देवळात प्रवेश करतांना पायरीला नमस्कार कसा करावा ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

कृती : पायरीला उजव्या हाताची बोटे लावून तोच हात डोक्यावर फिरवावा.

शास्त्र : `देवळाच्या प्रांगणात देवतांच्या लहरींच्या संचारामुळे सात्त्विकता वाढलेली असते. परिसरातील चैतन्यामुळे पायर्‍यांनाही देवत्व प्राप्‍त झालेले असल्याने, पायरीला उजव्या हाताची बोटे लावून तोच हात डोक्यावर िफिरवण्याची पद्धत आहे. पायर्‍यांवरील धूळही चैतन्यमय असते आणि तिचाही आपण मान राखायचा असतो व तिच्यातील चैतन्याचाही फायदा करून घ्यावयाचा असतो, हे यावरून लक्षात येते. नमस्कार करतांना `पायरीत आलेले देवतेचे चैतन्य हातातून संपूर्ण शरिरात संक्रमित होत आहे', असा भाव ठेवल्याने जिवाला अधिक फायदा होतो; परंतु या वेळी जिवाचा अहंही कमी असेल, तर नमस्काराचे मिळणारे फळ सर्वाधिक असते। कुठलीही कृती ही `स्व'चा त्याग करून केली असता, ते अकर्म कर्म होते।

(संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती')

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: