देवतेचे पूजन करतांना पूजनातील कृतींचे शास्त्र कळले, तर त्या कृतींचे महत्त्व लक्षात येऊन पूजन अधिक श्रद्धेने होते. श्रद्धेतूनच भावाचा जन्म होतो व भावपूर्ण कृतीमुळे देवतेच्या तत्त्वाचा लाभ अधिक होतो. तसेच देवपूजेची कृती अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्यरीत्या केल्यास त्यातून मिळणारे फळ अधिक असते. देवीच्या विविध रूपांना कोणती फुले व का वाहावीत, देवीची आरती कशी करावी, गौरी तृतीया व हरितालिका या दिवशी देवीपूजन केल्याने काय लाभ होतो, नवरात्रात घटस्थापना, अखंड दीपप्रज्वलन, कुमारिका -पूजन इत्यादी कृती करण्याचे महत्त्व काय, देवीचा गोंधळ घालणे व देवीकडे जोगवा मागणे, या कृतींचा उद्देश काय, यांसारख्या विविध विषयांवरील नाविन्यपूर्ण व सूक्ष्म-स्तरावरील अध्यात्मशास्त्रीय ज्ञान `देवीपूजनाशी संबंधित कृतींचे शास्त्र' या लघुग्रंथात दिले आहे. या लघुग्रंथातील देवीपूजनाचे शास्त्र समजून घेऊन कृती करणाऱ्यास देवीचा कृपाशीर्वाद लवकर संपादन होवो, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना ! अश्विन शु. १ (३० सप्टेंबरपासून) नवरात्राला प्रारंभ होत आहे.
नवरात्रातील देवीच्या उपासनेमागील शास्त्र
नवरात्र व्रता संबंधित कृतींचे शास्त्र :
अ १. घटस्थापना करणे (मातीचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात माती घालून सप्तधान्ये पेरणे) अ १ इ. शास्त्र व महत्त्व :`मातीच्या किंवा तांब्याच्या कलशात पृथ्वीतत्त्वरूपी मातीमध्ये सप्तधान्यांच्या रूपात आप व तेज यांचे अंश पेरून त्या बिजांतून प्रक्षेपित होणाऱ्या व बंद घटात उत्पन्न झालेल्या गरम ऊर्जेच्या साहाय्याने नाद निर्माण करणाऱ्या लहरींकडे कमी कालावधीत ब्रह्मांडातील तेजतत्त्वात्मक आदिशक्तीरूपी लहरी आकृष्ट होण्यास मदत होते. मातीच्या कलशात पृथ्वीच्या जडत्वदर्शकतेमुळे आकृष्ट झालेल्या लहरींना जडत्व प्राप्त होऊन त्या दीर्घकाळासाठी त्याच जागी स्थित होण्यास मदत होते, तर तांब्याच्या कलशामुळे या लहरींचे वायूमंडलात वेगाने प्रक्षेपण होऊन संपूर्ण वास्तूला त्याचा मर्यादित काळासाठी फायदा मिळण्यास मदत होते. घटस्थापनेमुळे शक्तीतत्त्वाच्या तेजरूपी रजोलहरी ब्रह्मांडात कार्यमान झाल्यामुळे पूजा करणाऱ्याच्या सूक्ष्मदेहाची शुद्धी होते।
अ २. अखंड दीपप्रज्वलन करणे : दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायूमंडल शक्तीतत्त्वात्मक तेजाने भारित असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. अखंड दीपप्रज्वलनाने या लहरींींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते; म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्त्व आहे. नवरात्रात कार्यरत असणाऱ्या तेजाधिष्ठीत लहरींच्या वेगात अखंडत्व व कार्यात सातत्य असल्याने या लहरी तेवढ्याच ताकदीने ग्रहण करणाऱ्या अखंड प्रज्वलित दीपरूपी माध्यमाचा उपयोग करून वास्तूत तेजाचे संवर्धन केले जाते.
अ ३. अष्टभुजा देवी व नवार्णव यंत्र यांची स्थापना करणे
अ ३ अ. आवाहन प्रक्रिया व स्थापना :
`नवरात्रातील देवीपूजनात प्रथम स्थान हे आवाहन प्रक्रिया व स्थापना यांना असते. आवाहनातील संकल्पामुळे शक्तीतत्त्वात्मक लहरी त्या त्या स्थानी दीर्घकाळ कार्यरत रहाण्यास मदत होते.
अ ३ आ. देवीच्या अष्टभुजारूपी मूर्तीची स्थापना : अष्टभुजा देवी हे शक्तीतत्त्वाचे मारक रूप आहे. नवरात्र हे ज्वलंत तेजतत्त्वरूपी आदिशक्तीच्या अधिष्ठानाचे प्रतीक आहे. अष्टभुजा देवीच्या हातांत असलेली आयुधे हे तिच्या प्रत्यक्ष मारक कार्यात्मक क्रियाशीलतेचे प्रतीक आहे. देवीच्या हातांतील ही मारकतत्त्वरूपी आयुधे अष्टदिशांचे अष्टपाल म्हणून ब्रह्मांडाचे रक्षण करून तेजाच्या साहाय्याने त्या त्या कालावधीत ब्रह्मांडातील वाईट शक्तींच्या संचारावर बंधन घालून, त्यांचा कार्यातील वेग खंडित करून पृथ्वीचे रक्षण करतात.
अ ३ इ. नवार्णव यंत्राची स्थापना : नवार्णव यंत्र हे देवीच्या पृथ्वीवरील स्थापित विराजनात्मक आसनाचे प्रतीक आहे. नवार्णव यंत्रामध्ये देवीच्या नऊ रूपांच्या मारक लहरींचे संयोगी रूपात घनीकरण झालेले असते. त्यामुळेे या आसनाला देवीचे निर्गुण अधिष्ठान मानले जाते. या यंत्रातून आवश्यकतेप्रमाणे ब्रह्मांडाच्या कार्यात्मक वेगात निर्माण होणारे देवीचे सगुण रूप हे तिच्या प्रत्यक्ष प्रकृतीदर्शक कार्यकारी तत्त्वाचे प्रतीक मानले जाते.
अ ४. मालाबंधन (देवीच्या मूर्तीवर फुलांच्या माळा टांगणे) : मालाबंधनामुळे फुलांतील रंग व गंध कणांकडे आकृष्ट झालेल्या वायूमंडलातील तेजतत्त्वात्मक शक्तीलहरी देवीच्या मूर्तीकडे पटकन संक्रमित होण्यास मदत होऊन त्यांच्या स्पर्शाने मूर्तीतील देवीतत्त्व कमी कालावधीत जागृत होते. कालांतराने हे देवीतत्त्व वास्तूत प्रक्षेपित होण्यास सुरुवात झाल्याने वास्तूशुद्धी होऊन जिवांनाही या चैतन्याचा फायदा मिळण्यास मदत होते.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ७.९.२००६, दुपारी ४.२०)
हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे `देवऋण, ऋषीऋण, पितृऋण व समाजऋण ही चार ऋणे फेडणे' होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी `श्राद्ध' आवश्यक असते. पितृऋण फेडणार्या श्राद्धामुळे देवऋण व ऋषीऋण फेडणे सुलभ होते. अशा या श्राद्धाविषयीची काही तात्त्विक माहिती यापूर्वी पाहिली आहे. आज आपण `श्राद्धाची तयारी व श्राद्ध करण्याच्या संदर्भातील कृती' याअंतर्गत श्राद्धासाठी लागणार्या साहित्याविषयी माहिती पाहूया.
श्राद्धासाठी लागणारे साहित्य १. सर्वसाधारण साहित्य (श्राद्धद्रव्ये) : `आसने, तीन ताम्हण, तांब्या, पळी-पंचपात्रे, दर्भ, पांढरी लोकर, वस्त्र, धोतर, जानवी जोड, पंचा, शाल, चादर, पांढरे गंध, उगाळलेले गोपीचंदन, काजळ किंवा सुरमा, कापूर, धूप, दीप, सुवासिक पांढरी फुले, माका, तुळस, सुपार्या, अगस्तीची पाने, विड्याची देठ असलेली पाने, सातू, काीही (न सडलेला तांदूळ), यव (सवाद), काळे तीळ, उडीद, गहू, सावे, मूग व मोहरी, मध, सुटे पैसे, भस्म, केळीची पाने किंवा मोहाच्या पत्रावळी, केळीचे द्रोण, तयार झालेला स्वयंपाक, तूप व काळास अनुसरून दक्षिणा.
२. अधिक योग्य पदार्थ (फुले, फळे व धान्य) : अगस्ती, कांचन, मोगरा, जाई, जुई, सोनटक्का, दुहेरी तगर, सोनचाफा, नागचाफा, पारिजात, बकुळी, सुरंगी इत्यादी फुले; महाळुंग, उंबर, आवळे, चिंच, आमसूल, आंबाडा, कवठ, मकाणा, अक्रोड, चारोळी, खारीक, खजूर, नारळ, केळी, द्राक्षे, डाळिंब, बोरे, फणस, खरबूज इत्यादी फळे व सुका मेवा; काळे उडीद, सावे, राळे, चुका, प्रियंगु, मोहरीचा कल्क, देवभात व लाह्या इत्यादी धान्य.
३. वर्ज्य पदार्थ : श्राद्धासाठी लागणार्या उपयुक्त पदार्थांचा विचार करतांनाच श्राद्धासाठीचे वर्ज्य पदार्थ कोणते, याचा विचार करणेही तेवढेच महत्त्वाचे ठरते. वर्ज्य पदार्थांची यादी पुढे दिली आहे. अ. कांदा, लसूण, मीठ, वांगे, वाटाणे, हरीक व पुलक नावांचे भात, राजगिरा, शेवगा, गाजर, कोहळा, वावडींग, मांस, काळे जिरे, मिरी, बिडलोण, शीतपाकी, अंकुर फुटणार्या भाज्या, शिंगाडे, जांभळया रंगाचे व नासलेले-कुजलेले पदार्थ. आ. दुर्गंधीयुक्त, खारे, शिळे, ज्याने गायीची तहान भागत नाही असे, डबक्यातले व रात्री भरून ठेवलेले पाणी. इ. वत्सरहित किंवा प्रसूत होऊन दहा दिवस पूर्ण न झालेल्या गायीचे दूध ई. बकरी, मेंढी, घोडी, उंटीण, म्हैस यांचे दूध व दुधाचे पदार्थ (मात्र म्हशीचे तूप योग्य आहे.) उ. मांजर, कुत्रा, उंदीर इत्यादींनी उष्टावलेले पदार्थ ऊ. `पूर्वी प्रणीवध करून मांसाने पितरांना तृप्त करीत', असा आधुनिक वेद-संशोधकांचा दावा आहे; पण ब्राह्मणांना मांसभक्षण निषिद्ध आहे. (श्राद्धात ब्राह्मणभोजन महत्त्वाचे मानले आहे.) या संदर्भातील एक श्लोक पुढीलप्रमाणे -
अर्थ : प्रणीवध करून जो मांसाने पितरांना तृप्त करतो, तो `चंदन जाळून कोळशाचा व्यापार करायला सिद्ध झाला आहे', असे समजावे. विहिरीत एखादा पदार्थ टाकल्यावर तो घेण्याकरता हात लांब करून डोकावणारा बालक जसा विहिरीत पडतो, तसेच मांसाने श्राद्ध करणारा स्वत:च्याच हाताने स्वत:चा विनाश ओढवून घेतो. मांसाने श्राद्ध करणार्याला पाप लागते.'
ए. `धर्मसिंधु' या ग्रंथात दिल्यानुसार आमिष पदार्थ (वर्ज्य पदार्थ) :प्राण्यांच्या हाडांचा चुना, चर्मपात्रातले पाणी, महाळुंग, ईडलिंबू, वैश्वदेव न झालेले अन्न, श्रीविष्णूला अर्पण न केलेले अन्न, मसुरा व मांस हे आठ आमिष पदार्थ होत.
४. दर्भ अ.`हा गवताचा एक प्रकार आहे. श्राद्धासाठी दर्भ घेतांना ते हिरवे असावेत. अनेक आघात करून किंवा नखांनी दर्भ तोडू नयेत. रस्त्यावरील, चितेवरील, यज्ञभूमीवरील, श्राद्धात वापरलेले आसन व आच्छादन यांपैकी व पिंडावरील दर्भ उपयोगात आणू नयेत. तसेच ब्रह्मयज्ञ, तर्पण यांतील व मूत्र वा शौचविधी करण्याच्या जागेवरील दर्भ घेऊ नयेत. `समूलस्तु भवेत् दर्भ: पितृणां श्राद्धकर्मणि ।', म्हणजे पितरांचे श्राद्ध करतांना दर्भ मुळासकट घ्यावेत. याचे कारण असे की, दर्भाच्या मुळाने पितृलोकाला जिंकता येते. आ. श्राद्धासाठी दर्भ उपटण्याच्या वेळी म्हणावयाचा मंत्र
माता-पिता, तसेच निकटवर्तीय हयात असतांना त्यांची सेवासुश्रूषा आपण धर्मपालन म्हणून करतो, त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते, असे भारतीय संस्कृती सांगते. त्या कर्तव्यपूर्तीची आणि त्याद्वारे पितरऋण फेडण्याची सुसंधी श्राद्धकर्मामुळे मिळते. लहानपणी तळहातावरील फोडाप्रमाणे आपल्याला जपणार्या आपल्या माता-पित्यांचा मृत्योत्तर प्रवास हा सुखमय व क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. श्राद्धविधीतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे तर्पण व पितृतर्पण. आज आपण तर्पण व पितृतर्पण यांविषयी माहिती पाहूया.
तर्पण १. अर्थ : देव, ऋषी, पितर व मनुष्य यांना जलांजली (उदक) देऊन तृप्त करणे, म्हणजे तर्पण होय. २. उद्देश : ज्यांच्या नावांचा उल्लेख करून तर्पण केले जाते, त्या देव, पितर आदींनी आपले कल्याण करावे, हा तर्पण करण्याचा हेतू असतो. ३. प्रकार : ब्रह्मयज्ञांग (यज्ञाच्या वेळी करावयाचे), स्नानांग (नित्य स्नान केल्यानंतर करावयाचे), श्राद्धांग (श्राद्धात केले जाणारे) अशी अनेक विधींची अंगभूत तर्पणे असतात व ती त्या त्या प्रसंगी करायची असतात. ४. तर्पण करण्याची पद्धत अ. `तर्पण नदीवर करावे', असे बोधायनाने सांगितले आहे. हे तर्पण नदीमध्ये नाभीपर्यंत पाण्यात उभे राहून किंवा नदीच्या काठी बसून करावे. आ. देव व ऋषी यांना पूर्वाभिमुख होऊन व पितरांना दक्षिणाभिमुख होऊन तर्पण करायचे असते. इ. `देवांचे तर्पण सव्याने, ऋष्यादिकांचे निवीताने व पितरांचे अपसव्याने करावे', असे शास्त्र आहे. ई. तर्पणासाठी दर्भाची आवश्यकता असते. दर्भाच्या अग्रावरून देवांचे, दर्भ मध्यावर दुमडून ऋषींचे आणि दोन दर्भांच्या मुळावरून व अग्रावरून पितरांचे तर्पण करावे. उ. हाताच्या बोटांच्या अग्रभागी असलेल्या देवतीर्थाने देवांना, अनामिका व कनिष्ठा यांच्या मुळांतून ऋषींना आणि तर्जनी व अंगठा यांचा मध्यभाग यांतून पितरांना उदक द्यावे (तर्पण करावे). ऊ. देवांना प्रत्येकी एक, ऋषींना दोन व पितरांना तीन अंजली तर्पण द्यावे. मातृत्रयी असल्यास तीन अंजली, तर इतर स्त्रियांना एक अंजली तर्पण द्यावे.' (`अंजली' या शब्दाचा मूळ अर्थ `ओंजळ', असा होतो. येथे मात्र `एक अंजली तर्पण द्यावे', म्हणजे `एकदाच तर्पण द्यावे', अशा अर्थाने `अंजली' हा शब्द वापरला आहे. - संकलक)
पितृतर्पण १. व्याख्या : पितरांना उद्देशून दिलेले उदक म्हणजेच पितृतर्पण होय. जीवत्पितृकाला पितृतर्पणाचा निषेध आहे. २. का करावे ? : पितरांना वंशजांकडून जशी पिंडाची व ब्राह्मणभोजनाची अपेक्षा असते, त्याचप्रमाणे उदकाचीही असते. ३. महत्त्व : तर्पण केल्याने पितर नुसते संतुष्ट होऊन निघून जात नाहीत, तर तर्पण करणार्याला आयुष्य, तेज, ब्रह्मवर्चस्व, संपत्ती, यश व अन्नाद्य (भक्षण केलेले अन्न पचविण्याचे सामर्थ्य) देऊन तृप्त करतात. ४। कधी करावे ? अ. देव, ऋषी व पितर यांना उद्देशून नित्य (दर दिवशी) तर्पण करावे. नित्य तर्पण हे पहाटे स्नान झाल्यावर करावे. पितरांसाठी दररोज श्राद्ध करणे शक्य नसल्यास निदान तर्पण तरी करावे. आ. पार्वण श्राद्ध केल्यानंतर दुसर्या दिवशी पितृतर्पण करावे.
५. तीलतर्पण : पितृतर्पणात तीळ घ्यावेत. तिळांचे काळे व पांढरे असे दोन भेद असून, काळे तीळ श्राद्धप्रसंगी वापरावे. तीळ न मिळाल्यास त्यांच्या ऐवजी सोने किंवा रुपे वापरावे. अ.`तीलमिश्रित जलाने पितरांना केलेल्या तर्पणाला तीलतर्पण म्हणतात. आ.जेवढ्या पितरांना उद्देशून श्राद्ध केलेले असेल, तेवढ्यांनाच उद्देशून श्राद्धांग तीलतर्पण करायचे असते. इ.दर्शश्राद्ध असता, त्याच्या पूर्वी व प्रतिसांवत्सरिक श्राद्ध असता, त्याच्या दुसर्या दिवशी तीलतर्पण करतात. इतर श्राद्धांत ते श्राद्धविधीनंतर लगेच करतात. ई.नांदीश्राद्ध, सपिंडीश्राद्ध इत्यादी श्राद्धांत तीलतर्पण करत नाहीत.'
६. तीलतर्पणाचे महत्त्व अ. `पितरांना तीळ प्रिय आहेत. आ. तिळांचा उपयोग केल्याने असुर श्राद्धविघात करीत नाहीत. इ. श्राद्धाच्या दिवशी घरभर तीळ पसरावे, निमंत्रित ब्राह्मणांना तीळमिश्रित जल द्यावे व तिळांचे दान द्यावे.' - जैमिनीय गृह्यसूत्र (२.१), बौधायन धर्मसूत्र (२.८.८) व बौधायन गृह्यसूत्र (क्रमश:)
अधिक माहितीसाठी संकेतस्थळावरील पुढील मार्गिकेला भेट द्या - विशेषांक : पितृपक्ष व श्राद्धविधी संदर्भ : सनातनचा ग्रंथ `श्राद्ध (महत्त्व व शास्त्रीय विवेचन)'. ग्रंथ हवा असल्यास संपर्क : पनवेल - (०२१४३) २३३ १२०)
`चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मशिक्षण' या सदरात श्राद्धाविषयी माहिती देण्यात येत आहे. तरीही काही जणांनी श्राद्धविधीबाबत असलेल्या अडचणी मांडल्या आहेत. या अडचणींचे निरसन होऊन त्यांना श्राद्धविधी करता यावा, यासाठी त्यावरील उपाय येथे देत आहोत.
श्राद्धविधी करण्यासाठी पुरोहित मिळत नाहीत. अशा वेळी काय करावे ?कोणत्याही गोष्टीसाठी पूर्वनियोजन असावे लागते. कमीतकमी १ महिना अगोदर पुरोहित शोधायला लागल्यास निश्चित मिळतात. आपल्या गावात पुरोहित उपलब्ध नसल्यास दुसर्या गावातील पुरोहितांना बोलावू शकतो. एवढे करूनही पुरोहित मिळत नसल्यास श्रीविष्णूला व श्रीदत्तगुरूंना शरण जाऊन प्रार्थना करावी व किमान श्राद्ध विधीतील पुढील भाग आचरणात आणावा. अ. जेवण बनवून देवाला नैवेद्य दाखवावा. आ. एका पानावर जेवण वाढून ते पान गाईला द्यावे. इ. एका पानावर जेवण वाढून ते पान कावळयाला द्यावे व हातपाय धुवून घरात यावे. (शक्य असल्यास काही पुरुष, स्त्रिया व मुले यांना भोजन द्यावे.) ( टीप :वरील विधीच्या जोडीला सुरुवातीला श्री दत्तगुरूंचे छायाचित्र स्वच्छ पुसलेल्या चौरंगावर ठेवून फूल व तुळस वहावी, उदबत्ती ओवाळावी व तीन तास `श्री गुरुदेव दत्त' हा नामजप करावा.)
घरातील व्यक्तीचे निधन होऊन १ वर्ष पूर्ण न झाल्यास, त्या कुटुंबातील मंडळींनी महालय श्राद्ध, तसेच सांवत्सरिक श्राद्ध करावे का ? महालय श्राद्ध हे केवळ एका व्यक्तीसाठी नसून सर्व पूर्वजांसाठी आहे. निधन झालेल्या व्यक्तीचा उल्लेख पुढच्या वर्षीच्या महालयात येतो. त्यामुळे सांवत्सरिक व महालय श्राद्ध केलेच पाहिजे. ते न करून चालत नाही. (टीप : काही जण श्राद्ध, तसेच इतर धार्मिक विधी यांबद्दल लोक बोलतात त्याप्रमाणे करतात. या वेळी शास्त्र काय सांगते यावर विश्वास ठेवावा. लोकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये. )
भाद्रपद कृष्ण चतुर्दशीला कोणाचे श्राद्ध करावे ?व्यक्तीचा मृत्यू शस्त्राने झाला असेल, व्यक्तीला युद्धात वीरमरण आले असेल किंवा कोणत्याही घातपातामुळे मृत्यू झाला असेल, त्यांचे महालय श्राद्ध भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीवर करावे व सांवत्सरिक श्राद्ध ज्या महिन्यात व ज्या तिथीला ते निवर्तले असतील, त्या तिथीवर करावे. (टीप : यासंदर्भात अधिक माहिती सनातनच्या `श्राद्ध' (महत्त्व व शास्त्रीय विवेचन) या ग्रंथात दिली आहे.)
कलीयुगातील बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे मायेत खूप गुरफटलेले असतात. मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त रहातो. असे अतृप्त लिंगदेह मर्त्यलोकात अडकतात. आपल्या कुळातील अशा या अतृप्त लिंगदेहांना सद्गती प्राप्त करून देण्याचा एक मार्ग म्हणजे श्राद्धविधी. श्राद्धविधी म्हटला की, ते कोणी करावा, कोठे करावा, कधी करावा, यांसारखे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे रहातात. काल आपण श्राद्ध कोठे करावे, याविषयी माहिती पाहिली. आज आपण श्राद्ध कधी करावे, या संदर्भातील माहिती पाहूया.
श्राद्ध कधी करावे ?
१. सर्वसाधारणत: योग्य तिथी : सर्वसाधारणत: अमावास्या, वर्षातल्या बारा संक्रांती, चंद्र-सूर्य ग्रहणे, युगादी व मन्वादी तिथी, अर्धोदयादी पर्वे, मृत्यूदिन, श्रोत्रिय ब्राह्मणांचे आगमन इत्यादी तिथी या श्राद्ध करण्यासाठी योग्य आहेत.
२. श्राद्धविधी अमूक एका काळी करू शकत नाही, म्हणून केला नाही, असे कोणालाही म्हणायला संधी न देणारा हिंदु धर्म ! २. अ. `सामान्यत: दरवर्षी मनुष्य मृत झालेल्या तिथीला (इंग्रजी दिनांकानुसार नाही, तर हिंदु पंचांगाप्रमाणे असलेल्या तिथीला) श्राद्ध करावे. मृत्यूतिथी माहीत नाही, पण फक्त महिना माहीत आहे, अशा वेळी त्या महिन्याच्या अमावास्येला श्राद्ध करावे.
२. आ. मृत्यूतिथी व महिना दोन्ही माहीत नसल्यास माघ किंवा मार्गशीर्ष अमावास्येला श्राद्ध करावे.
२. इ. निश्चित मृत्यूतिथी माहीत नसल्यास, मृत्यूची बातमी समजलेल्या दिवशी श्राद्ध करावे.
२. ई. पितरांचे श्राद्ध दररोज करायला पाहिजे. हे उदकाने, म्हणजे पितरांना तर्पण करूनही करता येते.
२. उ. पितरांचे श्राद्ध दररोज करणे अशक्य असल्यास दर्शश्राद्ध करावे. त्याने नित्य श्राद्धाची सिद्धी होते. दर्श म्हणजे अमावास्या. दर्शश्राद्ध म्हणजे दर महिन्याच्या अमावास्येला करावयाचे श्राद्ध.
२. ऊ. दर महिन्याला दर्शश्राद्ध करणे अशक्य असल्यास चैत्र, भाद्रपद व आश्विन या महिन्यांच्या अमावास्यांना तरी करावे.
२. ए. दर्शश्राद्ध चैत्र, भाद्रपद व आश्विन या महिन्यांच्या अमावास्यांना करणेही शक्य नसल्यास भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात महालय श्राद्धे तरी अवश्य करावीत. तेही अशक्य असल्यास भाद्रपद अमावास्येला (सर्वपित्री अमावास्येला) तरी श्राद्ध करावेच.'
(हिंदु धर्माने धर्माचरणात इतकी मुभा दिली असतांनाही हिंदू श्राद्ध वगैरे करत नाहीत. मग अशा हिंदूंना कोण मदत करू शकणार ? - संकलक)
३. दिवसातील योग्य काल : दिवसाचे पाच भाग केल्यावर त्यांतल्या चौथ्या भागाला `अपराण्ह', असे म्हणतात. हा काल श्राद्धाला योग्य समजावा.
४. श्राद्ध करण्यासाठी असलेल्या विशेष तिथी व त्या तिथींना पितृश्राद्ध केल्यास होणारे फायदे ४ अ. कल्पादी तिथी :ब्रह्मदेवाच्या दिवसाची आदी तिथी असते, तिला कल्पादी तिथी म्हणतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा व पंचमी, वैशाख शुद्ध तृतीया, कार्तिक शुद्ध सप्तमी, मार्गशीर्ष शुद्ध नवमी, माघ शुद्ध त्रयोदशी, फाल्गुन वद्य तृतीया या कल्पारंभीच्या तिथी आहेत. या तिथींना श्राद्ध केल्यास पितरांची तृप्ती होते, असे शास्त्रात सांगितले आहे.
४ आ. अक्षय्य तृतीया (वैशाख शुद्ध तृतीया) : अक्षय्य तृतीया म्हणजे कृत युगाचा आरंभदिन. या दिवशी केले जाणारे पितृश्राद्ध, पितृतर्पण, दान वगैरे सर्व अक्षय्य होते; म्हणून या दिवशी पितरांसाठी अपिंड श्राद्ध किंवा निदान तर्पण तरी करावे.
(श्राद्ध करण्यासाठी असलेल्या आणखी काही विशेष तिथी व त्या तिथींना पितृश्राद्ध केल्यास होणारे फायदे १८ सप्टेंबर रोजी पृष्ठ २ वर `धर्मसत्संग' या सदरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.) (क्रमश:)
अधिक माहितीसाठी संकेतस्थळावरील पुढील मार्गिकेला भेट द्या -
कलीयुगातील बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे मायेत खूप गुरफटलेले असतात. मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त रहातो. असे अतृप्त लिंगदेह मर्त्यलोकात अडकतात. आपल्या कुळातील अशा या अतृप्त लिंगदेहांना सद्गती प्राप्त करून देण्याचा एक मार्ग म्हणजे श्राद्धविधी. श्राद्धविधी म्हटला की, तो कोणी करावा, कोठे करावा, कधी करावा, यांसारखे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे रहातात. काल आपण श्राद्ध कोणी करावेत, याविषयी माहिती पाहिली. आज आपण श्राद्ध कोठे करावे, या संदर्भातील माहिती पाहूया.
श्राद्ध कोठे करावे ?
१. श्राद्धासाठी योग्य जागा (श्राद्धदेश) अ. `दक्षिण बाजूला उतरती अशी जागा श्राद्धासाठी चांगली असते. आ. गोमयाने सारवलेली, तसेच कीटकादी प्राणी व अपवित्र वस्तू यांनी वर्जित अशी भूमी श्राद्धासाठी चांगली असते. इ. वनात, पुण्यस्थानी किंवा शक्यतो स्वत:च्याच घरात तळमजल्यावर श्राद्ध करावे. आपल्या घरात श्राद्ध केले असता तीर्थाच्या तुलनेत आठपट पुण्य प्राप्त होते. प्रसंगी दुसर्याच्या घरात त्याच्या परवानगीने किंवा थोडेसे भाडे देऊन श्राद्धासाठी जागा घ्यावी. ई. ज्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीचे स्वामित्व नसते अशी ठिकाणे, म्हणजे वने, पर्वत, नद्या, तीर्थे, मोठी सरोवरे, देवालये या ठिकाणी श्राद्ध करण्यास हरकत नाही.
२. विशिष्ट क्षेत्री श्राद्ध करण्याचे महत्त्व २ अ. श्राद्ध करण्यास जास्त योग्य क्षेत्रे व त्यांचे महत्त्व : `गंगा, सरस्वती, यमुना, पयोष्णी इत्यादी नद्यांच्या ठिकाणी; महोदधी म्हणजे मोठ्या समुद्राच्या काठी; प्रभासतीर्थ, पुष्करतीर्थ, प्रयाग, काशी, गया, मातृगया, कुरुक्षेत्र, गंगाद्वार इत्यादी तीर्थांच्या ठिकाणी; नैमिषक्षेत्र, धर्मारण्य, धेनुकारण्य इत्यादी अरण्यांच्या ठिकाणी; ब्रह्मसरोवर, महासरोवर यांच्या ठिकाणी; अक्षय्यवट, महाक्षेत्रे यांच्या ठिकाणी; तुळसी, आवळे यांच्या वनांतील छायेखाली इत्यादी क्षेत्रांत श्राद्धे केली असता अक्षय्य पद प्राप्त होते.
२ आ. श्राद्धाच्या संदर्भात गया क्षेत्राचे महत्त्व १. गया क्षेत्रातील प्रेतशिलेवर पिंडदान केल्यामुळे प्रेतत्व नष्ट होऊन आत्मा पितरलोकात जातो. २. गया क्षेत्राच्या ठिकाणी शमीपत्राप्रमाणे पिंड दिल्याने सात गोत्रांचा, म्हणजे एकशे एक कुळांचा उद्धार होतो. वर दिलेल्या सर्व ठिकाणी श्राद्धाप्रमाणेच स्नान, दान, तप इत्यादी कर्मे केली असता त्या कर्मांचे अक्षय्य फळ मिळते.' ३. श्राद्धास वर्ज्य जागा : `गुरांचा गोठा, हत्ती बांधण्याची जागा, घोड्याची पागा, दगडांनी बांधलेले कट्टे व पाणी या ठिकाणी श्राद्ध करू नये. केल्यास पितर त्या श्राद्धकर्माचा विघात करतात.' (क्रमश:) (संदर्भ : सनातनचा ग्रंथ `श्राद्ध (महत्त्व व शास्त्रीय विवेचन)'. ग्रंथ हवा असल्यास संपर्क : पनवेल - (०२१४३) २३३ १२० )
सनातनने `पितृपक्ष व महालय श्राद्ध' ही ध्वनीचित्र-तबकडी प्रसारित केली आहे. त्या ध्वनीचित्र-तबकडीत दाखवल्याप्रमाणे श्राद्धविधी केल्याने ज्यांना अनुभूती आल्या असतील, त्यांनी त्या आम्हाला अवश्य पाठवाव्यात.
सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. पितृपंधरवडा म्हणजे आपल्या कुळातील ज्या पितरांना त्यांच्या अतृप्त वासनांमुळे सद्गती प्राप्त झाली नसेल, त्यांच्या इच्छा-आकांक्षा श्राद्धविधीद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्त करून देण्याची संधी. विधी म्हटले की, तो विधी कोणी करावा, कधी करावा, कोठे करावा, यांसारखे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. या प्रश्नांची उत्तरे या सदरातून आपल्याला मिळतील. आज आपण श्राद्ध कोणी करावे, या संदर्भातील माहिती पाहूया. १. स्वत: करणे महत्त्वाचे : `श्राद्धविधी स्वत: करायचा असतो. तो स्वत:ला करता येत नाही; म्हणून आपण ब्राह्मणाकडून करवितो. आता श्राद्ध करणारे ब्राह्मणही मिळेनासे झाले आहेत. यावर उपाय म्हणून श्राद्ध-संकल्पविधीच्या पोथ्या मिळतात. त्या आणून प्रत्येकाने श्राद्ध-संकल्पविधी पाठ करावा. हा पाठ संस्कृत भाषेत असतो. आपण अन्य भाषा शिकतो, मग संस्कृत तर देवभाषा आहे, तसेच ती आपल्याला सहज येण्यासारखीही आहे. (वरील मुद्दा तत्त्वत: योग्य असला, तरी संस्कृत भाषेतील उच्चारांतील काठिण्य, शास्त्रात सांगितलेला विधी नीट आकलन होण्याची मर्यादा इत्यादी पहाता स्वत: श्राद्धविधी यथासांग पार पाडणे, हे प्रत्येकाच्याच बाबतीत शक्य होईल असे नाही. अशांनी ब्राह्मणाकरवी व ब्राह्मण न मिळाल्यास एखाद्या जाणकाराकरवी श्राद्धविधी करण्यास हरकत नाही. श्राद्धविधी होणे हे जास्त आवश्यक आहे, हे येथे लक्षात घ्यावे. - संकलक)
२. श्राद्धपक्षादी पितरांसाठी केले जाणारे विधी मुलाने करणे आवश्यक असणे : पूर्वजांची स्पंदने व त्यांच्या सर्वांत जवळच्या वारसदारांची स्पंदने, यांमध्ये खूप साधर्म्य असते. एखादा सूक्ष्म-देह वेदना अनुभवत असतो, तेव्हा त्या त्रासाची स्पंदने त्याचा सर्वांत जवळचा वारसदारही अनुभवत असतो. याच कारणास्तव श्राद्धपक्षादी पितरांसाठी केले जाणारे विधी मुलाने करायचे असतात. मुलाची स्पंदने व पितरांची स्पंदने एकसारखीच असल्यामुळे श्राद्धतर्पणाच्या वेळी मुलाने दिलेले तर्पण पितरांना ग्रहण करणे सुलभ होते.
३. श्राद्धविधी अमूक एक व्यक्ती करू शकत नाही, म्हणून केला नाही, असे कोणालाही म्हणायला संधी न देणारा हिंदु धर्म ! :मुलगा (उपनयन न झालेलाही), मुलगी, नातू, पणतू, पत्नी, संपत्तीत वाटेकरी असणार्या मुलीचा मुलगा, सख्खा भाऊ, पुतण्या, चुलत भावाचा मुलगा, वडील, आई, सून, थोरल्या व धाकट्या बहिणीची मुले, मामा, सपिंड (सात पिढ्यांपर्यंतचे कुळातील कोणीही), समानोदक (सात पिढ्यांनंतरचे गोत्रातील कोणीही), शिष्य, उपाध्याय, मित्र, जावई या क्रमाने पहिला नसेल, तर दुसर्याने श्राद्ध करावे.
एकत्र कुटुंबात कर्त्या वडीलपुरुषाने (कुटुंबात वयाने मोठ्या किंवा सर्वांच्या पालनपोषणाची जबाबदारी असलेल्या व्यक्तीने) श्राद्धे करावीत. विभक्त झाल्यावर प्रत्येकाने स्वतंत्र श्राद्धे करावीत.' प्रत्येक मृत व्यक्तीसाठी श्राद्ध केले जाईल व त्याला सद्गती मिळेल, अशी पद्धत हिंदु धर्माने तयार केली आहे. `एखाद्या मृत व्यक्तीचे कोणीही नसल्यास त्याचे श्राद्ध करण्याचे कर्तव्य राजाचे असते', असे धर्मसिंधु या ग्रंथात नमूद करण्यात आले आहे. (इतके मार्ग असूनही हिंदू श्राद्ध वगैरे करत नाहीत. मग अशा हिंदूंना कोण मदत करू शकणार ? - संकलक)
४. स्त्रियांनी श्राद्ध करणे अ. मुद्दा `३' मध्ये मुलगी, पत्नी, आई व सून यांनाही श्राद्ध करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी सांप्रत काळी श्राद्ध सांगणारे काही पुरोहित स्त्रियांना श्राद्ध करायला संमती देत नाहीत. याचे कारण असे की, पूर्वी स्त्रियांचे मौजीबंधन होत असे. हल्ली मात्र स्त्रियांच्या बाबतीत हा संस्कार सर्वच वर्णांमध्ये बंद झाल्यामुळे त्याला अनुसरून स्त्रियांनी श्राद्ध करणे, हेही बंद झाले; मात्र आपत्काळात, म्हणजेच श्राद्ध करण्यास कोणीही उपलब्ध नसल्यास श्राद्ध न करण्यापेक्षा स्त्रियांनी श्राद्ध करावे.
सनातनने `पितृपक्ष व महालय श्राद्ध' ही ध्वनीचित्र-तबकडी प्रसारित केली आहे. त्या ध्वनीचित्र-तबकडीत दाखवल्याप्रमाणे श्राद्धविधी केल्याने ज्यांना अनुभूती आल्या असतील, त्यांनी त्या त्वरित नजीकच्या सत्संगात पाठवाव्यात.
१५.९.२००८ ते २९.९.२००८ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्या निमित्ताने आपण पितर व श्राद्ध यांविषयीची माहिती जाणून घेऊया.
चातुर्मासात आपण बरेच सण व उत्सव साजरे करतो. त्यांपैकी बर्याच `सणांची शास्त्रीय माहिती, ते साजरे करण्याचे महत्त्व' या धर्मसत्संगांच्या मालिकेत यापूर्वीच्या भागांत आपण पाहिले. आज आपण पहाणार आहोत याच चातुर्मासाच्या कालावधीत केल्या जाणार्या एका महत्त्वाच्या विधीबद्दल. हा विधी म्हणजेच आपल्या पूर्वजांच्या तृप्तीकरीता केला जाणारा श्राद्धविधी. हल्लीच्या काळात सण व उत्सव उत्साहात साजरे केले जातात; मात्र आपल्याच पूर्वजांच्या शांतीसाठी कर्तव्य म्हणून श्राद्ध करणे आवश्यक असतांनादेखील हा विधी करतांना समाजात कोणी फारसे आढळत नाहीत. बर्याच जणांना `हा विधी करणे म्हणजे वेळ व पैसा यांचा अपव्यय करणे', असेच वाटते. अगदी आस्तिक असणारी माणसेही `आमचा देवावर विश्वास आहे; पण आता जग एवढे पुढे गेले असतांना, श्राद्ध वगैरे करणे आम्हाला काही पटत नाही', असे म्हणतांना आढळतात. याचे कारण म्हणजे या विषयाचा त्यांचा काहीच अभ्यास नसणे व श्राद्धाबद्दल असलेले गैरसमज. आपल्याला कौटुंबिक जीवनात होणारे बरेच त्रास हा विधी न केल्याने होत असतात. हे त्रास कोणते, ते त्रास श्राद्ध केल्याने कसे दूर होतात, म्हणजेच श्राद्धविधी करण्याचे महत्त्व काय व हा विधी केल्याने आलेल्या अनुभूती आपण आजच्या भागात पहाणार आहोत.
२ अ १. ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले `मृत्यू व त्यानंतरची गती' यांविषयीचे शास्त्र मृत्यूनंतर एखाद्याचे अस्तित्व असू शकते, हेच मुळात आजच्या काळात विज्ञानाला सर्वश्रेष्ठ मानणार्या अनेकांना पटत नाही. `जे स्थूल डोळयांना दिसते, तेवढेच जग', असे म्हणणार्या विज्ञानवाद्यांना श्राद्ध वगैरे करणे पटत नाही. हे लोक सर्वतोपरी विज्ञानाने सिद्ध केलेल्या गोष्टींवरच विश्वास ठेवतात. माणूस मेला की पुढे त्याचे काय होते ? मरण हे जीवनाचे शेवटचे टोक आहे का कि मृत्यूनंतरही जीवन असते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे विज्ञान आजपर्यंत तरी देऊ शकलेले नाही. मात्र आता विज्ञानही या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. बुद्धीच्या पलीकडचे हे शास्त्र ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी सांगितलेले असतांना, वैज्ञानिक आता त्याला बुद्धीच्या आधारे सिद्ध करू पहात आहेत ! लंडनमध्ये नुकतीच एक जागतिक परिषद झाली. त्यामध्ये वैद्यकीयदृष्ट्या मृत म्हणून घोषित करण्यात आलेल्या; पण नंतर पुन्हा जिवंत झालेल्या बर्याच लोकांच्या विचित्र अनुभवांवर चर्चा करण्यात आली. अशा प्रकारे पुन्हा जिवंत झालेल्या तब्बल १० टक्के लोकांनी बेशुद्धावस्थेत किंवा मृतावस्थेत आपल्याला आलेले अनुभव कथन केलेले आहेत. या घटनांचा विचार केल्यानंतर डॉक्टरांचे म्हणणे आहे की, विचारांचा जन्म मेंदूतून होत असेल, तर या मृत झालेल्या लोकांमध्ये कोणत्याही विचारांचा जन्म व्हावयास नको होता; पण तसे झालेले नाही. उलट त्यांनी त्या काळात घडलेल्या सर्व घटनांचे इत्यंभूत वर्णन केले आहे. त्यामुळे माणूस मृत झाला, तरी त्याचे विचार चालू ठेवणारी एखादी शक्ती त्याच्या शरिरात असावी. विज्ञानाला आता लागलेल्या या शोधाविषयीचे ऋषीमुनींनी सांगितलेले शास्त्र असे आहे - `स्थूलदेहाला सोडून लिंगदेह शरिराबाहेर पडला, तरी मनोदेह व कारणदेह कार्यरत रहात असल्यामुळे ती व्यक्ती मन व बुद्धी यांच्या आधारे विचार करू शकते.' माणूस मृत झाल्यावर त्याचा पुढचा प्रवास कसा होतो, त्या प्रवासावर त्याच्या मनावरील संस्कारांचा काय परिणाम होतो, तसेच मृत्यूच्या वेळी मनात एखादी वासना अतृप्त राहिल्यामुळे पुढील प्रवासास होणारा अडथळा व त्यावर उपाय म्हणून श्राद्ध करण्याची आवश्यकता का आहे, या सर्वांविषयीचे शास्त्र कैक हजार वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी अत्यंत सविस्तररीत्या लिहून ठेवले आहे. त्याचे महत्त्व आता तरी विज्ञानवाद्यांनी समजून घेतले, तर त्यांना बुद्धीने न सोडवता आलेल्या कितीतरी समस्या ते सहज सोडवू शकतील.
२ अ २. श्राद्धविधी करणे, म्हणजे कर्तव्यपालन ! भारतीय संस्कृतीचे हे वैशिष्ट्य आहे की, धर्मपालन व कर्तव्य म्हणून निकटवर्तियांची जिवंतपणी सेवासुश्रुषा करणे व त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांना चांगली गती मिळावी म्हणून श्राद्धविधी करणे. याउलट पाश्चिमात्य देशांत आई-वडील म्हातारे झाले की, त्यांना वृद्धाश्रमात ठेवतात व नंतर त्यांची साधी चौकशीही करीत नाहीत !
२ अ ३. श्राद्धपक्ष यासाठीच चातुर्मासातील भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्षात, म्हणजेच श्राद्धपक्षात पितरांचे श्राद्ध करावे. या पक्षाला `पितृपक्ष', असेदेखील म्हटले जाते. या काळात पितर श्राद्धात अर्पण केलेले अन्न ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवर येतात. या पक्षात एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता, ते वर्षभर तृप्त रहातात. भाद्रपद अमावास्येला, म्हणजेच सर्वपित्री अमावास्येला सर्व पितरांना उद्देशून श्राद्ध करावे.
२ अ ४. श्राद्धपक्ष दरवर्षी करणे महत्त्वाचे प्रत्येक वर्षी श्राद्ध करून त्या त्या लिंगदेहांभोवती असलेले वासनात्मक कोषांचे आवरण कमी करून त्यांना हलकेपणा प्राप्त करून देऊन मंत्रशक्तीच्या ऊर्जेवर त्यांना गती देणे, हे पितृऋण फेडण्याचे प्रमुख साधन आहे. सर्वच लिंगदेह साधना करणारे नसल्याने त्यांना बाह्य ऊर्जेच्या बळावर श्राद्धादी कर्मे करून पुढे ढकलावे लागते; म्हणून प्रत्येक वर्षी श्राद्धकर्म करणे महत्त्वाचे ठरते.
२ अ ५. पितरांची कृपा आवश्यक आपल्याला जीवनात देवांच्या कृपेइतकीच पितरांची कृपाही आवश्यक असते. `पितर रागावलेल्या कुटुंबात शांती नसते. त्या कुटुंबातील व्यक्तींना जुनाट रोग होतात', असे शास्त्रात सांगितले आहे. २ अ ६. श्राद्धविधी करण्याचे महत्त्व आज विज्ञानाने बर्याच सुखसोयी उपलब्ध करून दिल्या असूनसुद्धा पूर्वीपेक्षा हल्लीच्या काळात कौटुंबिक समस्या व दु:ख यांचे प्रमाण वाढलेले दिसते. घरात सातत्याने भांडणे होणे, एकमेकांशी न पटणे, नोकरी न मिळणे, एखाद्याला गंभीर आजार होणे, सर्व परिस्थिती अनुकूल असूनदेखील लग्न न होणे, घरातील कर्ती व्यक्ती व्यसनाधीन होणे यांसारख्या अनेक समस्या आढळून येतात. या समस्यांचे निराकरण करणे प्रगत विज्ञानालाही शक्य नाही; कारण या समस्यांच्या मूळ कारणांचा शोध विज्ञानाला घेता येत नाही. पूर्वीच्या काळी सर्व घरांत श्राद्धविधी कर्तव्य म्हणून नित्यनेमाने केले जात असल्याने पूर्वज संतुष्ट रहायचे. त्यामुळे कौटुंबिक कलह वा समस्या यांचे प्रमाण त्यामानाने कमी होते. आजच्या काळात वाढलेल्या या समस्यांचे एक कारण `पूर्वज संतुष्ट नसणे', हे असते; म्हणजेच आपण श्राद्धविधी न केल्याने त्यांना पुढची गती मिळत नाही व त्याचीच जाणीव करून देण्यासाठी ते आपल्याला त्रास देतात. आपला धर्माचा अभ्यास नसल्याने, तसेच श्राद्धविधीमागील शास्त्र व त्याचे महत्त्व माहिती नसल्याने त्रास असण्यामागील हे कारण आपल्याला कळत नाही. आपण या समस्यांचे निराकरण आपल्या बुद्धीला पटेल त्या मार्गाने करायला जातो; पण शेवटी पदरी अपयशच येते. अशाच अपयशी ठरलेल्या अनेकांनी उपाय म्हणून श्राद्धादी विधी केल्याने त्यांचे त्रास दूर झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.
२ अ ७. उद्देश पितरांची पूजा करणे, हा धर्माचाच एक भाग मानला गेला आहे. पितरांना सद्गती लाभावी, त्यांनी पितृलोकातून वंशावर कृपादृष्टी ठेवावी, जे पितर पितृलोकात न जाता भूतयोनीत गेले असतील आणि जे वंशातल्या किंवा कुळातल्या लोकांना बाधा करीत असतील, त्यांची ती बाधा दूर व्हावी, त्याबरोबरच त्यांचा उद्धार व्हावा, असे बहुविध उद्देश पितृपूजा केल्याने सफल होतात.
२ अ ८. फलप्राप्ती स्मृतिचंद्रिका व इतरही अनेक ग्रंथांत `आयुष्य, पुत्र, यश, स्वर्ग, कीर्ती, पुष्टी, बल, लक्ष्मी, पशू, सौख्य, धन, धान्य या गोष्टी पितृपूजनाने म्हणजेच श्राद्ध केल्याने प्राप्त होतात', असे सांगितले आहे.
२ अ ९. कोणी करावे ? २ अ ९ अ. क्रम : मुलगा, मुलगी, नातू, पणतू, पत्नी, मालमत्ता घेणारा मुलीचा मुलगा, सख्खा भाऊ, पुतण्या, चुलत भावाचा मुलगा, वडील, आई, सून, थोरल्या व धाकट्या बहिणीची मुले, मामा, सपिंड, समानोदक, शिष्य, उपाध्याय, मित्र, जावई या क्रमाने पहिला नसेल, तर दुसर्याने श्राद्ध करावे.
२ अ ९ आ. स्वत: करणे महत्त्वाचे : खरे म्हणजे हा विधी स्वत: करायचा असतो. तो स्वत:ला येत नाही म्हणून आपण ब्राह्मणाकडून करवितो.
२ अ ९ इ. विभक्त कुटुंब असल्यास : एकत्र कुटुंबात कर्त्या वडील पुरुषाने श्राद्धे करावीत. विभक्त झाल्यावर प्रत्येकाने स्वतंत्र श्राद्धे करावीत.
२ अ १०. श्राद्ध मन लावून करणे मनात विविध विचार सुरू असतील, तर विधी परिणामकारक होत नाही. त्यामुळे पितरांना श्राद्धाचा लाभ कमी प्रमाणात होतो. माणसाचे मनोव्यापार सुरू असले की, त्याचा वासनादेह व मनोदेह यांतून बाहेर पडणार्या स्पंदनांचा मृत माणसाच्या मनावर पुष्कळ परिणाम होतो; म्हणून श्राद्ध करतांना ते मन लावून व नीटनेटके केले पाहिजे.
२ अ ११. अन्न किती काळ पुरते ?पितृपक्षात अर्पण केलेले अन्न पितरांना दुसर्या पितृपक्षापर्यंत, म्हणजे वर्षभर पुरते.
२ अ १२. श्राद्धविधी अमुक एक कारणाने करू शकत नाही, असे कोणालाही म्हणायला संधी न देणारा हिंदु धर्म !श्राद्ध करण्यात येणार्या अडचणी दूर करण्याच्या अनेक पद्धती आहेत. या सर्व पद्धतींवरून एकच लक्षात येते की, दरवर्षी येणार्या श्राद्धाच्या दिवशी किंवा श्राद्धपक्षात पितरांना उद्देशून कोणत्यातरी प्रकाराने श्राद्ध केलेच पाहिजे, त्याशिवाय राहू नये, हाच त्यातला मुख्य उद्देश आहे. तरीही इतके मार्ग असूनही आजकाल हिंदू श्राद्ध वगैरे करत नाहीत. अशांना कोण मदत करू शकणार ? सर्वांत प्राचीन धर्म असून व सर्वांत आधी इतका सखोल अभ्यास करून फक्त हिंदु धर्मानेच या विधींचे शास्त्र सांगितलेले असूनही आज बहुसंख्य हिंदू हे विधी करत नाहीत. याचे कारण आपला धर्माचा अभ्यास नसणे व आपली आपल्याच धर्मावर श्रद्धा नसणे. दत्ताच्या नामजपामुळे पूर्वजांचे होणारे त्रास कसे कमी होतात, यांसंदर्भातील माहिती आपण पुढील धर्मसत्संगात पाहूया. आपल्यापैकी अनेकांच्या घरांत भांडणे होणे, भयानक स्वप्न पडणे, निद्रानाशाचा त्रास असणे, साप दिसणे, सतत आजारपण असणे, व्यवसायात यश न येणे यांसारखे कमी-अधिक प्रमाणात पूर्वजांचे त्रास होत असतात. त्यांवर आपण बुद्धीने विचार करून आतापर्यंत बरेच उपाय केलेही असतील; मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नसल्यास ते त्रास पूर्वजांमुळेच आहेत, हे नक्की होते. त्यावर जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन उपाय म्हणून श्राद्धादी विधी करून घेतल्याने तुम्ही या त्रासांतून कायमची मुक्तता मिळवू शकाल. आतापर्यंत बर्याच जणांनी याचा अनुभव स्वत: घेतलेला आहे
संदर्भ : सनातन धर्मसत्संग ध्वनीचित्र-तबकडी `पितृपक्ष व महालय श्राद्ध' - ध्वनीचित्र-तबकडी हवी असल्याससंपर्क : रत्नागीरी (०२३५२) २२२३४६
भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी झाली. त्या निमित्त श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण गणपति व इतर देवता यांचे साम्य याविषयी माहिती जाणून घेऊया.
१३. गणपति व इतर देवता १३ अ. शिव व गणपति : `सांप्रत गणपतीला आपण शिवपरिवारातला आणि शिवपुत्र मानतो; पण अशी ही एक कल्पना आहे की, शिव आणि श्री गणेश या देवता पूर्वी एकरूपच होत्या; जो शिव तोच श्री गणेश आणि जो श्री गणेश तोच शिव होता. श्री गणपति अथर्वशीर्षात गणेशाला उद्देशून `त्वं ब्रह्मा त्वं विष्णु: त्वं रुद्र: ।', असे म्हटले आहे. श्री गणेश व शिव यांचे साम्य व सामर्थ्य सहज कळावे इतके ठळक आहे. भालचंद्र, तृतीयनेत्र व नागभूषणे ही शिवाची तीन वैशिष्ट्ये श्री गणेशमूर्तीतही आढळतात. श्री गणेशाला भालचंद्र असे नाव आहे. `गजवदनमचिंत्यम्' या श्री गणेशाच्या ध्यानश्लोकात त्याला त्रिनेत्रीही म्हटले आहे. तसेच श्री गणेशाच्या कमरेभोवती नागबंधही आहे. शंकराने हालाहल प्राशन केल्यानंतर तज्जन्य दाह शांत करण्यासाठी सूर्यभूषणे घातली व मस्तकी चंद्र धारण केला, अशी कथा आहे. श्री गणेशाबद्दलही अशीच कथा गणेशपुराणात आढळते. अनलासुर अग्नीरूपाने जग जाळीत होता, तेव्हा त्याचे श्री गणेशाने भक्षण केले; मग त्याचा दाह शांत करण्यासाठी देवांनी श्री गणेशावर सर्प, चंद्र इत्यादी शीतलोपचार केले.'
१३ आ. हनुमान व श्री गणपति :या दोघांचा रंग लाल आहे. या दोघांकडे अष्टमहासिद्धी आहेत. हनुमानाला रुई वहातात, तर श्री गणपतीला पांढरी रुई, म्हणजे मंदार, याची पत्री वहातात.
१३ इ. ओंकार (ॐ) व गणपति :`सृष्टीच्या उत्पत्तीचा विचार सांगतांना, सृष्टीच्या उत्पत्तीच्या प्रारंभी `ॐ इतिध्वनिरभूत्' म्हणजे `ॐ' असा ध्वनी झाला. या ध्वनीचे दृश्यस्वरूप `सवै गजाकर: ।', म्हणजे तो ध्वनी, म्हणजेच ओंकार हा हत्तीच्या मुखासारखा आहे, असे सांगितले आहे. म्हणजे प्रथमत: ध्वनी झाला व तो `ॐ' असा झाला. हा ओंकार उभा करून पहा, म्हणजे `तो गणपतीच्या मुखासारखा आहे', हे लक्षात येईल. तात्पर्य, ॐ व श्री गणपति हे एकच आहेत, भिन्न नाहीत; म्हणून ओंकाराला नमन म्हणजेच गणपतीला नमन. सृष्टीच्या प्रारंभी ॐ व अथ हे दोन शब्द ब्रह्मदेवाचा कंठ भेदून बाहेर आले. ओंकारश्चाथशब्दश्च द्वावेतौ ब्रह्मण: पुरा । कंठं भित्वा विनिर्यातौ तस्मान्मांगलिकावुभौ ।। म्हणून हे दोन शब्द मंगलवाचक आहेत, असे म्हटले आहे. ओंकार हे श्री गणपतीचे स्वरूप आहे.' (?)
१३ ई. कुंडलिनी व गणपति : श्री गणपति अथर्वशीर्षात ऋषींनी गणेशाचे वर्णन `मूलाधारस्थितोऽसि नित्यं', म्हणजे `तू शरिरातील मूलाधारचक्राच्या ठिकाणी नित्य रहातोस', असे केले आहे. श्री गणेश ही मूलाधारचक्राची देवता समजली जाते. मूलाधारचक्र व त्यातील कमळ ही दोन्ही लाल रंगाची आहेत. श्री गणपतीचा रंगही लाल आहे. मूलाधार हे षट्चक्रांतील आरंभीचे चक्र असून आध्यात्मिक उन्नतीचा आरंभ मूलाधारचक्र जागृत झाल्यावर होतो. तसेच कोणत्याही कार्यारंभी श्री गणपतीची पूजा करतात. (समाप्त)
श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत अश्लील चित्रपटगिते लावण्यापेक्षा देवतांचा नामजप लावा ! भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी झाली. त्या निमित्त श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण अथर्वशीर्षासंबंधी माहिती जाणून घेऊया.
अथर्वशीर्ष थर्व म्हणजे गरम, अथर्व म्हणजे शांती व शीर्ष म्हणजे मस्तक. ज्याच्या पुरश्चरणाने मस्तकास शांती प्राप्त होते ते अथर्वशीर्ष होय. भगवान जैमिनीऋषींचे सामवेदीय शाखेतील शिष्य मुद्गलऋषी यांनी `साममुद्गल गणेशसूक्त' लिहिले. त्यानंतर त्यांचे शिष्य गणकऋषी यांनी `श्री गणपति अथर्वशीर्ष' लिहिले. बहुतेक मंत्रांत देवतेचे ध्यान, म्हणजे मूर्तीचे वर्णन आधी असते व स्तुती नंतर असते. याउलट अथर्वशीर्षात स्तुती आधी व ध्यान नंतर आहे. अथर्वशीर्षाचे पुढील तीन प्रमुख भाग आहेत - १. शांतीमंत्र : सुरुवातीला `ॐ भद्रं कर्णेभि:' व `स्वस्तिन: इंद्रा.....' हे मंत्र आणि शेवटी `सह नाववतु ।......' हे मंत्र २. ध्यानविधी : `ॐ नमस्ते गणपतये' येथपासून ते `वरदमूर्तये नम:' येथपर्यंतचे दहा मंत्र ३. फलश्रुती :`एतदथर्वशीर्ष योऽधीते' इत्यादी चार मंत्र अथर्वशीर्ष म्हणणे : हे स्तोत्र म्हणतांना पुढील सूचनांकडे लक्ष द्यावे. १. उच्चार अगदी स्पष्ट असावेत. २. स्तोत्र अगदी संथपणे एका गतीत म्हणावे. ३. स्तोत्रपठण `तदर्थभावपूर्वक तत् अर्थ भावपूर्वक', म्हणजे `त्याचा (स्तोत्राचा) अर्थ समजून भावासह' झाले पाहिजे. केवळ यंत्राप्रमाणे प्राणहीन उच्चारण नको. उच्चारण असे व्हावे की, ज्याच्या योगाने जपकर्ता भगवद्भावयुक्त आणि भगवच्छक्तीयुक्त झाला पाहिजे. ४. जेव्हा एकापेक्षा अधिक वेळा हे स्तोत्र म्हणावयाचे असते तेव्हा `वरदमूर्तये नम: ।' येथपर्यंतच म्हणावे. त्याच्या पुढे जी फलश्रुती आहे ती शेवटच्या आवर्तनानंतर म्हणावी. त्याप्रमाणेच शांतीमंत्र प्रत्येक पाठापूर्वी न म्हणता सुरुवातीस एकदा म्हणावा. ५. या स्तोत्राच्या एकवीस आवृत्ती म्हणजे एक अभिषेक होय. ६. स्तोत्र म्हणण्यापूर्वी स्नान करावे. ७. पाटावर न बसता त्याऐवजी धूतवस्त्राची घडी, मृगाजिन, धाबळी किंवा दर्भाची चटई यांचा उपयोग करावा. ८. पाठ म्हणून पूर्ण होईपर्यंत मांडी बदलावी लागणार नाही, अशी सोपी साधी मांडी घालावी. ९. दक्षिण दिशेखेरीज अन्य कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे. १०. पाठीला बाक येईल, असे न बसता ताठ बसावे. ११. पाठ म्हणण्यापूर्वी आई, वडील आणि आपले गुरु यांना नमस्कार करावा. १२. पाठाला सुरुवात करण्यापूर्वी जमल्यास श्री गणपतीची पूजा करून त्याला अक्षता, दूर्वा, शमी व तांबडे फूल वहावे. पूजा करता न आल्यास निदान श्री गणपतीचे ध्यान एक मिनिटभर करावे, नमस्कार करावा आणि मग पाठास सुरुवात करावी. १३. उच्चारात चुका होऊ नयेत; म्हणून स्तोत्र बरोबर कसे म्हणावे, ते जाणत्या व्यक्तीकडून शिकून घ्यावे. १४. स्तोत्र म्हणतांना श्री गणपतीच्या मूर्तीकडे किंवा ॐ कडे पाहून म्हणावे, म्हणजे लवकर एकाग्रता होते.
अथर्वशीर्ष म्हणण्याचे फायदे १. स्तोत्रात फलश्रुती दिलेली असते. आत्मज्ञानसंपन्न ऋषीमुनींना हे वाङ्मय परावाणीतून स्फुरत असल्याने व फलश्रुतीमागे त्यांचा संकल्प असल्याने स्तोत्रपठण करणार्याला ते फळ फलश्रुतीमुळे मिळते. २. स्तोत्रपठण करणार्याच्या भोवती कवच (संरक्षक आवरण) निर्माण करण्याची शक्ती स्तोत्रात आहे; म्हणून अथर्वशीर्षाच्या पठणाने वाईट शक्तीच्या त्रासापासून रक्षण होते. (क्रमश:) (संदर्भ : अथर्वशीर्ष स्तोत्र व त्याचा सविस्तर अर्थ सांगणारा सनातनचा लघुग्रंथ `श्री गणपत्यथर्वशीर्ष व संकष्टनाशन श्री गणेशस्तोत्र (अर्थासह)' ग्रंथ हवा असल्यास संपर्क : पनवेल (०२१४३) २३३ १२०
मिरवणुकीत श्री गणेशाचा नामजप करा ! मिरवणुकीतून जातांना मोठ्या आवाजात अश्लील चित्रपटगीते लावणे वा म्हणणे त्याबरोबर हिडीस अंगविक्षेप करत वाचणे, गुलाल उधळणे व जोरजोरात ओरडणे, अशा प्रकारची गैरवर्तणूक करण्याने वातावरण सात्त्विक न बनता तामसिक बनते. त्यामुळे त्याचा मिरवणुकीतील नागरिकांना फायदा न होता उलट समाजाची सात्त्विकता कमी होण्यास कारणीभूत ठरते.
भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी झाली. त्या निमित्त श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण ज्येष्ठ गौरी हे व्रत करण्याची पद्धत व अनंत चतुर्दशी यांविषयी शास्त्रोक्त माहिती जाणून घेऊया.
ज्येष्ठा गौरी १. तिथी : `भाद्रपद शुद्ध अष्टमी२. इतिहास व उद्देश : असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया श्री महालक्ष्मी गौरीला शरण गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली. श्री महालक्ष्मी गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले; म्हणून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.
व्रत करण्याची पद्धत अ. हे व्रत तीन दिवस चालते. प्रांतभेदानुसार हे व्रत करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये धातूची, मातीची प्रतिमा करून अथवा कागदावर श्री लक्ष्मीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात व त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवतात.
आ. गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्या दिवशी तिची पूजा करून नैवेद्य दाखवतात.
इ. तिसर्या दिवशी गौरीचे नदीत विसर्जन करतात व परत येतांना नदीतील थोडी वाळू किंवा माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.'
अनंत चतुर्दशी
१. तिथी : भाद्रपद शुद्ध चतुर्दशी २. उद्देश : मुख्यत: हे व्रत गतवैभव परत मिळावे याकरिता केले जाते. ३. व्रत करण्याची पद्धत : या व्रताची मुख्य देवता अनंत म्हणजेच श्रीविष्णु असून शेष व यमुना या गौण देवता आहेत. या व्रताचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. या व्रताची सुरुवात कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दोरा सहजपणे सापडल्यास करतात व मग ते त्या कुळात चालू रहाते. अनंताच्या पूजेत चौदा गाठी मारलेल्या तांबडा रेशमाचा दोरा पूजतात. पूजेनंतर दोरा उजव्या हातात बांधतात. चतुर्दशी पौर्णिमायुक्त असल्यास विशेष लाभदायक ठरते. (क्रमश:)
नागरिकांना आवाहन !आपल्या परिसरातील वा आपल्याला माहीत असलेल्या गणेशोत्सव मंडळांकडून गैरप्रकार होत असल्यास त्याला विरोध न करणे म्हणजे याला मूकसंमती देणे होय. धर्माच्या दृष्टीकोनातून धर्मद्रोही कृत्ये करणारा व त्याला मूकसंमती देणारा, हे दोघेही सारखेच गुन्हेगार ठरतात. गैरप्रकार घडू नयेत, यासाठी आपण समाजाचे घटक आहोत, हे लक्षात ठेवून चुकीच्या गोष्टींविरुद्ध कृती करावयास हवी !
उद्याच्या खंडणीबाजांच्या विरोधात आजच कृती करा ! गणेशोत्सवातील निधीसंकलनाच्या वेळी करण्यात येणार्या जबरदस्तीच्या विरोधात कृती करणे, हे प्रत्येक देशप्रेमी नागरिकाचे, तसेच पोलिसांचे कर्तव्य आहे. आज धार्मिक उत्सवाची वर्गणी जमा करतांना लोकांवर जबरदस्ती करणार्यांमधून पुढे खंडणीबाज निर्माण होऊ शकतात, हे लक्षात घ्या. जबरदस्तीने वर्गणी मागणार्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करा !
गणेशभक्तांनो, अंनिसच्या अशास्त्रीय `मूर्तीदान मोहिमे'ला विरोध करून शास्त्रोक्त मूर्तीविसर्जनच करा ! भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी आहे. त्यानिमित्त श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण श्री गणपति पूजन, गणेश विसर्जन आदींविषयी शास्त्रोक्त विधी जाणून घेऊया.
सनातनची सात्विक श्री गणेशमूर्ती
१२ उ १० अ. `मूर्तीदान' हे अशास्त्रीय, तर `मूर्तीविसर्जन' हेच योग्य : श्री गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या जलात किंवा जलाशयात करणे आवश्यक असते, असे शास्त्रात सांगितले असले तरी जलप्रदूषण, अवर्षण इत्यादींमुळे `मूर्तीविसर्जन' याकडे काही जण समस्या म्हणून पहातात. त्यावर उपाययोजना म्हणून `अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)'सारख्या धर्मद्रोही संघटना मूर्तीविसर्जनाच्या ऐवजी मूर्तीदान करण्याचे हास्यास्पद आवाहन करतात. मूर्तीदान करणे, हे अशास्त्रीय असून तो श्री गणेशाचा अवमान आहे. `गणपतीच्या मूर्तीचे दान' अशास्त्रीय असल्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. १. भाद्रपद महिन्यातील श्री गणेश चतुर्थीस प्राणप्रतिष्ठापना केलेल्या मूर्तीचे विसर्जन करावे, असा शास्त्रोक्त विधीच आहे. २. देवतांचे दान घेणे किंवा देणे हा देवतांचा अपमान आहे; कारण देवतांचे दान घेण्याचे किंवा देण्याचे सामर्थ्य मनुष्यात नाही. ३. श्री गणेशाची मूर्ती म्हणजे एखादे खेळणे किंवा शोभिवंत वस्तू नव्हे, की जिचा उपयोग संपला म्हणून ती दुसर्याला दान म्हणून दिली. अंनिसचे कार्यकर्ते भाविकांकडून मूर्तीदान म्हणून घेऊन नंतर त्या दगडांच्या खाणींमध्ये फेकून देतात, असे निदर्शनास आले आहे. आपल्या श्रद्धास्थानाची ते अशी `विल्हेवाट' लावतात. मग आपण असा धर्मद्रोह का होऊ द्यायचा ? `सनातन संस्था' यासंदर्भात दरवर्षी जनजागृती मोहीम राबवते. आपणही मूर्तीदान करू नका, तसेच धर्मरक्षणाच्या कार्यासाठी सनातनच्या मोहिमेत सहभागी व्हा !
१२ उ १० आ. आपत्कालीन परिस्थितीत `मूर्तीविसर्जन' कसे करावे ? : काही ठिकाणी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी जलाशयाचा पुरेसा साठा नसतो. काही ठिकाणी सर्व जलस्रोत दूषित असल्याने मूर्ती विसर्जन करण्यासाठी योग्य नसतात, तसेच एखाद्या ठिकाणी दुष्काळ अथवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यासही मूर्तीचे विसर्जन करणे शक्य होत नाही. अशी स्थिती असल्यास त्यावर पुढील दोन प्रकारे आपण उपाययोजना करू शकतो.
१. मूर्तीची प्रतिष्ठापना न करता त्याऐवजी सुपारी ठेवून सुपारीवर प्रतिकात्मक श्री गणपतिपूजन करावे. सुपारीचे विसर्जन छोट्या विहिरीत किंवा ओहोळात करता येते.
२. श्री गणेश चतुर्थीसाठी धातूची नवीन मूर्ती आणावी व तिची प्राणप्रतिष्ठापूर्वक पूजा करावी. आपल्या दररोजच्या पूजेत श्री गणपति असला तरी नवीन मूर्ती आणण्याचा उद्देश असा आहे - गणेश चतुर्थीच्या वेळी पृथ्वीवर गणेशलहरी खूप जास्त प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्ती येईल. जास्त शक्ती असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजाअर्चा वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते; कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात. यासाठी धातूची नवीन मूर्ती आणावी. विसर्जनाच्या वेळी अशी मूर्ती जलात विसर्जन करण्याची आवश्यकता नसते. विसर्जनाच्या वेळी गणपतीच्या हातावर अक्षता द्याव्या व मूर्ती उजव्या हाताने जागेवरून थोडी हालवावी. त्यानंतर मूर्ती घरात एखाद्या पवित्र जागी ठेवावी. विसर्जन केल्यानंतर त्या मूर्तीतील तत्त्वही विसर्जित होते. त्यामुळे अशा मूर्तीची दररोज पूजा करण्याची आवश्यकता नाही. पुढील वर्षी या मूर्तीची पुन्हा प्राणप्रतिष्ठापना करून पूजा करावी.
२ उ ११. मूर्तीभंग :`प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी वा विसर्जनापूर्वीच्या अक्षता टाकून त्या मूर्तीतील देवत्व गेल्यावर त्या मूर्तीचा अवयव तुटल्यास विचार करण्याचे काहीच कारण नाही. प्राणप्रतिष्ठेपूर्वी अवयव दुखावल्यास दुसरी मूर्ती पुजावी. देवत्व गेल्यावर अवयव दुखावल्यास त्या मूर्तीचे नेहमीप्रमाणे विसर्जन करावे. प्राणप्रतिष्ठा झाल्यावर अवयव दुखावला, तर त्या मूर्तीवर अक्षता टाकून विसर्जन करावे. जर ही घटना श्री गणेश चतुर्थीच्या दिवशीच घडली, तर दुसरी मूर्ती पुजावी व दुसर्या, तिसर्या दिवशी घडल्यास नवीन मूर्ती पुजण्याचे काहीच कारण नाही. मूर्ती पूर्णतया भंग पावल्यास कुलपुरोहिताच्या सल्ल्याने यथावकाश `अद्भुत दर्शन शांती' करावी. दीपपतन, दृषद्स्फुटन (पाटा फुटणे), आळवाला फूल येणे, मूर्ती भंग पावणे इत्यादी अद्भुते घडल्यास त्या कुटुंबात द्रव्यहानी, गंभीर आजार वा अपमृत्यू घडण्याची शक्यता असते; म्हणून वरील उपाय श्रद्धेने करावा.' (क्रमश:)