स्नानानंतर प्राणायाम का करावा ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा

पूजकाने स्नान केल्यावर लगेच प्राणायाम करावा. प्राणायाम केल्यामुळे जिवाच्या पंचप्राणांची काही प्रमाणात शुद्धी होऊन जिवाच्या देहात असलेल्या काळया शक्‍तीचे विघटन होते. तसेच स्नान केल्यामुळे जिवाच्या देहाची सात्त्विकता काही अंशी वाढल्याने प्राणायामाच्या आधारे जिवाला सात्त्विकता जास्त काळापर्यंत टिकवून ठेवणे शक्य होते.सर्वसाधारणत: पूजाविधीच्या विविध कृतींतून जिवासाठी आवश्यक वायूमंडलाची निर्मिती होत असते. त्यामुळे प्राणायाम करण्याची विशेष आवश्यकता नसते. मात्र सध्याच्या काळात रज-तम यांचे प्रमाण जास्त असल्याने प्राणायामाने देहाची सात्त्विकता टिकवावी लागते. देह सात्त्विक असल्यास जिवाने पूजाविधीला सुरुवात करताच ईश्‍वरी तत्त्वाच्या स्रोताशी पटकन जुळवून घेतल्याने पूजेची गुणवत्ताही वाढते; म्हणून शक्यतो जिवाने आंघोळ झाल्यावर लगेच प्राणायाम करावा.
.

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: