नमस्कार करतांना डोळे का मिटावेत ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
`दोन्ही हात जोडून नतमस्तक होणे, म्हणजे ईश्‍वराला किंवा समोरच्या व्यक्‍तीतील देवत्वाला प्रणाम करणे होय। आपल्याच अंतर्यामी ईश्‍वराचे दर्शन व्हावे, यासाठी ईश्‍वराला किंवा आदरणीय व्यक्‍तीला वंदन करतांना डोळे मिटावेत.'

संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'
Read more...

मृतदेहाला नमस्कार करण्याऐवजी देवालाच नमस्कार करून प्रार्थना का करू नये ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
कलीयुगात कर्मकांडानुसार `मृतदेहाला चांगली गती प्राप्‍त होऊ दे', अशी ईश्‍वराला प्रार्थना करून मृतदेहाला नमस्कार करण्याची प्रथा आहे. मृतदेहाला नमस्कार करण्याऐवजी देवालाच नमस्कार करून प्रार्थना का करू नये ?

उत्तर : - असे करण्याने कलीयुगातील जिवांसमोर प्रत्यक्ष कृतीतून `थोरामोठ्यांचा आदर राखावा', असा आदर्श निर्माण करणे अशक्य होईल. कलीयुगातील पिढी जी धर्मभ्रष्ट होत चालली आहे, त्या पिढीला प्रत्यक्ष आदर्श वर्तनाच्या निम्न स्तराला येऊन शिकवणेच क्रमप्राप्‍त आहे. कलीयुगातील जीव हे आध्यात्मिकदृष्ट्या अज्ञानी असल्याने त्यांना प्रत्येक गोष्ट त्या त्या स्थळी जाऊन, तिथे नमस्कारासारखी प्रत्यक्ष कृती करून शिकवणे आता महत्त्वाचे बनले आहे. मृतदेहासाठी ईश्‍वराला मानस-नमस्कार करून प्रार्थना केल्यास ते इतरांना कळणार नाही; कारण ते कळण्यासाठी आध्यात्मिक क्षमताच हवी. कलीयुगामधील जिवांमध्ये ती नसल्याकारणाने प्रत्यक्ष कृती करणेच आवश्यक ठरते; म्हणून मृतदेहातील देवाला नमस्कार करणे जास्त चांगले. या कृतीने भावनिक तसेच आध्यात्मिक हे दोन्ही उद्देश साध्य होतात.

संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'

इंग्रजी मध्ये वाचाण्यासाठी येथे टिचकी मारा
Read more...

मृतदेहाला नमस्कार करावा का ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

त्रेता व द्वापार या युगांतील जीव हे कलियुगातील जिवांच्या तुलनेत खूपच सात्त्विक असल्याने त्यांच्या मृतदेहाला नमस्कार करणे योग्य असले, तरी कलियुगात तसे करणे केवळ रूढीमुळे चालू आहे का ? तसे असल्यास ती रूढी बंद करावी का ?

उत्तर : मृतदेहाला नमस्कार करण्याने त्याच्याबद्दल आदराची भावना व्यक्‍त करून इतरांसमोर वरिष्ठांचा मान राखावा, हा आदर्श ठेवता येतो. कलियुगात या प्रक्रियेतून आध्यात्मिक स्तरावरील फायदा न मिळता फक्‍त भावनिक स्वरूपाचाच फायदा मिळणे शक्य होते म्हणून ही रूढी बंद करू नये, तर त्यातून आध्यात्मिक फायदा कसा मिळवावा, हे शिकावे. जिवाची सात्त्विकता कमी झाल्याने कलियुगात या प्रक्रियेला रूढीचेच स्वरूप प्राप्‍त झाले आहे; परंतु `भाव तेथे देव' या उक्‍तीप्रमाणे मृतदेहाला म्हणजेच मृतदेहातील ईश्‍वरालाच आपण नमस्कार करत आहोत, या भावाने आपण त्याच्यासमोर नतमस्तक झालो, तर मृतदेहातील ईश्‍वरी अंश प्रकट होऊन आपल्याला त्याचा आशीर्वाद मिळण्यास मदत होते; कारण ईश्‍वर हे अविनाशी तत्त्व आहे, त्याला देहबंधन नाही.

संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'

इंग्रजी मध्ये माहीती हवी असल्यास येथे टिचकी मारा

Read more...

एकमेकांना भेटतांना कशा प्रकारे नमस्कार करावा ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

परस्परांना भेटतांना एकमेकांसमोर उभे राहून दोन्ही हातांची बोटे जुळवून अंगठ्यांची टोके स्वत:च्या अनाहतचक्राशी टेकवून नमस्कार करावा. असा नमस्कार केल्याने जिवात नम्रभावाचे संवर्धन होऊन ब्रह्मांडातील सात्त्विक लहरी जिवाच्या चार बोटांतून संक्रमित होऊन अंगठ्यातून शरिरात गेल्यामुळे जिवाचे अनाहतचक्र जागृत होते. यामुळे जिवाची आत्मशक्‍ती कार्यरत होते. तसेच परस्परांना नमस्कार केल्याने एकमेकांकडे आशीर्वादात्मक लहरींचे प्रक्षेपण होते. यामुळे दोघांनाही दोघांतील जागृत झालेल्या देवत्वाचा लाभ मिळण्यास मदत होते.'





संदर्भ : सनातन-निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'


वाचा : Why 'Namaskar' and not a 'hand shake'?

.
Read more...

सौभाग्यवतीने ज्येष्ठांना नमस्कार करतांना तीन वेळा हात खाली-वर का करावा ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
सौभाग्यवती स्त्री ही आदिमायेच्या अप्रकट निर्गुण स्तरावरील सुप्‍त शक्‍तीचे द्योतक आहे। ती मायेतूनही अद्वैत साधून देणारे आदिशक्‍तीचे सगुण रूप आहे. ज्या वेळी आपण कुठल्याही गोष्टीचा त्रिवार उच्चार करतो किंवा एखादी गोष्ट त्रिवार करतो, त्या वेळी ईश्‍वराची संकल्पशक्‍ती इच्छा, क्रिया व ज्ञान या तीन शक्‍तींच्या स्तरांवर कार्यरत होते. यामुळे आपण हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास जाते. सुवासिनी स्त्रीमध्ये आदिमाया-आदिशक्‍तीचे बीज हे सुप्‍तावस्थेत असल्याने तिच्या खाली वाकून त्रिवार हात हालवण्याने उत्पन्न होणार्‍या शक्‍तीरूपी रजोलहरींच्या वेगवान प्रक्षेपणामुळे, तसेच तिच्यातून प्रकट होणार्‍या लीनभावामुळे समोरील वरिष्ठ जिवातील देवत्व प्रकट होऊन तिला तीनही शक्‍तींच्या बळावर कार्य करण्यासाठी प्रकट शक्‍ती पुरवते. या शक्‍तीमुळे तिची आत्मशक्‍ती कार्यरत होते. या शक्‍तीमुळे तिच्या क्रियमाणाला गती प्राप्‍त होऊन ती आदिमायेच्या बळावर आपल्या कुटुंबाचा उद्धार करते. तिच्यातून प्रक्षेपित होणार्‍या रजोगुणी चैतन्यलहरींच्या वेगवान प्रक्षेपणाचा फायदा तिच्या पतीलाही मिळाल्याने तोही प्रत्यक्ष शिवाच्या रूपात मायेत कार्य करू शकतो.'

संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'
Read more...

औक्षण करतांना नाण्याऐवजी दागिन्याने ओवाळण्यामागील शास्त्र काय ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
`सोन्याचे किंवा चांदीचे नाणे किंवा या धातूंची पट्टी वापरल्याने, त्यांच्यातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींचा स्तर जास्त प्रमाणात सपाट पृष्ठभाग असल्याने सत्त्वगुणाशी, म्हणजेच निर्गुणाशी संबंधित असतो. याउलट त्या धातूंचे दागिने वापरले असता, त्यांवर असलेल्या नक्षीमुळे त्या त्या घटकाची सगुणाशी संबंधित रजोगुणी लहरी प्रक्षेपित करण्याची क्षमता वाढते व या लहरी सत्त्वगुणी लहरींपेक्षा कनिष्ठ स्तरावरील असल्याने सर्वसामान्य जिवाला सहज ग्रहण होऊन त्या त्या स्तरावर त्या त्या लहरींचा फायदा मिळणे सुलभ होते; म्हणून शक्यतो औक्षणात दागिने वापरले जातात.

संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील ग्रंथ `धार्मिक व सामाजिक कृतींमागील शास्त्र'

इंग्रजी मध्ये माहिती हवी असल्यास येथे टिचकी मारा
Read more...

औक्षण करतांना अंगठी (दागिना) व सुपारी हातात घेऊन त्यांनी का ओवाळतात ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

`अंगठी व सुपारी या दोन्ही गोष्टी जिवाने हाती घेतलेल्या कार्याला पूरक, म्हणजेच कारक आहेत. औक्षण करण्यापूर्वी देवतेला शरण जाऊन प्रार्थना केल्याने तबकातील सर्वच घटक देवतांकडून येणार्‍या सात्त्विक लहरींनी भारित झालेले असतात. सोन्याची अंगठी ही सत्त्वगुणप्रधान असल्याने अंगठीतून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरी या सुपारीतून प्रक्षेपित होणार्‍या आपतत्त्वाच्या लहरींमुळे थोड्याफार प्रमाणात रजोगुणी, म्हणजेच प्रवाही बनतात. यामुळे अंगठीतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींचे रूपांतर जिवाला पेलवेल, अशा सगुण लहरींत होणे सोपे जाते. यामुळे जिवाला त्याच्या क्षमतेएवढे देवतेचे तत्त्व मिळण्यास मदत होते.'

संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील ग्रंथ `धार्मिक व सामाजिक कृतींमागील शास्त्र'

इंग्रजी मध्ये माहिती हवी असल्यास येथे टिचकी मारा

Read more...

पती व पत्‍नी यांनी जोडीने नमस्कार करतांना पत्‍नीने पतीच्या कोणत्या बाजूस राहून नमस्कार करावा ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
कोणतेही कर्म करतांना पत्‍नीने पतीच्या उजव्या बाजूस रहावे। पत्‍नीला नवर्‍याची अर्धांगी म्हणजेच उजवी नाडी समजतात. उजवी नाडी ही कार्याला ऊर्जा पुरवणार्‍या आदिशक्‍तीच्या प्रकट कार्यरत शक्‍तीचे प्रतीक आहे, तर पुरुषतत्त्वाचे निदर्शक असणारी डावी नाडी ही आदिशक्‍तीने पुरवलेल्या कार्यऊर्जेच्या बळावर प्रत्यक्ष कार्य करणार्‍या शिवाचे प्रतीक आहे. शिवाची शक्‍ती म्हणून पत्‍नीने पतीच्या उजव्या बाजूला राहून त्याला प्रत्येक कर्मात साथ द्यावयाची असते. प्रत्येक पूजाविधीमध्ये प्रत्यक्ष कर्म न करता पत्‍नी फक्‍त पतीच्या उजव्या हाताला आपल्या चार बोटांचा स्पर्श करून त्याला पूजाविधीमध्ये लागणारी श्री दुर्गादेवीची क्रियाशक्‍ती पुरवते. म्हणून यजमान व त्याची पत्‍नी यांनी केलेले कर्म शिव-शक्‍तीची जोड मिळाल्याने कमी कालावधीत फलद्रूप होते.

संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'

इंग्रजी मध्ये माहीती हवी असल्यास येथे टिचकी मारा
Read more...

विवाहानंतर पती व पत्‍नी यांनी जोडीने नमस्कार का करावा ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

`विवाह म्हणजे शिवरूपी पती व शक्‍तीरूपी पत्‍नी या तत्त्वांचा संगम होय। प्रत्येक कर्म हे शिवरूपी सगुण क्रियाशक्‍ती (प्रत्यक्ष कार्य करणे) व त्या कर्माला गती प्राप्‍त करून देणारी, तसेच जास्तीतजास्त प्रमाणात निर्गुणाशी संबंधित असणारी शक्‍ती यांच्या जोड संगमाने पूर्णत्वास जाते. विवाहानंतर दोन्ही जीव गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतात. गृहस्थाश्रमात एकमेकांना पूरक होऊन संसारसागरातील कर्मे करणे व त्यासाठी थोरामोठ्यांचा एकत्रितपणे आशीर्वाद घेणे महत्त्वाचे ठरते. दोघांनी एकत्रितपणे नमस्कार केल्यास ब्रह्मांडातील शिव-शक्‍तीरूपी लहरी कार्यरत होऊन जिवांमध्ये लीनभावाचे संवर्धन होऊन गृहस्थाश्रमात परिपूर्ण कर्म घडून त्याची योग्य फलप्राप्‍ती झाल्याने कमीतकमी देवाणघेवाण हिशोब निर्माण होणे शक्य होते; म्हणून विवाहानंतर दोघांनी प्रत्येक कर्माला पूरक बनून नमस्कारासारख्या कृतीतूनही एकमेकांना अनुमोदन देणे, असा वरील कृतीमागील उद्देश आहे.

पती व पत्‍नी यांची आध्यात्मिक पातळी किंवा ईश्‍वराप्रती असलेला भाव ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास त्यांनी एकत्रितपणे नमस्कार करणे अथवा एकट्याने नमस्कार करणे किंवा मानस नमस्कार करणे यांतून होणारी फलप्राप्‍ती एकच असते; म्हणूनच प्रत्यक्ष कर्मापेक्षा त्यापाठी असलेल्या ईश्‍वराप्रतीच्या भावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. (पती-पत्‍नीपैकी नमस्कार करायला एकच उपस्थित असेल, तर एकट्यानेच नमस्कार करावा. )


संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'

इंग्रजी मध्ये माहीती हवी असल्यास येथे टिचकी मारा
Read more...

वयोवृद्धांना नेहमी नमस्कार का करावा ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
ऊर्ध्वं प्राणा ह्युत्क्रामन्ति यून: स्थविर आयति ।
प्रत्युत्थानाभिवादाभ्यां पुनस्तान्प्रतिपद्यते ।।
- मनुस्मृति २.१२०; महाभारत, उद्योग. ३८.१, अनु. १०४, ६४-६५.
अर्थ : वृद्ध पुरुषाचे आगमन झाल्यावर तरुण व्यक्‍तीचे प्राण वरच्या दिशेने सरकू लागतात व जेव्हा तो उठून नमस्कार करतो, तेव्हा तो प्राणांना पूर्वस्थितीत प्राप्‍त करतो.


`वृद्ध व्यक्‍तीचा प्रवास हा हळूहळू दक्षिण दिशेला, म्हणजे यमलोकाकडे (मृत्यूकडे) होत असल्याने तिच्या शरीरातून रज व तम लहरींचे प्रक्षेपण मोठ्या प्रमाणावर होऊ लागते. अशी वृद्ध व्यक्‍ती समोर आल्यावर तरुण व्यक्‍तीच्या शरीरावर त्या लहरींचा परिणाम होतो व त्या दोघांमध्ये सूक्ष्म-चुंबकीय क्षेत्र तयार होते. त्यामुळे तरुण व्यक्‍तीचे पंचप्राण वर उचलले जातात. अशा प्रकारे अचानक पंचप्राणांना मिळालेल्या गतीमुळे व्यक्‍तीला त्रास होण्याची शक्यता असते. जेव्हा तरुण व्यक्‍ती वृद्ध व्यक्‍तीला नमस्कार करते, तेव्हा तरुण व्यक्‍तीतील सुषुम्नानाडी काही प्रमाणात जागृत होते व तरुण व्यक्‍तीतील सत्त्वगुण वाढू लागतो. त्यामुळे तिच्यातील रज व तम गुणांवर सत्त्वगुणाचा प्रभाव होऊ लागतो व तिचे प्राण पूर्वस्थितीत येतात. यासाठी वृद्ध व्यक्‍तीचे आगमन होताच तिला लहानांनी नमस्कार करण्याची पद्धत आहे.'


संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'

इंग्रजी मध्ये माहीती हवी असल्यास येथे टिचकी मारा

Read more...