श्री गणेश चतुर्थी

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
श्री गणेश चतुर्थी

महत्त्व : दर महिन्याच्या चतुर्थीला श्रीगणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १०० पटीने कार्यरत असते, तर गणेशोत्सवाच्या दिवसांत ते १००० पटीने कार्यरत असते. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात केलेल्या श्रीगणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ होतो.

गणेश चतुर्थीचे कात कुटुंबात कोणी करावे ? : सर्व भाऊ एकत्र रहात असतील, म्हणजेच त्यांचा द्रव्यकोश (खजिना) व पाकनिष्पत्ती (चूल) एकत्र असेल, तर सर्वांनी मिळून एक मूर्ती पुजली तरी चालते; पण द्रव्यकोश व पाकनिष्पत्ती कोणत्याही कारणास्तव विभक्त असतील, तर त्यांनी आपापल्या घरी स्वतंत्र गणेशकात करावे

नवीन मूर्तीचे प्रयोजन : पृथ्वीवर जास्त प्रमाणात येणाऱ्या गणेश लहरी नेहमीच्या पूजेतील मूर्तीत आवाहन केल्यास तिच्यात जास्त शक्ती येईल. जास्त शक्ती असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजा वर्षभर करणे कठीण जाते; कारण त्यासाठी कर्मकांडातील सगळी बंधने पाळावी लागतात. म्हणून नवीन मूर्ती आवाहन करण्यासाठी वापरतात व नंतर विसर्जित करतात.

गणेशाला दूर्वा वहाण्याची पद्धत : कोवळया व ३, ५, ७ अशा विषम संख्येच्या पात्या असलेल्या दूर्वा एकत्र बांधून व पाण्यात भिजवून मग वहाव्यात. दूर्वा वहातांना चेहरा सोडून संपूर्ण मूर्ती दूर्वांनी मढवावी. यामुळे मूर्ती लवकर जागृत व्हायला मदत होते.

गणेशोत्सवाच्या काळात गणेशाचा नामजप करण्याचे महत्त्व : या काळात `ॐ गँ गणपतये नम: ।' हा नामजप जास्तीतजास्त करावा. यामुळे नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या गणेशतत्त्वाचा आपल्याला जास्त लाभ मिळतो.

(अधिक माहितीसाठी वाचा सनातन-निर्मित ग्रंथ `गणपति' )
संदर्भ : http://www.sanatan.org/marathi/san/san.shtml#ganesh

गणपतिची स्थापना कशी करावी ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: