
पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. त्या वेळी देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी झाले. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला.त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती' म्हणून साजरा करतात.दत्तजयंती हा एक सांप्रदायिक जन्मोत्सव आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी...