चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मशिक्षण (स्नानाचे प्रकार)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
स्नानाच्या संदर्भातील आचार


१. स्नानाचे महत्त्व : `स्नान केल्याने जिवाच्या देहाभोवती आलेले काळे आवरण व जिवाच्या देहातील रज-तम यांचे उच्चाटन होऊन जिवाच्या देहातील पेशी-पेशी चैतन्य ग्रहण करण्यास पोषक होतात. तसेच तोंड धुणे व शौचक्रिया यांमुळे जिवाच्या देहातून बाहेर न पडलेल्या त्रासदायक घटकांचे स्नानाच्या माध्यमातून विघटन होते.' - एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, १९.६.२००७, दुपारी ३.५१)

२. स्नान केल्याने होणारे फायदे
२ अ.
`स्नानामुळे जिवाच्या देहातील रज-तम कणांचे प्रमाण कमी होऊन जीव वायूमंडलात प्रक्षेपित होत असलेल्या सत्त्वलहरी सहजतेने ग्रहण करू शकतो.

२ आ. स्नान केल्यामुळे जिवाच्या बाह्यमंडलात स्थिरता येण्यास मदत होते. त्यामुळे स्नानानंतर देवपूजा करतांना जीव वृत्ती अंतर्मुख करून वायूमंडलाशी पटकन एकरूप होऊ शकतो व वायूमंडलाच्या पोषकतेच्या अनुषंगाने देवतेच्या लहरी ग्रहण करू शकतो.'

२ इ. प्रात:स्नानाचे फायदे
२ इ १. प्रात:स्नानाने (सकाळी केलेल्या स्नानाने) तेजोबल व आयुष्य वाढते आणि दु:स्वप्नांचा नाश होतो.
२ इ २. `सूर्योदयापूर्वी मंगलस्नान केल्याने जीव अंतर्-बाह्य शुद्ध होऊन त्या काळातील सात्त्विक लहरी ग्रहण करू शकतो.'
- श्री गणपति (कु. मेघा नकाते यांच्या माध्यमातून, ११.१०.२००५, दुपारी १२.२५)

३. स्नानाचे प्रकार : हे समजून घेण्यापूर्वी काळाच्या संदर्भातील पुढील माहिती समजून घेणे आवश्यक आहे. सूर्योदयापूर्वी २ घटिका (४८ मिनिटे) `उष:काल' असतो. उष:काल म्हणजे अंधार संपून उजेड दिसायला लागण्याचा काळ. यालाच `तांबडे फुटायला लागले', असे म्हणतात. उष:कालाच्या पूर्वीच्या ३ घटिका (७२ मिनिटे, म्हणजे १ तास १२ मिनिटे) `ब्राह्ममुहूर्तकाल' असतो. सूर्योदयाच्या वेळेनुसार उष:काल व ब्राह्ममुहूर्तकाल यांच्या वेळाही बदलतात.

३ अ . ब्राह्ममुहूर्तावर स्नान करणे : `ब्राह्ममुहूर्तावर स्नान करणे, म्हणजे जिवाद्वारे देवपरंपरेचे पालन करणे. ब्राह्ममुहूर्तावर केलेले स्नान हे `देवपरंपरा' या श्रेणीत येते. देवपरंपरेमुळे जिवाला पुढील लाभ होतात.

३ अ १. जिवावर शुद्धता, पवित्रता व निर्मळता हे संस्कार होणे : `ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी जिवाचा मनोदेह स्थिर-अवस्थेत असतो. त्यामुळे त्या कालावधीत स्नान केल्याने जिवावर शुद्धता, पवित्रता व निर्मळता हे संस्कार कालाच्या आधारे होतात.

३ अ २. ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी प्रक्षेपित होत असलेले ईश्‍वरी चैतन्य व देवतांच्या लहरी ग्रहण करण्यास जीव समर्थ बनणे : ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी देवतांच्या लहरी अन्य कालापेक्षा जास्त पटीने कार्यरत असतात. `स्नान करणे' यासारख्या प्रत्यक्ष आवाहनदर्शक कृतीच्या माध्यमातून देवतांचे तत्त्व जिवाकडे आकृष्ट होते. तसेच या कालावधीत जिवावर स्नानाच्या माध्यमातून झालेल्या स्थूल व सूक्ष्म स्वरूपांच्या संस्कारांमुळे जीव ब्राह्ममुहूर्तावर प्रक्षेपित होत असलेले ईश्‍वरी चैतन्य व देवतांच्या लहरी ग्रहण करण्यास समर्थ होतो.

३ अ ३. ईश्‍वराच्या पूर्णात्मक चैतन्याशी एकरूप होता येणे : शुद्धता, पवित्रता आणि निर्मळता या तीन संस्कारांच्या माध्यमातून जिवाला ईश्‍वराच्या संकल्प, इच्छा आणि क्रिया या तीन प्रकारच्या शक्‍ती व या तीन शक्‍तींच्या अनुषंगाने ज्ञानशक्‍तीही ग्रहण करता येऊन ईश्‍वराच्या पूर्णात्मक चैतन्याशी एकरूप होता येते.'
- एक ज्ञानी (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून, ७.१०.२००६, दुपारी ५.५९)

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: