गणेशोत्सव विशेष - ६

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत अश्लील चित्रपटगिते लावण्यापेक्षा देवतांचा नामजप लावा !
भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी झाली. त्या निमित्त श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण अथर्वशीर्षासंबंधी माहिती जाणून घेऊया.


अथर्वशीर्ष
थर्व म्हणजे गरम, अथर्व म्हणजे शांती व शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पुरश्चरणाने मस्तकास शांती प्राप्‍त होते ते अथर्वशीर्ष होय. भगवान जैमिनीऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्‌गलऋषी यांनी `साममुद्‌गल गणेशसूक्‍त' लिहिले. त्यानंतर त्यांचे शिष्य गणकऋषी यांनी `श्री गणपति अथर्वशीर्ष' लिहिले. बहुतेक मंत्रांत देवतेचे ध्यान, म्हणजे मूर्तीचे वर्णन आधी असते व स्तुती नंतर असते. याउलट अथर्वशीर्षात स्तुती आधी व ध्यान नंतर आहे.
अथर्वशीर्षाचे पुढील तीन प्रमुख भाग आहेत -
१. शांतीमंत्र : सुरुवातीला `ॐ भद्रं कर्णेभि:' व `स्वस्तिन: इंद्रा.....' हे मंत्र आणि शेवटी `सह नाववतु ।......' हे मंत्र
२. ध्यानविधी : `ॐ नमस्ते गणपतये' येथपासून ते `वरदमूर्तये नम:' येथपर्यंतचे दहा मंत्र
३. फलश्रुती : `एतदथर्वशीर्ष योऽधीते' इत्यादी चार मंत्र
अथर्वशीर्ष म्हणणे : हे स्तोत्र म्हणतांना पुढील सूचनांकडे लक्ष द्यावे.
१. उच्चार अगदी स्पष्ट असावेत.
२. स्तोत्र अगदी संथपणे एका गतीत म्हणावे.
३. स्तोत्रपठण `तदर्थभावपूर्वक तत् अर्थ भावपूर्वक', म्हणजे `त्याचा (स्तोत्राचा) अर्थ समजून भावासह' झाले पाहिजे. केवळ यंत्राप्रमाणे प्राणहीन उच्चारण नको. उच्चारण असे व्हावे की, ज्याच्या योगाने जपकर्ता भगवद्भावयुक्‍त आणि भगवच्छक्‍तीयुक्‍त झाला पाहिजे.
४. जेव्हा एकापेक्षा अधिक वेळा हे स्तोत्र म्हणावयाचे असते तेव्हा `वरदमूर्तये नम: ।' येथपर्यंतच म्हणावे. त्याच्या पुढे जी फलश्रुती आहे ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी. त्याप्रमाणेच शांतीमंत्र प्रत्येक पाठापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदा म्हणावा.
५. या स्तोत्राच्या एकवीस आवृत्ती म्हणजे एक अभिषेक होय.
६. स्तोत्र म्हणण्यापूर्वी स्नान करावे.
७. पाटावर न बसता त्याऐवजी धूतवस्त्राची घडी, मृगाजिन, धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा. ८. पाठ म्हणून पूर्ण होईपर्यंत मांडी बदलावी लागणार नाही, अशी सोपी साधी मांडी घालावी.
९. दक्षिण दिशेखेरीज अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे.
१०. पाठीला बाक येईल, असे न बसता ताठ बसावे.
११. पाठ म्हणण्यापूर्वी आई, वडील आणि आपले गुरु यांना नमस्कार करावा.
१२. पाठाला सुरुवात करण्यापूर्वी जमल्यास श्री गणपतीची पूजा करून त्याला अक्षता, दूर्वा, शमी व तांबडे फूल वहावे. पूजा करता न आल्यास निदान
श्री गणपतीचे ध्यान एक मिनिटभर करावे, नमस्कार करावा आणि मग पाठास सुरुवात करावी.
१३. उच्चारात चुका होऊ नयेत; म्हणून स्तोत्र बरोबर कसे म्हणावे, ते जाणत्या व्यक्‍तीकडून शिकून घ्यावे. १४. स्तोत्र म्हणतांना श्री गणपतीच्या मूर्तीकडे किंवा ॐ कडे पाहून म्हणावे, म्हणजे लवकर एकाग्रता होते.

अथर्वशीर्ष म्हणण्याचे फायदे
१. स्तोत्रात फलश्रुती दिलेली असते. आत्मज्ञानसंपन्न ऋषीमुनींना हे वाङ्मय परावाणीतून स्फुरत असल्याने व फलश्रुतीमागे त्यांचा संकल्प असल्याने स्तोत्रपठण करणार्‍याला ते फळ फलश्रुतीमुळे मिळते.
२. स्तोत्रपठण करणार्‍याच्या भोवती कवच (संरक्षक आवरण) निर्माण करण्याची शक्‍ती स्तोत्रात आहे; म्हणून अथर्वशीर्षाच्या पठणाने वाईट शक्‍तीच्या त्रासापासून रक्षण होते. (क्रमश:)
(संदर्भ : अथर्वशीर्ष स्तोत्र व त्याचा सविस्तर अर्थ सांगणारा सनातनचा लघुग्रंथ `श्री गणपत्यथर्वशीर्ष व संकष्टनाशन श्री गणेशस्तोत्र (अर्थासह)' ग्रंथ हवा असल्यास संपर्क : पनवेल (०२१४३) २३३ १२०

मिरवणुकीत श्री गणेशाचा नामजप करा !
मिरवणुकीतून जातांना मोठ्या आवाजात अश्लील चित्रपटगीते लावणे वा म्हणणे त्याबरोबर हिडीस अंगविक्षेप करत वाचणे, गुलाल उधळणे व जोरजोरात ओरडणे, अशा प्रकारची गैरवर्तणूक करण्याने वातावरण सात्त्विक न बनता तामसिक बनते. त्यामुळे त्याचा मिरवणुकीतील नागरिकांना फायदा न होता उलट समाजाची सात्त्विकता कमी होण्यास कारणीभूत ठरते.

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: