गणेशोत्सव विशेष - ४

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
गणेशभक्‍तांनो, अंनिसच्या अशास्त्रीय `मूर्तीदान मोहिमे'ला विरोध करून शास्त्रोक्‍त मूर्तीविसर्जनच करा !
भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी आहे. त्यानिमित्त श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण श्री गणपति पूजन, गणेश विसर्जन आदींविषयी शास्त्रोक्‍त विधी जाणून घेऊया.



सनातनची सात्विक श्री गणेशमूर्ती



१२ उ १० अ. `मूर्तीदान' हे अशास्त्रीय, तर `मूर्तीविसर्जन' हेच योग्य : श्री गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या जलात किंवा जलाशयात करणे आवश्यक असते, असे शास्त्रात सांगितले असले तरी जलप्रदूषण, अवर्षण इत्यादींमुळे `मूर्तीविसर्जन' याकडे काही जण समस्या म्हणून पहातात. त्यावर उपाययोजना म्हणून `अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)'सारख्या धर्मद्रोही संघटना मूर्तीविसर्जनाच्या ऐवजी मूर्तीदान करण्याचे हास्यास्पद आवाहन करतात. मूर्तीदान करणे, हे अशास्त्रीय असून तो श्री गणेशाचा अवमान आहे. `गणपतीच्या मूर्तीचे दान' अशास्त्रीय असल्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. भाद्रपद महिन्यातील श्री गणेश चतुर्थीस प्राणप्रतिष्ठापना केलेल्या मूर्तीचे विसर्जन करावे, असा शास्त्रोक्‍त विधीच आहे.
२. देवतांचे दान घेणे किंवा देणे हा देवतांचा अपमान आहे; कारण देवतांचे दान घेण्याचे किंवा देण्याचे सामर्थ्य मनुष्यात नाही.
३. श्री गणेशाची मूर्ती म्हणजे एखादे खेळणे किंवा शोभिवंत वस्तू नव्हे, की जिचा उपयोग संपला म्हणून ती दुसर्‍याला दान म्हणून दिली.
अंनिसचे कार्यकर्ते भाविकांकडून मूर्तीदान म्हणून घेऊन नंतर त्या दगडांच्या खाणींमध्ये फेकून देतात, असे निदर्शनास आले आहे. आपल्या श्रद्धास्थानाची ते अशी `विल्हेवाट' लावतात. मग आपण असा धर्मद्रोह का होऊ द्यायचा ? `सनातन संस्था' यासंदर्भात दरवर्षी जनजागृती मोहीम राबवते. आपणही मूर्तीदान करू नका, तसेच धर्मरक्षणाच्या कार्यासाठी सनातनच्या मोहिमेत सहभागी व्हा !

१२ उ १० आ. आपत्कालीन परिस्थितीत `मूर्तीविसर्जन' कसे करावे ? : काही ठिकाणी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी जलाशयाचा पुरेसा साठा नसतो. काही ठिकाणी सर्व जलस्रोत दूषित असल्याने मूर्ती विसर्जन करण्यासाठी योग्य नसतात, तसेच
एखाद्या ठिकाणी दुष्काळ अथवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यासही मूर्तीचे विसर्जन करणे शक्य होत नाही. अशी स्थिती असल्यास त्यावर पुढील दोन प्रकारे आपण उपाययोजना करू शकतो.

१. मूर्तीची प्रतिष्ठापना न करता त्याऐवजी सुपारी ठेवून सुपारीवर प्रतिकात्मक
श्री गणपतिपूजन करावे. सुपारीचे विसर्जन छोट्या विहिरीत किंवा ओहोळात करता येते.

२. श्री गणेश चतुर्थीसाठी धातूची नवीन मूर्ती आणावी व तिची प्राणप्रतिष्ठापूर्वक पूजा करावी. आपल्या दररोजच्या पूजेत श्री गणपति असला तरी नवीन मूर्ती आणण्याचा उद्देश असा आहे - गणेश चतुर्थीच्या वेळी पृथ्वीवर गणेशलहरी खूप जास्त प्रमाणात येतात. त्यांचे आवाहन नेहमीच्या पूजेतील मूर्तीत केल्यास तिच्यात खूप जास्त शक्‍ती येईल. जास्त शक्‍ती असलेल्या मूर्तीची साग्रसंगीत पूजाअर्चा वर्षभर नीटपणे करणे कठीण जाते; कारण त्यासाठी कर्मकांडातील बंधने पाळावी लागतात. यासाठी धातूची नवीन मूर्ती आणावी. विसर्जनाच्या वेळी अशी मूर्ती जलात विसर्जन करण्याची आवश्यकता नसते. विसर्जनाच्या वेळी गणपतीच्या हातावर अक्षता द्याव्या व मूर्ती उजव्या हाताने जागेवरून थोडी हालवावी. त्यानंतर मूर्ती घरात एखाद्या पवित्र जागी ठेवावी. विसर्जन केल्यानंतर त्या मूर्तीतील तत्त्वही विसर्जित होते. त्यामुळे अशा मूर्तीची दररोज पूजा करण्याची आवश्यकता नाही. पुढील वर्षी या मूर्तीची पुन्हा प्राणप्रतिष्ठापना करून पूजा करावी.

२ उ ११. मूर्तीभंग : `प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी वा विसर्जनापूर्वीच्या अक्षता टाकून त्या मूर्तीतील देवत्व गेल्यावर त्या मूर्तीचा अवयव तुटल्यास विचार करण्याचे काहीच कारण नाही. प्राणप्रतिष्ठेपूर्वी अवयव दुखावल्यास दुसरी मूर्ती पुजावी. देवत्व गेल्यावर अवयव दुखावल्यास त्या मूर्तीचे नेहमीप्रमाणे विसर्जन करावे. प्राणप्रतिष्ठा झाल्यावर अवयव दुखावला, तर त्या मूर्तीवर अक्षता टाकून विसर्जन करावे. जर ही घटना श्री गणेश चतुर्थीच्या दिवशीच घडली, तर दुसरी मूर्ती पुजावी व दुसर्‍या, तिसर्‍या दिवशी घडल्यास नवीन मूर्ती पुजण्याचे काहीच कारण नाही. मूर्ती पूर्णतया भंग पावल्यास कुलपुरोहिताच्या सल्ल्याने यथावकाश `अद्भुत दर्शन शांती' करावी. दीपपतन, दृषद्स्फुटन (पाटा फुटणे), आळवाला फूल येणे, मूर्ती भंग पावणे इत्यादी अद्भुते घडल्यास त्या कुटुंबात द्रव्यहानी, गंभीर आजार वा अपमृत्यू घडण्याची शक्यता असते; म्हणून वरील उपाय श्रद्धेने करावा.' (क्रमश:)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: