चातुर्मासाच्या निमित्ताने धर्मशिक्षण

1 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
वास्तूत रहाणार्‍या व्यक्‍तीच्या चांगल्या अथवा वाईट प्रवृत्तीचा परिणाम वास्तूवर होतो !

आषाढ शुद्ध एकादशीपासून चातुर्मासाला आरंभ झाला. त्यानिमित्त वाचकांसाठी आचारधर्माविषयीचे विवेचन येथे देत आहोत. काल आपण आचारधर्म पाळल्यामुळे व्यष्टीच्या संदर्भात होणारे अंतर्शुद्धी व इतर फायदे पाहिले. आज `वास्तूशुद्धी' विषयी माहिती जाणून घेऊया।




आचारधर्म पाळल्यामुळे होणारे फायदे
१ ई. वास्तूशुद्धी
१ ई १. अर्थ : वास्तूतील त्रासदायक स्पंदने नष्ट करून चांगली स्पंदने निर्माण करणे म्हणजे वास्तूशुद्धी.
१ ई २. वास्तूदोष : वास्तूची अयोग्य रचना, वास्तूवर सातत्याने होणारे रज-तम कणांचे आघात, वास्तूत राजसिक-तामसिक प्रवृत्तीच्या व्यक्‍ती रहात असल्यास त्यांच्यामुळे निर्माण होणारी त्रासदायक स्पंदने, वाईट शक्‍तींचा त्रास इत्यादींचा परिणाम वास्तूवर होतो. त्यामुळे वास्तूत त्रासदायक स्पंदने, म्हणजे वास्तूदोष निर्माण होतो.
१ ई ३. वास्तूशुद्धीची आवश्यकता : वास्तूदोषामुळे वास्तूत रहाणार्‍यांच्या जीवनात शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक व आध्यात्मिक अडथळे येतात. वास्तूदोषामुळे साधकांच्या साधनेतही अडथळे येतात.

१ ई ४. वास्तूशुद्धीच्या काही पद्धती
अ. वास्तूमध्ये दररोज गोमूत्र किंवा विभूतीचे पाणी (विभूती घातलेले पाणी) शिंपडावे व विभूती फुंकरावी.
आ. वास्तूमध्ये दररोज सकाळ-संध्याकाळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा व उदबत्ती लावावी, तसेच धूप घालावा.
इ. देवघरात देवाचे चित्र पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करून ठेवावे.
ई. घरातील सर्वांनी एकत्र येऊन देवाला प्रार्थना करावी, थोडा वेळ नामजप करावा व देवतांची स्तोत्रे म्हणावीत.
उ. भिंतींवर देवतांच्या नामपट्ट्यांचे मंडल करून त्याद्वारे सूक्ष्म-छत (संरक्षककवच) करावे. (याविषयी सविस्तर माहिती सनातनचे हस्तपत्रक `वास्तूशुद्धी व वाहनशुद्धी यांसाठीच्या काही सुलभ पद्धती' यात दिली आहे.)
ऊ. घरातील सर्वांनी आचार-विचार चांगले ठेवावेत.
ए. तीव्र वास्तूदोष असल्यास वास्तूशांती करावी.

२. काम-क्रोधादी विकारांना नष्ट करण्याचे सामर्थ्य आचारधर्मात असणे : `हिंदूंच्या आचारांत शरीरशुद्धी व मानसशुद्धी आहे, शिवाय वासनांवरील नियंत्रण आहे. हिंदूंचे आचार ईश्‍वराभिमुख करणारे व पापापासून रक्षण करणारे आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मोह व मत्सर या षड्रिपूंवरील नियंत्रणाची व्यवस्था आचारधर्मात आहे.' - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

३. दु:खांचा नाश करण्याचे सामर्थ्य आचारधर्मात असणे
युक्‍ताहारविहारस्य युक्‍तचेष्टस्य कर्मसु ।
युक्‍तस्वप्नावबोधस्य योगो भवति दु:खहा ।।
- श्रीमद्भगवद्‌गीता, ६.१७

अर्थ : जो आहार-विहार, झोपणे-जागणे, व्यवहार व आपले प्रत्येक कर्म नियमित आणि यथायोग्य करतो, त्यालाच योग प्राप्‍त होऊन त्याच्या दु:खांचा नाश होतो.(क्रमश:)

1 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा:

आशा जोगळेकर said...

वास्तु शुध्दी विषयी छान माहिती मिळाली. आभार.