माझे सद्गुरुसंसारात जीव जळत आहे, शांतीचे स्थान सत्पुरुषच आहे, कुठलाही पापी जीव असला तरीही त्याला मोक्ष मार्गाला चढवतात, तसे हे माझे सद्गुरु आहेत !
गुरुकृपायोगानुसार साधनेचे टप्पेस्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न, नामजप, सत्संग, सत्सेवा, अहं-निर्मूलनासाठी प्रयत्न, सत्साठी त्याग, भावजागृतीसाठी प्रयत्न आणि साक्षीभाव हे गुरुकृपायोगानुसार साधनेचे टप्पे आहेत.
ईश्वरभक्तांचाच नाही तर इतरांचाही योगक्षेम ईश्वर वहातो; पण अहंकारामुळे त्यांना ते कळत नाही.
संतांच्या ठिकाणी भेदभाव नाही.`मेघ हा सर्वत्र सारखाच वर्षाव करीत असतो; पण सखोल जागी पाणी साठते व ताठरपणे उभे असलेले डोंगर कोरडेच रहातात. त्याचप्रमाणे संतांच्या ठिकाणी भेदभाव नाही. त्यांची दयादृष्टी सर्वांवर सारखीच असते, पण जो शुद्ध अंत:करणाने त्यांचे ठिकाणी लीन असतो, त्याला श्रद्धेनुसार यथोचित फलप्राप्ती होते.'
शिक्षकदिन नव्हे गुरुपौर्णिमा साजरी करा !भारतीय संस्कृतीनुसार कोणतेही सण किंवा उत्सव साजरे करण्यामागे काही विशिष्ट तत्त्व असते व त्याप्रमाणे ते साजरे करणार्यास त्याचा फायदा होत असतो. ईश्वरी राज्यात शिक्षकदिन हा गुरुपौर्णिमेदिवशी साजरा करण्यात येईल; कारण या दिवशी पृथ्वीवर जास्त प्रमाणात येणार्या गुरुतत्त्वाचा विद्यार्थ्यांना लाभ होईल. तसेच शिक्षक हे ठराविक वेळ व केवळ शब्दांच्या माध्यमातून शिकवितात, तर गुरु हे चोवीस तास शब्द व शब्दातीत या दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत मार्गदर्शन करीत असतात. ईश्वरी राज्यातीलशिक्षक हे गुरूंप्रमाणेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे असतील. त्यामुळे ईश्वरी राज्यात गुरुपौर्णिमा व शिक्षकदिन हे वेगवेगळे साजरे न करता, ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी साजरे करण्यात येतील !
ग्रंथ - अध्यात्मशास्त्रीय माहिती१. भावाचे प्रकार व जागृती
२. संत भक्तराज महाराज यांचे चरित्र : खंड १
३. संत भक्तराज महाराज यांचे चरित्र : खंड २
४. संत भक्तराज महाराज यांचे चरित्र : खंड ३
५. संत भक्तराज महाराज यांचे चरित्र : खंड ४
६. संत भक्तराज महाराज यांचे चरित्र : खंड ५
७. गुरुकृपायोग
८. शिष्य
९. समष्टी साधनेसाठी आवश्यक गुण
१०. व्यष्टी साधनेसाठी आवश्यक गुण
वितरणासाठी संपर्क |
अनुक्रमणिका१. गुरुपौर्णिमा२. गुरुकृपायोग३. गुरुपौर्णिमा महोत्सव४. इतर५. गुरुपौर्णिमेच्या संदर्भातील अनुभूती
|
अ. महर्षी व्यासमहर्षी व्यास व्यासांचे अमाप वाङ्मय `व्यासांनी अठरा पुराणे व अठरा उपपुराणे रचली. यांशिवाय व्यासांची पुष्कळशी पुराणे प्रसिद्ध आहेत आणि बरीचशी लुप्त झाली आहेत. व्यासांचा `वेदांत दर्शन' (ब्रह्मसूत्र) ग्रंथ तर प्रतिभा- प्रज्ञेचा अपूर्व विलास आहे. त्यांनी अनेक गीता रचल्या, अनेक प्रकरणी ग्रंथ केले. बृहद्व्यास स्मृति, लघुव्यास स्मृति असे काही ग्रंथ रचले. अनेक ग्रंथांवर भाष्ये (व्यास भाष्ये) लिहिली.'
व्यासांचे वाङ्मय नष्ट होण्याला जबाबदार कोण ?
`व्यासांचे सगळे वाङ्मय या देशाला गोर्यांचे पाय लागण्याआधी परंपरेने साक्षात् उपलब्ध होते. बौद्ध, यवन, मुसलमान आणि इंग्रजी शासनाने ते नष्ट व भ्रष्ट करून टाकले. (आमच्या प्राचीन वाङ्मयासंबधी हीनगंड जोपासल्याने आम्ही त्या वाङ्मय अध्ययनाचा त्याग केला. पुष्कळसे ग्रंथ वाचक नसल्याने गंगार्पण केले.)' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
आ. `गुरुकृपा ही केवलं शिष्यपरममंङ्लम् ।'१. ईश्वरप्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित झालेल्यांना `परमकल्याण केवळ गुरुच करू शकतात', याची खात्री पटणे : `गुरुकृपा ही केवलं शिष्यपरममंङ्लम् ।', याचा अर्थ शिष्याचे परममंगल केवळ गुरुकृपेनेच होते. ईश्वरप्राप्तीच्या ध्येयाने प्रेरित झालेले साधक व शिष्य यांनी प्रत्यक्ष गुरुकृपा अनुभवलेली असल्याने त्यांना गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व पटलेले असते. त्यामुळे त्यांना `आपल्या गुरूंसाठी काय करू व किती करू', असे वाटत असते. गुरुकृपेचे वर्णन व महत्त्व हे शब्दातीत असल्यामुळे ते शब्दांतून व्यक्त करणे अशक्यच असते. तरीही शिष्यांना गुरूंच्या आलेल्या अनुभूती, गुरूंनी केलेली कृपा, त्यांचे हास्य, त्यांनी आपल्याशी केलेली मधुरवचने, मार्गदर्शन इत्यादींचे नित्य स्मरण शिष्याकडून होत असते व तो गुरूंच्या आठवणीतच सतत रममाण होत असतो. त्याला आता खर्या अर्थाने गुरूंचे वेड लागलेले असते. अंतर्यामी गुरूंचे महत्त्व पटलेले असल्याने व उत्तरोत्तर गुरूंची ओढ वाढत गेल्याने त्याला आता गुरूंशिवाय चैन पडत नाही. आपले परमकल्याण केवळ गुरुच करू शकतात याची खात्री पटल्याने तो पूर्णपणे गुरूंना समर्पित होतो व गुरुही त्याला जवळ घेतात.
२. साधनेत प्रगती होत गेल्यावर `आतापर्यंतचा साधनेतला प्रवास केवळ गुरुकृपेनेच झाला आहे', याची अनुभूती सातत्याने आल्याने व गुरुचरणांशीच सर्व देवता असल्याचे पटल्याने शिष्य फक्त गुरुभक्ती व गुरुसेवा यांत रममाण होणे : खरेतर साधकाने अध्यात्माच्या शाळेत प्रवेश केल्यापासूनच गुरु त्याची साधना करवून घेत असतात; परंतु साधकाला त्याची जाणीव नसते. साधकाची साधनेत जसजशी प्रगती होत जाते, तसतसे त्याला गुरूंचे महत्त्व पटू लागते. `आतापर्यंतचा साधनेतला प्रवास केवळ गुरुकृपेनेच झाला आहे', याची त्याला खात्री पटते. गुरुकृपा सातत्याने मिळवण्यासाठी तो गुरूंच्या मार्गदर्शनानुसार प्रयत्न करतो. शिष्य झाल्यावर गुरुच त्याच्याकडून योग्य प्रकारे साधना करवून घेऊन त्याची साधनेत प्रगती करून घेतात. या स्थितीला `गुरूंचे आज्ञापालन करणे', हा एकच ध्यास शिष्याला लागलेला असतो. `आपली प्रगती गुरूंच्या संकल्पाने होत आहे व तेच सर्वकाही आपल्याकडून करवून घेत आहेत', अशी अनुभूती सातत्याने घेतल्याने शिष्याचा गुरूंप्रती कृतज्ञताभाव व शरणागतभाव वाढू लागतो. आता त्याला देवतांची भक्तीही करावी लागत नाही. गुरुचरणांशीच सर्व देवता असल्याने आता तो फक्त गुरुभक्ती व गुरुसेवा यांत रममाण होतो.
३. गुरूंना आपल्या शिष्यासाठी `काय करू व किती करू', असे वाटत असणे, त्यांना आपल्या शिष्याच्या प्रगतीची ओढ वाटत असणे व ते त्याला आपल्यासारखा बनवण्यासाठी अधीर असणे : शिष्याला गुरूंचा काही महिन्यांचा अथवा काही वर्षांचा सहवास लाभला, तरी तो गुरूंसाठी वेडा होतो. ज्या गुरूंनी अनेक जन्मांपासून त्याचे बोट धरून ठेवले आहे व ते त्याला प्रत्येक जन्मात साधनेचे मार्गदर्शन करून पुढे पुढे घेऊन जातात, त्यांना आपल्या शिष्याचे किती वेड असेल ! गुरूंना आपल्या शिष्यासाठी `काय करू व किती करू', असे वाटत असते. त्यांचे प्रेमही शिष्याला भरभरून मिळत असते. त्याला आपल्यासारखा बनवण्यासाठी ते अधीर असतात. शिष्याला जेव्हा गुरुचरणांची व त्यांच्या चरणी स्थान प्राप्त करण्याची ओढ लागते व ती वाढत जाते, त्या वेळी गुरुच त्याला आत्मज्ञान देतात व त्यानंतर स्वत:मध्ये सामावून घेतात. खरेतर हे सर्व गुरूंनीच केलेले असते. त्यासाठी शिष्याला काहीही प्रयत्न करावे लागत नाहीत. जसे आपण काशीला जाणार्या आगगाडीत बसलो की, आपणही काही न करता काशीला पोहोचतो, त्याप्रमाणे एकदा आपण गुरुकृपेच्या गाडीत बसलो की, आपोआपच गुरु आपल्याला योग्य ठिकाणी नेऊन सोडतात. त्यासाठी शिष्याला काहीही करावे लागत नाही. हे अनुभवल्यामुळेच शिष्याला गुरुकृपेचे अनन्यसाधारण महत्त्व माहीत असते व तो गुरुचरणी सतत लीन असतो.' - ईश्वर (सौ. राजश्री अरुण खोल्लम यांच्या माध्यमातून, २४.७.२००७ सायं.५ वाजता)
इ. गुरु-शिष्य परंपरांनी धर्मरक्षणासाठी अधिक कार्यरत व्हावे !डॉ. जयंत बाळाजी आठवले `गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे गुरूंच्या पूजनाचा दिवस. गुरूंकडून आपल्याला जे मिळाले व जे मिळत आहे, त्याप्रती पूर्ण कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या दिवशी सनातन हिंदु संस्कृतीच्या निर्देशक असणार्या व गुरु-शिष्य परंपरा जपणार्या सर्व विद्याशाखांमधील साधक आपापल्या गुरुपरंपरेचे स्मरण करतात व गुरूंचे पूजन करतात. गुरु-शिष्य परंपरा ही सनातन हिंदु संस्कृतीने जगाला दिलेली देणगी आहे. ती सनातन हिंदु संस्कृतीतील ज्ञानदानाच्या व विद्यादानाच्या पद्धतीचा गाभा आहे. तीमध्ये विद्या देणार्याचे व ती घेणार्याचे संबंध वैशिष्ट्यपूर्ण आहेत. विद्या देणार्यावर केवळ तेवढीच विद्या देण्याची जबाबदारी नाही, तर अन्य जीवनमूल्ये त्या साधकाला शिकवण्याचीही जबाबदारी आहे. विद्या घेणारा पोटार्थी म्हणून ती ग्रहण करणारा विद्यार्थी नसून त्या विद्येचे संवर्धन करणारा साधक आहे. या संस्कृतीत `ज्ञान' ही संज्ञा ईश्वरप्राप्तीशी निगडित आहे. त्याला `सर्वश्रेष्ठ विद्या' ही संज्ञा आहे; कारण हे ज्ञान केवळ त्याचे अधिकारी असणारे गुरुच दुसर्याला देऊ शकतात. जेथे अशा ज्ञानदानाची `गुरु-शिष्य' परंपरा जपणारे पूजन असेल, तेथे या सोहळयाचे वैभव काय सांगावे ! असे सर्व असतांना ज्या सनातन हिंदु धर्माने जगाला अशी अत्यंत महत्त्वपूर्ण देणगी दिली, त्याची स्थिती बिकट बनलेली आहे. अलीकडचेच उदाहरण घ्या. `दी लव्ह गुरु' नावाच्या हॉलिवूड-निर्मित चित्रपटात गुरूंचे यथेच्छ विडंबन करण्यात आले आहे. `गुरु-शिष्य' परंपरा या पुण्यभूमीतील आहे', असे आपण म्हणतो; मात्र `ती आपली नाही', हे आपल्याला सांगण्यासाठी `ही संस्कृती आर्यांची आहे व आर्य हे बाहेरून आले होते. त्यामुळे ही संस्कृती येथील नव्हे', असा खोटा इतिहास सांगितला जातो. मध्यंतरी केरळमधील देवस्वम्मंत्री सुधाकरन यांनी `गुरु अंतर्वस्त्रे घालत नाहीत. त्यांनी ते घालणे आधी शिकावे', असे संतापजनक विधान केले होते. ईश्वरप्राप्तीचे ज्ञान देणे, म्हणजे धर्माचे ज्ञान देणे. असे कार्य करणार्यांवर धर्मद्रोही वाटेल तसा हल्ला चढवतात, हे वेळोवेळी अनुभवाला आले आहे. सरकार सनातन हिंदु संस्कृतीचे कोणत्याही प्रकारे पोषणकर्ते तर नाहीच; उलट ते ती नष्ट करू पहात आहे, हेही वेळोवेळी प्रत्ययाला आले आहे. - डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था.
ई. गुरूंची आवश्यकता१. शहरात एखाद्याचा पत्ता माहीत नसेल, तर तो कोणीतरी सांगावा लागतो. त्याचप्रमाणे ईश्वराचा पत्ता गुरुच सांगू शकतात. २. स्वत:ला पोहता येत नसेल, तर नदीपार होण्यासाठी भोपळयाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे संसारसागर तरून जाण्यासाठी गुरुरूपी भोपळयाची आवश्यकता असते. ३. शिष्याला स्वत:च्या प्रयत्नांनी आपली उन्नती करून घेता येत नाही, असे नाही; पण चांगल्या गुरूंच्या उपदेशाने व मार्गदर्शनाने शिष्याचा आत्मोन्नतीचा मार्ग सुगम होतो. एक आगबोट एके ठिकाणी ४ तासांत जाऊन पोहोचत असेल, तर तिच्यामागे तिला दोरीने बांधलेली होडी चारच तासांत त्या स्थळी पोहोचते; पण ती होडी आगबोटीपासून वेगळी केली आणि एकटीच चालवण्यात आली, तर ती त्या ठिकाणी जाण्यास तिला १२ तास लागतील. आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गात आपण स्वत:च प्रयत्न करू लागलो, तर आपल्यातील दोषांमुळे व चुकांमुळे आपली उन्नती होण्यास फार काळ लागतो; पण योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाने १२ तासांचा मार्ग ४ तासांत आक्रमिता येतो. थोडक्यात म्हणजे `महाजनो येन गत: स पंथा: ।' (मोठी मोणसे ज्या मार्गाने गेली त्या मार्गाने जावे.) या न्यायाने गुरूंकडे जावे. ४. ईश्वराकडे जाण्याचा मार्ग गुरूच सांगू शकतात अ. आपल्या एका मित्राला भेटायला आपण त्याच्या गावात आलो; पण त्याचा पत्ता माहीत नसेल, तर तो कोणाला तरी विचारावा लागतो. त्याचा पत्ता कळल्यावर आपण ते ठिकाण शोधू शकतो. त्याचप्रमाणे `मी'चा म्हणजे आत्मारामाचा पत्ता गुरुच सांगू शकतात. आ. आपण वाळवंटात वाट चुकल्यावर आपल्याला मार्गदर्शक वाटाड्या मिळाला नाही, तर इकडून तिकडे व तिकडून इकडे, असे भटकून आपण दमून जाऊ. अन्न-पाणी न मिळाल्याने आपण मरून जाऊ. त्याचप्रमाणे मार्गदर्शक गुरु भेटले नाहीत, तर आपल्यातील दोष आणि आपल्या हातून होणार्या चुका यांमुळे आपल्याला ८४ लक्ष योनींतून भटकत रहावे लागेल. इ. आपण मित्राला दूरध्वनी केला व तो लागला नाही, तर दूरध्वनीचालक आपल्याला दूरध्वनी लावून देतो. त्याचप्रमाणे आपला संपर्क देवाशी होत नसला, तर गुरु मधल्या अडचणी दूर करून आपला संपर्क देवाशी करून देतात. अडचणी कोणत्या ? आई-वडील, बंधू-भगिनी, पत्नी, संपत्ती या गोष्टी म्हणजे आपण व ईश्वर या मध्ये मायावी पडदाच आहे. या मोहपाशातून गुरु आपणास सोडवून देवाचे दर्शन घडवतात. `जिज्ञासु : परमेश्वर व मी यांच्या ओळख-संबंधांत हा त्रयस्थ दलाल गुरु कशाला पाहिजे ? प.पू. महाराज : हे पहा, साध्या व्यावहारिक गोष्टीतदेखील, ``हा रस्ता कोठे जातो ?'' यालादेखील मार्गदर्शकाची जरूरी लागते. व्यावहारिक शिक्षण देण्याच्या बाबतीतसुद्धा गुरुजींची जरूरी लागते. कोणीतरी उजेड दाखवावा लागतो. हीच गोष्ट परमेश्वराची ओळख करून देण्याच्या बाबतीत आहे.' - आत्मप्रभा (ब्रह्मीभूत श्री गजानन महाराज, नाशिक यांचे पारमार्थिक विचार. पृष्ठ ५७)
उ. गुरुपौर्णिमेसाठी केलेल्या सेवेचे व त्यागाचे महत्त्वसाधनेत जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी हळूहळू आपले तन, मन व धन यांचा त्याग होणे आवश्यक असते. मनाचा त्याग नामस्मरणाने, तनाचा त्याग शारीरिक सेवेने आणि धनाचा त्याग ते अर्पण करून होतो. त्यासाठी संत हेच पात्र आहेत. आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी, उदा. आजारपण, धंद्यात येणार्या अडचणी, पैसा न टिकणे, या गोष्टी पूर्वजन्मीच्या देवाण-घेवाण हिशोबामुळे घडतात. संतांना दिलेल्या दानातून विविध अडचणी दूर होतात. याचा अनुभव साधकांनी घेतलेला असतो; म्हणून अनेक साधक क्षेत्रावर अर्पण करत असतात. ईश्वरप्राप्तीसाठी सर्वस्वाचा त्याग करायचा असतो. ते साध्य व्हावे; म्हणून टप्प्याटप्प्याने दानाचे प्रमाण वाढवीत जावे. अर्पण किती केले, यापेक्षा आसक्ती किती कमी झाली, हे महत्त्वाचे आहे. उदा. लाखो रुपये असतांना १० हजार रुपये अर्पण करणे, याऐवजी १०० रुपये असतांना १०० रुपये अर्पण करणे हे जास्त महत्त्वाचे आहे. गुरुपौर्णिमेला गुरुतत्त्व इतर दिवसांपेक्षा एक हजार पटीने जास्त कार्यरत असते. त्यामुळे गुरूंच्या इतर आध्यात्मिक कार्यक्रमांच्या वेळी किंवा एरव्ही केलेल्या सेवा व त्याग याच्यापेक्षा गुरुपौर्णिमेसाठी केलेल्या सेवा व त्याग यांमुळे अनुभूती जास्त प्रमाणात येतात व गुरुकृपा जास्त प्रमाणात होते.
ऊ. साधनेत धन अर्पण करण्याचे महत्त्व व त्याचे परिणामएकूण साधनेत धन अर्पणाचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे. १. देवाण-घेवाण हिशोब फिटण्यास मदत होते. २. प्रारब्ध भोग भोगून संपवण्यात सुरू असलेल्या प्रक्रियेत जलदता येते. ३. धनासंदर्भातील आसक्ती कमी होते. ४. मायेतून बाहेर पडून साधना करणे सोपे जाते.
ए. अर्पण करण्याची संधी देणारा गुरुपौर्णिमा हा महान क्षण होय !अध्यात्मजीवन ही सिद्ध व साधक यांची क्रीडा आहे. त्यात एकाने द्यायचे असते व दुसर्याने घ्यायचे असते. जो देतो तोच पुन्हा घेतो व जो घेतो तोच पुन्हा देतो. फक्त देतांना व घेतांना वस्तूच्या स्वरूपात बदल होतो. या क्रीडेतील एकाला `गुरु' म्हणतात व दुसर्याला `शिष्य' म्हणतात. भौतिकातील कुठलेही क्षेत्र याला अपवाद नाही. तथापि आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात गुरु-शिष्य संबंध जास्त प्रभावी असतात. त्याचे माध्यम वाणी तथा वाङ्मय असते. त्याचे संकलन, विषयवार एकीकरण, वर्गनिहाय नियमन, नियोजन व स्वयंभू रचना ज्यांनी वैश्विक आदर्श पद्धतीने बलवत्तर प्रमाणात केली, त्यांना भगवान `श्री व्यास' या नावाने ओळखले जाते. वैश्विक सद्गुरु ही परमश्रेष्ठ उपाधी लोकमानसाच्या हृदयातून त्यांनी प्राप्त करून घेतली आहे. त्यांच्या चिरायू स्वरूपाच्या वाङ्मयकार्यातून ते विश्वाला अखंडपणे देत असतात. त्यांचे हात हजारो आहेत. घेणार्यांची झोळी दुबळी पडू नये म्हणून आणि घेणार्यांकडून कृतज्ञतेचा वारसा जपला जावा म्हणून व्यासपौर्णिमा जी गुरुपौर्णिमा या नावाने ओळखले जाते, तिचे आयोजन केले जाते. भगवान श्री व्यास म्हणजे मूर्तिमंत ज्ञान. त्यांनी ज्ञान ओतून कर्म व भक्ती यांच्या पायांनी सुदृढ केलेले आणि योगाच्या आधारे बळकट केले ते व्यासपिठ ! व्यासपिठावर बसण्याचा अधिकार ज्यांना प्राप्त झाला, ते श्री सद्गुरु होत. अशांना अभिवादन करून त्यांचेकडून प्राप्त झालेल्या अमर अमृतश्रोताला कृतज्ञतेच्या कोंदणात बसवून ते अर्पण करण्याची संधी देणारा गुरुपौर्णिमा हा महान क्षण होय ! देणारा श्री सद्गरु अखंडपणे देत असतो. घेणारा मात्र खंडितपणेच घेत असतो. तेवढ्यानेदेखील घेणार्याच्या जीवनात क्रांति घडून येते. जीवनाची वाटचाल धन्यतेकडे होऊ लागते. ज्याला याची जाण असेल, त्याची कृतज्ञता बुद्धी खचितच जागृत होईल. तीच प्रगट करण्याचा सुवर्णकाल म्हणजे गुरुपौर्णिमा. - प.पू. स्वामी विद्यानंद, पुणे
अ. गुरुकृपायोगाचे महत्त्वगुरुकृपायोगामुळे अहं लवकर कमी होणे `गुरुकृपायोगाची मूल्ये जिवाला सेवाभावातून अहं कमी करण्यासाठी त्या त्या स्तरावर चैतन्य प्रदान करत असल्याने समष्टी साधनेमुळे व्यष्टी साधनेपेक्षा लवकर अहं कमी होण्यास मदत होते, याचे शिक्षण देतात.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ६.१.२००६, रात्री ८.२५)
गुरुकृपायोगानुसार साधना करणारे जीव सप्तपाताळ व सप्तलोक यांत न अडकणे `गुरुकृपायोगानुसार समष्टी साधना करणार्या कलीयुगातील जिवाला कमी कालावधीत सप्तपाताळ व सप्तलोक यांत असणार्या अडचणींविषयी, म्हणजेच साधनेत येणार्या प्रत्येक स्तरावरील अडचणींविरुद्ध कसे लढायचे, हे माहीत झाल्याने असे जीव स्थूलात किंवा सूक्ष्मात त्या त्या टप्प्यावर अडकण्याची शक्यता खूप कमी असते.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १६.४.२००६, दुपारी ३.१९)
गुरुकृपायोगानुसार साधना करणारे देवाणघेवाणीच्या स्तरावरून मुक्त झाल्याने त्यांना पुनर्जन्म नसणे `गुरुकृपायोगानुसार समष्टी साधना करणारे सर्व जीव ईश्वरी राज्यात परिक्रमणा करणारे असून सर्वच दृष्टीने परिपूर्ण असतात; कारण या कालावधीत कमाल वाईट शक्तींच्या होणार्या त्रासातून ते कृपेच्या बळावर तरून, शिक्षित होऊन, पुढे येणार्या सर्व अडथळयांवर मात कशी करायची याचे प्रशिक्षण घेतलेले असतात. यामुळे प्रत्यक्ष देवाणघेवाणीच्या स्तरावरून ते मुक्त होऊन परत जन्माला न येता पुढची गती धारण करतात.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १६.४.२००६, दुपारी ३.१९)
आ. समष्टी साधनेतील सहजता, सुंदरता व सानंदता या तीन `स'कारांवर `गुरुकृपायोग' आधारित असणेसौ. अंजली गाडगीळ `सहजता, सुंदरता व सानंदता या तीन `स'कारांसह कृती करण्याचा प्रयत्न करणारा तो साधक.
अ. सहजता (दिसेल ते कर्तव्य) : `दिसेल ते कर्तव्य', या भावातून प्रत्येक गोष्ट केली, तर ती सहजपणे होते. सतत वर्तमानकाळात रहाता आल्यामुळे भूतकाळ व भविष्यकाळ यांचे विचार कमी होण्यास, परिणामी संस्कार कमी होण्यास मदत होते.
आ. सुंदरता (प्रत्येक गोष्ट सुंदर, परिपूर्ण करण्यास शिकणे व मग ती दुसर्यालाही शिकवणे) : कुठलीही कृती करतांना ती नीटनेटकी, सुंदर व दुसर्याला समजेल अशी केल्याने त्या कृतीचे इतरांनाही लगेच आकलन होते व त्या गोष्टीतून इतर जिवांनाही आनंद मिळतो. `ही गोष्ट फक्त मला माझ्यासाठी सुंदर करावयाची नाही, तर ती दुसर्यांना आनंद देण्यासाठी करावयाची आहे', हा झाला जिवाचा समष्टी भाव. समष्टीमध्ये एखादी कृती करून मग ती सोपी करून इतरांना शिकवणे व आपल्यासारखाच दुसरा साधक तयार करणे ईश्वराला अपेक्षित असते. सुंदर गोष्ट नेहमीच चैतन्यदायी व आनंददायी असते.
इ. सानंदता (प्रत्येक कृती ही केवळ माझ्या आनंदापुरतीच मर्यादित नसून ती दुसर्याला आनंद देण्यासाठीही आहे.) : सहजता व सुंदरता या टप्प्यांतून जीव हळूहळू सानंदतेकडे जाऊ लागतो. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये जिवाचे ईश्वराशी द्वैत असते. प्रत्येक कृती सानंदतेने करता करताच जिवाचा प्रवास सायुज्य मुक्तीकडे लवकर होऊ शकतो.' - श्री गुरुतत्त्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १६.४.२००४, सकाळी १०.४४) (वरील मुद्याचे संगणकावर टंकलेखन करत असतांना मला माझा उजवा हात प.पू. डॉक्टरांच्या लेखणी धरलेल्या हातासारखा जाणवत होता. - सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.)
इ. गुरुकृपायोग : आध्यात्मिक उन्नतीचा विहंगम मागगुरुकृपायोगानुसार साधनेत नामासहित कर्म करतांना प्रार्थना केल्यामुळे जिवाचा भाव वाढणे, कृतज्ञतेमुळे अहं कमी होणे व नामाचे रूपांतर गुणात्मक नामात झाल्याने साधक कमी कालावधीत संतपदाला पोहोचणे : `नामासहित कर्म करता करता कर्माला प्रार्थना व कृतज्ञता यांची जोड दिली असता, या नामाचे रूपांतर गुणात्मक नामात होते; कारण जिवाच्या नामामुळे ब्रह्मांडातील सूक्ष्मलहरी, प्रार्थना केल्यामुळे जिवाचा भाव वाढल्याने सूक्ष्मतर लहरी व कृतज्ञतेमुळे अहं कमी झाल्याने सूक्ष्मतम लहरी कार्यरत होतात व जिवाकडे आकृष्ट होतात. त्यामुळे कर्म करतांना एकाच वेळी या तिन्ही लहरींचा फायदा जिवाला मिळतो. यातच गुरुकृपायोगाच्या शिकवणीचे महत्त्व लक्षात येते; कारण इतर संप्रदाय फक्त `नामजप करा', एवढेच सांगतात. त्यामुळे गुरुकृपायोगाप्रमाणे साधना करणारे जीव फक्त नामजप करणार्या जिवांपेक्षा गुणात्मक नामजपाकडे लवकर जातात. साहजिकच इतरांच्या तुलनेत त्यांची उन्नती जलद होते व असे जीव कमी कालावधीत संतपदाला पोहोचतात.' - श्री गुरुतत्त्व (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २६.५.२००४, सायं. ६.५०)
गुरुकृपायोगानुसार साधनेने साधकाची आध्यात्मिक उन्नती जलद होऊन त्याला `चौर्ध्वागती' प्राप्त होणे गुरुकृपायोगात सर्व प्रकारच्या साधनामार्गांबद्दल स्थूलातून व सूक्ष्मातून मार्गदर्शन होत असल्याने साधकाच्या साधनेच्या अंगानुसार व त्यामुळे त्याला प्राप्त पातळीनुसार आवश्यक साधना करवून घेतली जाते. त्यामुळे साधकाची आध्यात्मिक उन्नती जलद होऊन त्याला `चौर्ध्वागती' प्राप्त होते. गुरुकृपायोगानुसार साधना करणार्यांची विविध तर्हेने होणारी उन्नती गुरुकृपायोगानुसार साधना करणार्या काही साधकांना मोक्ष मिळालेला असेल, काही साधकांची त्या दिशेने वाटचाल सुरू असेल, काहींना स्वर्गप्राप्ती झालेली असेल, काहींना ईश्वरी राज्यातील राजवैभव प्राप्त झालेले असेल, तर काहींना चौर्ध्वागती प्राप्त झाल्याने उच्च लोकांत स्थान प्राप्त होऊन तेथे त्यांची सूक्ष्मातून साधना सुरू असेल. कलीयुगात अवतरलेल्या गुरुकृपायोगानुसार साधना करणार्या सनातनच्या काही साधकांना प.पू. डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने चौर्ध्वागती प्राप्त झालेली आहे.' - ब्रह्मतत्त्व (सौ. कविता विक्रमसिंह पाटील यांच्या माध्यमातून, १९.४.२००६, सकाळी ७.४५)
गुरुकृपायोगाप्रमाणे साधना केल्याने सात देवतांची उपासना होत असल्यामुळे सातही देवतांप्रती जिवाचा भाव वाढणे, त्यामुळे देवतांनी समष्टी साधना करणार्या जिवाला आपणहून मदत करणे व जिवाची उन्नती झपाट्याने होणे `गुरुकृपायोगाप्रमाणे साधना करणार्या जिवाला सप्तदेवतांच्या नामजपाच्या प्रयोगातून आलेला तो तो नामजप करण्याची सवय लागल्याने त्याची सर्व देवतांशी जवळीक होण्यास मदत होते व सातही देवतांप्रती जिवाचा भाव वाढण्यास मदत झाल्यामुळे देवता समष्टी साधना करणार्या जिवाला आपणहून मदत करतात. हे गुरुकृपायोगातील सात उच्च देवतांच्या नामजपाच्या प्रयोगपद्धतीचे महत्त्व असल्याने जिवाची उन्नतीही ते ते तत्त्व मिळाल्यामुळे झपाट्याने होते.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १९.६.२००४, सायं. ५.०७)
ई. गुरुकृपायोगानुसार साधना करणारे जीव हे निवृत्तीमार्गी असणेश्री. निषाद : गुरुकृपायोगानुसार साधना करणारे जीव हे प्रवृत्तीमार्गी आहेत कि निवृत्तीमार्गी ? एक ज्ञानी : गुरुकृपायोगानुसार साधना करणारे जीव मायेमध्ये राहून निवृत्तीमार्ग अनुभवत साधनेतील सर्व अनुभव घेत आहेत. निवृत्तीमार्गी जिवांना देहबुद्धी व संपत्ती यांचा गर्व रहात नाही अथवा खूप अत्यल्प प्रमाणात रहातो. त्याप्रमाणे सनातनचे साधक सर्व अनुभवत आहेत. साधनामार्गाच्या दृष्टीने बघितल्यास गुरुकृपायोग हा प्रवृत्तीमार्ग आहे. साधकांचा स्तर व त्यांच्या अनुभूतींच्या दृष्टीने बघितल्यास सनातनचे साधक हे निवृत्तीमार्गी ठरतात; म्हणून गुरुकृपायोगाने साधना करणारे जीव हे प्रवृत्तीमार्गाने जाणारे निवृत्तीमार्गी जीव आहेत. (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १५.६.२००६, दुपारी ४.५३)
उ. `गुर्वाज्ञापालन हेच एकमेव उद्दिष्टगुरुकृपायोगाप्रमाणे साधना करणार्या जिवांचे `गुर्वाज्ञापालन हेच एकमेव उद्दिष्ट' असणे व विविध योगमार्गांची ब्रीदवाक्ये
अज्ञात शक्ती : गुरुकृपायोगानुसार साधना करणार्या जिवांसाठी `गुरुकृपायोगाप्रमाणे साधना करणार्या जिवाला गुर्वाज्ञापालन हेच एकमेव उद्दिष्ट आहे', असाच नियम का आहे ? एक ज्ञानी : प्रत्येक मार्गाप्रमाणे साधना करणार्या जिवांसाठी त्या त्या योगमार्गाच्या विशिष्ट पद्धतीकडे वळता यावे; म्हणून त्या त्या योगमार्गाचे ते ते ब्रीदवाक्य असते.
कर्मयोग अ. माध्यम : कर्म आ. ब्रीदवाक्य : `कर्म करा; पण फळाची अपेक्षा करू नका.' म्हणजे कर्मामध्ये (योगमार्गाच्या विशिष्ट पद्धतीमध्ये) सतत सातत्य ठेवा; पण फळाची अपेक्षा करू नका, म्हणजे स्वत:ला लिप्त करून घेऊ नका.
ज्ञानयोग अ. माध्यम : ज्ञान आ. वाक्य : `अयं आत्मा ब्रह्म' व `ब्रह्म सत्य जगत् मिथ्या', म्हणजे `स्वत: ब्रह्म आहे, हे सत्य आहे व हे सर्व जगत मायास्वरूप आहे', हे लक्षात ठेवा. `स्वत: ब्रह्म आहे', या ज्ञानाला (जाणिवेला) विसरू नका.
गुरुकृपायोग अ. माध्यम : गुरूंची प्राप्ती करणे आ. वाक्य : `गुर्वाज्ञापालन हेच एकमेव उद्दिष्ट', म्हणजे गुरुस्वरूपाचे (तत्त्व किंवा सगुण स्वरूप) पूर्णपणे अनुकरण करावे. वरील माहितीवरून गुरुकृपायोगाचे ब्रीदवाक्य हे गुरूंशी निगडित असलेल्या प्रत्यक्ष देहात्मक जिवाला प्रत्येक क्षण विघटनाच्या प्रक्रियेतून गुरुतत्त्वाकडे नेणारे असले पाहिजे. ही शक्ती वरील वाक्यामध्ये असल्यामुळे हेच वाक्य गुरुकृपायोगाचे ब्रीदवाक्य असणे योग्य आहे. (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ११.६.२००६, दुपारी ५.०७)
ऊ. गुरुकृपायोगानुसार साधना करणार्यांची उन्नती लक्षात न येण्याचे कारणसंकलक : कलीयुगात जलद आध्यात्मिक उन्नती साधून घेऊन परत जन्माला न येता स्वचैतन्याच्या बळावर पुढील मार्गक्रमणा करणार्या जिवांचे कमाल प्रमाण ३० टक्के आहे, असे आपण सांगितले आहे. एवढे प्रमाण आहे, तर ते स्थूल व सूक्ष्म यांद्वारे जाणवत का नाही ? एक विद्वान : `आताच्या रज-तमयुक्त वाईट शक्तींच्या कमाल प्रभावाखाली ते जाणवत नाही; कारण या अवस्थेत आपल्या अंतर्बाह्य मनाच्या जाणिवांची एकाग्रता चैतन्याच्या दाोतावर केंद्रित न होता वाईट शक्तींचे होणारे हल्ले परतवण्यात गुंतलेली असल्याने सातत्याने पातळीमध्ये चढ-उतार होत असतो. वाईट शक्तींच्या कमाल प्रभावाखाली साधकांचे आताचे वेगळेपण सुस्पष्ट होणारे नाही.' (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १६.४.२००६, दुपारी ३.१९)
गुरुकृपायोगानुसार साधना करणार्या साधकांचे वेगळेपण सन २०१२ नंतर सर्वांच्याच लक्षात येणार असणे `आता साधकांचा कार्यातील सगुण-निर्गुण असा टप्पा सुरू आहे. पुढे उत्क्रांती होऊन ज्या वेळी निर्गुण स्तरावरील टप्पा सुरू होईल, त्या वेळी साधक ब्राह्म व क्षात्र या दोन्ही तेजांनी भारीत असल्याने, सन २०१२ नंतर त्यांची क्षात्र, म्हणजेच स्थूल व ब्राह्म, म्हणजेच सूक्ष्म या दोन्ही स्तरांवर प्रगती होऊन कमी कालावधीत उन्नती होईल. त्या वेळी त्यांचे वेगळेपण सर्वांच्याच लक्षात येईल.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १६.४.२००६, दुपारी ३.१९)
अ. यंदाची गुरुपौर्णिमा अशी साजरी करूया !गुरुपौर्णिमा, गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. प्रत्येकच साधक हा दिवस जास्तीतजास्त चांगल्या पद्धतीने साजरा करण्याचा विचार करत असतो. अर्थात या दिवशी गुरुतत्त्व १ हजार पटीने कार्यरत असल्याने साधकांना त्याचा फायदा अधिक प्रमाणात होत असतो. गुरूंना शिष्याकडून अपेक्षा अशी काहीच नसते. शिष्याने त्याची आध्यात्मिक उन्नती करून घेऊन आत्मकल्याण करावे, यासाठीच ते सर्व करीत असतात. जलद आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी स्वत:त साधकत्व निर्माण करणे गरजेचे असते. साधकाने स्वत:त साधकत्व व कालांतराने शिष्यत्व निर्माण करणे, हीच गुरूंप्रती खर्या अर्थाने कृतज्ञता असते. प.पू. डॉक्टरांनीही साधकांत साधकत्व निर्माण व्हावे, यासाठी सर्वच जिल्ह्यांत साधकत्ववृद्धी शिबिरांचे आयोजन करण्यास मागे सांगितले होते. त्याच दृष्टीने पावले उचलून जास्तीतजास्त प्रयत्न करून आपण स्वत:त साधकत्व निर्माण करून यंदाची गुरुपौर्णिमा साजरी करूया. त्यासाठी `नेमके काय करायला हवे', याची उजळणी या लेखात करूया. संकलक : अँड्. योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. अँड्. योगेश जलतारे १. स्वत:त साधकत्व निर्माण करण्यासाठी साधनेच्या पुढील नऊ अंगांचा अंगिकार करूया ! १ अ. स्वभावदोष-निर्मूलन : यासाठी चुका स्वीकारून व त्यांच्या मुळाशी जाऊन स्वभावदोष शोधणे, त्यांची नोंद तक्त्यात करणे व त्यांवर स्वयंसूचना देणे आदी बाबी नियमित करूया. १ आ. अहं-निर्मूलन : दिवसभरातील प्रत्येकच कृती जाणीवपूर्वक शरणागतीच्या भावाने करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या ज्या कृतींतून किंवा लक्षणांतून आपल्या अहंचे प्रकटीकरण होते, त्या कृतींची किंवा लक्षणांची नोंद करून त्याच्या निवारणासाठी प्रयत्न करूया. १ इ. नेतृत्वगुण : सेवेमध्ये जास्तीतजास्त जबाबदार्या घेऊन त्या चांगल्यात चांगल्या प्रकारे पार पाडूया. त्यासाठी नेतृत्वातील विविध पैलूंचा अभ्यास करून त्यांचे आचरण करूया. वरील तीन अंगे आपण प्रामाणिकपणे अंगिकारल्यास पुढील सहा अंगे खर्या अर्थाने अंगिकारल्यासारखे होईल. १ ई. नामजप : अहंविरहित व दशापराधविरहित आणि शरणागतीच्या भावाने केलेला नामजप भावपूर्णच होतो. त्यासाठी निराळे प्रयत्न करावे लागत नाहीत. १ उ. सत्संग : अहंविरहित व दोषविरहित जीवन जगणे व जोडीला नामजप करणे, म्हणजे एकप्रकारचा सत्संगच झाला असे झाल्यास आपण २४ तास सत्संगात राहू व आपल्याला प्रत्येक गोष्टीतून सत्संग मिळवता येईल. १ ऊ. सत्सेवा : नामासहीत व शरणागतीच्या भावाने केलेली सेवा सत्सेवा होईल. १ ए. त्याग : गुरुपौर्णिमेला त्यागाचे खूप महत्त्व आहे. साधनेची सर्व अंगे नियमितपणे आचरणात आणण्यातून तन, मन व धन यांचा त्याग होईल. एरव्ही आपण साधना सुरू करताच गुरुकृपेला सुरुवात होते; परंतु आपले तन, मन व धन यांचा ५५ टक्के इतका त्याग झाल्यावर गुरुकृपेची अनुभूती आपल्याला घेता येते. ही अनुभूती घेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत. दिवसभरात आपल्याकडून १३ तास शारीरिक सेवा झाल्यास व आपले नामाशी, म्हणजेच ईश्वराशी अनुसंधान राहिल्यास तन व मन यांचा ५५ टक्के त्याग झाला, असे म्हणता येईल. मनाच्या त्यागामध्ये आपल्या मनाविरुद्ध झाले, तरी त्याचा भावनात्मक विचार न करता `गुरूंनी आपल्याला शिकवण्यासाठीच हा प्रसंग आपल्या जीवनात घडवला आहे', असा भावात्मक विचार करणे अंतर्भूत आहे. हा विचार मनात येण्यासाठीच स्वभावदोष व अहं-निर्मूलन प्रक्रिया प्रभावीपणे राबवायला हवी. बुद्धीचा त्याग होण्यासाठी प्रत्येक सेवा `योग: कर्मसु कौशलम्', म्हणजे `कर्म कुशलतेने, परिपूर्णपणे करणे, म्हणजे योग', या नियमाप्रमाणे करायला हवी. लवकरात लवकर मनोलय व बुद्धीलय होणे, हेच अध्यात्मात साध्य करायचे असते. ते त्यागातून साध्य होते. धनाचा त्याग करणे त्यामानाने सोपे असते. पूर्णवेळ साधकांच्या मनात प्रश्न येतो, `आम्ही सर्वच त्याग करून आलो आहोत, तर आमचा धनाचा त्याग कसा होईल ?' त्यांनी गुरूंनी दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा विनियोग काटकसरीने व योग्य पद्धतीने करायला हवा. त्यातून त्यांना धनाचा त्याग साध्य होईल.
१ ऐ. प्रीती : वरील सर्व अंगे आपल्याला निरपेक्ष भावाने व प्रेमाने अंगिकारायची आहेत. यातूनच आपल्यात सर्वांप्रती प्रीती निर्माण होईल. १ ओ. भाववृद्धी : वरील आठ अंगांची परिपूर्ण पूर्तता केल्यास भाववृद्धी निश्चित आहे.
२. एवढे सगळे कधी करावे ? वरील सर्व वाचल्यावर आपल्या मनात प्रश्न येतो, `एवढे सगळे करायचे कधी ?' येथेच आपले प्रयत्न थांबतात. `कसे करायचे', या विचारात आपण काहीच करत नाही. येथे महत्त्वाचा भाग म्हणजे, प.पू. डॉक्टरांनी जर आपल्याला वरीलप्रमाणे करायला सांगितले आहे, तर त्याबाबत त्यांनी विचार केला असेल कि नाही ? साधकाला अशक्यप्राय असलेली गोष्ट प.पू. डॉक्टर करायला सांगतील का ? या गोष्टींचा विचार आपण करायला हवा. आपले दैनंदिन सेवेचे योग्य नियोजन केल्यास वरील सर्व गोष्टी आपणास सहज करता येतील. त्यात काही अडचण असल्यास प्रमुखसेवकांना विचारून घेऊ शकतो.
३. अंतर्मुखता कशी साधावी ? साधनेची वरील अंगे अंगिकारण्यात आणखी एक अडचण असते, ती म्हणजे अंतर्मुखतेचा अभाव. सर्वसाधारणत: `दिवसभरात सेवा करतांना होणार्या चुका व इतर साधकांविषयी मनात येणार्या प्रतिक्रिया लक्षात येत नाहीत किंवा त्यांवर ताबा मिळवता येत नाही. नामजप करतांना किंवा सेवा करतांना एकाग्रता साधत नाही', अशा प्रकारच्या आपल्या अडचणी असतात. यामध्ये आपण शेवटपर्यंत स्वत:च्या स्तरावर चिंतन करायला कमी पडतो. कुठल्याही प्रसंगात आपण `मी कुठे कमी पडलो', याऐवजी परिस्थिती, नियोजन, सहकारी साधक यांना दोष देतो. येथेच नेमकी चूक होते. ही चूक टाळण्यासाठी नेमकी विचारसरणी कशी असायला हवी, हे पुढील उदाहरणांतून समजून घेऊया.
उदा. अ. : `सुनील ऐकत नाही', अशी अनिलची तक्रार आहे. अनिल म्हणतो, ``मी सुनीलच्या चुका वेगवेगळया प्रकारे सांगून पाहिल्या; परंतु तो ऐकतच नाही. त्यामुळे आता मी त्याला सांगणे सोडून दिले. येथे अनिलने हा अभ्यास सुनीलच्या स्तरावर केलेला आहे. त्यामुळे तो `सुनील ऐकत नाही, म्हणजे सुनीलमध्ये ऐकण्याची वृत्ती नाही', या निष्कर्षाप्रत पोहोचला. अनिलने शेवटपर्यंत स्वत:च्या स्तरावर चिंतन केल्यास ते पुढीलप्रमाणे असेल. - सुनील माझे ऐकत नाही; परंतु प.पू. डॉक्टर किंवा डॉ. दुर्गेश सामंत यांनी सांगितलेले ऐकेल. याचा अर्थ `त्याच्यात ऐकण्याची वृत्ती नाही', असे नाही. उलटपक्षी `माझ्यातच काहीतरी कमी आहे. मी प.पू. डॉक्टर किंवा दुर्गेशदादा यांच्यासारखा झाल्यास सुनील माझे ऐकेल. त्यामुळे मलाच माझे प्रयत्न वाढवायला हवेत', असे विचार केल्यास अनिलच्या मनातून सुनीलविषयीच्या नकारात्मक भावना निघून जातील व तो त्याच्यासाठी सकारात्मक विचार व प्रयत्न करू लागेल. येथे सुनील सुधारेल अथवा न सुधारेल; मात्र अनिलमध्ये सुधारणा होऊन तो प.पू. डॉक्टर किंवा दुर्गेशदादा यांच्यासारखा होईल व हेच प.पू. डॉक्टरांना अपेक्षित आहे. उदा. आ. : श्री दत्त मंदिरातील सत्संग बंद पडला. त्या संदर्भात सत्संगसेवक श्री. शिंदे म्हणाले, ``सत्संगातील संख्या कमी झाली आहे. येणारे जिज्ञासू नसून श्रवणभक्त आहेत व काहींना खूपदा बोलावूनही ते येत नाहीत. त्यामुळे सत्संग बंद करावा लागला.'' येथेही श्री. शिंदे यांनी सत्संग बंद पडण्यामागील कारणांचा विचार करतांना इतरांच्या स्तरावरच केला. स्वत:च्या स्तरावर विचार केल्यास त्यांची विचारसरणी पुढीलप्रमाणे असेल, `मी सत्संगात घेत असलेला विषय सगळयांना समजतो का ? सत्संगाची वेळ त्यांना सोयीची आहे का ? त्यांच्या मनातील शंकांचे निरसन मी व्यवस्थित केले आहे का ? सत्संगात येण्यात त्यांना आणखी काही अडचणी नाहीत ना ?' येथेही सत्संग बंद पडला, तरी तो सुरू रहाण्यासाठी श्री. शिंदे यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केल्याने त्यांची उन्नती निश्चित होईल.
४. प्रार्थनेने अशक्य काय आहे ? वरील प्रयत्नांच्या जोडीला प्रार्थना केल्यास अंतर्मुखता साधणे व वरील नऊ अंगांनुसार साधना करणे अशक्य नाही. काही वेळा वाईट शक्तींनी काळे आवरण आणल्याने आपल्याकडून हव्या त्या प्रमाणात व नियमितपणे प्रयत्न होत नाहीत. येथेही आपण `काळे आवरण आल्याने प्रयत्न होत नाहीत', असे म्हटले, तर दुसर्या टोकाचाच विचार झाला. प.पू. डॉक्टरांनी सांगितले आहे, ``आपली आध्यात्मिक पातळी वाढली, तर वाईट शक्ती आपल्याला त्रास देऊ शकत नाहीत.'' याचा अर्थ आपणच आपली भक्ती वाढवून आध्यात्मिक बळ वाढवले पाहिजे. त्यासाठी वरील प्रयत्नांच्या जोडीला जास्तीतजास्त प्रार्थना केल्यास ते अशक्य नाही.
५. प्रार्थना या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वरील ध्येय आम्हा साधकांना लवकरात लवकर प्राप्त होओ, हीच श्री गुरुचरणी प्रार्थना !
आ. साधकांनो, भक्तीमार्गानुसार गुरुपौर्णिमा साजरी करून जास्तीतजास्त गुरुकृपा संपादन करूया !संकलक : श्री. भूषण कुलकर्णी, नेसाई, गोवा
सनातन संस्थेतर्फे देशात १९९७ सालापासून व विदेशात २००० सालापासून गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा होत आहे. यंदाही संस्थेतर्फे सर्वत्र गुरुपौर्णिमेचा प्रसार, निधीसंकलन करणे व जाहिराती मिळवणे, या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. काही वेळेस गुरुपौर्णिमेचे आयोजन करतांना एक प्रकारची मरगळ दिसून येऊ शकते. त्यासाठी कारणीभूत उत्साह, चैतन्य व भाव यांची कमतरता, म्हणजेच भक्तीमार्गाचा अभाव आहे, ही गोष्ट साधकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. तसेच गुरुपौर्णिमेच्या संदर्भात करावयाच्या प्रत्येक छोट्या सेवेतूनही आपली देवावरची भक्ती कशी वाढेल, ते पहाणे आवश्यक आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केल्या जाणार्या प्रत्येक सेवेतून आपली व्यष्टी व समष्टी साधना होणार आहे. गुरुपौर्णिमेच्या तयारीचा एक भाग म्हणून आपण विविध समित्या स्थापन करतो, त्याविषयी काही मुद्दे या लेखातून पाहूया. तसेच प्रत्येक साधकाला गुरुतत्त्वाचा १ हजार पटीने फायदा कसा होईल व सातत्याने गुरुकृपा कशी संपादन करता येईल, यांविषयीचे विवेचन येथे केले आहे.
१. गुरुपौर्णिमेचा जास्तीतजास्त फायदा मिळवण्यासाठी करावयाचे उपाय अ. प्रार्थना, वैयक्तिक नामजप व सातत्याने कृतज्ञता वाढवून गुरुपौर्णिमेच्या वेळी होणार्या वाईट शक्तींच्या त्रासांवर मात करावी. आ. आपण साधना म्हणून सत्सेवेला ३० टक्के महत्त्व द्यावे. जे साधक नोकरी करत असतील, त्यांनी रजेचे नियोजन करून सेवेत जास्तीतजास्त वेळ सहभागी होण्याचा प्रयत्न करावा. पूर्णवेळ साधकांनी उपलब्ध वेळेचा क्षणन्क्षण गुरुपौर्णिमेच्या सेवेसाठी कसा उपयोगात आणता येईल व आपली सेवा ही गुरुसेवा कशी होईल, यांकडे लक्ष द्यावे. इ. त्यागाला ३० टक्के महत्त्व आहे. त्यामुळे तन, मन, धन, वेळ, बुद्धी व अहं यांचा साधनेसाठी जास्तीतजास्त त्याग करावा. गुरुकृपेने गेल्या वर्षभरात आपण जी काही साधना व आध्यात्मिक उन्नती करू शकलो, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची गुरुपौर्णिमा हीच एकमेव संधी आहे. ही कृतज्ञता गुरुपौर्णिमेनिमित्त उत्कृष्ट सेवा करूनच व्यक्त करू शकतो.
२. व्यष्टी व समष्टी साधनेच्या दृष्टीने होणारे फायदे अ. ज्या साधकांमध्ये भक्तीभाव, गुरूंच्या कार्याविषयी तळमळ व क्षात्रवृत्ती आहे आणि ज्या साधकांची प्रार्थना व नाम जास्तीतजास्त सुरू आहे, अशा साधकांकडे हे गुरुतत्त्व जास्त प्रमाणात आकृष्ट होणार आहे. आ. साधकांना `सत्पात्रे दानम्' करण्याची ही वर्षभरातील दुर्लभ संधी आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुकार्यासाठी केलेले अर्पण साधकाच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट ठरते. इ. समाजात अध्यात्माविषयी तात्त्विक मुद्दे सांगावयाचे असल्यामुळे आपला अभ्यास व बुद्धीचा निश्चय होतो. तशीच आपली श्रद्धाही वाढते. ई. अध्यात्मप्रसार केल्यामुळे आपला अहं कमी होण्यास मदत होते. उ. सेवा करत असतांना आपले स्वभावदोष लक्षात येतात व ते कमी करण्यासाठी गुरुचरणी शरणागतभाव वाढतो.
३. समष्टी साधनेच्या दृष्टीने होणारे फायदे अ. `संघे: शक्ति कलौयुगे ।' या उक्तीप्रमाणे समष्टी साधनेचा प्रत्येक साधकाला फायदा होण्यासाठी एखाद्या साधकाची चूक जर आपल्या लक्षात आली, तर ती त्याला वेळीच लक्षात आणून द्यावी. यामुळे जितक्या चुका कमी तितका गुरुतत्त्वाचा अधिकाधिक फायदा साधकांना होईल.
आ. धर्मसंस्थापनेचे गुरूंचे कार्य हे अवतार कार्य आहे. त्यामुळे या कार्यातील खारीचा वाटा म्हणून समाजात गुरुपौर्णिमा व अध्यात्म यांचा जास्तीतजास्त प्रसार केल्याने धर्मसंस्थापनेच्या कार्याला हातभार लागेल.
४. गुरुपौर्णिमेनिमित्त परिणामकारक प्रसार करण्यासाठी न्यावयाचे प्रसारसाहित्य अ. संस्थेच्या कार्याची माहिती असलेली प्रसारधारिका आ. ग्रंथ, लघुग्रंथ, ध्वनीफिती व ध्वनीचित्र तबकडी इ. नामपट्ट्या, वास्तू शुद्ध करण्यासाठी करावयाचे नामपट्ट्यांचे सूक्ष्म-छत व त्याबद्दलची माहितीपत्रके, देवतांची सात्त्विक चित्रे ई. सनातनची नियतकालिके, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेले विशेषांक उ. गुरुपौर्णिमेचे निमंत्रण व आवाहनपत्रक ऊ. निधीसंकलनाचे पावतीपुस्तक ए. जाहिरातीचे रिलीज ऑर्डर फॉर्म
५. गुरुपौर्णिमेनिमित्त जाहिराती किंवा निधीसंकलन करतांना घ्यावयाची काळजी अ. ईश्वरी कार्यासाठी केवळ जाहिरात मिळवणे, हा उद्देश नसावा. जाहिरातदारांना व देणगीदारांना या कार्यासाठी जाहिरात किंवा अर्पण दिल्याने गुरुतत्त्वाचा कसा फायदा होतो, हे उदाहरणांसहित समजावून सांगावे. आ. `गुरुपौर्णिमा विशेषांका'च्या माध्यमातून जे ज्ञान आपण समाजाला देत आहोत, ते समजावून सांगावे. इ. जाहिरातदार व देणगीदार साधक कसे होतील, या गोष्टीला जास्त प्राधान्य द्यावे.
६. गुरुपौर्णिमा महोत्सवाची पूर्वतयारी गुरुपौर्णिमा महोत्सवाची तयारी करतांना विविध समित्यांचे आयोजन करणे आवश्यक आहे. यामध्ये पुढील विविध सेवा करण्यार्या साधकांची नेमणूक करावी. अ. प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रण देणे आ. साफसफाई इ. स्वागत-कक्ष ई. ग्रंथप्रदर्शन उ. अध्यात्मविषयक प्रदर्शन ऊ. नामपट्ट्या व देवतांची सात्त्विक चित्रे यांचे प्रदर्शन ए. सूक्ष्म-जगताविषयी माहिती व त्याविषयी प्रदर्शन ऐ. नियतकालिकांचे प्रदर्शन ओ. आरती म्हणणारे साधक व त्यांचा सराव औ. कापडीफलक लावणे व ते काढणे अं. सूत्रसंचालन करणारे साधक क. पूजा करणारे व सांगणारे साधक
गुरुपौर्णिमेची तयारी उत्कृष्ट व गुरूंना अपेक्षित कशी होईल, या दृष्टीने प्रत्येक साधकाने प्रयत्नशील रहावे. याचबरोबर सेवा करतांना होणार्या त्रुटींचे बारकाईने निरीक्षण करणार्या व त्यात बदल सांगणार्या साधकाची निवड करावी. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात होणार्या चुका अगोदरच लक्षात येऊन वेळीच दुरुस्त केल्या जातील. असे केल्याने या वर्षी होणारी गुरुपौर्णिमा चुकांविरहित होऊन प्रत्येक साधकाला जास्तीतजास्त आध्यात्मिक लाभ मिळेल.
७. गुरुपौर्णिमेची पूर्वतयारी करतांना व प्रसारासाठी बाहेर जातांना घ्यावयाची काळजी अ. स्वत:च्या नामजपावर लक्ष केंद्रित करून ते संख्यात्मक व गुणात्मक दृष्ट्या वाढवावे. आ. प्रसाराला निघण्यापूर्वी अर्धा तास नामजप करून निघावे. त्यामुळे आपल्याभोवती संरक्षककवच निर्माण होण्यास मदत होईल. तसेच गुरूंना अपेक्षित अशी सेवा व्हावी व आपल्याभोवती संरक्षककवच असावे, यांसाठी दर अर्ध्या तासाने प्रार्थना करावी व कृतज्ञता व्यक्त करावी. इ. विभूतीचे पाणी जास्तीतजास्त प्राशन करावे व आवश्यकतेनुसार विभूती लावावी. ई. दिवसभर प्रसारामध्ये आपल्याकडून झालेल्या चुका परत होऊ नयेत, यासाठी उपाययोजना करावी. सेवा करतांना आलेल्या अडचणी, वेळेच्या नियोजनातील त्रुटी, लक्षात आलेले स्वभावदोष, तसेच दिवसभरामध्ये झालेले निधीसंकलन, मिळालेल्या जाहिराती व झालेली ग्रंथविक्री यांचा हिशोब या सर्व गोष्टी लिहून ठेवाव्यात. तसेच हे सर्व आपल्या जिल्ह्यातील/विभागातील जबाबदार सेवकाला सांगावे. उ. दुसर्या दिवशी प्रसाराला जाण्याचे नियोजन हे लिखित स्वरूपात असावे. प्रसाराला घेऊन जातांना न्यावयाचे सर्व साहित्य आवश्यकतेप्रमाणे आहे कि नाही, हे तपासावे व आवश्यकतेनुसार त्याची मागणी करावी. ऊ. रात्री झोपण्यापूर्वी १५ मिनिटे नामजप करावा व नामपट्ट्यांचे मंडल करावे.
८. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुढील गोष्टी कटाक्षाने करा ! अ. नामजप करत गुरुपौर्णिमेचे आयोजन केलेल्या वास्तूची स्वच्छता व गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी. आ. सेवा करत असतांना दर अर्ध्या तासाने सामूहिक प्रार्थना करावी. त्यासाठी घंटा वाजवण्याचे नियोजन करावे. इ. दर एका तासाने भाव असलेल्या साधकाने विभूती फुंकरावी. वाईट शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी साधकांनी आपला वैयक्तिक नामजप प्रार्थनेसह शरणागतभावाने करावा. ई. सेवा करत असतांना दर अर्ध्या तासाने विभूतीचे पाणी प्यावे. खाद्यपदार्थांमध्ये विभूती घालून प्रार्थना करूनच ते पदार्थ खावेत. उ. साधकांचा भक्तीभाव वाढण्यासाठी प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांची ध्वनीफीत लावावी अथवा एकत्रित नामजप करावा. ऊ. वाईट शक्तींचा तीव्र त्रास असणार्या साधकांना वेगळे बसवण्याची व्यवस्था करावी. ए. उपस्थित जिज्ञासू, साधक व वक्ता यांच्या मन व बुद्धी यांवर आलेले आवरण दूर होण्यासाठी व त्यांना विषयाचे आकलन व्हावे, यांसाठी भाव असलेल्या साधकांनी श्री गणेशाला प्रार्थना करावी. ऐ. प्रत्यक्ष गुरूंचेच पूजन करत आहोत, या भावाने गुरुपूजन करावे व सांगावे. ओ. गुरुपौर्णिमेचे प्रवचन करणार्या व सूत्रसंचालन करणार्या साधकांनी कार्यक्रमाच्या अगोदर आपला ५ तास नामजप पूर्ण होईल, असे पहावे. औ. गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा करत असतांना आलेल्या अनुभूती व गुरुपौर्णिमा कार्यक्रमानिमित्तचे लिखाण त्वरित नजीकच्या संकलन विभागास पाठवावे.
इ. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची उपस्थिती वाढवण्यासाठी, तसेच कार्यक्रम चुकांविरहित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा !डॉ. (कु.) माया पाटील गुरुपौर्णिमा, म्हणजे पृथ्वीतलावर गुरुतत्त्व १ हजारपटीने प्रक्षेपित होऊन कार्यरत असणारा दिवस. सर्व साधकांच्या दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. पृथ्वीतलावर १ हजार पटीने प्रक्षेपित होणार्या गुरुतत्त्वाचा फायदा सर्वांना व्हावा, यासाठी सर्व साधकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गुरुपौर्णिमा जवळ येत आहे. त्या दिवशी कार्यक्रमाला जास्तीतजास्त जिज्ञासूंनी यावे, यासाठी आपण प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच त्या दिवशीचा कार्यक्रम चुकांविरहित व उत्कृष्ट होण्यासाठीही आपल्याकडून प्रयत्न व्हायला हवेत. - डॉ. (कु.) माया पाटील, अखिल भारत प्रसारसेविका
१. कार्यक्रमाची उपस्थिती जास्तीतजास्त वाढण्यासाठी पुढील प्रयत्न करावेत अ. निमंत्रणपत्रिका जास्त काढून त्या वितरित करण्यावर भर देऊ नये. बर्याचदा लोक निमंत्रण पत्रिका घेतात व त्या तशाच ठेवून देतात, त्यांचा वापर करत नाहीत. त्यामुळे पत्रिकांची छपाई जास्त करून वापरू नये. आ. आपल्या ओळखीच्या व्यक्तींच्या नावांची यादी आताच तयार करून ठेवावी व त्यांना त्या दिवशीच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यास सांगावे. इ. जाहिरातदार व अर्पणदार यांच्याकडून जाहिराती व अर्पण घेतांनाच त्यांना निमंत्रित करावे. नंतर आवश्यकता असल्यास त्यांना दूरध्वनीवरून निमंित्रित करू शकतो. ई. प्रत्येक साधकाने किमान १० जिज्ञासू कार्यक्रमाला येतील, अशी जबाबदारी घ्यावी. केंद्रामध्ये १०० साधक असतील, तर कार्यक्रमाला १ हजार जिज्ञासूंची उपस्थिती असणे कठीण नाही. उ. गुरुपौर्णिमेच्या शेवटच्या आठवड्यात सर्व साधकांनी कार्यक्रमाला उपस्थिती कशी वाढेल, या दृष्टीने नियोजन करून त्याप्रमाणे प्रसार करण्याकडे लक्ष द्यावे. ऊ. बँका, पतसंस्था, सरकारी कार्यालये इत्यादी ठिकाणी जाऊन सर्वांना एकत्रित करून ५ ते १० मिनिटांचा विषय सांगावा. यामध्ये गुरुपौर्णिमेचे महत्त्व, कार्यक्रमाचे स्वरूप व गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये व फायदे, असे मुद्दे एकत्रित करून सांगितल्यास लोकांना कार्यक्रमाला येण्याचे महत्त्व पटेल व ते कार्यक्रमाला येतील. ए. वरील विषयाला अनुसरून कोपरा-सभा घ्याव्यात, तसेच देवळांमध्येही विषय सांगण्यास थांबावे. ऐ. देवळांमध्ये फलक असल्यास फलकावर किंवा भित्तीपत्रके (पोस्टर्स) तयार करून त्यांवर, तसेच गल्लीतील फलकांवर गुरुपौर्णिमा सोहळयाचे स्थळ व वेळ चार दिवस अगोदरच लिहून ठेवावी. ओ. प्रमुखसेवकांनी सर्व साधकांचे विभागानुसार नियोजन करून त्याचा पाठपुरावा करावा.
२. कार्यक्रम चुकांविरहित व उत्कृष्ट करण्यासाठीचे प्रयत्न आतापासूनच करा ! अ. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम चुकांविरहित होण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी करावयाच्या सर्व सेवांचा सराव आताच करून घ्या. यामध्ये गुरुपूजन करणे, प्रवचन करणे, धार्मिक विधींचे प्रात्यक्षिक करणे, कार्यस्थळाच्या ठिकाणची सर्व सजावट इत्यादी. आ. सत्यम्-शिवम्-सुंदरम् हे ईश्वराचे तत्त्व आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी १ हजार पटीने कार्यरत असणारे गुरुतत्त्व ग्रहण होण्यासाठी कार्यक्रमामध्ये चुका होणारच नाहीत, याकडे आपण लक्ष द्यायला हवे. त्यासाठी प्रत्येक कृती करण्यापूर्वी त्याचा सराव करणे, समयमर्यादा घालून सेवा पूर्ण करणे, तसेच प्रमुखसेवकांनी प्रत्येक सेवा स्वत: पहाणे यांकडे लक्ष द्यावे. `(कोणतीही) सेवा इतर साधकांनी केली असेल', असे गृहीत धरू नये. इ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यासपिठावर करावयाच्या सेवा भावनेपोटी कोणालाही करावयास सांगू नये. ज्या साधकांना व्यासपिठावरील सेवा चांगल्या करावयास येतात, त्यांनाच त्या करायला सांगाव्यात, उदा. सूत्रसंचालन करणे, धार्मिक विधीतील कृती करणे इत्यादी.
अ. गुरूंकडून ज्ञान मिळवण्यापेक्षा त्यांची सेवा करणे जास्त महत्त्वाचे !अध्यात्मात सर्वस्वाचा त्याग करायचा असतो. शिष्य जेव्हा गुरूंकडून ज्ञान मिळवतो, तेव्हा तो त्याग करण्याऐवजी काहीतरी मिळवत असतो. याउलट सेवा करतांना तन व मन यांचा त्याग होतो; म्हणूनच जिज्ञासूपेक्षा सेवा करणारे शिष्य गुरूंना जास्त आवडतात. - डॉ. आठवले (२३.७.२००७, सायं. ६)
`महर्षी व्यास कोण ?' - धर्मद्रोही हिंदु सरकारी वकिलाचा प्रश्नमहाराष्ट्रातील एका तालुक्याच्या ठिकाणी एका न्यायालयात एका प्रकरणाची सुनावणी सुरू होती. हे प्रकरण हिंदु व मुसलमान यांच्यात झालेल्या वादाचे होते. न्यायालयात पोलिसांची बाजू मांडतांना सरकारी वकिलांनी `महर्षी व्यास कोण ?' असा प्रश्न उपस्थित केला. सरकारी वकील हिंदु असतांना त्यांनी असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे ही सुनावणी ऐकण्यासाठी न्यायालयात उपस्थित असलेल्या काही हिंदूंना त्या वकिलांची कीव आली, तर काही धर्माभिमानी हिंदूंच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली. ही सुनावणी ऐकणार्या अशाच एका धर्माभिमानी हिंदूने व्यक्त केलेले विचार येथे देत आहोत.
हिंदूंमध्ये धर्माभिमानाचा अभाव असल्यामुळेच धर्मद्रोही सरकारी वकिलांकडून हिंदूंना दुखावणारा प्रश्न उपस्थित या प्रकरणाची सुनावणी सुरू असतांना न्यायालयात उपस्थित असलेल्यांमध्ये ८० टक्के लोक हिंदू होते. हिंदु धर्मियांत महर्षी व्यासांना आदराचे स्थान आहे. महर्षी व्यासांना आदिगुरु मानले जाते. हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व असणारी गुरु-शिष्य परंपरा त्यांच्यापासूनच सुरू झाली. प्रत्येक विषय त्यांनीच निर्माण केला आहे. महर्षी व्यासांच्या कृपेमुळेच मानवाला विविध विषयांचे ज्ञान होत आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हिंदू प्रतीवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमा हा दिवस `व्यासपौर्णिमा' म्हणजेच `गुरुपौर्णिमा' म्हणून साजरी करतात. हिंदूच नव्हे, तर प्रत्येक मनुष्याने त्यांच्याप्रती कृतज्ञ असले पाहिजे, असे महान कार्य महर्षी व्यासांनी केले आहे. असे असतांना जन्माने हिंदु असणार्या वकिलांनी मोठ्या संख्येने हिंदू उपस्थित असतांनाही `महर्षी व्यास कोण ?' असा प्रश्न जाहीररीत्या उपस्थित केलाच कसा ? अर्थात याचे उत्तर आहे, हिंदूंमध्ये असलेला धर्माभिमानाचा अभाव.
हिंदूंमध्ये धर्मप्रबोधनाला पर्याय नाही ! महंमद पैगंबर किंवा येशू िख्र्तास् कोण ? असा प्रश्न प्रत्यक्षात नव्हे, तर कोणी स्वप्नातही विचारू शकत नाही. मुसलमानांना असलेला त्यांच्या धर्माप्रतीचा प्रचंड अभिमान, हेच याचे कारण आहे. सरकारी वकिलांनी असा प्रश्न उपस्थित करून त्यांना हिंदु धर्माचा काडीमात्र अभिमान नसल्याचेच दाखवून दिले आहे. या सरकारी वकिलांनी आपली बुद्धी थोडी जरी चालवली, तरी लक्षात येईल की, महर्षी व्यासांमुळेच आज त्यांना वकिली करता येत आहे. या सुनावणीला बरेच दिवस उलटले आहेत, तरी एकाही हिंदूने याबाबत त्यांना जाब विचारलेला नाही. हिंदूंची ही स्थिती केवळ धर्मप्रबोधनानेच बदलू शकते.
मुसलमानधार्जिणेपणा जपणार्या हिंदूंना हिंदुस्थानात रहाण्याचा काय अधिकार ? सुनावणी सुरू असलेले प्रकरण हिंदु व मुसलमान यांच्यातील वादाचे होते. या प्रकरणात आरोपीच्या पिंजर्यात हिंदू उभे होते. केवळ मुसलमानांना खूष करण्यासाठी वकील महोदयांनी असा प्रश्न विचारला असल्याची शक्यता आहे. स्वधर्माचा काडीचाही अभिमान नसणार्या व केवळ मुसलमानांना खूष करू पहाणार्या हिंदु वकिलांना हिंदुस्थानात रहाण्याचा काय अधिकार ? त्यांनी मुसलमानांच्या राष्ट्रात जाऊन राहिलेलेच बरे. हिंदु धर्माचा थोडाही अभ्यास नसलेले असे जन्महिंदू पाहिले की, एका मुसलमान व्यक्तीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. कर्नाटकात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो असता मला एक मुसलमान व्यक्ती भेटली होती. तिला हिंदु धर्माबद्दल खूप कौतुक होते. तिचा हिंदु धर्माबद्दल, मंदिरांबद्दल, हिंदूंचे सण व रूढी परंपरा यांबद्दल खूप अभ्यास होता. त्या व्यक्तीने परिसरातील मंदिरांची माहिती मला विस्तृतपणे सांगितली होती. हिंदु धर्माचे कौतुक असणारे असे मुसलमान कोठे व जन्माने हिंदु असूनही `महर्षी व्यास कोण ?' असा प्रश्न विचारणारे निलाजरे वकील कोठे ? - एक कट्टर हिंदु
गुरुपौर्णिमेच्या संदर्भातील अनुभूतीरेल्वेतील बाकड्याखाली ठेवलेल्या गुरुपौर्णिमा विशेषांकांतील चैतन्य सहन न झाल्यामुळे त्या बाकड्यावर बसलेली मुसलमान मुलगी प्रकट होणे १०.७.२००६ रोजी मी जळगाव जिल्ह्याच्या गुरुपौर्णिमा विशेषांकांचे गठ्ठे घेऊन `भुसावळ पॅसेंजर'ने जळगावला जाण्यास निघालो. मी विशेषांकांचे गठ्ठे माझ्या व शेजारच्या बाकाखाली ठेवले होते. इगतपुरी येथे एक मुसलमान व्यक्ती व तिची मुलगी माझ्या समोरच्या बाकावर येऊन बसले. अर्ध्या तासानंतर ते दोघे माझ्या शेजारी बसले. काही वेळाने ती मुलगी प्रकट झाली व हातवारे करून ओरडू लागली, `काझी, मुझे मत मारो, मैं इसे छोड जाऊंगी, मुझे कोडे बहुत लगते है ।' ती प्रकट झाल्यावर मी त्या बाकावरून उठलो व दुसर्या बाकावर बसलो. त्या वेळी माझा नामजप सुरू होता. पूर्ण प्रवासात तिच्याजवळ कुणीही बसले नाही. ती मुलगी तीन तास प्रकटावस्थेत होती. ते दोघे चाळीसगाव येथे उतरले. नंतर माझ्या लक्षात आले, `बाकाखाली गुरुपौर्णिमा विशेषांकांचे गठ्ठे ठेवलेले होते. त्या विशेषांकांतील चैतन्य सहन न झाल्यामुळे त्या मुलीला त्रास झाला व ती प्रकट झाली.' - श्री. जसराज करगुटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सभागृहात गेल्यावर तेथील चैतन्यामुळे खूप चांगल्या अनुभूती आल्याने साधनेबद्दलची तळमळ वाढणे मी १.१.२००४ मध्ये सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यास सुरुवात केली. माझी साधनेतील पहिली गुरुपौर्णिमा आली. आम्हाला अर्पणाचे महत्त्व सांगितले होते. त्यानुसार समाजात जाऊन अर्पण गोळा करायचे होते. जेव्हा मी प्रथम अर्पण मागण्यासाठी आमच्या कॉलनीत गेले, तेव्हा तेथील लोकांनी मला म्हटले, `तुम्ही असे मागणे केव्हापासून सुरू केले.' त्या वेळी मला खूप राग आला होता. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सभागृहात गेल्यावर तेथील चैतन्यामुळे मला खूप चांगल्या अनुभूती आल्या. तेव्हापासून माझी साधनेबद्दलची तळमळ वाढत गेली. त्याच वेळी मी मनाशी ठरवले, `आता इथून मागे जायचे नाही.' त्यानंतर मी भावसत्संगाला जाणे, ज्येष्ठ साधकांच्या मार्गदर्शनाला जाणे, अभ्यासवर्गालाजाणे, विविध कार्यक्रमात सहभागी होणे सुरू केले. एकदा भावसत्संगाहून येण्यास उशीर झाल्यामुळे माझे पती माझ्यावर खूप चिडले होते; परंतु दुसर्या आठवड्यात जेव्हा भावसत्संगाच्या वेळी ते मला नेण्यासाठी आले, तेव्हा तेथील चैतन्य पाहून त्यांना खूप चांगले वाटले व तेव्हापासून त्यांनीही साधनेला सुरुवात केली.
गुरुपौर्णिमेच्या ठिकाणी सेवा करतांना प्रथम विरोध करून नंतर स्वत:हून कापडी फलक लावण्यास परवानगी देणे गुरुपौर्णिमेच्या ठिकाणी संस्थेचे कापडी फलक लावतांना सभागृहाच्या मालकांनी ते लावण्यास मनाई केली व रागवायला सुरुवात केली. आम्ही उपस्थित साधकांनी त्यांना प्रथम नम्रतापूर्वक समजावण्याचा प्रयत्न केला; पण ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. मी सर्व साधकांना प्रार्थना करण्यास सुचवून आम्ही सर्वांनी प.पू. डॉक्टरांना प्रार्थना केली. त्यानंतर १० मिनिटांनी त्या गृहस्थांनी बाहेर येऊन `जरा बाजूला बॅनर लावा', असे स्वत:हून सांगितले. त्या क्षणी आम्हाला गुरुतत्त्वाचा महिमा अनुभवायला मिळाला. - सौ. शैलजा वि. अवतरे, कराड (२००६)
समोर प.पू. भक्तराज महाराज व प.पू. डॉक्टर बसलेले दिसणे व भाव जागृत होणे `आज प्रथमच मला `भाव म्हणजे काय असतो', हे अनुभवायला मिळाले. माझ्या समोरच प.पू. भक्तराज महाराज व प.पू. डॉक्टर बसलेले मला दिसले. माझ्या डोळयांतून थंड अश्रू येत होते. आज मला नेहमीप्रमाणे जराही त्रास जाणवला नाही.' - सौ. रुची कृष्णा, मेलबोर्न, ऑस्ट्रेलिया. |