वयोवृद्धांना नेहमी नमस्कार का करावा ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
ऊर्ध्वं प्राणा ह्युत्क्रामन्ति यून: स्थविर आयति ।
प्रत्युत्थानाभिवादाभ्यां पुनस्तान्प्रतिपद्यते ।।
- मनुस्मृति २.१२०; महाभारत, उद्योग. ३८.१, अनु. १०४, ६४-६५.
अर्थ : वृद्ध पुरुषाचे आगमन झाल्यावर तरुण व्यक्‍तीचे प्राण वरच्या दिशेने सरकू लागतात व जेव्हा तो उठून नमस्कार करतो, तेव्हा तो प्राणांना पूर्वस्थितीत प्राप्‍त करतो.


`वृद्ध व्यक्‍तीचा प्रवास हा हळूहळू दक्षिण दिशेला, म्हणजे यमलोकाकडे (मृत्यूकडे) होत असल्याने तिच्या शरीरातून रज व तम लहरींचे प्रक्षेपण मोठ्या प्रमाणावर होऊ लागते. अशी वृद्ध व्यक्‍ती समोर आल्यावर तरुण व्यक्‍तीच्या शरीरावर त्या लहरींचा परिणाम होतो व त्या दोघांमध्ये सूक्ष्म-चुंबकीय क्षेत्र तयार होते. त्यामुळे तरुण व्यक्‍तीचे पंचप्राण वर उचलले जातात. अशा प्रकारे अचानक पंचप्राणांना मिळालेल्या गतीमुळे व्यक्‍तीला त्रास होण्याची शक्यता असते. जेव्हा तरुण व्यक्‍ती वृद्ध व्यक्‍तीला नमस्कार करते, तेव्हा तरुण व्यक्‍तीतील सुषुम्नानाडी काही प्रमाणात जागृत होते व तरुण व्यक्‍तीतील सत्त्वगुण वाढू लागतो. त्यामुळे तिच्यातील रज व तम गुणांवर सत्त्वगुणाचा प्रभाव होऊ लागतो व तिचे प्राण पूर्वस्थितीत येतात. यासाठी वृद्ध व्यक्‍तीचे आगमन होताच तिला लहानांनी नमस्कार करण्याची पद्धत आहे.'


संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'

इंग्रजी मध्ये माहीती हवी असल्यास येथे टिचकी मारा

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: