बलिप्रतिपदा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

अनुक्रमणिका१. बलिप्रतिपदाअ. कथा :
हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. बलिप्रतिप्रदेची कथा अशी - बलिराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथि जे मागेल ते त्याला तो दान देत असे. दान देणे हा गुण आहे, पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच असतो. कोणाला काय, केव्हा व कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे व तो शास्त्रात व गीतेने सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे. अपात्री देऊ नये; पण बलिराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. अपात्र माणसांच्या हाती संपत्ति गेल्याने ते मदोन्मत्त होऊन वाटेल तसे वागू लागतात. तेव्हा भगवान विष्णूने मुंजा मुलाचा अवतार घेतला. वामन म्हणजे लहान. मुंजा मुलगा लहान असतो व तो `ॐ भवति भिक्षां देही ।' म्हणजे `भिक्षा द्या' असे म्हणतो. विष्णूने वामनावतार घेतला व बलिराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले, ``काय हवे ?'' तेव्हा वामनाने त्रिपाद भूमिदान मागितले. वामन कोण आहे व या दानामुळे काय होणार, याचे ज्ञान नसल्याने बलिराजाने त्रिपाद भूमि या वामनाला दान दिली. त्याबरोबर या वामनाने विराटरूप धारण करून एका पायाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली. दुसर्‍या पायाने अंतरिक्ष व्यापले व तिसरा पाय कोठे ठेवू असे बलिराजास विचारले. तिसरा पाय आपल्या मस्तकावर ठेवा असे बलिराजा म्हणाला. तेव्हा तिसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात घालावयाचे असे ठरवून वामनाने ``तुला काही वर मागावयाचा असेल तर माग (वरं ब्रूहि)'', असे बलिराजास सांगितले. तेव्हा `आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आहे व आपण मला पाताळात घालविणार आहात, तेव्हा तीन पावले टाकण्याचे जे सर्व घडले ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे', असा त्याने वर मागितला. ते तीन दिवस म्हणजे आश्‍विन कृष्ण चतुर्दशी, अमावास्या व कार्तिक शुद्ध प्रतिपदा. याला बलिराज्य असे म्हणतात. बलिराज्यात आपल्या मनाला वाटेल तसे लोकांनी वागावे असे धर्मशास्त्र सांगते; मात्र शास्त्राने सांगितलेली निषिद्ध कर्मे सोडून. अभक्ष्यभक्षण, अपेयपान व अगम्यागमन ही निषिद्ध कर्मे आहेत; म्हणून या दिवसांत माणसे दारू उडवितात (आतषबाजी करतात) पण दारू पीत नाहीत ! शास्त्राने परवानगी दिली असल्याने परंपरेने लोक या दिवसांत मौजमजा करतात. अशी ही दिवाळी. बलिप्रतिपदेच्या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बलि व त्याची पत्‍नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करावी, त्यांना मद्यमांसाचा नैवेद्य दाखवावा. यानंतर बलिप्रीत्यर्थ दीप व वस्त्रे यांचे दान करतात. या दिवशी प्रात:काळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात. दुपारी पक्वान्नांचे भोजन करतात. दिवाळीतला हाच दिवस प्रमुख समजला जातो. या दिवशी लोक नवी वस्त्रावरणे लेवून सर्व दिवस आनंदात घालवितात. या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा व फुले खोचतात व कृष्ण, गोपाळ, इंद्र, गायी, वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात व मिरवणूक काढतात.

आ. विक्रम संवत् वर्षारंभ दिन२. बलिप्रतिपदा तिथीची वैशिष्ट्ये

अ. हा दिवस दिवाळीतील दिवस असल्याने आनंद वाटत असला, तरी या दिवशी सूक्ष्मातून दाब असतो. ही तिथी असुराची असल्याने त्यांच्या वृत्तीप्रमाणे तिथीची निर्मिती होते. त्यामुळे या दिवशी बाह्य वातावरणाबरोबर स्वत:च्या अंत:करणाचे निरीक्षण करा.

आ. हा दिवस क्षमेचा असल्याने या दिवशी चुका केलेल्या जिवांना क्षमा करून त्यांना नवीन संधी दिल्यास ते जीव पुढे जाऊन सत्त्वमय होतात.

इ. या दिवशी बर्‍याच ठिकाणी मांसाहार करण्याची प्रथा असली, तरी मांसाहार करणे टाळले पाहिजे. या दिवशी मांसाहार केल्यास जिवाची वृत्ती तामसिक बनू शकते.

ई. या दिवशी वातावरणात श्रीविष्णूचे १५ ते ३५ टक्के तत्त्व पृथ्वीतलावर येत असल्याने पृथ्वीवरील वातावरण विष्णुमय होते. त्याचा श्रीविष्णूच्या (श्रीकृष्ण, श्रीविष्णु व सत्यनारायण यांच्या) भक्‍तांना जास्तीतजास्त फायदा होतो.)

साधकांनो, या दिवशी माझे तत्त्व जास्तीतजास्त येणार असल्याने तुमच्यातील तळमळ व भक्‍ती वाढवून त्याचा फायदा करून घ्या.
- श्रीकृष्ण (सौ. प्रार्थना बुवा यांच्या माध्यमातून, १०.१०.२००५, सकाळी ११.१३)


३. `बलिप्रतिपदा' या दिवसाबाबत एका `ज्ञानी'कडून मिळालेली माहितीहा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मूहूर्त म्हणून ओळखला जातो. या दिवशी बलीची पूजा सर्वप्रथम का करावी, तसेच कालचक्राबाबत सनातनचे साधक श्री. निषाद देशमुख यांना एका `ज्ञानी'कडून मिळालेली माहिती येथे देत आहोत.

अ. पाताळातून येणार्‍या लहरी बलीच्या अधिपत्याखाली असल्यामुळे बलीची पूजा सर्वप्रथम करावी !
पाताळातून येणार्‍या सर्व लहरी बलीच्या अधिपत्याखाली असल्यामुळे लहरींवर नियंत्रण असलेल्या घटकाचीच सर्वप्रथम पूजा केल्यास भोगाने तृप्‍त झालेला घटक अन्य घटकांना नियंत्रित करून ठेवतो. तसेच एक-एक करून तो सर्वच घटकांना भोग पुरवतो; म्हणून सर्वप्रथम बलीची पूजा करण्याचे शास्त्र (विधान) आहे.
- एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ११.१०.२००६, दुपारी १.०४)

आ. बलिप्रतिपदेचा दिवस साडेतीन मुहूर्तांमध्ये गणला जाण्यामागील कारण
१. मुहूर्त : ज्या दिवशी गतीमान कालचक्रातील व्यासकता संपूर्णतेला, म्हणजेच प्रत्यक्ष उत्पत्ती बिंदूच्या व्यासत्वावर असलेल्या अवस्थेत उत्पत्ती बिंदूच्या संपर्कात येऊन पुन: व्यासत्वाच्या स्वरूपात गतीमान होण्यास सुरुवात होते, त्या काळाला, म्हणजेच प्रत्यक्ष काळाच्या नूतनतेच्या वेळी कार्यरत झालेल्या गतीमततेतील व्यासत्वातून कार्यरत होणार्‍या दिवसाला `मुहूर्त' असे म्हटले जाते.
२. महाकालचक्रातील तत्त्वाचे व ईश्‍वरी शक्‍तीचा लाभ होऊन भूत आणि भविष्य यांचा योग्य तो समतोल राखण्यासाठी साडेतीन मुहूर्त साजरे केले जाणे :
इच्छा, क्रिया, ज्ञान आणि धर्म या प्रकारच्या चार घटकांच्या निमित्ताने साडेतीन मुहूर्त साजरे केले जातात. मुहूर्त ही संकल्पना प्रत्यक्ष कालचक्राच्या अनुषंगाने आहे. कालचक्र म्हणजे ईश्‍वराने निर्मिलेल्या सृष्टीच्या संहारकतेकडे होत असलेल्या प्रवासाची प्रत्यक्ष गती स्वरूपातील गणना. साडेतीन मुहूर्तातील पहिला मुहूर्त हा कालचक्राच्या इच्छा स्वरूपातील पूर्णतेचा, दुसरा मुहूर्त क्रिया स्वरूपाच्या पूर्ततेचा, तिसरा मुहूर्त ज्ञान स्वरूपाच्या पूर्ततेचा, तर अर्धा मुहूर्त धर्माच्या अर्ध पूर्णतेतून लयाकडे होत असलेल्या समावेशकतेचा दर्शक आहे. ज्या दिवशी महाकालचक्राच्या एक एक अंगाची पूर्णत्वता एक एक बिंदूशी निगडित होते, त्या दिवशी त्या त्या तत्त्वाचे बाहुल्य असते. कालाच्या प्रत्येक उपखंडाच्या त्या त्या उपखंडात त्या त्या दिवशी ईश्‍वराची ती ती शक्‍ती कार्यरत होत असल्यामुळे त्या त्या शक्‍तीचा लाभ होऊन भूत आणि भविष्य यांचा योग्य तो समतोल राहून जीवस्थिती स्वरूपात, म्हणजेच वर्तमानकाळात राहून त्या त्या तत्त्वाचा प्रत्यक्ष लाभ व्हावा; म्हणून साडेतीन मुहूर्त साजरे केले जातात.
- एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ११.१०.२००६, दुपारी १.५२)
३. इच्छा, क्रिया आणि ज्ञानशक्‍ती यांच्या बलावर प्राप्‍त झालेल्या कालाला पूर्णकता कालचक्राच्या व्यासाला पूर्णत्वातून उच्चपूर्णत्वाकडे नेते; म्हणून तीन मुहूर्त हे पूर्ण दिवसाचे गणले जातात, तर धर्मशक्‍ती ही परिपूर्णत्व वाचकसंज्ञेतून अपूर्णत्व वाचकतेशी निगडित संज्ञेकडे, म्हणजेच ईश्‍वराकडे कालाच्या व्यासाला नेत असल्यामुळे त्या दिवसाला अर्धा म्हणून साजरा केला जातो.
- एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ११.१०.२००६, दुपारी २.०७)

इ. कालचक्राचा प्रवास
श्री. निषाद देशमुख : इच्छाशक्‍तीतून कालचक्राचा प्रवास सुरू होऊन तो क्रियाशक्‍तीद्वारे पूर्णत्वाला गेला, क्रियाशक्‍तीतून सुरू झालेला कालचक्राचा प्रवास ज्ञानशक्‍तीतून पूर्णत्वाकडे गेला व ज्ञानशक्‍तीतून सुरू झालेला कालचक्राचा प्रवास धर्मशक्‍तीतून पूर्णतेकडे गेला, असे आहे का ?
एक ज्ञानी : नाही.
१. सत्ययुगाची सुरुवात : ईश्‍वराच्या इच्छाशक्‍तीने संकल्पशक्‍तीचे सगुण कार्यजन्यात्मक स्वरूप धरून सृष्टीउत्पत्ती ईश्‍वराच्या निर्गुणात्मक सगुण इच्छाशक्‍तीच्या प्रत्यक्ष प्रभावलयतेच्या आधारभूतात्मकतेच्या वर गेली व सत्ययुगाची सुरुवात झाली.
२. त्रेतायुगाची सुरुवात : पुढे सगुणातून कार्यरत झालेल्या इच्छाशक्‍तीने सगुण-निर्गुण, निर्गुण-सगुण, निर्गुण आणि निर्गुणातीत रूपाच्या एकानंतर एक, अशा श्रेष्ठतम स्तरावर त्या त्या स्तरावरच्या स्वरूपात्मक बोधतेतील कार्यजन्यता घेऊन निर्गुणात्मकता, म्हणजेच शून्यकतेवर आधारित असलेल्या निर्गुणजन्यात्मकतेप्रमाणे सगुणात्मक चालनात्मकतेशी निगडित स्तरावर सत्ययुगाची पूर्णता करून प्रभावलयतेच्या स्वरूपात क्रियाशक्‍तीच्या निर्गुणावर आधारलेले स्वरूप घेऊन त्रेतायुगाची सुरुवात झाली.
३. द्वापारयुगाची सुरुवात : त्यानंतर शक्‍तीतील त्या त्या उच्चकता कालाच्या प्रवाहमानकतेच्या आधारे घेऊन ज्ञानशक्‍तीच्या स्वरूपात द्वापारयुगाची सुरुवात झाली.
४. कलीयुगाची सुरुवात : त्यानंतर धर्मशक्‍तीच्या स्वरूपात कलीयुगाची सुरुवात केली.
(श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ११.१०.२००६, दुपारी २.२१)

इच्छा, क्रिया आणि ज्ञानशक्‍ती या पूर्णत्वाशी, तर धर्मशक्‍ती अपूर्णत्वाशी संबंधित असणे : प्रत्यक्ष इच्छा, क्रिया आणि ज्ञानशक्‍ती या पूर्णत्वाशी, म्हणजेच उत्पत्ती, स्थिती आणि लय या प्रकारच्या पूर्णत्वाशी निगडित प्रत्यक्ष उपात्मक (म्हणजेच उप-उप स्वरूपावर त्या त्या स्तराला धरून कार्य करणारी) स्वरूपाचे कार्य करण्यासही सक्षम असल्याने त्या त्या स्वरूपात कार्य करून प्रत्यक्ष कालाला पूर्णत्वाची परिपूर्णता प्रदत्त केली. याउलट धर्माची अपूर्णात्मकता (अपूर्ण म्हणजेच ज्याला पूर्णत्वाने व्यापू शकत नाही, अशा ईश्‍वरापासून निर्मिती झालेली असल्यामुळे) हाच गुणधर्म असल्यामुळे धर्मशक्‍तीच्या बलावर कलीयुगाची समाप्‍ती होऊन पूर्ण कालचक्र ईश्‍वरात विलीन होईल. (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ११.१०.२००६, दुपारी २.२१)

ई. कलीयुगाच्या समाप्‍तीच्या दिवस बलिप्रतिपदा असेल : सध्याच्या सत्ययुगातून कलीयुगापर्यंतच्या समाप्‍तीचा दिवस बलिप्रतिपदा, म्हणजेच धर्मशक्‍तीच्या स्वरूपातून निर्गुणकतेकडे नेणारा दिवस असेल. या दिवशी श्रीविष्णूचा दहावा अवतार कल्की आसुरी शक्‍तीचा शेवट करून पूर्ण सृष्टीला ईश्‍वरात विलीन करील.
- एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ११.१०.२००६ दुपारी २.२१)

उ. धर्मपालनामुळे ईश्‍वराच्या क्रियास्वरूपात्मक ऊर्जेचे प्रक्षेपण होऊन ईश्‍वर जिवाला उच्च स्थानावर नेतो !विश्‍वाच्या स्थितीधारकतेसाठी कार्यरत होणार्‍या प्रत्यक्ष मानवबलामध्ये ईश्‍वरी शक्‍तीची जागृती होऊन कर्माच्या फलनिष्पतीत जिवाला प्रत्यक्ष ईश्‍वराशी सहज स्तरावर एकरूपता गाठता यावी, यासाठी बुद्धीगम्य कर्माच्या माध्यमातून बुद्धीअगम्य कार्य करणार्‍या स्थूल घटकाशी निगडित विधींचा समावेश केला आहे. धर्म स्वत:च्या प्रत्यक्ष कर्मस्वरूपमय वलयातून ईश्‍वराच्या क्रियास्वरूपात्मक ऊर्जेचे प्रक्षेपण करून प्रत्यक्ष मानवाची जागृती आणि विश्‍वाच्या स्थितीतील प्रत्यक्ष ईश्‍वरी ऊर्जेचे माध्यमदर्शक प्रक्षेपण ही दोन्ही कर्मे जिवात करून जिवाला उच्च स्तरावर नेतो; म्हणून हिंदु धर्मामध्ये धर्मपालनाचे अनन्यसाधारण महत्त्व सांगण्यात आले आहे.
- एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ११.१०.२००६ दुपारी ९.३४)


४. वामनाने केलेले बलीराजाचे खरे हित !

`विष्णूने अनन्य भक्‍त असुराधिपती बलीवर अन्याय केला. असा कसा तो परमात्मा विष्णु ? त्याला करुणामय कसे म्हणावे ? बलीने अश्‍वमेध यज्ञ केला. त्या यज्ञात सर्व भुवन तृप्‍त झाले. देव व ऋषी यांनी त्या यज्ञाची विलक्षण प्रशंसा केली; पण बली हा भोगार्थी नाही, तर मोक्षार्थी आहे, असा निर्णय करून त्याचे इष्ट करण्याकरिता सिद्धी देणारा विष्णु (बटुवामन) त्याच्या यज्ञात आला आणि केवळ भोगाकरिता दीन झालेल्या व त्यामुळे अथवा असे करण्यास योग्य असलेल्या वडील बंधू इंद्राला जगताचा तुकडा देण्याच्या उद्देशाने, बलीला बाह्यदृष्ट्या फसवून; पण अंतरदृष्ट्या त्याचे कोटीकल्याण करून, त्या पापहारक हरीने, मायाबलाने तीन पावलांनी तिन्ही भुवने त्याच्यापासून हिरावून घेतली व त्याला पाताळातले राज्य दिले; पण बलीचे प्रारब्ध त्याला इंद्रत्व देणार आहे. तो त्याकरिता शरीर धारण करून जीवन्मुक्‍त स्थितीत आहे.'
- गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी


५. ।। मंगलाचरण ।।

`आपले कल्याण असो !'

`आपले स्वागत आहे !!'

`मी याचक आहे.'

`प्रभू ! मी आपली काय सेवा करू ?'

`मला जमीन हवी !'

`किती ?'

`माझ्या पावलाने, ...तीन पावले !'

`दिली !!'

`संकल्प जल हातावर द्या !'

शुक्राचार्य सांगतात, `बलीराजा देऊ नको !...याचक भिक्षुक नाही, साक्षात् `विष्णु' आहे.'

बली म्हणाले, `साक्षात विष्णूपेक्षा श्रेष्ठ असा दान देण्याला पात्र कोण असू शकतो ?'

अशा प्रकारे राजा बलीच्या यज्ञारंभी पूजीत झालेला वामन भगवंत आम्हा सर्वांचे नेहमी रक्षण करो !!

(श्रीमहाविष्णूचा पाचवा वामन अवतार, पृ. ३ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (नारायणानंदनाथ))

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: