देवीपूजनाशी संबंधित कृतींचे शास्त्र

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवादेवतेचे पूजन करतांना पूजनातील कृतींचे शास्त्र कळले, तर त्या कृतींचे महत्त्व लक्षात येऊन पूजन अधिक श्रद्धेने होते. श्रद्धेतूनच भावाचा जन्म होतो व भावपूर्ण कृतीमुळे देवतेच्या तत्त्वाचा लाभ अधिक होतो. तसेच देवपूजेची कृती अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्यरीत्या केल्यास त्यातून मिळणारे फळ अधिक असते. देवीच्या विविध रूपांना कोणती फुले व का वाहावीत, देवीची आरती कशी करावी, गौरी तृतीया व हरितालिका या दिवशी देवीपूजन केल्याने काय लाभ होतो, नवरात्रात घटस्थापना, अखंड दीपप्रज्वलन, कुमारिका -पूजन इत्यादी कृती करण्याचे महत्त्व काय, देवीचा गोंधळ घालणे व देवीकडे जोगवा मागणे, या कृतींचा उद्देश काय, यांसारख्या विविध विषयांवरील नाविन्यपूर्ण व सूक्ष्म-स्तरावरील अध्यात्मशास्त्रीय ज्ञान `देवीपूजनाशी संबंधित कृतींचे शास्त्र' या लघुग्रंथात दिले आहे. या लघुग्रंथातील देवीपूजनाचे शास्त्र समजून घेऊन कृती करणाऱ्यास देवीचा कृपाशीर्वाद लवकर संपादन होवो, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना ! अश्विन शु. १ (३० सप्टेंबरपासून) नवरात्राला प्रारंभ होत आहे.


नवरात्रातील देवीच्या उपासनेमागील शास्त्र

नवरात्र व्रता संबंधित कृतींचे शास्त्र :


अ १. घटस्थापना करणे (मातीचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात माती घालून सप्तधान्ये पेरणे)
अ १ इ. शास्त्र व महत्त्व : `मातीच्या किंवा तांब्याच्या कलशात पृथ्वीतत्त्वरूपी मातीमध्ये सप्तधान्यांच्या रूपात आप व तेज यांचे अंश पेरून त्या बिजांतून प्रक्षेपित होणाऱ्या व बंद घटात उत्पन्न झालेल्या गरम ऊर्जेच्या साहाय्याने नाद निर्माण करणाऱ्या लहरींकडे कमी कालावधीत ब्रह्मांडातील तेजतत्त्वात्मक आदिशक्तीरूपी लहरी आकृष्ट होण्यास मदत होते. मातीच्या कलशात पृथ्वीच्या जडत्वदर्शकतेमुळे आकृष्ट झालेल्या लहरींना जडत्व प्राप्त होऊन त्या दीर्घकाळासाठी त्याच जागी स्थित होण्यास मदत होते, तर तांब्याच्या कलशामुळे या लहरींचे वायूमंडलात वेगाने प्रक्षेपण होऊन संपूर्ण वास्तूला त्याचा मर्यादित काळासाठी फायदा मिळण्यास मदत होते. घटस्थापनेमुळे शक्तीतत्त्वाच्या तेजरूपी रजोलहरी ब्रह्मांडात कार्यमान झाल्यामुळे पूजा करणाऱ्याच्या सूक्ष्मदेहाची शुद्धी होते।


अ २. अखंड दीपप्रज्वलन करणे : दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायूमंडल शक्तीतत्त्वात्मक तेजाने भारित असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्त्वात्मक लहरी आकृष्ट होतात. अखंड दीपप्रज्वलनाने या लहरींींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते; म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्त्व आहे. नवरात्रात कार्यरत असणाऱ्या तेजाधिष्ठीत लहरींच्या वेगात अखंडत्व व कार्यात सातत्य असल्याने या लहरी तेवढ्याच ताकदीने ग्रहण करणाऱ्या अखंड प्रज्वलित दीपरूपी माध्यमाचा उपयोग करून वास्तूत तेजाचे संवर्धन केले जाते.


अ ३. अष्टभुजा देवी व नवार्णव यंत्र यांची स्थापना करणे


अ ३ अ. आवाहन प्रक्रिया व स्थापना :
`नवरात्रातील देवीपूजनात प्रथम स्थान हे आवाहन प्रक्रिया व स्थापना यांना असते. आवाहनातील संकल्पामुळे शक्तीतत्त्वात्मक लहरी त्या त्या स्थानी दीर्घकाळ कार्यरत रहाण्यास मदत होते.

अ ३ आ. देवीच्या अष्टभुजारूपी मूर्तीची स्थापना : अष्टभुजा देवी हे शक्तीतत्त्वाचे मारक रूप आहे. नवरात्र हे ज्वलंत तेजतत्त्वरूपी आदिशक्तीच्या अधिष्ठानाचे प्रतीक आहे. अष्टभुजा देवीच्या हातांत असलेली आयुधे हे तिच्या प्रत्यक्ष मारक कार्यात्मक क्रियाशीलतेचे प्रतीक आहे. देवीच्या हातांतील ही मारकतत्त्वरूपी आयुधे अष्टदिशांचे अष्टपाल म्हणून ब्रह्मांडाचे रक्षण करून तेजाच्या साहाय्याने त्या त्या कालावधीत ब्रह्मांडातील वाईट शक्तींच्या संचारावर बंधन घालून, त्यांचा कार्यातील वेग खंडित करून पृथ्वीचे रक्षण करतात.

अ ३ इ. नवार्णव यंत्राची स्थापना : नवार्णव यंत्र हे देवीच्या पृथ्वीवरील स्थापित विराजनात्मक आसनाचे प्रतीक आहे. नवार्णव यंत्रामध्ये देवीच्या नऊ रूपांच्या मारक लहरींचे संयोगी रूपात घनीकरण झालेले असते. त्यामुळेे या आसनाला देवीचे निर्गुण अधिष्ठान मानले जाते. या यंत्रातून आवश्यकतेप्रमाणे ब्रह्मांडाच्या कार्यात्मक वेगात निर्माण होणारे देवीचे सगुण रूप हे तिच्या प्रत्यक्ष प्रकृतीदर्शक कार्यकारी तत्त्वाचे प्रतीक मानले जाते.

अ ४. मालाबंधन (देवीच्या मूर्तीवर फुलांच्या माळा टांगणे) : मालाबंधनामुळे फुलांतील रंग व गंध कणांकडे आकृष्ट झालेल्या वायूमंडलातील तेजतत्त्वात्मक शक्तीलहरी देवीच्या मूर्तीकडे पटकन संक्रमित होण्यास मदत होऊन त्यांच्या स्पर्शाने मूर्तीतील देवीतत्त्व कमी कालावधीत जागृत होते. कालांतराने हे देवीतत्त्व वास्तूत प्रक्षेपित होण्यास सुरुवात झाल्याने वास्तूशुद्धी होऊन जिवांनाही या चैतन्याचा फायदा मिळण्यास मदत होते.' - एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ७.९.२००६, दुपारी ४.२०)


अवश्य पहा : देवीपूजनाशी संबंधित कृतींचे अधिक लघुपात

vbn

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: