गणेशोत्सव विशेष - १

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
भाद्रपद शु. चतुर्थीला (३.९.२००८ रोजी) श्री गणेश चतुर्थी आहे. त्या निमित्त श्री गणपतीविषयी उद्बोधक माहिती येथे देत आहोत. आज आपण श्री गणपतीच्या महागणपति या नावाचा अर्थ, तसेच श्री गणपतीचे महत्त्व, कार्य व त्याची वैशिष्ट्ये पाहू.
महागणपति

ऋद्धि-सिद्धि (शक्‍ती) यांच्यासहित असलेला श्री गणपति म्हणजे महागणपति होय. `पार्वतीने तयार केलेला गणेश हा महागणपतीचा अवतार होय. तिने मृत्तिकेचा आकार करून त्यात श्री गणपतीचे आवाहन केले. जगदुत्पत्ती होण्यापूर्वी निर्गुण व कूटस्थ स्वरूपात असल्यामुळे महत्तत्त्वास महागणपति म्हणतात. महागणपति जेव्हा विशिष्ट सिद्धी किंवा निखळ मोक्षप्राप्‍तीस्तव आराधला जातो, तेव्हा उजवीकडे सोंड असलेला श्री गणपति घेण्याची प्रथा आहे; पण अशा वेळी तो शक्यतो पार्थिव श्री गणपति असतो. काही सोन्याचांदीच्या उजव्या सोंडेच्या श्री गणपतीच्या मूर्ती क्वचित आढळतात. `प्रत्येक पुरुषदेवतेची एकेक शक्‍ती मानली जाते, उदा. ब्रह्मा - भारती, श्रीविष्णु - श्री लक्ष्मी, शिव - पार्वती. गाणपत्यांनीही परब्रह्मरूप गणपतीची एक शक्‍ती मानली असल्यास नवल नाही. श्री गणपति त्याच्या शक्‍तीस मांडीवर घेऊन आलिंगन देत असल्याचे शिल्प उपलब्ध आहे. आजही असे रंगवलेले चित्र पहावयास मिळते. त्याचप्रमाणे `सिद्धि' आणि `बुद्धि' या त्याच्या दोन पत्‍नी त्याच्या दोन्ही बाजंूस बसलेल्या आहेत, असेही शिल्प उपलब्ध आहे. या शक्‍तीसह श्री गणपतीला तंत्रशास्त्रात `महागणपति' असे म्हटले आहे।


महत्त्व

कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम श्री गणपतिपूजन करण्याचे महत्त्व : पूजास्थानी इतर देवता श्री गणपतीच्या परवानगीशिवाय कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत; म्हणून कोणतेही मंगलकार्य किंवा इतर कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम श्री गणपतिपूजन करतात. श्री गणपतीने एकदा दिशा मोकळया केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करत असतो, ती तेथे येऊ शकते. यालाच महाद्वारपूजन किंवा महागणपतिपूजन असे म्हणतात. (गाणपत्य संप्रदायात ब्रह्म याऐवजी गणपति व परब्रह्म याऐवजी महागणपति हे शब्द वापरतात.)

कार्य व वैशिष्ट्ये


अ. विघ्नहर्ता : विघ्नहर्ता असल्याने तमाशापासून विवाहापर्यंत, तसेच गृहप्रवेशादी सर्व विधींच्या आरंभी श्री गणेशपूजन असते.
आ. प्राणशक्‍ती वाढवणारा : मनुष्याच्या शरिरातील निरनिराळी कार्ये निरनिराळया शक्‍तींद्वारे होत असतात. (या निरनिराळया शक्‍तींबद्दल माहिती सनातनच्या `हठयोग' या ग्रंथातील `प्रकरण ६. प्राणायाम' यात दिली आहे.) त्या निरनिराळया शक्‍तींच्या मूलभूत शक्‍तीला `प्राणशक्‍ती' असे म्हणतात. श्री गणपतीचा नामजप प्राणशक्‍ती वाढवणारा आहे. (क्रमश:)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `गणपति')


हिंदूंनो, गणेशोत्सवातील गैरप्रकार बंद करण्यासाठी सनदशीर मार्गाने लढा द्या !

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात चौकाचौकात ध्वनीक्षेपकावर मोठ्याने गाणी लावली जातात. त्यासाठी मोठे ध्वनीवर्धक लावून ही सार्वजनिक मंडळे एकामेकांशी चढाओढ करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होते व अवतीभोवती रहाणार्‍या जनतेचे जगणे दुर्धर होऊन जाते. यात त्या मंडळांतील सदस्यांच्या ओरडण्याचीही भर असते. असे ध्वनीवर्धक रात्री उशिरापर्यंत लावले जातात. सार्वजनिक ठिकाणी ध्वनीवर्धकावर मोठ्या आवाजात गाणे लावून अवतीभोवती रहाणार्‍या लोकांना त्रास होईल, असे वर्तन करणे कायद्याने गुन्हा आहे. आपल्याला असा त्रास झाल्यास मंडळांच्या विरोधात पोलिसांत लेखी फिर्याद नोंदवा. त्याची एक प्रत सनातनला पाठवा. पोलीस ठाण्यात जातांना दोन-चार जणांना बरोबर घेऊन जा. ध्वनीमुद्रक घेऊन जा. पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेण्यास नकार दिल्यास त्यांच्या वरिष्ठांकडे त्याच्याविरुद्ध तक्रार करा.

निगडीत वृत्त : श्री गणपति विशेष

गणेशोत्सव जनजागृती चळवळीत आपण हे करू शकता !
वक्रमार्गाने चालणार्‍यांना शिक्षा करून सरळ मार्गावर आणणारा तो वक्रतुंड !

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: