मृतदेहाला नमस्कार करण्याऐवजी देवालाच नमस्कार करून प्रार्थना का करू नये ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
कलीयुगात कर्मकांडानुसार `मृतदेहाला चांगली गती प्राप्‍त होऊ दे', अशी ईश्‍वराला प्रार्थना करून मृतदेहाला नमस्कार करण्याची प्रथा आहे. मृतदेहाला नमस्कार करण्याऐवजी देवालाच नमस्कार करून प्रार्थना का करू नये ?

उत्तर : - असे करण्याने कलीयुगातील जिवांसमोर प्रत्यक्ष कृतीतून `थोरामोठ्यांचा आदर राखावा', असा आदर्श निर्माण करणे अशक्य होईल. कलीयुगातील पिढी जी धर्मभ्रष्ट होत चालली आहे, त्या पिढीला प्रत्यक्ष आदर्श वर्तनाच्या निम्न स्तराला येऊन शिकवणेच क्रमप्राप्‍त आहे. कलीयुगातील जीव हे आध्यात्मिकदृष्ट्या अज्ञानी असल्याने त्यांना प्रत्येक गोष्ट त्या त्या स्थळी जाऊन, तिथे नमस्कारासारखी प्रत्यक्ष कृती करून शिकवणे आता महत्त्वाचे बनले आहे. मृतदेहासाठी ईश्‍वराला मानस-नमस्कार करून प्रार्थना केल्यास ते इतरांना कळणार नाही; कारण ते कळण्यासाठी आध्यात्मिक क्षमताच हवी. कलीयुगामधील जिवांमध्ये ती नसल्याकारणाने प्रत्यक्ष कृती करणेच आवश्यक ठरते; म्हणून मृतदेहातील देवाला नमस्कार करणे जास्त चांगले. या कृतीने भावनिक तसेच आध्यात्मिक हे दोन्ही उद्देश साध्य होतात.

संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'

इंग्रजी मध्ये वाचाण्यासाठी येथे टिचकी मारा

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: