सौभाग्यवतीने ज्येष्ठांना नमस्कार करतांना तीन वेळा हात खाली-वर का करावा ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
सौभाग्यवती स्त्री ही आदिमायेच्या अप्रकट निर्गुण स्तरावरील सुप्‍त शक्‍तीचे द्योतक आहे। ती मायेतूनही अद्वैत साधून देणारे आदिशक्‍तीचे सगुण रूप आहे. ज्या वेळी आपण कुठल्याही गोष्टीचा त्रिवार उच्चार करतो किंवा एखादी गोष्ट त्रिवार करतो, त्या वेळी ईश्‍वराची संकल्पशक्‍ती इच्छा, क्रिया व ज्ञान या तीन शक्‍तींच्या स्तरांवर कार्यरत होते. यामुळे आपण हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास जाते. सुवासिनी स्त्रीमध्ये आदिमाया-आदिशक्‍तीचे बीज हे सुप्‍तावस्थेत असल्याने तिच्या खाली वाकून त्रिवार हात हालवण्याने उत्पन्न होणार्‍या शक्‍तीरूपी रजोलहरींच्या वेगवान प्रक्षेपणामुळे, तसेच तिच्यातून प्रकट होणार्‍या लीनभावामुळे समोरील वरिष्ठ जिवातील देवत्व प्रकट होऊन तिला तीनही शक्‍तींच्या बळावर कार्य करण्यासाठी प्रकट शक्‍ती पुरवते. या शक्‍तीमुळे तिची आत्मशक्‍ती कार्यरत होते. या शक्‍तीमुळे तिच्या क्रियमाणाला गती प्राप्‍त होऊन ती आदिमायेच्या बळावर आपल्या कुटुंबाचा उद्धार करते. तिच्यातून प्रक्षेपित होणार्‍या रजोगुणी चैतन्यलहरींच्या वेगवान प्रक्षेपणाचा फायदा तिच्या पतीलाही मिळाल्याने तोही प्रत्यक्ष शिवाच्या रूपात मायेत कार्य करू शकतो.'

संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: