१. शहरात एखाद्याचा पत्ता माहीत नसेल, तर तो कोणीतरी सांगावा लागतो. त्याचप्रमाणे ईश्वराचा पत्ता गुरुच सांगू शकतात.
२. स्वत:ला पोहता येत नसेल, तर नदीपार होण्यासाठी भोपळयाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे संसारसागर तरून जाण्यासाठी गुरुरूपी भोपळयाची आवश्यकता असते.
३. शिष्याला स्वत:च्या प्रयत्नांनी आपली उन्नती करून घेता येत नाही, असे नाही; पण चांगल्या गुरूंच्या उपदेशाने व मार्गदर्शनाने शिष्याचा आत्मोन्नतीचा मार्ग सुगम होतो. एक आगबोट एके ठिकाणी ४ तासांत जाऊन पोहोचत असेल, तर तिच्यामागे तिला दोरीने बांधलेली होडी चारच तासांत त्या स्थळी पोहोचते; पण ती होडी आगबोटीपासून वेगळी केली आणि एकटीच चालवण्यात आली, तर ती त्या ठिकाणी जाण्यास तिला १२ तास लागतील. आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गात आपण स्वत:च प्रयत्न करू लागलो, तर आपल्यातील दोषांमुळे व चुकांमुळे आपली उन्नती होण्यास फार काळ लागतो; पण योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाने १२ तासांचा मार्ग ४ तासांत आक्रमिता येतो. थोडक्यात म्हणजे `महाजनो येन गत: स पंथा: ।' (मोठी मोणसे ज्या मार्गाने गेली त्या मार्गाने जावे.) या न्यायाने गुरूंकडे जावे.
४. ईश्वराकडे जाण्याचा मार्ग गुरूच सांगू शकतात
अ. आपल्या एका मित्राला भेटायला आपण त्याच्या गावात आलो; पण त्याचा पत्ता माहीत नसेल, तर तो कोणाला तरी विचारावा लागतो. त्याचा पत्ता कळल्यावर आपण ते ठिकाण शोधू शकतो. त्याचप्रमाणे `मी'चा म्हणजे आत्मारामाचा पत्ता गुरुच सांगू शकतात.
आ. आपण वाळवंटात वाट चुकल्यावर आपल्याला मार्गदर्शक वाटाड्या मिळाला नाही, तर इकडून तिकडे व तिकडून इकडे, असे भटकून आपण दमून जाऊ. अन्न-पाणी न मिळाल्याने आपण मरून जाऊ. त्याचप्रमाणे मार्गदर्शक गुरु भेटले नाहीत, तर आपल्यातील दोष आणि आपल्या हातून होणार्या चुका यांमुळे आपल्याला ८४ लक्ष योनींतून भटकत रहावे लागेल.
इ. आपण मित्राला दूरध्वनी केला व तो लागला नाही, तर दूरध्वनीचालक आपल्याला दूरध्वनी लावून देतो. त्याचप्रमाणे आपला संपर्क देवाशी होत नसला, तर गुरु मधल्या अडचणी दूर करून आपला संपर्क देवाशी करून देतात. अडचणी कोणत्या ? आई-वडील, बंधू-भगिनी, पत्नी, संपत्ती या गोष्टी म्हणजे आपण व ईश्वर या मध्ये मायावी पडदाच आहे. या मोहपाशातून गुरु आपणास सोडवून देवाचे दर्शन घडवतात.
जिज्ञासु : परमेश्वर व मी यांच्या ओळख-संबंधांत हा त्रयस्थ दलाल गुरु कशाला पाहिजे ?

प.पू. महाराज : हे पहा, साध्या व्यावहारिक गोष्टीतदेखील, ``हा रस्ता कोठे जातो ?'' यालादेखील मार्गदर्शकाची जरूरी लागते. व्यावहारिक शिक्षण देण्याच्या बाबतीतसुद्धा गुरुजींची जरूरी लागते. कोणीतरी उजेड दाखवावा लागतो. हीच गोष्ट परमेश्वराची ओळख करून देण्याच्या बाबतीत आहे.' - आत्मप्रभा (ब्रह्मीभूत श्री गजानन महाराज, नाशिक यांचे पारमार्थिक विचार. पृष्ठ ५७)
१. गुरुपौर्णिमा
अ. महर्षी व्यास
आ. `गुरुकृपा ही केवलं शिष्यपरममंङ्लम् ।'
इ. गुरु-शिष्य परंपरांनी धर्मरक्षणासाठी अधिक कार्यरत व्हावे !
ई. गुरूंची आवश्यकता
उ. गुरुपौर्णिमेसाठी केलेल्या सेवेचे व त्यागाचे महत्त्व
ऊ. साधनेत धन अर्पण करण्याचे महत्त्व व त्याचे परिणाम
ए. अर्पण करण्याची संधी देणारा गुरुपौर्णिमा हा महान क्षण होय !
२. गुरुकृपायोग
अ. गुरुकृपायोगाचे महत्त्व
आ. समष्टी साधनेतील सहजता, सुंदरता व सानंदता या तीन `स'कारांवर `गुरुकृपायोग' आधारित असणे
इ. गुरुकृपायोग : आध्यात्मिक उन्नतीचा विहंगम माग
ई. गुरुकृपायोगानुसार साधना करणारे जीव हे निवृत्तीमार्गी असणे
उ. `गुर्वाज्ञापालन हेच एकमेव उद्दिष्ट
ऊ. गुरुकृपायोगानुसार साधना करणार्यांची उन्नती लक्षात न येण्याचे कारण
३. गुरुपौर्णिमा महोत्सव
अ. यंदाची गुरुपौर्णिमा अशी साजरी करूया !
आ. साधकांनो, भक्तीमार्गानुसार गुरुपौर्णिमा साजरी करून जास्तीतजास्त गुरुकृपा संपादन करूया !
इ. गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची उपस्थिती वाढवण्यासाठी, तसेच कार्यक्रम चुकांविरहित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा !
४. इतर
अ. गुरूंकडून ज्ञान मिळवण्यापेक्षा त्यांची सेवा करणे जास्त महत्त्वाचे !
आ. `महर्षी व्यास कोण ?'
५. गुरुपौर्णिमेच्या संदर्भातील अनुभूती
अनुभूती
.
0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा:
Post a Comment