
भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी आहे. त्या निमित्त श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण श्री गणपतीच्या मूर्तीच्या विविध भागांचा भावार्थ पाहूया. सनातनची सात्त्विक श्री गणेशमूर्ती गणपतीला तुळस न वहाण्याचे कारण पौराणिक कारण : `एक अप्सरा अती सुंदर होती. तिला उत्तम पती हवा होता. त्यासाठी ती उपवास, जप, व्रते, तीर्थयात्रा वगैरे सतत करत होती. एकदा तिला ध्यानात मग्न असलेला श्री गणपति दिसला. तिला तो फार आवडला; म्हणून...