पूजेपूर्वी करावयाची वैयक्‍तिक तयारी (स्नान)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
स्नान




१. शक्य असल्यास नदी, तलाव, विहीर आदी जलस्रोतांच्या ठिकाणी स्नान करावे.

२. रासायनिक घटकांपासून बनवलेल्या साबणाने स्नान करण्यापेक्षा तेल व उटणे लावून किंवा आयुर्वेदिक साबण लावून स्नान करावे.

३. स्नानापूर्वी जलदेवतेला प्रार्थना करावी, `हे जलदेवते, तुझ्या पवित्र जलाने माझे बाह्य शरीर शुद्ध होण्याबरोबरच अंतर्मनही स्वच्छ व निर्मळ होऊ दे.'

४. घरी स्नान करायचे झाल्यास पाटावर मांडी घालून व शक्यतो डोक्यावरून स्नान करावे.

५. स्नान करतांना आपल्या उपास्यदेवतेचा नामजप सतत करावा.

६ . स्नानानंतर एका तासाच्या आत देवपूजा सुरू करावी.

स्नानाचे महत्त्व `स्नान केल्याने जिवाच्या देहाभोवती आलेले काळे आवरण व जिवाच्या देहातील रज-तम यांचे उच्चाटन होऊन जिवाच्या देहातील पेशी-पेशी चैतन्य ग्रहण करण्यास पोषक होतात. तसेच तोंड धुणे व शौचक्रिया यांमुळे जिवाच्या देहातून बाहेर न पडलेल्या त्रासदायक घटकांचे स्नानाच्या माध्यमातून विघटन होते


या विषयीची अधिक माहिती वाचन्यासाठी येथे टिचकी मारा



.

Read more...

मुलांनो, `सुसंस्कारीत व्हा !

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
नीतीमूल्ये, संस्कृती, परंपरा व आचारधर्म या गोष्टी बाल्यावस्थेतच व्यक्‍तीचा जीवनविषयक दृष्टीकोन घडवतात !


२. बालमित्रांसाठी प्रश्‍नोत्तरे

अ. जोड्या जुळवा !


आ. रिकाम्या जागा भरा !

उ. एका शब्दात उत्तरे द्या !


ऊ. चित्रावरून प्रश्‍नांची उत्तरे द्या !


३. मुलांनो, `सुसंस्कारीत व्हा !'



अ. `सुसंस्कारीत व्हा !'


आ. विद्यार्थ्यांनो, हे कराच !


इ. मुलांनो, स्वावलंबी बना !



ई. चित्रपट अभिनेते वा खेळाडू यांच्याऐवजी अशांचा आदर्श ठेवा !


उ. मुलांनो, हे तुम्हाला माहीत आहे का ?


ऊ. हॅरी पॉटर नको, तर देवतांच्या व वीरांच्या कथा असलेली पुस्तके वाचा !


४. चंगळवादी पाश्चात्त्य संस्कृती नको, तर सात्त्विक भारतीय संस्कृतीचे आचरण करा !

अ. पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करू नका !


आ. `फास्ट फूड\' नको, तर घरातील सात्त्विक आहार घ्या !


इ. मुलांनो, सणाच्या दिवशी भारतीय पद्धतीचा सात्त्विक पोषाख करा !


ई. मुलांनो, मातृभाषेचाच आग्रह धरा !


उ. मित्रांनो, दूरचित्रवाणीच्या राक्षसाला दूर ठेवा !


ऊ. हिंदूंनो, वाढदिवस जन्मतिथीच्या दिवशी साजरा करा !


इ. विद्यार्थ्यांनो, श्री संकष्टनाशन गणपतिस्तोत्राचे पारायण करा !


ई. `सत्यम् शिवम् सुंदरम्\' यानुसार आचरण ठेवा !


९. बालसाधकांच्या अनुभूती

अनुभूती

Read more...

देवपूजेसाठी करावयाच्या तयारीचा क्रम कसा असावा ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा


`देवपूजेची तयारी करतांना पुढीलप्रमाणे करावी.

अ. पूजकाची (जिवाची) तयारी
आ. स्थळाची शुद्धी
इ. उपकरणांची शुद्धी व जागृती
ई. पूजेपूर्वी करावयाची अन्य तयारी, उदा. निर्माल्यविसर्जन, देशकाल उच्चार, संकल्प, देवतांच्या मूर्ती व चित्रे स्वच्छ करणे.

देवपूजेसाठी करावयाच्या तयारीचा विशिष्ट क्रम असण्याचे कारण :

अशा प्रकारची पूजेची तयारी जिवाच्या बाह्यतेतून अंतरात्मकतेकडील प्रवास दर्शवते. त्यामुळे जिवाची वृत्ती जास्त प्रमाणात अंतर्मुख होऊन जीवस्थळ व काळ यांच्यातील सगुणाला त्यागून निर्गुणातील ईश्‍वरी चैतन्य ग्रहण करण्यास सज्ज होतो.'


संदर्भ : सनातनच्या `पूजेपूर्वी करावयाची वैयक्‍तिक तयारी' ग्रंथातून

.
Read more...

अहेर करणे

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
अहेर' या शब्दाचा अर्थ `अहेर' म्हणजे हिरावून न घेता येणारी गोष्ट।

अहेर कसा असावा ?

`हल्ली मोठमोठ्या किमती वस्तू भेट म्हणून देणे, यालाच अहेर समजतात; पण खरे पहाता हे भावनेपोटी केलेले कर्म आहे. अहेर हा दुसर्‍या जिवाच्या आध्यात्मिक उन्नतीस पोषक असणारा, असा असावा. ईश्‍वरप्राप्‍तीसाठी साधना शिकवणारे ग्रंथ, देवतांप्रती भक्‍तीभाव वाढवणारी देवतांची सात्त्विक चित्रे व नामपट्ट्या, ही अशा प्रकारच्या अहेरची काही उदाहरणे होत.


इंग्रजी मध्ये येथे वाचा :-
1 Introduction to a spiritual perspective on giving gifts
2 What happens at a spiritual level when we give gifts?
2.1 Is it possible not to create a give-and-take account when giving gifts?
3 What type of gift should one choose?
4 What determines the volume of the give-and-take account?
5 What is the highest gift?


.

Read more...

कोणाला नमस्कार करू नये ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

खाली उल्लेख केलेल्या व्यक्‍तींना का नमस्कार करू नये, यामागील शास्त्र येथे विशद केले आहे.

१. समुद्रात उतरलेली व्यक्‍ती : समुद्रात उतरलेल्या व्यक्‍तीला धोका असतो. तिला नमस्कार केल्याने आपल्यालाही धोका संभवू शकतो.

२. उद्विग्न व्यक्‍ती : उद्विग्न व्यक्‍तीला नमस्कार केल्याने आपले मन विचलित होऊन आपल्यातही उद्विग्नता निर्माण होऊ शकते. तसेच उद्विग्न व्यक्‍तीला नमस्कार करण्याचा आदर्श ठेवणेही चुकीचे आहे.

३. ओझे वाहणारी व्यक्‍ती : ओझे वाहणार्‍या व्यक्‍तीतील रजोगुण वाढलेला असतो. तसेच अशा व्यक्‍तीला नमस्कार करणे, म्हणजे तिच्यासारखा (अनावश्यक) ओझे वाहण्याचा आदर्श समोर ठेवणे.

४. स्त्रीसह क्रीडेत आसक्‍त असलेली व्यक्‍ती : स्त्रीसह क्रीडेत आसक्‍त असलेल्या व्यक्‍तीतील वासना वाढलेल्या असल्याने तिच्यातील तम व रज गुणांचे प्रमाण वाढलेले असते। अशा व्यक्‍तीला नमस्कार केल्याने आपल्यातील तम व रज गुण वाढतातच, शिवाय आपल्याही मनामध्ये वासनेचे विचार येतात.

५. बालकासह खेळणारी व्यक्‍ती : बालकासह खेळणार्‍या व्यक्‍तीला सुख मिळत असते, म्हणजेच तिची कुंडलिनी जागृत असण्याची शक्यता कमी असते. (कुंडलिनी जागृत असलेल्या व्यक्‍तीकडून आनंदाच्या लहरी प्रक्षेपित होत असतात. कुंडलिनीशक्‍ती ही ईश्‍वराच्या शक्‍तीचे प्रतीरूप असल्याने या शक्‍तीच्या जागृतीमुळे आनंदाची अनुभूती येते.) अशा व्यक्‍तीला नमस्कार केल्याने त्या नमस्काराचा आपल्याला पूर्ण फायदा होत नाही.

६. हातामध्ये फूल व दर्भ घेतलेली व्यक्‍ती १. हातामध्ये फूल व दर्भ घेतलेल्या व्यक्‍तीचा भाव वाढलेला असतो व बहुतेक वेळा कुंडलिनीही जागृत झालेली असते। तिला नमस्कार केल्याने तिचा भाव कमी होऊ शकतो.२. नमस्कार करणार्‍याची पात्रता कमी असल्यास त्याला नमस्कारातून मिळणारी शक्‍ती सहन न झाल्याने त्या शक्‍तीचा त्रास होऊ शकतो.'

संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'

.
Read more...

यज्ञ करणार्‍या व्यक्‍तीला नमस्कार करू नये ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
१. यज्ञ करणारी व्यक्‍ती ही बहुतेक वेळा स्वत:ला विशिष्ट फल प्राप्‍त होण्यासाठी यज्ञ करत असते. तिला नमस्कार केल्याने तिला मिळणार्‍या फळामधील काही भाग नमस्कार करणार्‍याला मिळतो. त्यामुळे यज्ञ करणार्‍या व्यक्‍तीला यज्ञाचा पूर्ण फायदा होत नाही.

२. यज्ञ करणार्‍या व्यक्‍तीची कुंडलिनीशक्‍ती जागृत झालेली असते. तिला नमस्कार केल्याने तिची एकाग्रता भंग होऊन तिच्या साधनेत खंड पडण्याचा संभव असतो.

३. यज्ञ करणार्‍या व्यक्‍तीला नमस्कार केल्याने तिचा अहं वाढून भाव कमी होऊ शकतो.

४. नमस्कार करणार्‍याची पात्रता कमी असल्यास त्याला नमस्कारातून मिळणारी शक्‍ती सहन न झाल्याने त्या शक्‍तीचा त्रास होऊ शकतो.

संदर्भ : सनातन-निर्मित `धर्म असे का सांगतो ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'

.
Read more...

नमस्कार करतांना पुरुषांनी डोके झाकू नयेत; मात्र स्त्रियांनी डोके का झाकावेत ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
न सोपानद्वेष्टितशिरा अवहितपाणिर्वाभिवादयीत । - आपस्तम्ब धर्मसूत्र १/४/१४/१९

अर्थ : पादत्राणे घालून, डोके झाकून किंवा हातात काही घेऊन नमस्कार करू नये।(स्त्रियांनी मात्र डोक्यावर पदर घेऊनच नमस्कार करावा.)`नमस्कार करतांना हात टेकवलेल्या स्थानावरील कुंडलिनीतील चक्र जागृत झालेले असते. त्यामुळे शरीरात सात्त्विकता जास्त प्रमाणात प्रवेश करू शकते. काही वेळा कुंडलिनीच्या जागृतीमुळे डोक्याच्या माध्यमातूनही सत्त्वलहरी शरिरात येऊ लागतात; परंतु काही वेळा वाईट शक्‍ती याचा फायदा उठवण्याचा प्रयत्‍न करतात व त्या काळी शक्‍ती सत्त्वलहरींमध्ये मिसळतात. पुरुषांमधील कुंडलिनीजागृतीची क्षमता ही स्त्रियांच्या कुंडलिनीजागृतीच्या क्षमतेच्या तुलनेत अधिक असते. त्यामुळे पुरुषांवर या काळया शक्‍तीचा फारसा प्रभाव पडत नाही. याउलट स्त्रिया जास्त संवेदनशील असल्याने त्यांच्यावर काळया शक्‍तीचा प्रभाव व परिणाम अधिक होतो आणि त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. यासाठी स्त्रियांनी नमस्कार करतांना डोक्यावर पदर घ्यावा. त्यामुळे डोके व लहरी यांच्यामध्ये कापडाचा अडथळा निर्माण होतो व वाईट स्पंदनांना शरीरात प्रवेश करता येत नाही. मात्र डोक्यावरील पदरामुळे चांगली स्पंदनेही काही प्रमाणात डोक्यातून आत शिरू शकत नाहीत. (वाईट स्पंदनांपेक्षा चांगली स्पंदने जास्त सूक्ष्म असल्याने पदरातूनही तीकाही प्रमाणात डोक्यात शिरतात.) तरीही नमस्काराच्या मुद्रेतून व्यक्‍तीला सात्त्विकता सर्वांत जास्त प्रमाणात मिळत असल्याने स्त्रियांना आवश्यक अशी सात्त्विकता या मुद्रेतून मिळते. यावरून लक्षात येते की, ईश्‍वर प्रत्येकाची किती काळजी घेतो. भाव असेल, तर वरील बंधने न पाळता नमस्कार केल्यास त्याचा तितकाच फायदा होतो.'

संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'
.
Read more...

नमस्कार करतांना कोणतीही वस्तू हातात का धरू नये ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
१. नमस्कार करतांना हातामध्ये एखादी वस्तू असल्यास हाताची बोटे व बोटांची टोके सरळ रेषेत न रहाता दुमडलेल्या स्थितीत रहातात. त्यामुळे समोरून येणार्‍या सत्त्वलहरींना दुमडलेल्या बोटांमधून व बोटांच्या टोकांमधून प्रवेश करता येत नाही.
२. समोरून येणार्‍या सत्त्वलहरी हातामध्ये धरलेल्या वस्तूवर धडकून पुन्हा मागे परत जातात। तसेच काही वेळा ती वस्तूही सत्त्वलहरी स्वत:मध्ये शोषून घेऊ शकते.
३. हातात धरलेली वस्तू जर राजसिक किंवा तामसिक असेल, तर अशी वस्तु नमस्कार करतेवेळी कपाळाला किंवा छातीला लावल्यास तिच्यातून प्रक्षेपित होणार्‍या रज-तम लहरी शरिरात प्रवेश करतात.'

संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'
Read more...

वटपौर्णिमा

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

* घरी वडाची फांदी आणून पूजा करण्याने प्रत्यक्ष वडाच्या पूजेतून मिळणारा लाभ मिळतो का ?

* वडाच्या पूजनाच्या वेळी जाणवलेली वैशिष्ट्ये

* वटपौर्णिमेचे अशा प्रकारचे हे व्रत काशीला जाऊन आल्यानंतर करायचे असते, असे सांगितले जाते। ज्या घरातील स्त्रीने असे व्रत सुरू केले असेल, ती स्त्री पतीनिधनानंतर आपले हे व्रत घरातील मोठ्या सुनेला करावयास देते। यामागील उद्देश काय ?

या प्रश्नांची उत्तर येथे वाचा : वटपौर्णिमा
--------------------------------------------------------------------------------

सती सावित्रीची कथा महाभारतात आली आहे. पांडव वनवासात असतांना जयद्रथाने द्रौपदीचे हरण केले. जयद्रथाचा पराभव करून परतलेले युधिष्ठिरादी पांडव आणि द्रौपदी ऋषीमुनींसह बसले असतांना मार्कंडेय ऋषींनी सावित्रीची कथा सांगितली. प्रात:स्मरणीय अशा पंचकन्यांमध्ये जिचा समावेश आहे, अशा द्रौपदीला मुख्यत्वेकरून ही कथा सांगण्यात आली. त्यावरूनही सावित्रीचे महत्त्व लक्षात येते. आज असणार्‍या वटपौर्णिमेनिमित्त सती सावित्रीचे हे पुण्यस्मरण !

सत्यवानाची निवड


एके दिवशी देवर्षी नारद राजा अश्‍वपतीच्या राजसभेत आले. राजाने त्यांचा सन्मान केला. ते दोघे परस्परांशी संवाद करत असतांनाच सावित्री परत आली. सभेत येताच तिने आपल्या पित्याला व नारदांना वंदन केले. नारदांनी तिच्याकडे एकवार दृष्टीक्षेप टाकून राजाला विचारले, ``या कन्येचा विवाह अजून झाला नाही असे दिसते, याचे कारण काय ?'' तिला वरसंशोधनासाठी पाठवल्याचे राजाने नारदांना सांगितले आणि मधल्या काळात काय घडले, ते सावित्रीला कथन करण्यास सांगितले.
राजाच्या सांगण्यावरून सावित्री म्हणाली, ``शाल्व देशात द्युमत्सेन नावाचा एक प्रसिद्ध धर्मात्मा राजा होता. काही काळानंतर तो अंध झाला. त्याचा पुत्रही लहान होता. ही संधी साधून शेजारच्या राजाने त्याचे राज्य बळकावले. तेव्हा द्युमत्सेन आपल्या राणी व पुत्रासह वनात निघून गेला व तेथेच तपस्वी जीवन जगू लागला. त्याचा आता तरुण झालेला सत्यवान नावाचा पुत्र मला योग्य वर वाटला आणि त्यालाच मी मनाने वरले आहे.'' सत्यवानाच्या गुणांचे कौतुक करून नारद म्हणाले, ``या सत्यवानाचे मातापिता सत्यवादी असल्याने ब्राह्मणांनी त्याचे नाव सत्यवान ठेवले आहे. राजा, तरीही एक फार दु:खाची गोष्ट आहे, आजपासून एक वर्षाने सत्यवान मृत्यू पावणार आहे.'' आपल्या भावी पतीचे आयुष्य फक्‍त एक वर्षाचे आहे, हे कळूनही सावित्री विचलीत झाली नाही. ते पाहून नारद म्हणाले, ``राजा, तुझ्या मुलीची-सावित्रीची बुद्धी निश्चयात्मक आहे, म्हणून तिला कोणत्याही प्रकारे या निर्णयापासून विचलित केले जाऊ शकत नाही. सत्यवानात जे गुण आहेत, ते कोणत्याही दुसर्‍या पुरुषात नाहीत. म्हणून मलाही असेच वाटते की, तू त्यालाच कन्यादान करावे.''
एका शुभमुहूर्तावर सत्यवान-सावित्रीचा विवाहसंस्कार झाला. पतीगृही आल्यावर सावित्रीने आपली मौल्यवान वस्त्रे व अलंकार उतरवून ठेवले. तिची नम्रता, सेवा, संयम इत्यादी गुण पाहून सर्वांनाच संतोष झाला. मधुर भाषण, सेवेतील तत्परता, संयम आदी गुणांनी तिने सासू-सासर्‍यांना, तर मनोभावे सेवा करून पतीलाही प्रसन्न ठेवले. काही काळ आनंदात गेला.

सत्यवानाचे प्राणहरण
सावित्री मनाशी एक-एक दिवस मोजत होती. नारदांचे बोल तिच्या स्मरणात होते. जेव्हा तिच्या लक्षात आले की आजपासून चौथ्या दिवशी सत्यवानाचा अंतसमय आहे, तेव्हा तीन रात्री अगोदर तिने व्रत धारण केले. रात्रंदिवस ती अगदी स्थिर होऊन बसून राहिली. पतीच्या मृत्यूदिनाची आधीची रात्र तिने जागून काढली. दुसर्‍या दिवशी दैनंदिन कामे उरकून सूर्य आकाशात थोडा वर आल्यावर तिने अग्नीला आहुती दिल्या. सत्यवान हातात कुर्‍हाड घेऊन समिधा व फळे आणण्यासाठी वनात जाण्यास निघाला. सावित्रीही सासू-सासर्‍यांची अनुज्ञा घेऊन सत्यवानाबरोबर जायला निघाली. वनात काम करता करता सत्यवान सावित्रीला म्हणाला, ``मला थकवा आला आहे. मी आता झोपू इच्छितो.'' हे ऐकून सावित्री त्याच्याजवळ आली. भूमीवर बसून तिने त्याचे मस्तक मांडीवर घेतले. तितक्यात तेथे तिला एक पुरुष दिसला. त्याची वस्त्रे लाल असून त्याच्या डोक्यावर मुकुट होता. त्याचे डोळे लाल होते. हातात पाश होता व तो अत्यंत भयंकर दिसत होता. तो सत्यवानाजवळ उभा राहून त्याच्याकडेच पहात होता. त्याला पाहून सावित्रीने सत्यवानाचे मस्तक भूमीवर ठेवले व ती उभी राहिली. तिचे हृदय धडधडत होते. अतिशय दु:खी होऊन हात जोडून ती त्याला म्हणाली, ``आपण कोणी देवता आहात, असे मी समजते. आपली इच्छा असल्यास मला सांगा की, आपण कोण आहात व येथे काय करू इच्छिता ?'' ती देवता म्हणाली, ``सावित्री, तू पतिकाता व तपस्विनी आहेस. म्हणून मी तुझ्याशी बोलेन. मी यमराज आहे. सत्यवानाचे आयुष्य संपले आहे. हा धर्मात्मा गुणांचा सागरच आहे. त्यामुळे त्याला नेण्यासाठी मी स्वत: आलो आहे. आता मी याला पाशात बांधून घेऊन जाणार आहे.'' असे बोलून सत्यवानाच्या शरीरातून अंगुष्ठमात्र पुरुष आपल्या पाशात बांधून यमराज दक्षिणेकडे जाण्यास निघाले. तेव्हा दु:खाने व्याकुळ झालेली सावित्रीही त्यांच्यामागोमाग जाऊ लागली.

यमधर्माकडून पहिला वर
काही अंतर गेल्यावर यमराज म्हणाले, ``सावित्री, तू परत जा. आता याची उत्तरक्रिया कर. तू पतीसेवेच्या ऋृणातून मुक्‍त झाली आहेस. पतीबरोबर तुला जेथपर्यंत यायला पाहिजे, तेथपर्यंत तू आली आहेस.'' सावित्री म्हणाली, ``माझ्या पतीदेवांना जेथे नेले जाईल किंवा ते स्वत: जेथे जातील, तेथे मलाही गेले पाहिजे. हाच सनातन धर्म आहे. तपश्चर्या, गुरुभक्‍ती, पतीप्रेम, व्रताचरण आणि आपली कृपा यांमुळे माझी गती कोठेही थांबू शकत नाही.'' तिच्या या बोलण्यावर यमराज प्रसन्न झाले. त्यांनी तिला सत्यवानाचे प्राण सोडून कोणताही वर माग म्हटले. या वेळी एकुलता एक पुत्र गमावलेल्या सासर्‍यांची मूर्ती तिच्या दृष्टीसमोर आली. तिने आपल्या सासर्‍यांसाठी दृष्टी, बल व तेज मागितले. यमराजांनी तिला `तथास्तु ।' म्हणून परत फिरण्यास सांगितले. सत्यवानाच्या मागे स्वत:चे काय होईल, याचा विचार न करता तिने आपल्या सासर्‍यांसाठी वर मागितला ! केवढा हा त्याग !!

यमधर्माकडून दुसरा वर
सावित्री यमराजाच्या मागे जातच राहिली. परत जायला सांगणार्‍या यमराजाला ती म्हणाली, ``जेथे माझे प्राणनाथ रहात आहेत, तेथेच मी असले पाहिजे. याशिवाय माझी आणखी एक गोष्ट ऐका. सत्पुरुषांचा तर एका वेळचा सहवासही अत्यंत लाभप्रद असतो. त्यापेक्षा त्यांच्याशी मैत्री होणे श्रेष्ठ आहे. सत्संगती कधीच वाया जात नाही म्हणून नेहमी सत्पुरुषांबरोबर राहिले पाहिजे.'' तिच्या या कल्याणकारी बोलण्यामुळे यमराजांनी तिला पतीचे प्राण सोडून दुसरी कोणतीही गोष्ट माग म्हटले. सावित्रीने आपल्या सासर्‍यांचे गेलेले राज्य त्यांना आपोआप प्राप्‍त व्हावे व त्यांनी आपल्या धर्माचा त्याग करू नये, हा वर मागितला. यमराजाने `तथास्तु ।' म्हणून तिला परत जाण्यास सांगितले. सासर्‍याने राज्यकारभार `धर्माने' करावा, या मागणीत तिची धर्मावरील अढळ निष्ठा दिसून येते !

दुहिता !
चालता-चालता सावित्री यमराजाला म्हणाली, ``सर्व प्रजेचे आपण नियमाने संयमन करून तिला इच्छित फळही देता, म्हणून आपण `यम' नावाने प्रसिद्ध आहात. म्हणून आता मी जे सांगेन ते ऐका. मन, वचन व कर्म यांनी सर्व प्राण्यांशी द्रोहरहित असणे, सर्वांवर कृपा करणे व दान देणे हा सत्पुरुषांचा सनातन धर्म आहे. अशा प्रकारचाच तर बहुतेक हा सर्व लोक आहे. सर्वच माणसे आपापल्या शक्‍तीप्रमाणे कोमलतेने वागतात; पण जे सत्पुरुष असतात, ते तर आपल्याजवळ आलेल्या शत्रूंवरही दया करतात.'' तिच्या या बोलण्यावर संतुष्ट होऊन यमराजांनी तिला तिसरा वर माग म्हटले. तिसर्‍या वराने सावित्रीने आपल्या पित्यासाठी १०० पुत्र मागितले. यमराजांनी तीही इच्छा पूर्ण करून तिला परत जायला सांगितले. सासू-सासर्‍यांचे कल्याण करून घेतल्यावर आपल्या वडिलांना आपल्या माघारी कोणीच संतान नसल्याचे तिच्या लक्षात आले. तिने तर सत्यवानाबरोबरच जाण्याचा निर्णय मनोमन घेतला होता. कन्येला `दुहिता' म्हणतात. सासर आणि माहेर या दोघांचे हित साधणारी ती `दुहिता'! किती उत्तम प्रकारे तिने आपले कर्तव्य पार पाडले !

यमधर्माकडून चौथा वर
काही अंतर चालून गेल्यावर सावित्री यमधर्माला म्हणाली, ``पतिदेवांच्या सानिध्यामुळे मला हे अंतर काही जास्त जाणवत नाही. माझे मन तर फार दूर दूर धावत असते. म्हणून मी जे बोलणार आहे, ते ऐकण्याची कृपा करावी. आपण विवस्वान (सूर्य) यांचे पराक्रमी पुत्र आहात. म्हणून आपणांस `वैवस्वत' म्हणतात. आपण शत्रूमित्रादिक भेदभाव सोडून सर्वांचा समानतेने न्याय करता. त्यामुळेच सर्व प्रजा धर्माचे आचरण करते. त्यामुळे आपणास `धर्मराज' म्हटले जाते.'' याही बोलण्यावर प्रसन्न होऊन यमराजांनी सावित्रीला चौथा वर दिला. या वराने तिने तिच्या कुलाची वृद्धी करणारे बलवान व पराक्रमी असे १०० पुत्र मागितले. पहिल्यांदाच सावित्रीने स्वत:साठी काहीतरी मागितले ! यमराजांनी आनंदाने तिला हा वर दिला व म्हटले की, तू खूप दूरवर आली आहेस. आता परत जा.

यमधर्माकडून सत्यवानाचे प्राण परत मिळाले !
सावित्री यमधर्माबरोबर पुढे-पुढे जातच राहिली. ती म्हणाली, ``सत्पुरुषांची वृत्ती नेहमी धर्मातच रहात असते. ते कधी दु:खी किंवा व्यथित होत नाहीत. सत्पुरुषांशी सत्पुरुषांचा जो समागम होतो, तो कधीही निष्फळ होत नाही. सत्पुरुष सत्याच्या बळावर सूर्यालासुद्धा आपल्या जवळ बोलावून घेतात. ते आपल्या तपाच्या प्रभावाने पृथ्वीलाही धारण करतात. सत्यात राहिल्याने सत्पुरुषांना कधी खेद होत नाही. हा सनातन सदाचार सत्पुरुषांनी आचारलेला आहे, असे जाणून सत्पुरुष परोपकार करतात व परतफेडीकडे कधी दृष्टी ठेवत नाहीत.'' तिचे हे धर्मानुकूल वचन ऐकून यमाने पाचवा वर मागण्यास सांगितले. तेव्हा सावित्री म्हणाली, ``हे धर्मराजा, आपण मला जो पुत्रप्राप्‍तीचा वर दिला आहे, तो दांपत्यधर्माशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून आता मी हाच वर मागते की, माझे पती जिवंत व्हावेत. यामुळे आपले वचन सत्य होईल. कारण पतीवाचून तर मी मृत्यूच्या मुखातच पडले आहे. पतीविना मला अन्य कोणत्याही सुखाची इच्छा नाही. स्वर्गाचीदेखील मला कामना नाही. प्रत्यक्ष लक्ष्मी आली तरी मला तिचीही आवश्यकता नाही. इतकेच नव्हे, तर पतीवाचून मी जिवंतही राहू इच्छित नाही. आपणच मला १०० पुत्र होण्याचा वर दिला आहे आणि तरीही आपण माझ्या पतीला घेऊन जात आहात. म्हणून मी जो हा वर मागितला आहे, त्यानेच आपले वचन सत्य होईल.'' हे ऐकून सूर्यपुत्र यमराज फार प्रसन्न झाले आणि त्यांनी `तथास्तु ।' म्हणत सत्यवानाचा पाश काढून घेतला. ते म्हणाले, ``हे कल्याणी ! घे, मी तुझ्या पतीला मुक्‍त केले आहे. आता हा सर्व प्रकारे निरोगी होईल. याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हा तुझ्यासह चारशे वर्षे जिवंत राहील. धर्मपूर्वक यज्ञअनुष्ठान करून सर्व लोकांत कीर्ती मिळवेल. त्याच्यापासून तुला १०० पुत्र होतील !'' यमराज परत जायला निघाले. सावित्रीने त्यांना वंदन केले आणि त्यांनी केलेल्या कृपेबद्दल कृतज्ञता व्यक्‍त केली. यमराज निघून गेल्यानंतर सावित्री सत्यवानाच्या अचेतन देहाजवळ आली. तिने त्याचे मस्तक पुन्हा आपल्या मांडीवर घेतले. हळूहळू सत्यवानाच्या देहात चैतन्य आले. तो उठून बसला ! आज अनेकांना हिंदु धर्मात सांगितलेले परलोक, परलोकांचा प्रवास आणि अन्य `सूक्ष्म' भाग प्रत्यक्षात आहेच, हे कळत नाही, पटत नाही. काहींना पटले तरी दिसू शकत नाही. येथे तर प्रत्यक्ष यमधर्माशी धर्मानुकूल संभाषण करून शीलवती, कुलवती, गुणवती सावित्रीने आपल्या पतीचे पंचप्राण परत आणले. प्रत्येक हिंदु पतिकातेच्या हृदयात अढळ स्थान मिळवणार्‍या सती सावित्रीला शतश: प्रणाम !

साभार : वटपौर्णिमा

.
Read more...

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन

1 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

* प्रतापसूर्य छ. शिवाजी महाराज !
* छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला...
* महाराष्ट्रातील लष्करी परंपरेचे आद्य प्रवर्तक : छत्रपति श्री शिवराय
* छ. शिवरायांचे राज्य निधर्मी नव्हे, तर धर्मराज्यच होते !

* शिवचरित्र : हिंदूंसाठी अखंड स्फूर्तीचा झरा !
* छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक तेज:पुंज तत्त्व
* छत्रपती शिवाजी महाराज जन्मतिथी वाद
* म्हणे मुसलमान `स्वराज्यनिष्ठ' !


* म्हणे शिवाजी महाराजांसाठी प्राणार्पण करणारे बहुसंख्य लोक मुसलमान होते !
* शिवरायांना `धर्मनिरपेक्ष' संबोधून त्यांच्या तथाकथित निष्ठावंत मुसलमान सरदारांची यादी वृत्तपत्रातून प्रसिद्ध
*
छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांचा अपमान करणार्‍या काँग्रेस पक्षाचा बदला घ्या !- नरेंद्र मोदी
* `ऑर्कूट'वर प्रभू श्रीराम व छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्लाघ्य विडंबन !

* छत्रपती उदयनराजे भोसले म्हणे ``कलमाडींचे विचार शिवाजी महाराजांसारखे !
*
केरळ सरकारने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाबद्दल महाराष्ट्रात संताप
* शिवजयंतीच्या दिवशी रामदासस्वामी द्वेष करणारे कोल्हापूर येथील धर्मद्रोही शिवाजी तरुण मंडळ !
* छत्रपती शिवरायांच्या पुतळयाची अवहेलना सनातनच्या साधिकेने थांबवली !

सौजन्य : छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन

इंग्रजी मध्ये येथे वाचा









Read more...

स्त्रियांनी कुंकू लावणे यामागील शास्त्र काय ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
* स्त्रियांनी कुंकू लावणे यामागील शास्त्र काय ?
* टिकली लावण्यापेक्षा कुंकू लावणे अधिक योग्य का आहे ?
* कुंकू लावल्यामुळे स्त्रीची आत्मशक्ती जागृत झाल्यास तिच्यात शक्तीतत्त्व आकृष्टकरण्याची प्रचंड क्षमता निर्माण होणे !

`कुंकवामध्ये तारक व मारक शक्तीतत्त्व आकृष्ट करण्याची प्रचंड क्षमता आहे। स्त्रीची आत्मशक्ती जागृत झाल्यास त्या शक्तीमध्येही कार्यानुरूप तारक किंवा मारक देवीतत्त्व आकृष्टकरण्याची प्रचंड क्षमता निर्माण होते। देवीतत्त्वाचा कृपाशीर्वाद मिळण्याच्या हेतूने स्त्रीच्या भ्रूमध्यावर तिने स्वत: किंवा दुसऱ्या स्त्रीने कुंकू लावल्यास स्त्रीमधील तारक शक्तीतत्त्वाची स्पंदने जागृत होतात व वातावरणातील शक्तीतत्त्वाची पवित्रके त्या स्त्रीकडे आकृष्ट होतात.'


स्त्रियांनी कुंकू लावणे यामागील शास्त्र
कुंकू :
`शुद्ध कुंकू हे शुद्ध हळद, चुन्याची निवळी व थोड्या प्रमाणात शुद्ध कर्पूर यांपासून तयार करतात. हे कुंकू हळदीपासून बनलेले असले, तरी या कुंकवातील हळदीचा वास पूर्णपणे नष्ट होऊन त्या ठिकाणी दैवी सुगंध दरवळत रहातो. हळद हुंगल्यानंतर वास येतो; मात्र शुद्ध कुंकवाचा सुगंध ठराविक अंतरापर्यंत दरवळत रहातो. शुद्ध कुंकवात आर्द्रता असूनही ते पूर्णपणे कोरडे असते. त्याचा स्पर्श बर्फासारखा गार असतो. शुद्ध कुंकू रक्तवर्णाचे असते. त्यामध्ये लोह या घटकाचे प्रमाण जास्त असते. हे कुंकू कपाळावर लावल्याने वाईट शक्ती भ्रूमध्यातून प्रवेश करू शकत नाहीत. पूर्वीच्या काळी (सत्य, त्रेता व द्वापार या युगांत) शुद्ध कुंकू मिळायचे; मात्र त्या युगांनुसार कुंकवाची सात्त्विकता कमी कमी होत गेली. हल्ली कलीयुगामध्ये हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत लोकच सात्त्विक कुंकू तयार करतात.'


१. `कुंकू लावतांना भ्रूमध्य व आज्ञाचक्र यांवर दाब दिला जातो व तेथील बिंदू दाबले जाऊन चेहर्‍याच्या स्नायूंना रक्‍तपुरवठा चांगला होतो.

२. कपाळावरील स्नायूंचा ताण कमी होऊन चेहरा उजळ दिसतो. इ. कुंकवामुळे वाईट शक्‍तींना आज्ञाचक्रातून शरिरात शिरायला अडथळा निर्माण होतो.' - ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, ६.११.२००७, दुपारी २.३०)


टिकली लावण्यापेक्षा कुंकू लावणे अधिक योग्य का आहे ?


`कुंकू हे पावित्र्याचे व मांगल्याचे प्रतीक आहे. कृत्रिम घटकांपेक्षा नैसर्गिक घटकांमध्ये देवतांच्या चैतन्यलहरी ग्रहण व प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असते. हळदीपासून कुंकू बनवलेले असल्याने टिकलीपेक्षा कुंकवामध्ये नैसर्गिकता जास्त असते, तसेच कुंकवातून प्रक्षेपित होणार्‍या सूक्ष्म-गंधामध्ये ब्रह्मांडातील देवतेची पवित्रके आकृष्ट व प्रक्षेपित करण्याची क्षमता असल्याने कुंकू लावलेल्या जिवाचे तारक-मारक चैतन्यलहरींच्या प्रक्षेपणामुळे वाईट शक्‍तींपासून रक्षण होते; म्हणून टिकली लावण्यापेक्षा कुंकू लावणे, हे सात्त्विकता ग्रहण करण्याच्या दृष्टीने जास्त फलदायी असते.टिकलीच्या पाठच्या बाजूला वापरण्यात आलेला गोंद हा तमोगुणी असल्याने तो आपल्याकडे रज-तमात्मक लहरी खेचून घेतो. या लहरींचा प्रवाह जिवाच्या आज्ञाचक्रातून शरिरात संक्रमित झाल्याने शरिरातील रज-तम कणांचे प्राबल्य वाढते. सतत टिकली लावल्यामुळे त्या जागी वाईट शक्‍तींचे स्थान निर्माण होण्याचीशक्यता जास्त असते.' - एक विद्वान(सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २३.१.२००५, रात्री ८.०१)(हे शास्त्र माहीत नसल्याने, तसेच हिंदु धर्मातील मांगलिक गोष्टींकडे पहाण्याची अनास्था असल्याने हल्ली स्त्रिया व मुली कुंकू लावण्याऐवजी टिकलीचा वापर सर्रास करतांना दिसतात. - संकलक)


महत्त्व १. कानातील अलंकारांमुळे कानांच्या पाळयांवर दाब येऊन बिंदूदाबनाचे (अँक्युप्रेशरचे) उपाय होतात.


२. `कानात अलंकार घातल्याने कानाची सात्त्विकता वाढून सूक्ष्म-नाद ग्रहण करण्याची क्षमताही वाढते.


३. कानात घालण्याच्या अलंकारांमुळे कानाभोवती चैतन्याचे संरक्षककवच निर्माण होऊन नादलहरींच्या माध्यमातून हल्ला करणार्‍या वाईट शक्‍तींपासून कानाचे रक्षण होते.


४. कानात घालण्याच्या काही अलंकारांच्या हालचालींमुळे सूक्ष्म-नाद निर्माण होऊन कानाचा पडदा व आतील यंत्रणा यांवर उपाय होऊन वाईट शक्‍तींचा त्रास कमी होतो.' - ईश्‍वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १२.११.२००७, रात्री ८.१५)

(संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या मालिकेतील `देवपूजेच्या कृतीचे शास्त्र (पूर्वतयारीसह)')


इंग्रजी मध्ये वाचा : How to identify pure vermilion?


Read more...

आपल्या महान यज्ञसंस्कृतीचे फायदे

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
शारीरिकदृष्ट्या : यज्ञोपचाराने क्षय ,पटकी ,विषमज्वर ,देवी इत्यादी रोग बरे होतात.
मानसिकदृष्ठ्या : अगीहोत्राने तणाव ,व्यसनाधीनता ,घरातील अशांती आदी समस्या दूर होतात.
पर्यावरणदृष्ट्या : अगीहोत्राने प्रदूषणनची समस्या कमी होते व पर्जनयागामुळे पावसाचे प्रमाण वाढते.
आध्यात्मिकदृष्ट्या : यज्ञयाग केल्याने दैवी शक्ती आकृष्ट होऊन सर्वसाधारणत: १० कि.मी. पर्यन्तचे वातावरण सात्विक राहते .
Read more...

स्नान करण्याची योग्य पध्दत

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
पहाटे शक्य नसल्या सूर्योदयानंतर स्नान करावे रासायनिक घटकांपासून बनवलेल्या साबणाने स्नान करण्यापेक्षा सुगंधी तेल व उटणे लावून किंवा आयुर्वेदिक साबणाने स्नान करावे .आंघोळीच्या पाण्यात चमचाभर जाडे मिठ घालावे व उपास्यदेवतेला प्राथेना करावी ,`माझ्या शरिरातील त्रासदायक शक्ती मिठामध्ये शोषून घेतली जाऊन मी शुध्द होऊ दे .'स्नानाला सुरुवात करण्यापूर्वी जलदेवतेला प्रार्थना करावी ,`हे,जलदेवते ,तुझ्या पवित्र जलाने माझे बाह्य शरीर शुध्द होण्याबरोबरच अंतर्मनही शुध्द व निर्मळ होऊ दे .'स्त्रियांनी आधी वेणी घालून मगच स्नानाला सुरुवात करावी .स्नान करतांना पाटावर मांडी घालून बसावे व शक्यतो डोक्यावरुन स्नान करावे .स्नान करताना आपल्या उपास्यदेवतेचा नामजप करावा .

संदर्भ : सनातन वही

Read more...

नमस्कार करतांना पादत्राणे का घालू नयेत ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
सोपानत्कश्चाशनासनशयनाभिवादननमस्कारन वर्जयत् । - गौतमस्मृति ९

अर्थ : बसणे, भोजन करणे, झोपणे, गुरुजनांना अभिवादन करणे व (अन्य श्रेष्ठ व्यक्‍तींना) नमस्कार करणे, ही सर्व कार्ये पादत्राणे घालून करू नयेत। १. `एखादी व्यक्‍ती जेव्हा पादत्राणे घालते, तेव्हा त्या व्यक्‍तीमधील रज-तम वाढते.२. रज-तम वाढलेल्या स्थितीत ती व्यक्‍ती जेव्हा नमस्कार करण्यासाठी हात जोडते, तेव्हा तिच्या कुंडलिनीतील कोणतेही चक्र जागृत होत नाही.३. रज-तम वाढल्याने त्या व्यक्‍तीची सात्त्विकता ग्रहण करण्याची क्षमताही कमी होते. त्यामुळे तिला नमस्काराचे फळ प्राप्‍त होत नाही.४. पादत्राणे घालून देवतांना नमस्कार केल्याने देवता रागावण्याचाही संभव असतो.'

संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती
Read more...

असामान्य पराक्रमातून सातत्याने स्फूर्ति देणार्‍या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
राणी लक्ष्मीबाई यांचा जीवनपट

१. राणी लक्ष्मीबाई

२. असामान्य पराक्रमातून सातत्याने स्फूर्ति देणार्‍या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई
३. झांशीवाली


ज्यांच्याकडून आदर्श घ्यावा असे बरेच पराक्रमी वीर हिंदुस्थानातील १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात चमकले। त्या सर्वांमध्ये असामान्य पराक्रम गाजवणार्‍या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांची आज पुण्यतिथि आहे. त्या निमित्ताने त्यांच्या अल्प चरित्राचे हे अवलोकन !

संदर्भ : राणी लक्ष्मीबाई
Read more...

नमस्कार करतांना डोळे का मिटावेत ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
`दोन्ही हात जोडून नतमस्तक होणे, म्हणजे ईश्‍वराला किंवा समोरच्या व्यक्‍तीतील देवत्वाला प्रणाम करणे होय। आपल्याच अंतर्यामी ईश्‍वराचे दर्शन व्हावे, यासाठी ईश्‍वराला किंवा आदरणीय व्यक्‍तीला वंदन करतांना डोळे मिटावेत.'

संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'
Read more...

मृतदेहाला नमस्कार करण्याऐवजी देवालाच नमस्कार करून प्रार्थना का करू नये ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
कलीयुगात कर्मकांडानुसार `मृतदेहाला चांगली गती प्राप्‍त होऊ दे', अशी ईश्‍वराला प्रार्थना करून मृतदेहाला नमस्कार करण्याची प्रथा आहे. मृतदेहाला नमस्कार करण्याऐवजी देवालाच नमस्कार करून प्रार्थना का करू नये ?

उत्तर : - असे करण्याने कलीयुगातील जिवांसमोर प्रत्यक्ष कृतीतून `थोरामोठ्यांचा आदर राखावा', असा आदर्श निर्माण करणे अशक्य होईल. कलीयुगातील पिढी जी धर्मभ्रष्ट होत चालली आहे, त्या पिढीला प्रत्यक्ष आदर्श वर्तनाच्या निम्न स्तराला येऊन शिकवणेच क्रमप्राप्‍त आहे. कलीयुगातील जीव हे आध्यात्मिकदृष्ट्या अज्ञानी असल्याने त्यांना प्रत्येक गोष्ट त्या त्या स्थळी जाऊन, तिथे नमस्कारासारखी प्रत्यक्ष कृती करून शिकवणे आता महत्त्वाचे बनले आहे. मृतदेहासाठी ईश्‍वराला मानस-नमस्कार करून प्रार्थना केल्यास ते इतरांना कळणार नाही; कारण ते कळण्यासाठी आध्यात्मिक क्षमताच हवी. कलीयुगामधील जिवांमध्ये ती नसल्याकारणाने प्रत्यक्ष कृती करणेच आवश्यक ठरते; म्हणून मृतदेहातील देवाला नमस्कार करणे जास्त चांगले. या कृतीने भावनिक तसेच आध्यात्मिक हे दोन्ही उद्देश साध्य होतात.

संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'

इंग्रजी मध्ये वाचाण्यासाठी येथे टिचकी मारा
Read more...

मृतदेहाला नमस्कार करावा का ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

त्रेता व द्वापार या युगांतील जीव हे कलियुगातील जिवांच्या तुलनेत खूपच सात्त्विक असल्याने त्यांच्या मृतदेहाला नमस्कार करणे योग्य असले, तरी कलियुगात तसे करणे केवळ रूढीमुळे चालू आहे का ? तसे असल्यास ती रूढी बंद करावी का ?

उत्तर : मृतदेहाला नमस्कार करण्याने त्याच्याबद्दल आदराची भावना व्यक्‍त करून इतरांसमोर वरिष्ठांचा मान राखावा, हा आदर्श ठेवता येतो. कलियुगात या प्रक्रियेतून आध्यात्मिक स्तरावरील फायदा न मिळता फक्‍त भावनिक स्वरूपाचाच फायदा मिळणे शक्य होते म्हणून ही रूढी बंद करू नये, तर त्यातून आध्यात्मिक फायदा कसा मिळवावा, हे शिकावे. जिवाची सात्त्विकता कमी झाल्याने कलियुगात या प्रक्रियेला रूढीचेच स्वरूप प्राप्‍त झाले आहे; परंतु `भाव तेथे देव' या उक्‍तीप्रमाणे मृतदेहाला म्हणजेच मृतदेहातील ईश्‍वरालाच आपण नमस्कार करत आहोत, या भावाने आपण त्याच्यासमोर नतमस्तक झालो, तर मृतदेहातील ईश्‍वरी अंश प्रकट होऊन आपल्याला त्याचा आशीर्वाद मिळण्यास मदत होते; कारण ईश्‍वर हे अविनाशी तत्त्व आहे, त्याला देहबंधन नाही.

संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'

इंग्रजी मध्ये माहीती हवी असल्यास येथे टिचकी मारा

Read more...

एकमेकांना भेटतांना कशा प्रकारे नमस्कार करावा ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

परस्परांना भेटतांना एकमेकांसमोर उभे राहून दोन्ही हातांची बोटे जुळवून अंगठ्यांची टोके स्वत:च्या अनाहतचक्राशी टेकवून नमस्कार करावा. असा नमस्कार केल्याने जिवात नम्रभावाचे संवर्धन होऊन ब्रह्मांडातील सात्त्विक लहरी जिवाच्या चार बोटांतून संक्रमित होऊन अंगठ्यातून शरिरात गेल्यामुळे जिवाचे अनाहतचक्र जागृत होते. यामुळे जिवाची आत्मशक्‍ती कार्यरत होते. तसेच परस्परांना नमस्कार केल्याने एकमेकांकडे आशीर्वादात्मक लहरींचे प्रक्षेपण होते. यामुळे दोघांनाही दोघांतील जागृत झालेल्या देवत्वाचा लाभ मिळण्यास मदत होते.'





संदर्भ : सनातन-निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'


वाचा : Why 'Namaskar' and not a 'hand shake'?

.
Read more...

सौभाग्यवतीने ज्येष्ठांना नमस्कार करतांना तीन वेळा हात खाली-वर का करावा ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
सौभाग्यवती स्त्री ही आदिमायेच्या अप्रकट निर्गुण स्तरावरील सुप्‍त शक्‍तीचे द्योतक आहे। ती मायेतूनही अद्वैत साधून देणारे आदिशक्‍तीचे सगुण रूप आहे. ज्या वेळी आपण कुठल्याही गोष्टीचा त्रिवार उच्चार करतो किंवा एखादी गोष्ट त्रिवार करतो, त्या वेळी ईश्‍वराची संकल्पशक्‍ती इच्छा, क्रिया व ज्ञान या तीन शक्‍तींच्या स्तरांवर कार्यरत होते. यामुळे आपण हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास जाते. सुवासिनी स्त्रीमध्ये आदिमाया-आदिशक्‍तीचे बीज हे सुप्‍तावस्थेत असल्याने तिच्या खाली वाकून त्रिवार हात हालवण्याने उत्पन्न होणार्‍या शक्‍तीरूपी रजोलहरींच्या वेगवान प्रक्षेपणामुळे, तसेच तिच्यातून प्रकट होणार्‍या लीनभावामुळे समोरील वरिष्ठ जिवातील देवत्व प्रकट होऊन तिला तीनही शक्‍तींच्या बळावर कार्य करण्यासाठी प्रकट शक्‍ती पुरवते. या शक्‍तीमुळे तिची आत्मशक्‍ती कार्यरत होते. या शक्‍तीमुळे तिच्या क्रियमाणाला गती प्राप्‍त होऊन ती आदिमायेच्या बळावर आपल्या कुटुंबाचा उद्धार करते. तिच्यातून प्रक्षेपित होणार्‍या रजोगुणी चैतन्यलहरींच्या वेगवान प्रक्षेपणाचा फायदा तिच्या पतीलाही मिळाल्याने तोही प्रत्यक्ष शिवाच्या रूपात मायेत कार्य करू शकतो.'

संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'
Read more...

औक्षण करतांना नाण्याऐवजी दागिन्याने ओवाळण्यामागील शास्त्र काय ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
`सोन्याचे किंवा चांदीचे नाणे किंवा या धातूंची पट्टी वापरल्याने, त्यांच्यातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींचा स्तर जास्त प्रमाणात सपाट पृष्ठभाग असल्याने सत्त्वगुणाशी, म्हणजेच निर्गुणाशी संबंधित असतो. याउलट त्या धातूंचे दागिने वापरले असता, त्यांवर असलेल्या नक्षीमुळे त्या त्या घटकाची सगुणाशी संबंधित रजोगुणी लहरी प्रक्षेपित करण्याची क्षमता वाढते व या लहरी सत्त्वगुणी लहरींपेक्षा कनिष्ठ स्तरावरील असल्याने सर्वसामान्य जिवाला सहज ग्रहण होऊन त्या त्या स्तरावर त्या त्या लहरींचा फायदा मिळणे सुलभ होते; म्हणून शक्यतो औक्षणात दागिने वापरले जातात.

संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील ग्रंथ `धार्मिक व सामाजिक कृतींमागील शास्त्र'

इंग्रजी मध्ये माहिती हवी असल्यास येथे टिचकी मारा
Read more...

औक्षण करतांना अंगठी (दागिना) व सुपारी हातात घेऊन त्यांनी का ओवाळतात ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

`अंगठी व सुपारी या दोन्ही गोष्टी जिवाने हाती घेतलेल्या कार्याला पूरक, म्हणजेच कारक आहेत. औक्षण करण्यापूर्वी देवतेला शरण जाऊन प्रार्थना केल्याने तबकातील सर्वच घटक देवतांकडून येणार्‍या सात्त्विक लहरींनी भारित झालेले असतात. सोन्याची अंगठी ही सत्त्वगुणप्रधान असल्याने अंगठीतून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरी या सुपारीतून प्रक्षेपित होणार्‍या आपतत्त्वाच्या लहरींमुळे थोड्याफार प्रमाणात रजोगुणी, म्हणजेच प्रवाही बनतात. यामुळे अंगठीतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींचे रूपांतर जिवाला पेलवेल, अशा सगुण लहरींत होणे सोपे जाते. यामुळे जिवाला त्याच्या क्षमतेएवढे देवतेचे तत्त्व मिळण्यास मदत होते.'

संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील ग्रंथ `धार्मिक व सामाजिक कृतींमागील शास्त्र'

इंग्रजी मध्ये माहिती हवी असल्यास येथे टिचकी मारा

Read more...

पती व पत्‍नी यांनी जोडीने नमस्कार करतांना पत्‍नीने पतीच्या कोणत्या बाजूस राहून नमस्कार करावा ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
कोणतेही कर्म करतांना पत्‍नीने पतीच्या उजव्या बाजूस रहावे। पत्‍नीला नवर्‍याची अर्धांगी म्हणजेच उजवी नाडी समजतात. उजवी नाडी ही कार्याला ऊर्जा पुरवणार्‍या आदिशक्‍तीच्या प्रकट कार्यरत शक्‍तीचे प्रतीक आहे, तर पुरुषतत्त्वाचे निदर्शक असणारी डावी नाडी ही आदिशक्‍तीने पुरवलेल्या कार्यऊर्जेच्या बळावर प्रत्यक्ष कार्य करणार्‍या शिवाचे प्रतीक आहे. शिवाची शक्‍ती म्हणून पत्‍नीने पतीच्या उजव्या बाजूला राहून त्याला प्रत्येक कर्मात साथ द्यावयाची असते. प्रत्येक पूजाविधीमध्ये प्रत्यक्ष कर्म न करता पत्‍नी फक्‍त पतीच्या उजव्या हाताला आपल्या चार बोटांचा स्पर्श करून त्याला पूजाविधीमध्ये लागणारी श्री दुर्गादेवीची क्रियाशक्‍ती पुरवते. म्हणून यजमान व त्याची पत्‍नी यांनी केलेले कर्म शिव-शक्‍तीची जोड मिळाल्याने कमी कालावधीत फलद्रूप होते.

संदर्भ : सनातनच्या `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'

इंग्रजी मध्ये माहीती हवी असल्यास येथे टिचकी मारा
Read more...

विवाहानंतर पती व पत्‍नी यांनी जोडीने नमस्कार का करावा ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

`विवाह म्हणजे शिवरूपी पती व शक्‍तीरूपी पत्‍नी या तत्त्वांचा संगम होय। प्रत्येक कर्म हे शिवरूपी सगुण क्रियाशक्‍ती (प्रत्यक्ष कार्य करणे) व त्या कर्माला गती प्राप्‍त करून देणारी, तसेच जास्तीतजास्त प्रमाणात निर्गुणाशी संबंधित असणारी शक्‍ती यांच्या जोड संगमाने पूर्णत्वास जाते. विवाहानंतर दोन्ही जीव गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतात. गृहस्थाश्रमात एकमेकांना पूरक होऊन संसारसागरातील कर्मे करणे व त्यासाठी थोरामोठ्यांचा एकत्रितपणे आशीर्वाद घेणे महत्त्वाचे ठरते. दोघांनी एकत्रितपणे नमस्कार केल्यास ब्रह्मांडातील शिव-शक्‍तीरूपी लहरी कार्यरत होऊन जिवांमध्ये लीनभावाचे संवर्धन होऊन गृहस्थाश्रमात परिपूर्ण कर्म घडून त्याची योग्य फलप्राप्‍ती झाल्याने कमीतकमी देवाणघेवाण हिशोब निर्माण होणे शक्य होते; म्हणून विवाहानंतर दोघांनी प्रत्येक कर्माला पूरक बनून नमस्कारासारख्या कृतीतूनही एकमेकांना अनुमोदन देणे, असा वरील कृतीमागील उद्देश आहे.

पती व पत्‍नी यांची आध्यात्मिक पातळी किंवा ईश्‍वराप्रती असलेला भाव ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास त्यांनी एकत्रितपणे नमस्कार करणे अथवा एकट्याने नमस्कार करणे किंवा मानस नमस्कार करणे यांतून होणारी फलप्राप्‍ती एकच असते; म्हणूनच प्रत्यक्ष कर्मापेक्षा त्यापाठी असलेल्या ईश्‍वराप्रतीच्या भावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. (पती-पत्‍नीपैकी नमस्कार करायला एकच उपस्थित असेल, तर एकट्यानेच नमस्कार करावा. )


संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'

इंग्रजी मध्ये माहीती हवी असल्यास येथे टिचकी मारा
Read more...

वयोवृद्धांना नेहमी नमस्कार का करावा ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
ऊर्ध्वं प्राणा ह्युत्क्रामन्ति यून: स्थविर आयति ।
प्रत्युत्थानाभिवादाभ्यां पुनस्तान्प्रतिपद्यते ।।
- मनुस्मृति २.१२०; महाभारत, उद्योग. ३८.१, अनु. १०४, ६४-६५.
अर्थ : वृद्ध पुरुषाचे आगमन झाल्यावर तरुण व्यक्‍तीचे प्राण वरच्या दिशेने सरकू लागतात व जेव्हा तो उठून नमस्कार करतो, तेव्हा तो प्राणांना पूर्वस्थितीत प्राप्‍त करतो.


`वृद्ध व्यक्‍तीचा प्रवास हा हळूहळू दक्षिण दिशेला, म्हणजे यमलोकाकडे (मृत्यूकडे) होत असल्याने तिच्या शरीरातून रज व तम लहरींचे प्रक्षेपण मोठ्या प्रमाणावर होऊ लागते. अशी वृद्ध व्यक्‍ती समोर आल्यावर तरुण व्यक्‍तीच्या शरीरावर त्या लहरींचा परिणाम होतो व त्या दोघांमध्ये सूक्ष्म-चुंबकीय क्षेत्र तयार होते. त्यामुळे तरुण व्यक्‍तीचे पंचप्राण वर उचलले जातात. अशा प्रकारे अचानक पंचप्राणांना मिळालेल्या गतीमुळे व्यक्‍तीला त्रास होण्याची शक्यता असते. जेव्हा तरुण व्यक्‍ती वृद्ध व्यक्‍तीला नमस्कार करते, तेव्हा तरुण व्यक्‍तीतील सुषुम्नानाडी काही प्रमाणात जागृत होते व तरुण व्यक्‍तीतील सत्त्वगुण वाढू लागतो. त्यामुळे तिच्यातील रज व तम गुणांवर सत्त्वगुणाचा प्रभाव होऊ लागतो व तिचे प्राण पूर्वस्थितीत येतात. यासाठी वृद्ध व्यक्‍तीचे आगमन होताच तिला लहानांनी नमस्कार करण्याची पद्धत आहे.'


संदर्भ : सनातन निर्मित `धर्मशास्त्र असे का सांगते ?' या ग्रंथमालिकेतील भाग ३ `नमस्काराच्या योग्य पद्धती'

इंग्रजी मध्ये माहीती हवी असल्यास येथे टिचकी मारा

Read more...