विधिवत साष्टांग नमस्कार म्हणजे काय व तो करण्यामागील शास्त्र काय ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
साष्टांग नमस्काराची व्याख्या काय ?
विधिवत साष्टांग नमस्कार म्हणजे काय व तो करण्यामागील शास्त्र काय ?

षडरिपू, मन व बुद्धी या आठ अंगांसह ईश्‍वराला शरण जाणे, म्हणजे साष्टांग नमस्कार करणे होय। षडरिपू हे सूक्ष्ममनाशी संबंधित आहेत। वरील व्याख्येत मन व बुद्धी हे दोन घटक अनुक्रमे स्थूलमन व स्थूलबुद्धी याअर्थी वापरले आहेत. ईश्‍वरप्राप्‍तीची तळमळ ६० टक्क्यांच्या पुढे असलेला साधकच `अहं'सहित शरण येऊ शकतो; म्हणून वरील व्याख्या ही सर्वसाधारण तळमळ असलेल्या साधकाच्या संदर्भातील आहे.' (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून मिळालेले ईश्‍वरी ज्ञान, ८.७.२००५, दुपारी १.३४)(षडरिपू म्हणजे चित्तावर जन्मोजन्मीच्या असलेल्या संस्कारांचा आविष्कार. संस्कार हे चित्ताशी, म्हणजे अंतर्मनाशी संबंधित असतात व अंतर्मन हे बाह्यमनाच्या तुलनेत सूक्ष्म आहे. यासाठी षडरिपू हे सूक्ष्ममनाशी संबंधित असतात, असे येथे म्हटले आहे. सर्वसाधारणत: ज्यांना आपण विचार करणारे मन (बाह्यमन) व विचार करणारी बुद्धी असे संबोधतो, त्यांना येथे अनुक्रमे स्थूलमन व स्थूलबुद्धी असे संबोधले आहे. - संकलक)

विधिवत साष्टांग नमस्कार म्हणजे काय व तो करण्यामागील शास्त्र काय ?

उरसा शिरसादृष्ट्या मनसा वचसा तथा पद्भ्यां कराभ्यां जानुभ्यां प्रणामोऽष्टांगमुच्यते ।अर्थ : १। छाती, २. शिर (डोके), ३. दृष्टी (डोळयांनी नमस्कार करणे), ४. मन (मनाने नमस्कार करणे), ५. वाचा (तोंडाने `नमस्कार' असे म्हणणे), ६. पाय, ७. हात व ८. जानू (गुडघे), जमिनीला टेकवून नमस्कार करणे म्हणजे साष्टांग नमस्कार. `याप्रमाणे केल्या जाणार्‍या नमस्काराला `विधिवत नमस्कार' असे म्हणतात. यामध्ये कायिक, वाचिक व मानसिक पद्धतीने देवतांना शरण येऊन त्यांना आवाहन केले जाते.

संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: