कलीयुगातील बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे मायेत खूप गुरफटलेले असतात. मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त रहातो. असे अतृप्त लिंगदेह मर्त्यलोकात अडकतात. आपल्या कुळातील अशा या अतृप्त लिंगदेहांना सद्गती प्राप्त करून देण्याचा एक मार्ग म्हणजे श्राद्धविधी. श्राद्धविधी म्हटला की, तो कोणी करावा, कोठे करावा, कधी करावा, यांसारखे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे रहातात. काल आपण श्राद्ध कोणी करावेत, याविषयी माहिती पाहिली. आज आपण श्राद्ध कोठे करावे, या संदर्भातील माहिती पाहूया.
श्राद्ध कोठे करावे ?
१. श्राद्धासाठी योग्य जागा (श्राद्धदेश)
अ. `दक्षिण बाजूला उतरती अशी जागा श्राद्धासाठी चांगली असते.
आ. गोमयाने सारवलेली, तसेच कीटकादी प्राणी व अपवित्र वस्तू यांनी वर्जित अशी भूमी श्राद्धासाठी चांगली असते.
इ. वनात, पुण्यस्थानी किंवा शक्यतो स्वत:च्याच घरात तळमजल्यावर श्राद्ध करावे. आपल्या घरात श्राद्ध केले असता तीर्थाच्या तुलनेत आठपट पुण्य प्राप्त होते. प्रसंगी दुसर्याच्या घरात त्याच्या परवानगीने किंवा थोडेसे भाडे देऊन श्राद्धासाठी जागा घ्यावी.
ई. ज्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीचे स्वामित्व नसते अशी ठिकाणे, म्हणजे वने, पर्वत, नद्या, तीर्थे, मोठी सरोवरे, देवालये या ठिकाणी श्राद्ध करण्यास हरकत नाही.
२. विशिष्ट क्षेत्री श्राद्ध करण्याचे महत्त्व
२ अ. श्राद्ध करण्यास जास्त योग्य क्षेत्रे व त्यांचे महत्त्व : `गंगा, सरस्वती, यमुना, पयोष्णी इत्यादी नद्यांच्या ठिकाणी; महोदधी म्हणजे मोठ्या समुद्राच्या काठी; प्रभासतीर्थ, पुष्करतीर्थ, प्रयाग, काशी, गया, मातृगया, कुरुक्षेत्र, गंगाद्वार इत्यादी तीर्थांच्या ठिकाणी; नैमिषक्षेत्र, धर्मारण्य, धेनुकारण्य इत्यादी अरण्यांच्या ठिकाणी; ब्रह्मसरोवर, महासरोवर यांच्या ठिकाणी; अक्षय्यवट, महाक्षेत्रे यांच्या ठिकाणी; तुळसी, आवळे यांच्या वनांतील छायेखाली इत्यादी क्षेत्रांत श्राद्धे केली असता अक्षय्य पद प्राप्त होते.
२ आ. श्राद्धाच्या संदर्भात गया क्षेत्राचे महत्त्व
१. गया क्षेत्रातील प्रेतशिलेवर पिंडदान केल्यामुळे प्रेतत्व नष्ट होऊन आत्मा पितरलोकात जातो.
२. गया क्षेत्राच्या ठिकाणी शमीपत्राप्रमाणे पिंड दिल्याने सात गोत्रांचा, म्हणजे एकशे एक कुळांचा उद्धार होतो.
वर दिलेल्या सर्व ठिकाणी श्राद्धाप्रमाणेच स्नान, दान, तप इत्यादी कर्मे केली असता त्या कर्मांचे अक्षय्य फळ मिळते.'
३. श्राद्धास वर्ज्य जागा : `गुरांचा गोठा, हत्ती बांधण्याची जागा, घोड्याची पागा, दगडांनी बांधलेले कट्टे व पाणी या ठिकाणी श्राद्ध करू नये. केल्यास पितर त्या श्राद्धकर्माचा विघात करतात.' (क्रमश:)
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `श्राद्ध (महत्त्व व शास्त्रीय विवेचन)'. ग्रंथ हवा असल्यास संपर्क : पनवेल - (०२१४३) २३३ १२० )
--------------------------------------------------------------------------------
सनातनने `पितृपक्ष व महालय श्राद्ध' ही ध्वनीचित्र-तबकडी प्रसारित केली आहे. त्या ध्वनीचित्र-तबकडीत दाखवल्याप्रमाणे श्राद्धविधी केल्याने ज्यांना अनुभूती आल्या असतील, त्यांनी त्या आम्हाला अवश्य पाठवाव्यात.
इतर श्राध्दविषयक लघुपट
अनुक्रमणिका
१. महालय श्राध्दविधीची तयार(विधीची यादी)
२. महालय श्राध्दकर्त्याची व विधीसंबंधी विधीवत पूर्व तयारी
३. महालय श्राध्दविधीतील ब्राह्मण स्वागत व अन्नप्रोक्षण
४. महालय श्राध्दविधीतील देवतांना आवाहन
५. महालय श्राध्दविधीतील अग्नौकरण
६. महालय श्राध्दविधीतील ब्राह्मणभोजन
७. महालय श्राध्दविधी करतांना पूर्वजांना अन्नामुळे तृप्ति कशी मिळते
८. महालय श्राध्दविधीतील पिंड पूजन
९. महालय श्राध्दविधी करण्यास व्यक्ती असमर्थ असल्यास काय करावे ?
साभार : पितृपक्ष व श्राध्दविधी विशेषांक
अनुक्रमणिका
१. महालय श्राध्दविधीची तयार(विधीची यादी)
२. महालय श्राध्दकर्त्याची व विधीसंबंधी विधीवत पूर्व तयारी
३. महालय श्राध्दविधीतील ब्राह्मण स्वागत व अन्नप्रोक्षण
४. महालय श्राध्दविधीतील देवतांना आवाहन
५. महालय श्राध्दविधीतील अग्नौकरण
६. महालय श्राध्दविधीतील ब्राह्मणभोजन
७. महालय श्राध्दविधी करतांना पूर्वजांना अन्नामुळे तृप्ति कशी मिळते
८. महालय श्राध्दविधीतील पिंड पूजन
९. महालय श्राध्दविधी करण्यास व्यक्ती असमर्थ असल्यास काय करावे ?
साभार : पितृपक्ष व श्राध्दविधी विशेषांक
0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा:
Post a Comment