नागपंचमीचा पूजाविधी

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

नागपंचमीचा पूजाविधी


संकलक : श्री. दामोदर
वझे, फोंडा, गोवा.

पूजेची प्राथमिक तयारी
चंदनामध्ये हळद घालून भिंतीवर नाग काढावा किंवा दरवाज्याच्या दोन्ही दारांवर मातीने किंवा गाईच्या शेणाने नागपत्‍नीसह नागाचे चित्र काढावे किंवा कुलाचाराप्रमाणे नागपूजन करावे.

संकल्प
सुरुवातीला आचमन करावे व देशकाल म्हणून पुढील संकल्प करावा - `मम सकुटुंबस्य सपरिवारस्य सर्वदा सर्वत: सर्पभय निवृत्ति पूर्वकं सर्प प्रसाद सिद्धिद्वारा श्री परमेश्‍वर प्रीत्यर्थं । श्रावण शुक्ल पंचम्यां यथामिलित उपचारै: नागपूजां करिष्ये ।'

अर्थ : माझ्या कुटुंबाचे व परिवारातील सर्वांचे नेहमी व सर्व ठिकाणी सर्पापासूनच्या भयाचे निवारण व्हावे. तसेच सर्पाची (नागराजाची) कृपादृष्टी व्हावी; म्हणून श्री परमेश्‍वराच्या प्रीतीकरिता श्रावण शुद्ध पंचमीला नागाची पूजा करतो. नेहमीप्रमाणे कलश, घंटा, दीप यांची पूजा करावी व न्यास करावा.

नागांचे आवाहन
उजव्या हातात अक्षता घेऊन नागांची पुढील एक एक नावे घ्यावी व तेव्हा `नम:'
म्हणतांना नागावर अक्षता वहाव्या.

१. अनंताय नम: अनंतं आवाहयामि ।
२. वासुकये नम: वासुकिं आवाहयामि ।
३. शेषाय नम: शेषं आवाहयामि ।
४. शंखाय नम: शंखं आवाहयामि ।
५. पद्माय नम: पद्मं आवाहयामि ।
६. कंबलाय नम: कंबलं आवाहयामि ।
७. कर्कोटकाय नम: कर्कोटकं आवाहयामि ।
८. अश्‍वतराय नम: अश्‍वतरं आवाहयामि ।
९. धृतराष्ट्राय नम: धृतराष्ट्रं आवाहयामि ।
१०. शंखपालाय नम: शंखपालं आवाहयामि ।
११. तक्षकाय नम: तक्षकं आवाहयामि ।
१२. कालियाय नम: कालियं आवाहयामि ।
१३. कपिलाय नम: कपिलं आवाहयामि ।
१४. नागपत्‍नीभ्यो नम: नागपत्‍नी: आवाहयामि ।
आवाहन झाल्यावर पुढील मंत्राने ध्यान करावे.

अनंतोवासुकिश्चैव कालियो मणि भद्रक: ।।
शंखश्च शंखपालश्च कर्कोटक धनंजयौ ।।
धृतराष्ट्रश्च ये सर्पास्तेभ्यो नित्यं नमो नम: ।।

ध्यान झाल्यावर पूजेला सुरुवात करावी.

१. अनंतादि नाग देवताभ्यो नम: आवाहयामि ।
२. अनंतादि नाग देवताभ्यो नम: आसनार्थे अक्षतां समर्पयामि ।
३. अनंतादि नाग देवताभ्यो नम: पाद्यम् समर्पयामि ।
४. अनंतादि नाग देवताभ्यो नम: अर्घ्यम् समर्पयामि ।
५. अनंतादि नाग देवताभ्यो नम: आचमनीयम् समर्पयामि ।
६. अनंतादि नाग देवताभ्यो नम: स्नानम् समर्पयामि । (किंवा `पंचामृत स्नानम् समर्पयामि ।', असे म्हणून पंचामृत घालावे.)
७. अनंतादि नाग देवताभ्यो नम: वस्त्रम् समर्पयामि ।
८. अनंतादि नाग देवताभ्यो नम: यज्ञोपवितम् समर्पयामि ।
९. अनंतादि नाग देवताभ्यो नम: चंदनम् समर्पयामि ।
नागपत्‍नीभ्यो नम: हरिद्रां कुंकूमं समर्पयामि ।
(नागपत्‍नीला हळदकुंकू वहावे व अलंकार वहावे.)
१०. अनंतादि नाग देवताभ्यो नम: पुष्पाणि, तुलसीपत्रम्, बिल्वपत्रम्, दुर्वाकुरान् समर्पयामि ।
(फुले वाहिल्यावर दही, अक्षता व दूर्वांकूर वहावे.)
११. अनंतादि नाग देवताभ्यो नम: धूपम् समर्पयामि ।
१२. अनंतादि नाग देवताभ्यो नम: दीपम् समर्पयामि ।
(नैवेद्यासाठी दूध, दही, तूप, साखर, पायस व लाह्या हे पदार्थ दाखवावेत. त्यांपैकी एखादे नसल्यास बाकीचे दाखवावेत.)
१३. अनंतादि नाग देवताभ्यो नम: नैवेद्यम् समर्पयामि ।
नारळ व विडा यांच्यावर पाणी घालावे. मग आरती करावी व कापूर ओवाळावा.
१४. अनंतादि नाग देवताभ्यो नम: प्रदक्षिणाम् समर्पयामि ।
१५. अनंतादि नाग देवताभ्यो नम: नमस्कारान् समर्पयामि ।
१६. अनंतादि नाग देवताभ्यो नम: प्रार्थनाम् समर्पयामि ।


प्रार्थना
श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी केलेल्या नागदेवतेच्या पूजनामुळे नागदेवता संतुष्ट होवो व मला नेहमी सुख प्राप्‍त होवो. हे नागराजा, पूजा करतांना ज्ञानाने किंवा अज्ञानामुळे कमी किंवा जास्त उपचार झाले असल्यास किंवा काही चुकल्यास मला क्षमा कर. तुमच्या कृपाशीर्वादाने माझे सर्व हेतु, इच्छा पूर्ण होवोत. सदा-सर्वदा तू आमच्या कुळाचे सर्पाच्या विषापासून रक्षण कर.

या दिवशी काय करावे ?
१. ज्यांना शक्य असेल त्यांनी वारुळाच्या ठिकाणी नागाला दूध पाजावे. दुधामध्ये तूप व साखर घालावी
२. वारुळाच्या ठिकाणी पुरुष व स्त्रिया यांनी गायन, भजन करावे.
३. भाजलेले चणे, भात, लाह्या इत्यादि पदार्थ सर्वांनी खावेत. (त्यामुळे दात घट्ट होतात.)
४. नागदेवता संतुष्ट व्हावी; म्हणून पायस व अन्न वाढून ब्राह्मण-भोजन घालावे.
याप्रमाणे दरवर्षी केले असता सर्पाची बाधा होत नाही.

या दिवशी काय करू नये ?
१. लोखंडी तव्यावर पोळया भाजू नयेत.
२. जमीन नांगरणे किंवा खणणे टाळावे.

साभार : नागपंचमी विशेषांक
0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: