आषाढ शुद्ध एकादशीपासून चातुर्मासाला आरंभ झाला. त्या निमित्त वाचकांसाठी आचारधर्माविषयीचे विवेचन येथे देत आहोत. सध्या आपण स्नानाच्या संदर्भातील आचारांविषयीची माहिती पहात आहोत. त्याअंतर्गत आज आपण सकाळच्या वेळी स्नान का करावे, स्नानापूर्वी करावयाची प्रार्थना व स्नान करतांना म्हणावयाचे श्लोक या संदर्भातील माहिती पाहूया.
ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी किंवा पहाटे स्नान करावे. स्नान करण्याची ही आदर्श वेळ आहे; परंतु हल्लीच्या काळी त्या वेळी स्नान करणे बहुतेकांना शक्य नसते. असे स्नान करणे शक्य नसल्यास सूर्योदय झाल्यावर जितक्या लवकर शक्य होईल, तितक्या लवकर स्नान करावे.
५ अ. दुपारी स्नान करण्यापेक्षा सकाळच्याच वेळी स्नान करावे.
५ अ १. शास्त्र - देहाला स्पर्शणार्या आपतत्त्वाच्या लहरींच्या साहाय्याने देहाकडून बाह्य-वायूमंडलातील सात्त्विक लहरी ग्रहण केल्या जाणे : `सकाळच्याच वेळी आंघोळ करणे खूप महत्त्वाचे आहे; कारण या काळात वायूमंडल सात्त्विक लहरींनी भारित असते. पाण्याच्या माध्यमातून देहाला स्पर्शणार्या आपतत्त्वाच्या लहरींच्या साहाय्याने देह बाह्य-वायूमंडलातील लहरी ग्रहण करण्यात अतीसंवेदनशील बनल्याने आपोआपच त्याच्याकडून बाह्य-वायूमंडलातील सात्त्विक लहरी ग्रहण केल्या जातात; परंतु आता कलीयुगात सर्व उलटेच चालले आहे. बायका आधी घरातील कामे करून त्यानंतर घाम येतो म्हणून नंतर आंघोळ करून मग वेणी घालतात. दुपारच्या वेळी वायूमंडलात रज-तमात्मक लहरींचा संचार वाढल्याने व आंघोळीच्या वेळी देह बाह्य-वायूमंडलातील लहरी ग्रहण करण्यात संवेदनशील बनल्याने तो उलट रज-तमात्मक लहरीच ग्रहण करतो व अशा तर्हेने देहाची बाह्यशुद्धी साधली गेली, तरी अंत:शुद्धी होत नाही.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)
५ आ. रात्री स्नान करण्यापेक्षा सकाळी स्नान करावे.५ आ १. शास्त्र - सकाळी स्नान केल्यावर स्थूल व सूक्ष्म या देहांची सात्त्विकता जास्त प्रमाणात वाढून ती दीर्घकाळ टिकणे व रात्री ती अल्पकाळ टिकणे : `सकाळची वेळ सात्त्विक असल्यामुळे सकाळी स्नान केल्यावर स्थूल व सूक्ष्म या देहांची सात्त्विकता जास्त प्रमाणात वाढते आणि ती दीर्घकाळ टिकून रहाते. रात्रीची वेळ तमोगुणी असल्यामुळे त्या वेळी स्नान केल्यामुळे स्थूल व सूक्ष्म या देहांची सात्त्विकता कमी प्रमाणात वाढते व अल्पकाळ टिकते. त्यामुळे त्या व्यक्तीला स्नानाचा लाभ फार कमी प्रमाणात होतो.' - ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २८.११.२००७, रात्री ११.१३)
६. स्नानापूर्वी करावयाची प्रार्थना व स्नान करतांना म्हणावयाचे श्लोक
६ अ. जलदेवतेला करावयाची प्रार्थना : `हे जलदेवते, तुझ्या पवित्र जलाने माझ्या स्थूलदेहाभोवती आलेले रज-तम यांचे काळे आवरण नष्ट होऊ दे. बाह्यशुद्धीप्रमाणे माझे अंतर्मनही स्वच्छ व निर्मळ होऊ दे.'
६ आ. नामजप करत किंवा श्लोक म्हणत स्नान करण्याचे महत्त्व
६ आ १. शास्त्र : `नामजप करत किंवा श्लोक म्हणत स्नान केल्याने पाण्यातील अंगीभूत चैतन्य जागृत होऊन त्याचा देहाला स्पर्श होऊन चैतन्याचे संक्रमण पेशीपेशींपर्यंत होते व त्यामुळे देहाला देवत्व प्राप्त होऊन दिवसभरातील कृती चैतन्याच्या स्तरावर करण्यास देह सक्षम बनतो.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ३०.१०.२००७, दुपारी १.२३)
६ इ. स्नान करतांना म्हणावयाचे श्लोक
१. गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिंधु कावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ।।
अर्थ : हे गंगे, यमुने, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू व कावेरी, तुम्ही सर्व नद्या माझ्या स्नानाच्या पाण्यात या.
२. गंगा सिंधू सरस्वति च यमुना गोदावरि नर्मदा ।
कावेरि शरयू महेन्द्रतनया चर्मण्वती वेदिका ।।
र्क्षिैं वेत्रवती महासुरनदी ख्याता जया गण्डकी ।
पूर्णा:पूर्णजलै:समुद्रसहिता:कुर्वन्तु मे मंगलम् ।।
अर्थ : गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू, महेन्द्रतनया, चंबळा, वेदिका, क्षिप्रा, वेत्रवती (माळव्यातील बेतवा नदी), प्रख्यात महासुरनदी, जया आणि गण्डकी या नद्या पवित्र व परिपूर्ण होऊन समुद्रासहित माझे कल्याण करोत.
३. नमामि गंगे तव पाद पंकजं सूरासूरै: वंदित दिव्य रूपम् ।
भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणाम् ।
अर्थ : सर्व ऐहिक सुख, भोग व मोक्ष देणार्या हे गंगामाते, प्रत्येकाच्या भावानुसार तुझे जे चरणकमल सर्व देव आणि दैत्य यांना वंदनीय आहेत, अशा तुझ्या चरणांना मी वंदन करतो.
स्नान करण्याची पद्धत
७ अ. स्त्रियांनी आधी वेणी घालून मगच स्नान करणे योग्य
७ अ १. शास्त्र - वेणी घालण्याच्या प्रक्रियेतून देहात झालेल्या रज-तमात्मक लहरींचे संक्रमण आंघोळीच्या माध्यमातून झालेल्या देहाच्या शुद्धीमुळे नष्ट होणे : `कित्येक स्त्रीया केस विस्कटतात, म्हणून आंघोळ झाल्यानंतर वेणी घालतात; परंतु आधी वेणी घालून मगच आंघोळ करण्याची पद्धत आहे. वेणी घालण्याच्या प्रक्रियेतून देहात जे काही रज-तमात्मक लहरींचे संक्रमण झालेले असते, ते आंघोळीच्या माध्यमातून झालेल्या देहाच्या शुद्धीमुळे नष्ट होते. उलट आंघोळीनंतर वेणी घातल्याने देह परत अशुद्ध होतो. यावरून असे लक्षात येते की, कलीयुगातील मनुष्य फक्त बाह्य स्वच्छेतेकडे, म्हणजेच देहाच्या बाह्य सौंदर्याकडे पहाणारा बनलेला असून तो जीवनाचे अध्यात्मीकरण करण्याच्या सिद्धांतापासून, म्हणजेच खर्या आचारापासून दूर गेलेला आहे.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)
७ अ २. अनुभूती - आंघोळीनंतर वेणी घातल्यामुळे चेहर्यावर काळे आवरण येण्याचे प्रमाण वाढणे व आंघोळीपूर्वी वेणी घातली असता चेहर्यावर आवरण येण्याचे व डोक्यावर दाब जाणवण्याचे प्रमाण कमी होऊन उत्साह जास्त वेळ टिकून रहाणे : `लहानपणापासूनच मला आंघोळ करण्यापूर्वी वेणी घालण्याची सवय होती. १९९१ साली मी महाविद्यालयात जाऊ लागल्यानंतर ती सवय सुटली. तेव्हा मी आंघोळीनंतर वेणी घातल्यामुळे माझ्या चेहर्यावर काळे आवरण येण्याचे प्रमाण वाढले. या तुलनेत आंघोळीपूर्वी वेणी घातली असता `चेहर्यावर आवरण येण्याचे व डोक्यावर दाब जाणवण्याचे प्रमाण कमी होऊन माझा उत्साह जास्त वेळ टिकून रहातो', असे मला जाणवले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून मी पुन्हा आंघोळीपूर्वी वेणी घालण्यास सुरुवात केली आहे.' - कु. स्वप्ना जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
७ आ. नग्न होऊन स्नान करू नये.
७ आ १. शास्त्र - वाईट शक्तींचा त्रास होऊ नये म्हणून नग्न होऊन स्नान करू नये : `नग्नता ही पूर्णपणे देहातील छिद्रांतून सूक्ष्म रज-तमात्मक वायू ऊत्सर्जनाला पूरक ठरणारी स्थिती असते. ही स्थिती वातावरणात स्वत:चे असे एक रज-तमात्मक वायूभारित मंडल बनवते. योनीमार्गातून किंवा गुदद्वारातून होणारे टाकाऊ वायूंचे सूक्ष्म-ऊत्सर्जन बाह्य वायूमंडलातील रज-तमात्मक लहरींच्या स्पर्शामुळे वेगाने सुरू झाल्याने या मार्गांकडे पाताळातून प्रक्षेपित होणारी त्रासदायक स्पंदने आकृष्ट होऊन संपूर्ण देह रज-तमाने भारित होतो. या स्थितीत स्नान केल्याने स्नानाचा विशेष फायदा होत नाही. याउलट अंतर्वस्त्राने कटिबंध क्षेत्रात निर्माण होणार्या दबावदर्शक प्रक्रियेमुळे मणिपूरचक्र जागृत स्थितीत राहून टाकाऊ वायूंचे आतल्याआतच पोकळीत विघटन करते. मणिपूरचक्र जागृत स्थितीत आल्याने स्नानातून मिळणार्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्यास देह संवेदनशील बनतो. याचा फायदा जिवाला मिळून त्याच्यासाठी स्नान हा आचार मंगलकारी होतो.' - एक विद्वान
(सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २५.१२.२००७, रात्री ८)
७ इ. स्नान करतांना मांडी घालून बसावे.
७ इ अ. शास्त्र : `उभ्याने स्नान केल्याने आपल्या अंगावरील मालीन्यासह जमिनीवर आदळणारा पाण्याचा प्रवाह जमिनीतील काळया शक्तीस्थानांना जागृत करतो. त्यामुळे जमिनीतून काळया शक्तीचे कारंजे उसळून परत आपल्या देहाला रज-तमयुक्त बनवते. यासाठी स्नान करतांना मांडी घालून बसावे.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६) (क्रमश:)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा:
Post a Comment