आश्विन शु. प्रतिपदा (१९ सप्टेंबर २००९) या दिवसापासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त घटस्थापना, वेदीवर सप्तधान्य पेरणे आणि कलशाचे पूजन करणे यांविषयी जाणून घेऊया. 
घटस्थापना घटस्थापना करतांना ज्या पदार्थांत देवतांकडून सात्त्विक लहरी आकर्षित करून घेण्याची क्षमता जास्त असते, ते पदार्थ घटात वापरतात. त्यामुळे ईश्वराकडून आकर्षित झालेली शक्ती त्यात साठवली जाऊन ती शस्त्रपूजेच्या वेळी मिळते. शास्त्रानुसार घटस्थापना केली, तर देवतेचे ३० टक्के तत्त्व (शक्ती) मिळते. - श्री गणेश (श्री. भरत मिरजे यांच्या माध्यमातून, १२.९.२००५, दुपारी ४) (संदर्भ : सनातनचा ग्रंथ `शक्ती')
घटस्थापना : वेदीवर सप्तधान्य पेरणे आणि कलशाचे पूजन करणे सूक्ष्मातील स्पंदनांचे प्रमाण (टक्के) ईश्वरी तत्त्व : २ आनंद : ०.७५ चैतन्य : ३ शक्ती : ४ कृती : `चाळलेल्या मातीची वेदी सिद्ध करण्यात येते. या भूमीला प्रार्थना करण्यात येते. वेदीच्या मध्यभागी जव घालण्यात येतात आणि त्यावर कलश ठेवण्यात येतो. त्यात जल, दूर्वा, गंध घालून मग पंचपल्लव घालतात. (वड, पिंपळ, आंबा, जांभूळ आणि औदुंबर यांची पाने ठेवतात.) थोडी माती, सुपार्या, पंचरत्ने (सोने, हिरा, पाचू, नीलमणी आणि मोती), चांदीचे नाणे कलशात घालतात. कलशाच्या कंठाला दोरा गुंडाळतात. त्यावर ताम्हनात तांदूळ ठेवून कलशात वरुणदेवाचे आवाहन करून पूजन करतात. वेदीवर माती पसरतात. त्यावर अंकुरणारी धान्ये पसरण्यात येतात. जव, तांदूळ, दोन प्रकारच्या चवळी, दोन प्रकारचे वाटाणे आणि मूग पेरतात. त्यावर पर्जन्यस्वरूप पाण्याचा वर्षाव करतात. धान्याला प्रार्थना करतात. त्यानंतर कलशाचे पूजन आणि प्रार्थना करतात.
१. चाळलेल्या मातीपासून सिद्ध करण्यात आलेल्या वेदीला, म्हणजेच भूमीला प्रार्थना केल्यावर शक्तीचा प्रवाह वेदीकडे आकृष्ट होतो. १ अ. शक्तीच्या वलयांची वेदीमध्ये निर्मिती होणे आणि त्यांचे वातावरणात प्रक्षेपण होते.
२. शक्तीची स्पंदने वेदीच्या मध्यभागी घातलेल्या जवाच्या ठिकाणी निर्माण होतात. जवाच्या वर आधी दिल्याप्रमाणे विविध वस्तू घालून सिद्ध केलेला तांब्याचा कलश आणि ताम्हन ठेवून वरुणदेवतेला आवाहन केल्यानंतर कलशात पुढीलप्रमाणे प्रवाह आकृष्ट होतात. ३. ईश्वरी तत्त्व ४. आनंद ५. चैतन्य
कलशात पुढीलप्रमाणे वलये निर्माण होऊन ती कार्यरत स्वरूपात फिरणे ३ अ. ईश्वरी तत्त्व ४ अ. आनंद ५ अ. चैतन्य ५ आ. चैतन्याच्या प्रवाहांचे वलयातून वातावरणात प्रक्षेपण होणे
शक्ती ६. कलशामध्ये घालण्यात येणार्या वस्तूंमुळे त्यामध्ये शक्तीचा प्रवाह आकृष्ट होतो. ६ अ. शक्तीचे वलय कलशामध्ये निर्माण होते. ६ आ. शक्तीच्या वलयातून शक्तीच्या प्रवाहांचे वातावरणात प्रक्षेपण होते. ६ इ. शक्तीच्या कणांचे कलशातून वातावरणात प्रक्षेपण होते. ६ ई. सप्तधान्य पेरल्यामुळे वेदीवर शक्तीचे कण कार्यरत रूपात फिरतात. नवरात्रीतील घटस्थापनेच्या विधीतून शक्तीची स्पंदने अधिक प्रमाणात निर्माण होऊन ती वातावरणात प्रक्षेपित होणे कलशात घालण्यात येणार्या वस्तूंतून निर्माण होणारी स्पंदने, त्यांचे प्रमाण आणि रंग (तत्त्वाच्या स्वरूपात)


येथे दिसणे आणि जाणवणे यांची क्रिया एकत्र झाली. म्हणजेच कधी तत्त्वाच्या जाणवण्यावरून त्याचा रंग दिसला, तर कधी रंगाच्या दिसण्यावरून (बुद्धीचा वापर करून) तत्त्व निश्चित केले. पहिल्यांदाच असे झाले आहे, उदा. पिंपळात निळसर रंग दिसला. यावरून `तेथे विष्णुतत्त्व अधिक आहे', असा विचार मनात आला. औदुंबरात दत्ततत्त्व अधिक असल्याने तेथे तांबडा (वैराग्याचा) रंग दिसला. - कु. प्रियांका लोटलीकर
इतर सूत्रे १. चाळलेल्या मातीपासून सिद्ध केलेल्या वेदीमध्ये पृथ्वीतत्त्वाचे प्रमाण अधिक असते. २. वेदीतील भूमीला प्रार्थना केल्यामुळे तिच्यातील शक्तीस्वरूप तत्त्व प्रकट होते. या शक्तीस्वरूप प्रकट भूमीतत्त्वामुळे पाताळातून आक्रमण करणार्या शक्तींना आळा बसतो. ३. वेदीच्या मध्यभागी ठेवलेल्या जवामध्ये शक्तीची स्पंदने कार्यरत स्वरूपात असतात. त्यामुळे वातावरणात मातीच्या गंधाचे (पृथ्वीतत्त्वाचे) प्रक्षेपण होते. ४. जवावर कलश ठेवण्यात येतो. त्या वेळी जवामध्ये शक्तीची स्पंदने कार्यरत होतात. त्यामुळे कलशाला आधार मिळतो. ५. कलशात पवित्र नद्यांना आवाहन करून जल घालण्यात येते. त्यामुळे जलामध्ये आपतत्त्वात्मक चैतन्य निर्माण होत असल्याचे जाणवले. ६. घटस्थापना विधीमध्ये कलशाला दोरा बांधण्यात येतो. त्यामुळे देवतांची कलशात निर्माण झालेली तत्त्वे दीर्घकाळ कार्यरत रहातात. ७. कलशाच्या वर ताम्हनात तांदूळ ठेवण्यात येतात. तांदुळामध्ये असणार्या चैतन्यामुळे ताम्हनात देवीला आसन प्रदान करण्यात येते. ८. वेदीवर सात प्रकारची धान्ये पेरण्यात येतात. ९. `सृष्टीच्या निर्मितीत उत्पत्तीजन्य शक्तीचे प्रतीक म्हणून ही कडधान्ये पेरण्यात येतात', असे जाणवले. १०. कडधान्यांना प्रार्थना करून त्यावर जलस्वरूप पर्जन्याचा वर्षाव करतात. म्हणजेच `सृष्टीच्या आवश्यक शक्तीचे पूजन करून कृपा संपादन करण्यात येते', असे जाणवले.' - कु. प्रियांका लोटलीकर, सनातन संस्था, गोवा. (भाद्रपद कृ. नवमी, कलियुग वर्ष ५१११ (१३.९.२००९))
आधुनिक शिक्षण नव्हे, तर धर्मशिक्षण घेऊन त्यानुसार आचरण केल्यासच मनुष्यजन्माचे सार्थक होते; कारण धर्मशिक्षणानेच `आचार कसा असावा', हे कळते.
|
0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा:
Post a Comment