दीपावली

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात.

अंतर्भूत दिवस : आश्विन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्विन वद्य चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अमावास्या (लक्ष्मीपूजन) व कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलीप्रतिपदा) असे चार दिवस दिवाळी साजरी केली जाते. काही जण त्रयोदशीला दिवाळीत न धरता, `दिवाळी उरलेल्या तीन दिवसांची आहे', असे समजतात. वसुबारस आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीला जोडून येतात, म्हणून त्यांचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूत: ते सण वेगवेगळे आहेत.

दीपावलीचा भावार्थ : `श्रीकृष्णाने आसुरी वृत्तीच्या नरकासुराचा वध करून जनतेला भोगवृत्ती, लालसा, अनाचार व दुष्टप्रवृत्ती यांपासून मुक्‍त केले आणि प्रभूविचार (दैवी विचार) देऊन सुखी केले, तीच ही `दीपावली\' आपण वर्षानुवर्षे केवळ एक रूढी म्हणून दीपावली साजरी करीत आहोत. आज त्यातील गुह्यार्थ लोप पावला आहे. हा गुह्यार्थ लक्षात घेऊन त्यातून अस्मिता जागृत झाल्यास अज्ञानरूपी अंध:काराचे, तसेच भोगवृत्ती व अनाचारी, आसुरी वृत्ती असलेल्या लोकांचे प्राबल्य कमी होऊन त्यांचे सज्जनशक्‍तीवरील वर्चस्व कमी होईल.

सण साजरा करण्याची पद्धत
अ. आकाशात तारे असतांना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. आघाडा या वनस्पतीच्या फांदीने डोक्यापासून पायापर्यंत व पुन्हा डोक्यापर्यंत पाणी प्रोक्षण करतात. यासाठी मूळ असलेली आघाड्याची वनस्पती वापरतात.

आ. यमतर्पण : अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण करण्यास सांगितले आहे. हा तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. त्यानंतर आई मुलांना ओवाळते. काही जण अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट (एक प्रकारचे कडू फळ) पायाने ठेचून उडवितात, तर काही जण त्याचा रस (रक्‍त) जिभेला लावतात.

इ. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात व वस्त्रदान करतात.

ई. प्रदोषकाळी दीपदान करतात. ज्याने प्रदोषकात घेतले असेल, तो प्रदोषपूजा व शिवपूजा करतो. (संदर्भ : सनातनचे प्रकाशन `सण, धार्मिक उत्सव व व्रते')http://www.sanatan.org/marathi/dainik/visheshank/diwalidiwali

* अभ्यंगस्नानाच्या वेळी स्नानापूर्वी तेल लावण्याचे महत्त्व

* लक्ष्मीपूजनाचे शास्त्र व महत्त्व

* नरक चतुर्दशीच्या दिवशी पुरुषांवर होणारे परिणाम व आईने पुत्र आणि पती यांचे औक्षण करण्याचे कारण

* भाऊबीज (यमद्वितीया)

* फटाक्यांचे आध्यात्मिक दुष्परिणाम0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: