देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन करण्याची पद्धत व त्यामागील शास्त्र

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा




अ. पद्धत १ : `देवीचा नामजप करत एक-एक चिमूट कुंकू देवीच्या चरणांपासून सुरुवात करून तिच्या डोक्यापर्यंत वाहावे अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकवाने स्नान घालावे.' - ब्रह्मतत्त्व (सौ. पाटील यांच्या माध्यमातून, २२.२.२००४, रात्री ९.३०)

आ. पद्धत २ : काही ठिकाणी देवीला कुंकुमार्चन करतांना कुंकू फक्‍त चरणांवर
वाहिले जाते.

शास्त्र
`मूळ कार्यरत शक्‍तीतत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली असल्याने शक्‍तीतत्त्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात. कुंकवातून प्रक्षेपित होणार्‍या गंधलहरींच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील शक्‍तीतत्त्वाच्या लहरी कमी कालावधीत आकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्त्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक, तसेच देवीतत्त्वाला प्रसन्न करणार्‍या गंधलहरींचे प्रतीक म्हणून कुंकवाच्या उपचाराला देवीपूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे. मूळ शक्‍तीतत्त्वाच्या बिजाचा गंध हाही कुंकवातून दरवळणार्‍या सुवासाशी साधर्म्य दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते.' - सूक्ष्म-जगतातील `एक विद्वान' (सनातनच्या साधिका सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २०.१०.२००५, रात्री ९.५३)

संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ `देवीपूजनाशी संबंधित कृतींचे शास्त्र'


नवरात्रविषयक अधिक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका

http://dainik.sanatan.org/visheshank/navratri/

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: