विज्ञानवाद्यांचे (गैर)समज !

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

`कोट्यवधींच्या मलमूत्राने प्रदूषित झालेली गंगा पवित्र कशी ?', असे विज्ञानवादी म्हणतात !
गंगा-यमुनेच्या संगमावर एवढा मोठा जनसमुदाय पाण्यात उतरतो तेव्हा थुंकी, मूत्र, विष्ठा, घाम यांमुळे प्रदूषित झालेल्या पाण्याने संसर्ग होऊ शकतो, असे विज्ञानवादी म्हणतात.

पवित्र व अस्वच्छ आणि शुद्ध-अशुद्ध यांतील फरक न समजणारे विज्ञानवादी !
तीर्थक्षेत्रांचे पाणी अशुद्ध होते ही मानवनिर्मित चूक असली, तरीही त्याचे पावित्र्य कमी होत नाही ! पवित्र व अपवित्र यांतील फरक सूक्ष्मातील स्पंदने जाणवणार्‍यांनाच कळतो. शुद्ध-अशुद्ध हे भौतिकशास्त्रात येते. म्हणून गंगाजळासारखी एखादी गोष्ट पवित्र परंतु अशुद्ध असू शकते ! अशुद्धतेचा भाग बुद्धीने नाहीसा करता येतो !

`लग्नकार्यात वधूवरांच्या डोक्यावर वहाणार्‍या अक्षतांमुळे तांदुळ फुकट जातो', असे विज्ञानवाद्यांना वाटते !
लग्नात अक्षता (म्हणजे न तुटलेले अख्खे तांदुळ) वापरण्याचे अध्यात्मशास्त्रदृष्ट्या कारण असे की, अक्षतांत विविध लोकांतील पवित्रके (सूक्ष्मातिसूक्ष्म देवतातत्त्वे) खेचून घेण्याची क्षमता असते. वधूवरांवर अक्षता टाकल्याने त्यांना त्या तत्त्वाचा फायदा होतो ! तसेच अक्षतांचे धान्य सफलता व सुपिकता याचेही प्रतीक आहे. विज्ञानवाद्यांना गरिबांचा एवढाच पुळका असेल, तर त्यांनी लग्नातील इतर अवाढव्य खर्च टाळून तो गरिबांना द्यावा.

`अत्यंसंस्कार व श्राद्ध यांपेक्षा समाजसेवा महत्त्वाची', असे विज्ञानवाद्यांना वाटते !
मंत्राग्नि देणे, श्राद्ध, त्रिपिंडी श्राद्ध, नारायण नागबळी, वगैरे विधी न केल्यास मृताला योग्य गती न मिळाल्याने काही जणांना त्याचा खूप त्रास होऊ शकतो।

`गाड्यांना मिरची-लिंबू बांधणे हास्यास्पद आहे', असे विज्ञानवाद्यांना वाटते !
विज्ञानवाद्यांचा स्पंदनशास्त्राचा अभ्यास नसल्याने वस्तूतील स्पंदने कळत नाहीत. असे विज्ञानवादी हसण्याव्यतिरिक्‍त काय करणार ? मिरची, लिंबू, बिब्बा इत्यादी पदार्थांत वाईट शक्‍तींची स्पंदने शोषून ती नष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळेच एखाद्या ठिकाणी गाडीवर वाईट शक्‍तींचा परिणाम होणार असेल, तर त्याची तीव्रता कमी होऊ शकते किंवा तो होत नाही.

`पिंडाला कावळा शिवणे, हे थोतांड आहे !' असे विज्ञानवादी म्हणतात !
पिंडाला कावळा शिवणे किंवा न शिवणे यामागचे शास्त्र : कावळयात मृताचा आत्मा शिरतो व तो पिंडाला शिवतो, असे नसून ज्या मृतात्म्याच्या इच्छा, वासना, हेतू राहिली असेल, तो पिंडावर येऊन बसतो व कावळयाला स्पर्श करू देत नाही. म्हणजे आत्मा पिंडावर असतो, कावळयात शिरलेला नसतो !
0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: