
होळी पौर्णिमा
समानार्थी शब्द : `होळीला महाराष्ट्रात `शिमगा' म्हणतात, दक्षिणेत `कामदहन' म्हणतात. तर बंगालमध्ये दौलायात्रा म्हणून होळीचा सण होतो. `हुताशनी', असेही होळीला नाव आहे.
स्थान : देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी फाल्गुन पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवायची असते. बहुधा गावाच्या ग्रामदेवतेसमोर होळी उभी करतात.
कृती : मध्ये एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करतात. त्याच्या भोवती गोवर्या व लाकडे रचतात. होळी पेटवण्याकरता जो अग्नी आणतात, तो चांडाळाच्या...