Guru Pournima 2013r
Chattrapati Shivaji Maharaj...
Swatantryaveer Vinayak Savarkar
Adi Shankaracharya
Guru Pournima 2013
Read More About Guru Pournima ...More
Chattrapati Shivaji Maharaj
Hindavi swarajyache sansthapak ani adarsh rajyakarta...More
Swantraveer Vinayak Damodar Sawarkar
Swatantryaveer vinayak damodar savarkarancha vijay aso...More
Adi Shankaracharya
Adi Shankkaracharya...More
गोकुळाष्टमी विशेषांक
दहिहंडी उत्सवाच्या दरम्यान धर्मद्रोह्यांकडून केले जाणारे देवतांचे विडंबन
१. श्रीकृष्णाच्या वेशातील मुलाचे बीभत्सपणे नाचणे
हिंदूंनो, आपणही अशा प्रकारे धर्मकार्यात सहभागी होऊ शकता
१. गोकुळाष्टमीनिमित्त जनप्रबोधन व प्रथमोपचार फेरीचे आयोजन
चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मशिक्षण (स्नान)
५ अ. दुपारी स्नान करण्यापेक्षा सकाळच्याच वेळी स्नान करावे.
५ अ १. शास्त्र - देहाला स्पर्शणार्या आपतत्त्वाच्या लहरींच्या साहाय्याने देहाकडून बाह्य-वायूमंडलातील सात्त्विक लहरी ग्रहण केल्या जाणे : `सकाळच्याच वेळी आंघोळ करणे खूप महत्त्वाचे आहे; कारण या काळात वायूमंडल सात्त्विक लहरींनी भारित असते. पाण्याच्या माध्यमातून देहाला स्पर्शणार्या आपतत्त्वाच्या लहरींच्या साहाय्याने देह बाह्य-वायूमंडलातील लहरी ग्रहण करण्यात अतीसंवेदनशील बनल्याने आपोआपच त्याच्याकडून बाह्य-वायूमंडलातील सात्त्विक लहरी ग्रहण केल्या जातात; परंतु आता कलीयुगात सर्व उलटेच चालले आहे. बायका आधी घरातील कामे करून त्यानंतर घाम येतो म्हणून नंतर आंघोळ करून मग वेणी घालतात. दुपारच्या वेळी वायूमंडलात रज-तमात्मक लहरींचा संचार वाढल्याने व आंघोळीच्या वेळी देह बाह्य-वायूमंडलातील लहरी ग्रहण करण्यात संवेदनशील बनल्याने तो उलट रज-तमात्मक लहरीच ग्रहण करतो व अशा तर्हेने देहाची बाह्यशुद्धी साधली गेली, तरी अंत:शुद्धी होत नाही.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)
५ आ. रात्री स्नान करण्यापेक्षा सकाळी स्नान करावे.५ आ १. शास्त्र - सकाळी स्नान केल्यावर स्थूल व सूक्ष्म या देहांची सात्त्विकता जास्त प्रमाणात वाढून ती दीर्घकाळ टिकणे व रात्री ती अल्पकाळ टिकणे : `सकाळची वेळ सात्त्विक असल्यामुळे सकाळी स्नान केल्यावर स्थूल व सूक्ष्म या देहांची सात्त्विकता जास्त प्रमाणात वाढते आणि ती दीर्घकाळ टिकून रहाते. रात्रीची वेळ तमोगुणी असल्यामुळे त्या वेळी स्नान केल्यामुळे स्थूल व सूक्ष्म या देहांची सात्त्विकता कमी प्रमाणात वाढते व अल्पकाळ टिकते. त्यामुळे त्या व्यक्तीला स्नानाचा लाभ फार कमी प्रमाणात होतो.' - ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २८.११.२००७, रात्री ११.१३)
६. स्नानापूर्वी करावयाची प्रार्थना व स्नान करतांना म्हणावयाचे श्लोक
६ अ. जलदेवतेला करावयाची प्रार्थना : `हे जलदेवते, तुझ्या पवित्र जलाने माझ्या स्थूलदेहाभोवती आलेले रज-तम यांचे काळे आवरण नष्ट होऊ दे. बाह्यशुद्धीप्रमाणे माझे अंतर्मनही स्वच्छ व निर्मळ होऊ दे.'
६ आ. नामजप करत किंवा श्लोक म्हणत स्नान करण्याचे महत्त्व
६ आ १. शास्त्र : `नामजप करत किंवा श्लोक म्हणत स्नान केल्याने पाण्यातील अंगीभूत चैतन्य जागृत होऊन त्याचा देहाला स्पर्श होऊन चैतन्याचे संक्रमण पेशीपेशींपर्यंत होते व त्यामुळे देहाला देवत्व प्राप्त होऊन दिवसभरातील कृती चैतन्याच्या स्तरावर करण्यास देह सक्षम बनतो.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ३०.१०.२००७, दुपारी १.२३)
६ इ. स्नान करतांना म्हणावयाचे श्लोक
१. गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिंधु कावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ।।
अर्थ : हे गंगे, यमुने, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू व कावेरी, तुम्ही सर्व नद्या माझ्या स्नानाच्या पाण्यात या.
२. गंगा सिंधू सरस्वति च यमुना गोदावरि नर्मदा ।
कावेरि शरयू महेन्द्रतनया चर्मण्वती वेदिका ।।
र्क्षिैं वेत्रवती महासुरनदी ख्याता जया गण्डकी ।
पूर्णा:पूर्णजलै:समुद्रसहिता:कुर्वन्तु मे मंगलम् ।।
अर्थ : गंगा, सिंधू, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू, महेन्द्रतनया, चंबळा, वेदिका, क्षिप्रा, वेत्रवती (माळव्यातील बेतवा नदी), प्रख्यात महासुरनदी, जया आणि गण्डकी या नद्या पवित्र व परिपूर्ण होऊन समुद्रासहित माझे कल्याण करोत.
३. नमामि गंगे तव पाद पंकजं सूरासूरै: वंदित दिव्य रूपम् ।
भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणाम् ।
अर्थ : सर्व ऐहिक सुख, भोग व मोक्ष देणार्या हे गंगामाते, प्रत्येकाच्या भावानुसार तुझे जे चरणकमल सर्व देव आणि दैत्य यांना वंदनीय आहेत, अशा तुझ्या चरणांना मी वंदन करतो.
स्नान करण्याची पद्धत
७ अ. स्त्रियांनी आधी वेणी घालून मगच स्नान करणे योग्य
७ अ १. शास्त्र - वेणी घालण्याच्या प्रक्रियेतून देहात झालेल्या रज-तमात्मक लहरींचे संक्रमण आंघोळीच्या माध्यमातून झालेल्या देहाच्या शुद्धीमुळे नष्ट होणे : `कित्येक स्त्रीया केस विस्कटतात, म्हणून आंघोळ झाल्यानंतर वेणी घालतात; परंतु आधी वेणी घालून मगच आंघोळ करण्याची पद्धत आहे. वेणी घालण्याच्या प्रक्रियेतून देहात जे काही रज-तमात्मक लहरींचे संक्रमण झालेले असते, ते आंघोळीच्या माध्यमातून झालेल्या देहाच्या शुद्धीमुळे नष्ट होते. उलट आंघोळीनंतर वेणी घातल्याने देह परत अशुद्ध होतो. यावरून असे लक्षात येते की, कलीयुगातील मनुष्य फक्त बाह्य स्वच्छेतेकडे, म्हणजेच देहाच्या बाह्य सौंदर्याकडे पहाणारा बनलेला असून तो जीवनाचे अध्यात्मीकरण करण्याच्या सिद्धांतापासून, म्हणजेच खर्या आचारापासून दूर गेलेला आहे.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६)
७ अ २. अनुभूती - आंघोळीनंतर वेणी घातल्यामुळे चेहर्यावर काळे आवरण येण्याचे प्रमाण वाढणे व आंघोळीपूर्वी वेणी घातली असता चेहर्यावर आवरण येण्याचे व डोक्यावर दाब जाणवण्याचे प्रमाण कमी होऊन उत्साह जास्त वेळ टिकून रहाणे : `लहानपणापासूनच मला आंघोळ करण्यापूर्वी वेणी घालण्याची सवय होती. १९९१ साली मी महाविद्यालयात जाऊ लागल्यानंतर ती सवय सुटली. तेव्हा मी आंघोळीनंतर वेणी घातल्यामुळे माझ्या चेहर्यावर काळे आवरण येण्याचे प्रमाण वाढले. या तुलनेत आंघोळीपूर्वी वेणी घातली असता `चेहर्यावर आवरण येण्याचे व डोक्यावर दाब जाणवण्याचे प्रमाण कमी होऊन माझा उत्साह जास्त वेळ टिकून रहातो', असे मला जाणवले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून मी पुन्हा आंघोळीपूर्वी वेणी घालण्यास सुरुवात केली आहे.' - कु. स्वप्ना जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
७ आ. नग्न होऊन स्नान करू नये.
७ आ १. शास्त्र - वाईट शक्तींचा त्रास होऊ नये म्हणून नग्न होऊन स्नान करू नये : `नग्नता ही पूर्णपणे देहातील छिद्रांतून सूक्ष्म रज-तमात्मक वायू ऊत्सर्जनाला पूरक ठरणारी स्थिती असते. ही स्थिती वातावरणात स्वत:चे असे एक रज-तमात्मक वायूभारित मंडल बनवते. योनीमार्गातून किंवा गुदद्वारातून होणारे टाकाऊ वायूंचे सूक्ष्म-ऊत्सर्जन बाह्य वायूमंडलातील रज-तमात्मक लहरींच्या स्पर्शामुळे वेगाने सुरू झाल्याने या मार्गांकडे पाताळातून प्रक्षेपित होणारी त्रासदायक स्पंदने आकृष्ट होऊन संपूर्ण देह रज-तमाने भारित होतो. या स्थितीत स्नान केल्याने स्नानाचा विशेष फायदा होत नाही. याउलट अंतर्वस्त्राने कटिबंध क्षेत्रात निर्माण होणार्या दबावदर्शक प्रक्रियेमुळे मणिपूरचक्र जागृत स्थितीत राहून टाकाऊ वायूंचे आतल्याआतच पोकळीत विघटन करते. मणिपूरचक्र जागृत स्थितीत आल्याने स्नानातून मिळणार्या सात्त्विक लहरी ग्रहण करण्यास देह संवेदनशील बनतो. याचा फायदा जिवाला मिळून त्याच्यासाठी स्नान हा आचार मंगलकारी होतो.' - एक विद्वान
(सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २५.१२.२००७, रात्री ८)
७ इ. स्नान करतांना मांडी घालून बसावे.
७ इ अ. शास्त्र : `उभ्याने स्नान केल्याने आपल्या अंगावरील मालीन्यासह जमिनीवर आदळणारा पाण्याचा प्रवाह जमिनीतील काळया शक्तीस्थानांना जागृत करतो. त्यामुळे जमिनीतून काळया शक्तीचे कारंजे उसळून परत आपल्या देहाला रज-तमयुक्त बनवते. यासाठी स्नान करतांना मांडी घालून बसावे.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.१०.२००७, सकाळी ९.४६) (क्रमश:)
चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मशिक्षण (स्नानाचे प्रकार)
१. स्नानाचे महत्त्व : `स्नान केल्याने जिवाच्या देहाभोवती आलेले काळे आवरण व जिवाच्या देहातील रज-तम यांचे उच्चाटन होऊन जिवाच्या देहातील पेशी-पेशी चैतन्य ग्रहण करण्यास पोषक होतात. तसेच तोंड धुणे व शौचक्रिया यांमुळे जिवाच्या देहातून बाहेर न पडलेल्या त्रासदायक घटकांचे स्नानाच्या माध्यमातून विघटन होते.' - एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १९.६.२००७, दुपारी ३.५१)
२. स्नान केल्याने होणारे फायदे
२ अ. `स्नानामुळे जिवाच्या देहातील रज-तम कणांचे प्रमाण कमी होऊन जीव वायूमंडलात प्रक्षेपित होत असलेल्या सत्त्वलहरी सहजतेने ग्रहण करू शकतो.
२ आ. स्नान केल्यामुळे जिवाच्या बाह्यमंडलात स्थिरता येण्यास मदत होते. त्यामुळे स्नानानंतर देवपूजा करतांना जीव वृत्ती अंतर्मुख करून वायूमंडलाशी पटकन एकरूप होऊ शकतो व वायूमंडलाच्या पोषकतेच्या अनुषंगाने देवतेच्या लहरी ग्रहण करू शकतो.'
२ इ. प्रात:स्नानाचे फायदे
२ इ १. प्रात:स्नानाने (सकाळी केलेल्या स्नानाने) तेजोबल व आयुष्य वाढते आणि दु:स्वप्नांचा नाश होतो.
२ इ २. `सूर्योदयापूर्वी मंगलस्नान केल्याने जीव अंतर्-बाह्य शुद्ध होऊन त्या काळातील सात्त्विक लहरी ग्रहण करू शकतो.'
- श्री गणपति (कु. मेघा नकाते यांच्या माध्यमातून, ११.१०.२००५, दुपारी १२.२५)
३. स्नानाचे प्रकार : हे समजून घेण्यापूर्वी काळाच्या संदर्भातील पुढील माहिती समजून घेणे आवश्यक आहे. सूर्योदयापूर्वी २ घटिका (४८ मिनिटे) `उष:काल' असतो. उष:काल म्हणजे अंधार संपून उजेड दिसायला लागण्याचा काळ. यालाच `तांबडे फुटायला लागले', असे म्हणतात. उष:कालाच्या पूर्वीच्या ३ घटिका (७२ मिनिटे, म्हणजे १ तास १२ मिनिटे) `ब्राह्ममुहूर्तकाल' असतो. सूर्योदयाच्या वेळेनुसार उष:काल व ब्राह्ममुहूर्तकाल यांच्या वेळाही बदलतात.
३ अ . ब्राह्ममुहूर्तावर स्नान करणे : `ब्राह्ममुहूर्तावर स्नान करणे, म्हणजे जिवाद्वारे देवपरंपरेचे पालन करणे. ब्राह्ममुहूर्तावर केलेले स्नान हे `देवपरंपरा' या श्रेणीत येते. देवपरंपरेमुळे जिवाला पुढील लाभ होतात.
३ अ १. जिवावर शुद्धता, पवित्रता व निर्मळता हे संस्कार होणे : `ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी जिवाचा मनोदेह स्थिर-अवस्थेत असतो. त्यामुळे त्या कालावधीत स्नान केल्याने जिवावर शुद्धता, पवित्रता व निर्मळता हे संस्कार कालाच्या आधारे होतात.
३ अ २. ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी प्रक्षेपित होत असलेले ईश्वरी चैतन्य व देवतांच्या लहरी ग्रहण करण्यास जीव समर्थ बनणे : ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी देवतांच्या लहरी अन्य कालापेक्षा जास्त पटीने कार्यरत असतात. `स्नान करणे' यासारख्या प्रत्यक्ष आवाहनदर्शक कृतीच्या माध्यमातून देवतांचे तत्त्व जिवाकडे आकृष्ट होते. तसेच या कालावधीत जिवावर स्नानाच्या माध्यमातून झालेल्या स्थूल व सूक्ष्म स्वरूपांच्या संस्कारांमुळे जीव ब्राह्ममुहूर्तावर प्रक्षेपित होत असलेले ईश्वरी चैतन्य व देवतांच्या लहरी ग्रहण करण्यास समर्थ होतो.
३ अ ३. ईश्वराच्या पूर्णात्मक चैतन्याशी एकरूप होता येणे : शुद्धता, पवित्रता आणि निर्मळता या तीन संस्कारांच्या माध्यमातून जिवाला ईश्वराच्या संकल्प, इच्छा आणि क्रिया या तीन प्रकारच्या शक्ती व या तीन शक्तींच्या अनुषंगाने ज्ञानशक्तीही ग्रहण करता येऊन ईश्वराच्या पूर्णात्मक चैतन्याशी एकरूप होता येते.'
- एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ७.१०.२००६, दुपारी ५.५९)
चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मशिक्षण ( लादी पुसणे )
लादी कधी पुसावी ?
केर काढून झाल्यावर लगेच लादी पुसावी.
लादी कशी पुसावी ?
अ. लादी पुसण्यासाठी वापरायच्या पाण्यात चिमूटभर विभूती घालावी.
अ १. शास्त्र : विभूतीतील सात्त्विक शक्तीमुळे विभूतीयुक्त पाण्याने लादी पुसल्यावर वाईट शक्तींमुळे लादीवर आलेले काळे थर नष्ट होण्यास मदत होते.
आ. जलदेवतेला प्रार्थना : लादी पुसण्यापूर्वी `वाईट शक्तींमुळे जमिनीवर आलेले काळे आवरण पाण्यातील चैतन्याने नष्ट होऊ देत', अशी जलदेवतेला प्रार्थना करावी.
इ. खाली वाकून उजव्या हाताने ओल्या कापडाने लादी पुसावी.
इ १. वाकून उजव्या हाताने लादी पुसण्याने होणारी प्रक्रिया : `वाकून उजव्या हाताने लादी पुसण्यातून निर्माण होणार्या मुद्रेतून मणिपूरचक्राशी असलेले पंचप्राण कार्यरत स्थितीत आल्याने कमी कालावधीत देहातील तेजरूपी चेतना कार्य करण्यास सिद्ध होते. या सिद्धतेतूनच सूर्यनाडी जागृत होऊन उजव्या हातातून तेजाचा प्रवाह लादी पुसण्याच्या कापडात संक्रमित होऊन तो पाण्यातील आपतत्त्वाच्या स्तरावर भूमीशी संलग्न असे तेजाचे कवच निर्माण करतो. म्हणूनच `लादी पुसणे' ही प्रक्रिया एकप्रकारे जमिनीवर तेजाचे कवच निर्माण करणारी असल्याने पाताळातून प्रक्षेपित होणार्या त्रासदायक स्पंदनांना अवरोध केला जाऊन वास्तूचे रक्षण होण्यास मदत होते.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २५.१२.२००७, सायं. ७.३२)
ई. केर काढतांना जसे तो आतून बाहेरच्या दिशेने, म्हणजे दरवाज्याच्या दिशेने पुढे पुढे ढकलत नेतात, त्याचप्रमाणे लादीही दरवाज्याच्या दिशेने पुसत यावी.
उ. लादी पुसण्यासाठी वापरत असलेले ओले कापड मधे मधे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.
लादी पुसून झाल्यावर उदबत्ती लावून घरात निर्माण झालेली सात्त्विकता टिकून रहाण्यासाठी वास्तूदेवतेला प्रार्थना करावी.
यंत्राच्या साहाय्याने लादी पुसण्याने होणारे तोटे
अ. वास्तू दूषित होणे : `यंत्राच्या साहाय्याने लादी पुसतांना जमिनीशी संलग्न होणार्या घर्षणात्मक नादाकडे पाताळातील त्रासदायक लहरी वेगाने आकृष्ट होतात व या लहरी पाण्यातील आपतत्त्वाच्या साहाय्याने जमिनीवर पसरवल्या जातात. यामुळे यांत्रिक पद्धतीने लादी पुसण्यातून त्रासदायक लहरींचे आवरण जमिनीवर निर्माण होऊन जमीन या लहरी स्वत:त घनीभूत करून ठेवण्यास सिद्ध बनते. यामुळे वास्तू दूषित होते.
आ. हाडे व स्नायू यांचे विकार होणे : यांत्रिक पद्धतीने जमीन पुसण्यातून निर्माण होणार्या त्रासदायक लहरींमुळे पायांच्या स्नायूंचे विकार, हाडांचे विकार, हाडे झिजणे, सांधेदुखी असे त्रास होऊ शकतात.
इ. वाईट शक्तींचा जास्त त्रास होऊ शकणे : यांत्रिक पद्धतीने जमीन पुसतांना ती शक्यतो वाकून न पुसता उभ्या स्थितीतच पुसली गेल्याने विशिष्ट मुद्रेच्या अभावामुळे सूर्यनाडी जागृत न झाल्याने यांत्रिक पद्धतीने लादी पुसण्यातून निर्माण झालेल्या त्रासदायक लहरींपासून देहमंडलाचेही रक्षण होऊ शकत नाही. त्यामुळे जिवाला वाईट शक्तींचा जास्त त्रास होऊ शकतो; म्हणून वाकून यंत्रविरहित, म्हणजेच उजव्या हाताने फरशी पुसणे जास्त लाभदायक आहे.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २५.१२.२००७, सायं. ७.३२)
अमृतवाणी संस्कृतभाषा !
देववाणी संस्कृत
रत्नागिरीसंस्कृतची आजची स्थिती पाहण्याअगोदर संस्कृत भाषेचा उद्भव कसा झाला, ते पाहूया. आपल्या वैदिक परंपरेने विश्वनिर्मितीपासूनचा साद्यंत इतिहास जतन करून ठेवला आहे. प्रथम सर्वत्र शून्य होते. मग `ॐ' असा ध्वनी अवकाशात निनादला. शेषषायी श्रीविष्णु प्रगट झाले. त्यांच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रगटले. त्यानंतर प्रजापती, मातृका, धन्वंतरी, गंधर्व, विश्वकर्मा आदी निर्माण झाले. याच वेळी विश्वाचे ज्ञानभांडार ज्यात सामावले आहे, असे वेद ईश्वराने उपलब्ध करून दिले. वेद संस्कृत भाषेत आहेत. संस्कृत ही `देववाणी' आहे. वेद जसे अपौरुषेय म्हणजे ईश्वरप्रणीत आहेत, तशीच संस्कृत भाषाही ईश्वरनिर्मित आहे. तिची रचना व लिपी ईश्वराने निर्माण केली आहे; म्हणून त्या लिपिलाही `देवनागरी' म्हणतात. संस्कृत भाषेची सर्व नावेही ती देवभाषा असल्याचे स्पष्ट करतात, उदा. `गीर्वाणभारती' हे नाव पहा. त्यातील `गीर्वाण' या शब्दाचा अर्थ `देव' असा आहे. रानटी अवस्थेतील मानवाने पशू-पक्ष्यांच्या आवाजांचे अनुकरण करून भाषा तयार केली असावी, हे पाश्चात्त्यांचे अनुमान योग्य नाही. माता-पिता आणि कुटुंबीय बालकाशी सतत बोलून त्याला भाषा शिकवतात, म्हणून मूल बोलायला शिकते. क्रूरकर्मा अकबराने एक प्रयोग करून बघितला. त्याने काही अर्भकांना एका जंगलात ठेवले. त्या अर्भकांना सांभाळणार्या सेवकांना त्याने तंबी देऊन ठेवली की, त्या मुलांच्या कानावर एकही शब्द पडता नये. १० वर्षांनी या मुलांना अकबरासमोर आणण्यात आले. त्या वेळी त्या मुलांना एकही शब्द उच्चारता आला नाही. ती सर्व मुले मुकीच राहिली होती. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुग या तीन युगांमध्ये संस्कृत हीच विश्वाची भाषा होती. त्यामुळे तिला `विश्ववाणी'ही म्हणतात. अगदी कौरव-पांडवांच्या काळापर्यंत संस्कृत हीच विश्वातील एकमेव भाषा होती. कौरव-पांडवांच्या त्या महाभारतीय युद्धानंतर वैदिक म्हणजेच हिंदूंचे विश्वसाम्राज्य हळूहळू आक्रसत आल्यावर संस्कृत भाषेचीही मोडतोड होऊन तिच्या वेड्यावाकड्या प्रादेशिक उच्चारातून अन्य भाषा निर्माण झाल्या. त्यामुळेच इंग्रजीसारख्या भाषांमध्ये संस्कृतशी साम्य दाखवणारे शब्द विपुल प्रमाणात आढळतात, उदा. गायीला संस्कृतमध्ये `गौ', तर इंग्रजीत `cow' म्हणतात, दाताला `दंत' तर इंग्रजीत `dentt' म्हणतात.
कुर्हाडीचा दांडा गोतास काळ !
प्रश्न असा पडतो की, समृद्ध असणार्या `गीर्वाणवाणी' संस्कृतला एकदम उतरती कळा का लागली ? अमूल्य असा हा वैश्विक ठेवा आपण गमावून का बसलो ? मुसलमान आक्रमकांनी जाळपोळ करून आमच्या संस्कृत ग्रंथांची राखरांगोळी केली, तर इंग्रजांनी आमच्या वैदिक शिक्षणव्यवस्थेची पाळेमुळेच उखडून टाकली. कारकून तयार करणार्या त्यांच्या शिक्षणप्रणालीमुळे इंग्रजी मन आणि मेंदू असलेला हिंदु नागरिक निर्माण झाला. परिणामी संस्कृतचे जतन जेवढ्या प्रमाणात व्हायला हवे होते, तेवढे झाले नाही. संस्कृतची अशी स्थिती झाल्यामुळे गेल्या शतकात ही भाषा नामशेष होते कि काय, असे वाटू लागले होते. शाळांमध्ये संस्कृत शिकणारे विद्यार्थी नाहीत म्हणून शिक्षक नाहीत आणि शिक्षक नाहीत म्हणून विद्यार्थी नाहीत, असे चित्र दिसत होते. त्यातच स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानांच्या पंतप्रधानपद भोगलेल्या नातवाने (राजीव गांधी यांनी) संस्कृतला प्रोत्साहन देण्याऐवजी तिला `मृत भाषा' असे संबोधून कुर्हाडीच्या दांड्याची भूमिका निभावली. हिंदुद्वेषामुळे संस्कृतला `मृत' म्हणणार्यांनी हे लक्षात घ्यावे की, आजही अनेक नियतकालिके, पुस्तके संस्कृतमध्ये प्रकाशित होतात. आकाशवाणी व दूरदर्शन यांवरून प्रतीदिन संस्कृतमधून वार्तापत्रे सादर केली जातात. मंगल कार्यांत संस्कृत मंत्रपठण केले जाते. घराघरांतून संस्कृतमधून स्तोत्रे म्हटली जातात. हे सर्व पाहून संस्कृत भाषेला `मृत' म्हणण्याचे धाडस करणार्यांची कीवच येते !
`संस्कृति: संस्कृताश्रिता: ।'
वास्तविक पहाता जगातील सर्व भाषा संस्कृतोद्भव आहेत. त्यामुळे एखादी भाषा शिकतांना संस्कृतचा आधार घेतल्यास ती शिकणे अधिक सोपे जाते. व्याकरणकर्ता पाणिनीने संस्कृत भाषेचे व्याकरण सूत्रबद्ध व नियमबद्ध रीतीने मांडले आहे. एवढे सर्व असतांना फारसे काटेकोर नियम नसणारी, लेखनाप्रमाणे उच्चार नसणारी आणि शब्द भांडारातही दरिद्री असणारी इंग्रजी भाषा पहिलीपासून शिकवण्याचा अट्टाहास का केला जातो ? आता मात्र संस्कृतला चांगले दिवस येत आहेत. विद्यार्थी आपणहून संस्कृतकडे वळत आहेत. संगणकीय प्रणालीतही संस्कृतचा वापर सर्व भाषांपेक्षा चांगला होऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे. जगाच्या प्रारंभापासून असलेली संस्कृत भाषा जगाच्या अंतापर्यंत राहील, हे सांगायला कोणा होराभूषणाची गरज नाही. `संस्कृति: संस्कृताश्रिता: ।' असे म्हणतात. संस्कृती ही संस्कृतच्या आश्रयाला असते. म्हणजे जेथे संस्कृतचे अध्ययन होते, तेथे संस्कृती वास करते. संस्कृतचा अभ्यास करणारी व्यक्ती ही संस्कृतीशील, सौजन्यशील असते. ही देववाणी असल्याने तिचे उच्चार जरी कानावर पडले, तरी आनंद वाटतो.
सरल मधुर ही संस्कृत भाषा
`सुरस सुबोधा विश्वमनोज्ञा ललिताहृद्या रमणीया । अमृतवाणी संस्कृतभाषा नैव क्लिष्टा, नच कठीना ।।' या काव्यपंक्तीत वर्णन केल्याप्रमाणे संस्कृत भाषा ही खरोखरच `अमृतवाणी' आहे. संस्कृतप्रेमी, संस्कृतचे शिक्षक, विद्यार्थी आणि हिंदु धर्माभिमानी यांनीच आता संस्कृत भाषेच्या रक्षणासाठी व संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत; कारण संस्कृत आणि संस्कृती यांचा फार जवळचा संबंध आहे !
साभार : अमृतवाणी संस्कृतभाषा !
॥
रक्षा (राखी) बंधन
१. इतिहास
अ. `पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपला भाऊ केले व नारायणाची मुक्तता केली. तो दिवस श्रावण पौर्णिमा होता.' लक्ष्मीने बळीराजाला घातलेल्या बंधनाविषयी संस्कृतमध्ये एक श्लोक आहे.
येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल: ।
तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल ।।
अर्थ : महाबली व दानवेन्द्र असा जो बली राजा जिने बद्ध झाला, त्या रक्षेने मी तुलाही बांधतो. हे राखी, तू चलित होऊ नकोस.
आ. भविष्यपुराणात सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधन हे मूळचे राजांसाठी होते. राखीची एक नवी पद्धत इतिहासकाळापासून सुरू झाली.
२. भावनिक महत्त्व : राखी बहिणीने भावाच्या हाताला बांधायची असते आणि त्यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा व भावाने बहिणीचे रक्षण करावे, ही भूमिका असते. बहिणीने भावाला राखी बांधण्याहून जास्त महत्त्वाचे आहे, एखाद्या तरुणाने / पुरुषाने एखाद्या तरुणीकडून / स्त्रीकडून राखी बांधून घेणे. त्यामुळे त्यांचा, विशेषत: तरुणांचा व पुरुषांचा तरुणीकडे किंवा स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलतो.
३. रक्षाबंधनाचे आध्यात्मिक महत्त्व : रक्षाबंधनामुळे बहीण व भाऊ यांना होणारा आध्यात्मिक लाभ म्हणजे त्यांच्यातील देवाणघेवाण हिशोब कमी होणे. या जन्मात व्यक्ती एखाद्याची नातेसंबंधी असण्यामागील महत्त्वाचे आध्यात्मिक कारण असते त्यांच्या आधीच्या जन्मांतील कर्मांमुळे एकमेकांना सुख व दु:ख देण्याच्या दृष्टीने त्यांच्यात निर्माण झालेला हिशोब.ज्याला अध्यात्मशास्त्रात `देवाणघेवाण हिशोब', असे म्हटले जाते. या हिशोबापायी त्या त्या नातेसंबंधातून आपल्याला सुख वा दु:ख अनुभवायला मिळत असते. बहीण व भाऊ यांचा एकमेकांत साधारण ३० टक्के इतका देवाण-घेवाण हिशोब असतो. तो राखी पौर्णिमेसारख्या सणांच्या माध्यमातून कमी होतो. हा आध्यात्मिक लाभ अधिकाधिक होण्यासाठी बहिणीने भावाकडून अपेक्षा बाळगू नये व भावाने बहिणीला सात्त्विक ओवाळणी द्यावी. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाकडून वस्तूच्या रूपात कोणतीही अपेक्षा मनात बाळगू नये. तशी अपेक्षा बाळगल्यास ती त्या दिवशी मिळणार्या या आध्यात्मिक लाभापासून वंचित रहाते.
४. राखी बांधणे : तांदूळ, सोने व पांढर्या मोहर्या पुरचुंडीत एकत्र बांधल्याने रक्षा अर्थात राखी तयार होते.
५. प्रार्थना करणे : बहिणीने भावाच्या कल्याणासाठी व भावाने बहिणीच्या रक्षणासाठी प्रार्थना करण्याबरोबरच दोघांनीही `राष्ट्र व धर्म यांच्या रक्षणासाठी आमच्याकडून प्रयत्न होऊ देत', अशी ईश्वराला प्रार्थना करावी.
६. राखीच्या माध्यमातून होणारे देवतांचे विडंबन रोखूया ! : हल्ली राखीवर `ॐ' किंवा देवतांची चित्रे असतात. राखीच्या वापरानंतर ती इतस्तत: पडल्यामुळे एकप्रकारे देवता व धर्मप्रतीक यांचे विडंबन होते आणि यामुळे पाप लागते. हे टाळण्यासाठी राखीचे पाण्यात विसर्जन करा !
साभार : Raksha Bandhan
चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मशिक्षण ( केर काढणे )
१. केर कधी काढावा ?
१ अ. `घर घाणेरडे झाले असेल, तर भावपूर्णरीत्या नामजप करत क्षात्रभाव ठेवून कुठल्याही वेळी केर काढावा. असे केले तरच केर काढण्याच्या कृतीतून निर्माण होणार्या त्रासदायक स्पंदनांचा देहावर प्रभाव पडणार नाही.
१ आ. स्वत:ला कर्मबंधनाचा आचाररूपी नियम लागू करून सकाळीच, म्हणजेच रज-तमात्मक क्रियेला अवरोध करणार्या वेळेतच हे कर्म उरकून घ्यावे
१ इ. सायंकाळी केर न काढणे : सकाळी एकदाच केर काढावा. सायंकाळी केर काढू नये; कारण या वेळी वायूमंडलात रज-तमात्मक स्पंदनांचा संचार मोठ्या प्रमाणात चालू असल्याने केर काढण्याच्या रज-तमात्मक क्रियेशी संबंध असलेल्या या प्रक्रियेतून वाईट शक्तींचा घरात शिरकाव होण्याची शक्यता अधिक असते. सकाळचे वायूमंडल सत्त्वप्रधान असल्याने हे वायूमंडल केर काढण्याच्या रज-तमात्मक क्रियेतून निर्माण होणार्या त्रासदायक स्पंदनांवर यथायोग्य अंकूश ठेवते; म्हणून या क्रियेचा कुणालाच त्रास होत नाही.
२. केरसुणीने केर कसा काढावा ?
२ अ. केर काढतांना कमरेत उजव्या बाजूला झुकून उजव्या हातात केरसुणी धरून केर मागून पुढच्या दिशेने ढकलत न्यावा.
२ अ १. कमरेत वाकण्याने होणारी प्रक्रिया : `केर काढतांना कमरेत वाकल्याने नाभीचक्रावर दाब येऊन पंचप्राण जागृत अवस्थेत रहातात. केर गुडघ्यात वाकून कधीच काढू नये; कारण या मुद्रेमुळे गुडघ्याच्या पोकळीत साठलेल्या किंवा घनीभूत झालेल्या रज-तमात्मक वायूधारणेला गती मिळण्याची शक्यता असे. त्यामुळे या मुद्रेत केर काढल्यास केर काढतांना पाताळातून वायूमंडलात उत्सर्जित होणारी त्रासदायक स्पंदने देहाकडे आकृष्ट होण्याची भीती असते; म्हणून रज-तमात्मकतेचे देहात संवर्धन करणारी अशी कृती शक्यतो टाळावी.
२ अ २. उजव्या बाजूला झुकल्याने होणारी प्रक्रिया : उजव्या बाजूला झुकून केर काढल्याने देहातील सूर्यनाडी जागृत रहाते व तेजाच्या स्तरावर देहाचे जमिनीतून उत्सर्जित होणार्या त्रासदायक स्पंदनांपासून रक्षण होते.'
- एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २६.१०.२००७, दुपारी ५.२०)
२ आ. पूर्व दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेकडे केर काढत जावे.
२ आ १. केर काढत पूर्व दिशेला गेल्यास केरातील रज-तम कण व लहरी यांमुळे पूर्वेकडून येणार्या देवतांच्या लहरींच्या मार्गात अडथळा निर्माण होणे : `पूर्व दिशेकडून देवतांच्या सगुण लहरींचे पृथ्वीवर आगमन होत असते. कचरा हा रज-तमात्मक असल्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे केर काढतांना कचरा व धूळ यांचे पूर्व दिशेने वहन होऊन त्यांद्वारे रज-तम कण व लहरी यांचे प्रक्षेपण होऊन पूर्व दिशेकडून येणार्या देवतांच्या सगुण तत्त्वाच्या लहरींच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे केर काढत पूर्वेकडे जाणे अयोग्य आहे. पूर्व दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेकडे केर काढत जाऊ शकतो.' - ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २८.११.२००७, रात्री १०.५५) (क्रमश:)
संदर्भ : अध्यात्मविषयक ग्रंथ `दिनचर्येशी संबंधित आचार व त्यांमागील शास्त्र'
मूर्तीकार व गणेशभक्त यांना आवाहन
शास्त्रानुसार मूर्ती कशी असावी, हे समजण्यासाठी सनातनतर्फे सात्त्विक मूर्तीचे चित्र प्रकाशित करण्यात आले आहे। पुढील आकृतीत दाखवलेली ३४.५ सें.मी. उंचीची श्री गणेशमूर्ती एक प्रमाण म्हणून दिली आहे. आपल्याला ज्या आकाराची मूर्ती बनवून घ्यावयाची असेल, त्या आकारानुसार त्या प्रमाणात मूर्तीची मापे बदलतील.
गणपतीविषयक - आध्यात्मिक माहिती
गणेश जयंतीविषयी ईश्वराकडून मिळालेले ज्ञान
गणेश मंत्रांचे महत्त्व
कार्याच्या अनुषंगाने गणपतीची विविध रूपे
गणपतीचे वाहन
शुभकार्यात प्रथम गणेशपूजन का करतात ?
श्रीगणेशाशी संबंधित साधकांना आलेल्या अनुभूती
गणेश जयंतीच्या निमित्ताने गणेशतत्त्व आकर्षित करणार्या काही रांगोळया
कलाकारांनो, गणपतीचे विडंबन म्हणजे कलात्मकता नव्हे!
विभक्त कुटुंबामध्ये गणपतीपूजन कसे करावे? - ध्वनीचित्रपट
श्री गणपती मध्यपूजाविधी - ध्वनीचित्रपट
श्री गणपती उत्तरपूजाविधी - ध्वनीचित्रपट
गणपतीपूजन व तिथी - ध्वनीचित्रपट
गणेशपूजनासाठी स्वतंत्र मूर्ती का आणावी? - ध्वनीचित्रपट
विविध रूपातील गणेशमूर्ती पूजावी का? - ध्वनीचित्रपट
गणेशमूर्तीच्या पाटाखाली तांदूळ का ठेवावेत? - ध्वनीचित्रपट
गणेशमूर्ती किती दिवस पूजावी? - ध्वनीचित्रपट
सार्वजनिक गणेशोत्सवातील गैरप्रकार - ध्वनीचित्रपट
चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मशिक्षण
विविध स्वरूपाचे आचारस्मृतींनुसार आचार
१. अत्रीस्मृतीतील आचार : अत्रीऋषींनी या स्मृतीत सांगितलेल्या आचारधर्मातील काही ठळक आचार पुढे दिले आहेत.
१ अ. सुवासिनी स्त्रियांनी त्यांच्या पतीच्या आज्ञेविना उपवास, तप, व्रते इत्यादी करू नयेत.
१ आ. सुवासिनी स्त्रियांनी त्यांच्या पतीलाच स्वत:चे सर्वस्व समजावे.
१ इ. वेदांइतके पवित्र ज्ञान नाही, मातेपेक्षा श्रेष्ठ गुरु नाही व दानासारखा मित्र नाही.
१ ई. दुष्काळात अन्नदान करणारा, सुकाळात सुवर्णदान करणारा आणि निर्जल प्रदेशात पाणपोईची व्यवस्था करणारा यांना स्वर्ग प्राप्त होतो.
१ उ. अन्नदान, सुवर्णदान व जलदान या दानांपेक्षाही विद्यादान श्रेष्ठ आहे.
२. यमस्मृतीतील आचार : कर्मफल व आचारधर्म यांसंबंधीचे नियम या स्मृतीत विशद केले आहेत, उदा. तलाव, विहिरी व देवालये यांचा जीर्णोद्धार करणार्याला ती नवीन बांधल्याचे पुण्यफळ मिळते.
३. पराशरस्मृतीतील आचार : या स्मृतीत कलीयुगात पाळावयाचा आचारधर्म दिला आहे. या स्मृतीत सांगितलेले काही आचार पुढीलप्रमाणे आहेत.
३ अ. मीठ, मध, तेल, दही व दूध कोणाकडूनही विकत घेतल्यास घेणार्याला दोष लागत नाही.
३ आ. ब्राह्मणाने चांगले आचरण करणार्या शुद्राच्या घरी तूप, दूध, तेल व गूळ यांचे पदार्थ सेवन करण्यास हरकत नाही.
३ इ. वैश्य व क्षत्रिय यांच्या घरी देव व पितृ कार्य करणार्या ब्राह्मणाने अन्नसेवन करण्यास हरकत नाही. ३ ई. योग्य कारणावाचून स्त्रीचा त्याग करणारा ७ जन्म स्त्री होऊन वैधव्याचे दु:ख भोगतो.
३ उ. पतीच्या आज्ञेशिवाय पत्नीने व्रत करू नये.
४. शंकस्मृतीतील आचार : या स्मृतीत प्रत्येकाचे वर्णोचित नाव कसे असावे व विशेषकरून स्त्रीने कसे वागावे, या संदर्भातील नीतीनियमांचे वर्णन केले आहे.
४ अ. ब्राह्मणाच्या नावाच्या शेवटी `शर्मा', क्षत्रियाच्या नावाच्या शेवटी `वर्मा', वैश्याच्या नावाच्या शेवटी `गुप्त' व शूद्राच्या नावाच्या शेवटी `दास' असे उपपद लावावे.
४ आ. कुलीन स्त्रीने वेश्या, चेटूक करणारी, कपटी व व्यभिचारी स्त्रीच्या आणि धूर्त पुरुष व संन्यासी यांच्या सहवासात राहू नये.
५. वसिष्ठस्मृतीतील आचार : सर्वसामान्य व्यक्तीलाही आचरणात आणता येतील, अशा सोप्या सदाचारांचे महत्त्व या स्मृतीत सांगितले आहे. त्याचबरोबर सज्जन व दुर्जन कोणाला म्हणावे, याच्या व्याख्याही या स्मृतीत दिल्या आहेत.' आचारांचे पालन कसे करावे ?
१. `मृत्यूने माझे केस पकडले आहेत', असे समजून धर्माचे आचरण करणे आवश्यक :
अजराऽमरवत्प्राज्ञो विद्यामर्थं च चिन्तयेत् ।
गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत् ।।
आहरेज्ज्ञानमर्थांश्च नरो ह्यमरवत्सदा ।
केशैरिव गृहीतस्तु मृत्युना धर्ममाचरेत् ।। - हितोपदेश, कथामुखं ३
अर्थ : बुद्धीमान मनुष्याने स्वत:ला अजरामर जाणून विद्या व धन मिळवावे आणि `मृत्यूने माझे केस पकडले आहेत (मृत्यूच्या हातात आपली शेंडी आहे)', असे समजून धर्माचे आचरण करावे.
२. नित्यनैमित्तिक कर्मे कर्तव्यबुद्धीने व अनासक्तीने आमरण आचरणे आवश्यक :
`आपली सहजकर्मे (नित्यनैमित्तिक कर्मे) कर्तव्यबुद्धीने व अनासक्तीने आमरण आचरलीच पाहिजेत. चित्तशुद्धी ही या जन्मी नव्हे, तर अनेक जन्मांच्या अंती प्राप्त झाली, तर कैवल्याची वाटचाल करता येणे शक्य होते.' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
३. सर्व कर्मे भगवंताला समर्पण केल्यामुळे होणारा आचरणशुद्धीचा लाभ सर्वश्रेष्ठ असणे :
मैत्री दिनाचा देखावा कशाला ? : 2008-08-07
चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मशिक्षण : 2008-08-04
चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मशिक्षण : 2008-08-03
चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मप्रबोधन : 2008-07-27
गणेश चतुर्थी : 2008-07-27
महाव्रत : एकादशी : 2008-07-27
धर्मसत्संग : 2008-07-24
चातुर्मासाचे आध्यात्मिक महत्त्व : 2008-07-15
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनवा ! : 2008-07-04
पादत्राणे घालून पूजन केले व नारळ वाढवला ! : 2008-06-१२