मृतदेहाला नमस्कार करावा का ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

त्रेता व द्वापार या युगांतील जीव हे कलियुगातील जिवांच्या तुलनेत खूपच सात्त्विक असल्याने त्यांच्या मृतदेहाला नमस्कार करणे योग्य असले, तरी कलियुगात तसे करणे केवळ रूढीमुळे चालू आहे का ? तसे असल्यास ती रूढी बंद करावी का ?

उत्तर : मृतदेहाला नमस्कार करण्याने त्याच्याबद्दल आदराची भावना व्यक्‍त करून इतरांसमोर वरिष्ठांचा मान राखावा, हा आदर्श ठेवता येतो. कलियुगात या प्रक्रियेतून आध्यात्मिक स्तरावरील फायदा न मिळता फक्‍त भावनिक स्वरूपाचाच फायदा मिळणे शक्य होते म्हणून ही रूढी बंद करू नये, तर त्यातून आध्यात्मिक फायदा कसा मिळवावा, हे शिकावे. जिवाची सात्त्विकता कमी झाल्याने कलियुगात या प्रक्रियेला रूढीचेच स्वरूप प्राप्‍त झाले आहे; परंतु `भाव तेथे देव' या उक्‍तीप्रमाणे मृतदेहाला म्हणजेच मृतदेहातील ईश्‍वरालाच आपण नमस्कार करत आहोत, या भावाने आपण त्याच्यासमोर नतमस्तक झालो, तर मृतदेहातील ईश्‍वरी अंश प्रकट होऊन आपल्याला त्याचा आशीर्वाद मिळण्यास मदत होते; कारण ईश्‍वर हे अविनाशी तत्त्व आहे, त्याला देहबंधन नाही.

संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'

इंग्रजी मध्ये माहीती हवी असल्यास येथे टिचकी मारा

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: