पूजा कधी करावी ?

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा
स्नानामुळे वाढलेल्या सात्त्विकतेचा लाभ होण्यासाठी स्नान केल्यावर शक्यतो एका तासाच्या आत पूजा सुरू करावी.

स्नान केल्यावर एका तासानंतर स्नानामुळे वाढलेली सात्त्विकता वायूमंडलातून होत असलेल्या रज-तमाच्या सततच्या हल्ल्यामुळे क्षीण होण्यास सुरुवात होते। त्यामुळे जिवाला स्नानामुळे वाढलेल्या सात्त्विकतेचा लाभ होत नाही; म्हणून शक्यतो स्नानानंतर एका तासाच्या आत पूजा सुरू करावी.'

खरे स्नान
अ. न उदकक्लिन्नगात्रस्तु स्नात: इत्यभिधीयते । - महाभारत, १३.१११.९

अर्थ : (केवळ) शरिराचे अवयव पाण्याने भिजले म्हणजे त्याला `स्नान केलेला' म्हणत नाहीत। ज्याने इंद्रियनिग्रहरूपी जलाने स्नान केले, तो अंतर्बाह्य शुद्ध होय. आ. जिवाचा देह व अंत:करण यांतील मळरूपी विकार काढण्याच्या क्रियेला `स्नान' असे म्हणतात; म्हणून `सतत साधना करणे', हेच खरे स्नान होय.

साभार : सनातनचा ग्रंथ `पूजेपूर्वी करावयाची वैयक्‍तिक तयारी'

0 आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा: