी बांधण्याचे महत्त्व
    १२. रक्षाबंधनाच्या दिवशी ओवाळणी देण्याचे महत्त्व
    १३. भावाने सात्त्विक ओवाळणी देण्याचे महत्त्व
    १४. पुढील काळात प्रत्येक जिवाने करावयाचे प्रयत्‍न

  • ३. `सनातन'ची राखी

    अ. `सनातन' राखीची उत्पत्ती
    आ. `सनातन' राखीची वैशिष्ट्ये
    इ. राखीमुळे सगुण व निर्गुण स्तरावर होणारे लाभ
    ई. `सनातन' राखीवर वाईट शक्‍तींचा हल्ला होण्याचे कारण
    उ. `सनातन' राखीच्या संदर्भात अनुभूती

  • ४. वाचकांना विनंती

    अ. साधिकांनो, रक्षाबंधनाच्या दिवशी देवतांना (देवांना) राखी बांधा !
    आ. राखी पौर्णिमेदिवशी बांधलेली राखी नंतर नामपट्टीप्रमाणे वापरा अगर विसर्जित करा !

  • ५. रक्षाबंधनाच्या सणामध्ये शिरलेले गैरप्रकार व विरोध

    अ. राख्यांवर `क्रिश' व `प्रिन्स' हिंदु धर्मातील सणांच्या व्यावसायिकरणाचा कळस !
    आ. राक्षस व भुते यांचे मुखवटे असलेल्या राख्यांची बाजारात विक्री
    इ. राखीद्वारे हनुमानाचे विडंबन थांबवणारा बालसाधक कु. सनत
    ई. मुसलमान युवतीची लाजिरवाणी प्रतिक्रिया
    उ. धर्मविषयक अज्ञानामुळे भयग्रस्त होऊन फोनाफोनी करणारे हिंदू
    ऊ. ख्रिश्चन मिशनरी शाळांचे हिंदुधर्माच्या विरोधातील कुटील कारस्थान
    ए. हिंदु विद्यार्थ्यांचे ख्रिस्तीकरण करण्याचा नियोजनबद्ध प्रयत्‍न

  • ६. एक हजारापेक्षा अधिक राख्यांचे वितरण करणार्‍या सनातनच्या साधिका व त्यांना आलेल्या अनुभूती

  • ७. रक्षाबंधनाच्या संदर्भातील साधकांना आलेल्या अनुभूती

Read In English : http://www.hindujagruti.org/hinduism/festivals/raksha-bandhan/

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: