ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांच्यासाठी

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

एकदा स्वामी विवेकानंद एका नास्तिक राजाकडे गेले होते. त्या राजाशी झालेल्या वार्तालापात त्या राजाने त्याचा देवावर विश्वास नसल्याचे सांगितले. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी त्या राज्याच्या दिवाणखान्यात लावलेले त्याच्या वडिलांचे छायाचित्र बघण्यासाठी मागितले व त्या छायाचित्राच्या काचेवर स्वामी विवेकानंद थुंकले।

हे बघताच संतापलेल्या राजाने त्यांना याबाबत विचारणा केली. त्यावर स्वामी विवेकानंद म्हणाले, ``काय झाले ?'' राजाने सांगितले, ``तुम्ही माझ्या वडिलांच्या छायाचित्रावर थुंकलात.'' स्वामी विवेकानंद म्हणाले, ``मी तर काचेवर थुंकलो. तुमचे वडील कुठे आहेत ?'' यातून राजाच्या `हा केवळ छायाचित्राचा कागद नसून आपल्या श्रद्धास्थानी असलेल्या वडिलांची अस्मिता आहे', हे लक्षात आले व तो शांत झाला. पुढे स्वामींनी राजाला देवाच्या अस्तित्वाबद्दल समजावून सांगितले.
अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याच्या नावाखाली केवळ हिंदु धर्मातील श्रद्धास्थानांचे विविध माध्यमांतून विडंबन करणार्‍यांना वरील बोधकथा मोठा धडा देऊन जाईल.
.

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: